शेअर मार्केट माहिती करता वेबसाईट्स लिस्ट – Share market information website list

शेअर मार्केट माहिती करता वेबसाईट्स लिस्ट

जेव्हा स्टॉक मध्ये गुंतवणूक करण्याची वेळ येते तेव्हा स्मार्ट गुंतवणूकदार कंपनी विश्लेषण  ला महत्त्व देतात.तुम्हाला गुंतवणूक करण्यापूर्वी गुंतवणूक करणारी कंपनी कशी आहे म्हणजे कंपनीची भविष्यातील योजना,अन्य महत्वाच्या गोष्टीची माहिती घ्यायला हवी.

नवीन ट्रेडर साठी फंडामेंटल विश्लेषण  बरोबर टेक्निकल विश्लेषण ,मार्केट विश्लेषण  आणि त्या कंपनीचा संपूर्ण रिविवं दाखवणाऱ्या फ्री वेबसाईट खूप उपयोगी ठरतात.

ह्या लेखामध्ये आपण हे विश्लेषण  दाखवणाऱ्या फ्री वेबसाईटस पाहणार आहोत.

स्टॉक मार्केट विश्लेषण  : Share market information website list

स्टॉक मध्ये गुंतवणूक करण्याचे कारण असते की चांगला रिटर्न्स भेटावा.जेव्हा तुम्ही एखाद्या स्टॉक चे विश्लेषण  करता,त्या कंपनीची महिती पाहता आणि शेवटी तुम्ही तो शेअर खरेदी किंवा विक्री करण्याचा निर्णय घेता,तेव्हा तुम्हाला त्या विश्लेषण  केलेल्या स्टॉक मधून चांगला रिटर्न मिळतो.स्टॉक मार्केट मध्ये कधीही काहीही होऊ शकते.तुम्ही स्टॉक चे विश्लेषण  करताना आर्थिक बातम्या नक्की पाहिल्या पाहिजेत.

जेव्हा तुम्ही विश्लेषण  करण्यामध्ये प्राविण्य मिळवता तेव्हा तुम्ही योग्य स्टॉक बय आणि सेल करण्यासाठी निवडू शकता.बाकीचे काय करतात ,ज्या स्टॉक मध्ये मोठया गुंतवणूकदारांनी गुंतवणूक केली आहे त्यात आपले पैसे टाकतात.हे पूर्णपणे चुकीचे आहे.पैसे आपले आहे तर रिस्क पण आपलीच पाहिजे.जेव्हा तुम्ही विश्लेषण  मधील रिपोर्ट्स वाचत असाल तेव्हा दुसर्याने केलेले ओपिनियन वाचायचे टाळा.विश्लेषण

तुम्ही यु ट्यूब चॅनेल वरून देखोल स्टॉक विश्लेषण  शिकू शकता.

 काही वेळा काय होत आपण एका स्टॉक चे खूप रिपोर्ट्स वाचतो अन गोंधळात पडतो.असे करण्यापेक्षा एका व्यक्तीचे यु ट्यूब चॅनेल वरून विडिओ पहा किंवा एका वेबसाईटवरुन रिपोर्ट वाचा,ह्यामुळे तुम्ही गोंधळात पडणार नाही.

See also  Loan व Debt मध्ये काय फरक आहे? Difference in loan and debt

बेस्ट साईट्स इंडियन शेअर मार्केट विश्लेषण  करण्यासाठी : Share market information website list

स्टॉक विश्लेषण  करण्याचे दोन पर्याय आहेत.पहिला म्हणजे तुम्हाला ज्या कंपनीचा स्टॉक विकत घ्यायचा आहे त्याचे नाव गुगल ला सर्च करा ,त्या स्टॉक चे तुम्हाला रिपोर्ट्स मिळतील.दुसरा पर्याय म्हणजे तुम्हाला ज्या कंपनीचा शेअर विकत घ्यायचाय त्याच्या ऑफिशियल वेबसाईटवर जावा आणि तिथे तुम्हाला त्या कंपनीचे सर्व रिपोर्टस समजतील.

काही आशा वेबसाईट आहेत जिथे तुम्हाला सम्पूर्ण रिपोर्ट मिळतो तो ही फ्री मध्ये आणि त्या वेबसाईट मध्ये पुरवलेला डेटा हा ऑफिशियल असतो.या वेबसाईटचा नवीन गुंतवणूकदार जास्त प्रमाणात लाभ उचलू शकतो.

