सारांश लेखन विषयी माहीती – Summary writing in Marathi

सारांश लेखन विषयी माहीती- Summary writing in Marathi

मित्रांनो सारांशलेखन हा परीक्षेतील खुप महत्वपूर्ण भाग आहे.नववी,दहावी,बारावी इत्यादी कुठल्याही इयत्तेची परीक्षा असो आपल्याला सारांश लेखन हा भाग काही गुणांसाठी विचारला जात असतो.

यात आपल्यासमोर एक मोठा परिच्छेद दिलेला असतो ज्याचे उतारयातील मुख्य मुददे अँड करून एक तृतीयांश भाग इतके आपणास सारांशलेखन करायचे असते.

पण आपल्यातील खुप विदयार्थी असतात ज्यांना सारांशलेखन करणे खुप अवघड वाटत असते.म्हणुन परिक्षेत आपण सारांशलेखनचा 5 ते 6 गुणांचा भाग सोडुन देत असतो.

असे आपल्यासोबत देखील होऊ नये यासाठी आजच्या लेखात आपण सारांशलेखन म्हणजे काय?सारांशलेखन कसे करावे?हे जाणुन घेणार आहोत.

सारांशलेखन म्हणजे काय?summary writing meaning in Marathi

सारांश लेखन म्हणजे परीक्षेत आपल्यासमोर पाठयपुस्तकाच्या बाहेरचा जो एक उतारा दिलेला असतो त्याचा एक तृतीयांश हा शब्दांत लिहुन दाखवणे होय.

म्हणजे समजा आपल्यासमोर 150 शब्दांचा एखादा उतारा दिलेला असेल तर आपणास त्याला 50 शब्दात संक्षिप्त रूपात मांडायचे असते.

सारांश लेखन मध्ये आपल्याला त्या दिलेल्या उतारयाचा त्यातील सर्व महत्वपूर्ण मुदद्यांना परिच्छेदात समाविष्ट करून मुददेसुदपणे त्याचा थोडक्यात परिचय द्यायचा असतो.

सारांशलेखन करताना कोणती काळजी घ्यायला हवी?

● सारांशलेखन करण्याच्या अगोदर दिलेला उतारा हा एकदा काळजीपुर्वक नीट वाचुन घ्यावा.अणि त्यातील विषय अणि आशय दोघे समजुन घ्यावे.एकदा वाचले तरीही उतारयातील मुख्य मुददा समजला नसेल तर आपण तो मुददा व्यवस्थित समजावा म्हणुन दोनदा वाचु शकतो.

● उतारयामध्ये मुख्य विषया संबंधित जेवढेही महत्वाचे मुददे दिलेले आहेत त्यांच्याखाली अंडरलाईन करून घ्यावे.

See also  बायजूस ( BYJU'S-app) विषयी माहीती What is BYJU'S Learning Marathi information ?

● मग त्या दिलेल्या मुददयांना समाविष्ट करून आपल्या स्वभाषेत सोप्या अणि सुटसुटीत पदधतीने वाक्य तयार करावीत.वाक्य लिहित असताना आपल्याकडुन कुठलीही व्याकरणिक चूक होणार नाही याची विशेष काळजी घ्यावी.

● उतारयाचा सर्व सारांश एका परिच्छेदात लिहावा.

दिलेल्या उतारयाचे सारांशलेखन कसे करावे?

सारांशलेखन करत असताना आधी आपण हे समजुन घ्यावे की आपल्यासमोर जो उतारा दिला आहे त्यात काय सांगितले आहे त्या उतारयाचा मुख्य केंद्रबिंदु काय आहे.तो उतारा कोणत्या विषयावर दिलेला आहे.त्यात सांगितलेले मुख्य विचार कल्पणा काय आहे?

अणि मग उतारयाचा विषय समजल्यावर त्याच्याशी सुसंगत असे जुळणारे अचुक शीर्षक उतारयाला सर्वप्रथम द्यावे.शीर्षकात आपण एखादी म्हण तसेच सुविचार देखील वापरू शकतो.उतारयाचे शीर्षक हे कधीही सारांशाच्या सुरूवातीस मध्यभागी लिहायचे असते.

सारांश लेखन करताना आपण कुठल्या चूका करू नये?

● कधीही दिलेल्या उतारयातील वाक्ये जसेच्या तसे लिहायचे नाही.

● स्वताच्या मनाने कुठलाही मुददा त्यात समाविष्ट करू नये.

● परिच्छेदात अलंकार तसेच म्हणींचा देखील वापर करणे टाळावे.

● ज्या मुददयांना अधिक महत्व नाही असे मुददे घेऊ नये उतारयातील अधिक महत्वपूर्ण मुददेच सारांश लेखनात समाविष्ट करावे.

● विनाकारण शब्दसंख्या वाढवून शब्दमर्यादा वाढवू नये.दिलेल्या शब्द मर्यादेतच सारांशलेखन करावे.

● सारांशलेखनात सुयोग्य भाषेचा समावेश असावा.

सारांश लेखनाची गुण विभागणी कशी केलेली असते?

● सारांश लेखनात उचित अणि योग्य शीर्षकाला एक गुण दिला जात असतो.

● दिलेल्या उतारयाचा मुख्य केंद्रबिंदु मध्यवर्ती कल्पणा जी आपण मांडत असतो तिला दोन गुण दिले जातात.

● सारांश लेखनात आपण जी योग्य भाषा वापरतो तिचे देखील आपणास दोन गुण दिले जात असतात.

उतारयाचा सारांश म्हणजे काय? सारांश काय असतो?

मित्रांनो कुठल्याही उतारयाचा सारांश म्हणजे त्याचा मुख्य सार असतो.

म्हणजे समजा एखादा चित्रपट आपण बघितला मग जेव्हा कोणी आपल्याला त्या चित्रपटाविषयी विचारते तेव्हा आपण त्या व्यक्तीस त्या चित्रपटाचा थोडक्यात परिचय देताना त्याची मुख्य कथा सांगत असतो तसेच आपल्याला सारांशलेखनाच्या बाबतीतही करायचे असते.

See also  मराठी बाराखडी (marathi barakhadi pdf)