स्टॉक विश्लेषण  करणाऱ्या 8 वेबसाईट्स – Share market information website list

  • मनी कन्ट्रोल –

ही भारतातील सर्वात फेमस स्टॉक विश्लेषण  वेबसाईट आहे.तुम्हाला जेवढी माहिती स्टॉक बद्दल हवी आहे,तेवढि सर्व माहिती तुम्हाला इथे मिळेल.जसे की फंडामेंटल विश्लेषण , टेक्निकल विश्लेषण , चालू बातम्या,चालू स्टॉक किंमत,IPO लाँच कधी होणार त्याची माहिती,इत्यादी.मनी कंट्रोल वर तुम्ही तुमची कस्टम वॉच लिस्ट बनवू शकता.

  • NSE –

NSE ही नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया ची ऑफिशियल वेबसाईट आहे.प्रोफेशनल ट्रेडर्स NSE च्या वेबसाईटवर येईन नियमित स्टॉक संबंधित ब्लॉग,आणि बरीचशी माहिती पाहतात.

  • इकॉनॉमिक्स टाइम्स –

इकॉनॉमिक्स टाइम्स हे एक न्युज पेपर आहे आणि भारतातील टॉपच्या आर्थिक न्यूज पेपर पैकी एक आहे.इकॉनॉमिक्स टाइम्स हे डिजिटल झालाय.तुम्ही इ-पेपर च्या मदतीने लाईव्ह मार्केट वॉच,ट्रेंडिंग न्युज,कंपनी विश्लेषण , इत्यादी.त्यांची पॉडकास्ट देखील आहे.

  • लाईव्ह मिंट –

लाईव्ह मिंट वरती तुम्ही स्टॉक संबंधी न्युज आणि ब्लॉग्स वाचू शकता.

  • स्क्रिनर इन –

स्क्रिनर ही टेक्निकल विश्लेषण  वेबसाईट आहे जिथे तुम्हाला कंपनीचा डेटा मिळतो, जसे की आर्थिक स्टेटमेंट, बॅलन्स शीट, इत्यादी.ह्यामध्ये तुम्हाला कंपनीचा वार्षिक,6 महिन्याचा रिपोर्ट मिळतो.तुम्ही वेगवेगळ्या कंपनीची तुलना करू शकता.

  • BSE –
See also  ज्येष्ठ नागरिक बचत योजना मधील कमाल ठेवीची मर्यादा १५ लाखावरून ३० लाख केली जाणार - Senior citizens Saving scheme latest update in Marathi

BSE हे NSE सारखे काम करते.बॉम्बे स्टॉक एक्सचेंज ची BSE ही ऑफिशियल वेबसाईट आहे.ह्यांध्ये तुम्हाला नुमेरिकेल आणि ग्राफिकल दोन्हीही रिपोर्ट मिळतात.तुम्ही ह्यामध्ये कोणत्याही कंपनीचा सर्वसमावेशक मार्केट रिपोर्ट पाहू शकता.

  • इन्वेस्टिंग.कॉम

 इन्वेस्टिंग ही विशेष स्टॉक विश्लेषण  साठी बनवलेली वेबसाईट आहे.ह्यामध्ये तुम्ही फंडामेंटल आणि टेक्निकल विश्लेषण  चे रिपोर्ट्स पाहू शकता.ह्यांध्ये तुम्हाला प्रॉफिट कॅल्क्युलेटर आणि मार्जिन कॅल्क्युलेटर सारखे टूल्स मिळतात.

  • ब्लूमबर्ग क्विंट –

 हे एक भारताचे मीडिया हाऊस आहे आणि हे आर्थिक आणि व्यवसाय या गोष्टींवर फोकस करते.ह्यांध्ये तुम्हाला अनलिटिकस आणि इक्विटी टूल्स,डेटा सर्व्हिस यांसारख्या सुविधा मिळतात.

आपण वर स्टॉक विश्लेषण  म्हणजे त्यात टेक्निकल आणि फंडा मेंटल सर्व्हिस प्रोवाईड करणाऱ्या फ्री वेबसाईट्स पाहिल्या.ह्या व्यतिरिक्त खूप साऱ्या आशा साईट्स आहेत जिथे तुम्हाला फ्री मध्ये विश्लेषण  मिळते.तुम्ही जर नवीन गुंतवणूकदार असाल आणि तुम्हाला गुंतवणूक क्षेत्रात खूप पुढे जायचे असेल,तर तुमच्यासाठी स्टॉक चे विश्लेषण  करणे खूप गरजेचे आहे

Stock Market Apps

  • BSE India App
  • CNBC App
  • Economic Times App
  • IIFL Markets App
  • com App
  • Moneycontrol App
  • Stock Edge App
  • Stock Market Live App

शेअर मार्केट म्हणजे काय