स्वामित्व योजना काय आहे?-Swamitva Yojana in Marathi

स्वामित्व योजना काय आहे?swamitva yojana in Marathi

नुकताच ई गव्हर्नसवरील पार पडलेल्या २६ व्या राष्ट्रीय परिषदेत स्वामित्व ह्या योजनेला राष्ट्रीय ई प्रशासन पुरस्कार मिळाला आहे.

स्वामित्व ह्या योजनेचा फुलफाॅम –

Survey of village abadi and mapping with improvised technology in village area असा होतो.

गावांच्या लोकसंख्येचे सर्वेक्षण करणे, प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करून ग्रामीण भागाचा नकाशा तयार करणे, तसेच ग्रामीण भागात वास्तव्यास असलेल्या लोकांना मालमत्तेचे हक्क प्रदान करणे असा ह्या वरील फुलफाॅमचा मराठी मध्ये अर्थ होतो.

स्वामित्व योजना काय आहे?swamitv yojna in Marathi

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही योजना २४ एप्रिल २०२० रोजी लाॅच केली होती.हयाच दिवशी राष्ट्रीय पंचायती राज दिवस देखील साजरा करण्यात आला होता.

ग्राम विकास पंचायती राज विभागाच्या अंतर्गत ही स्वामित्व योजना येते.राज्यांमध्ये या योजनेसाठी महसूल अभिलेख विभागाला नोडल विभाग बनवण्यात आले आहे.

ग्राम विकास अणि पंचायती राज ह्या विभागाचे मंत्री गिरीराज सिंह हे आहेत.

स्वामित्व ह्या योजनेअंतर्गत रहिवासी जमिनीचे मोजमाप केले जाईल त्यानंतर गावाच्या हद्दीत येणाऱ्या प्रत्येक मालमत्तेचा डिजिटल नकाशा तयार केला जाईल,याचसोबत महसूल गटाची हद्दही निश्चित केली जाते.

थोडक्यात सांगायचे म्हटले तर कोणते घर किती क्षेत्रात आहे, हे ड्रोन तंत्रज्ञानाच्या वापर करून अचूकतेने मोजले जाते.

हया योजनेअंतर्गत गावातील प्रत्येक घराचे मालमत्ता कार्ड राज्य सरकार द्वारा तयार केले जाते.

२०२० मध्ये लाॅच करण्यात आलेल्या ह्या राज्य सरकारच्या योजनेअंतर्गत २०२४ पर्यंत म्हणजे २०२० पासुन पुढील चार वर्षांच्या कालावधीत ६ लाख २० हजार एवढ्या गावांना कव्हर केले जाणार आहे.

See also  भारतीय क्रिकेट प्राधीकरणात विविध पदांवर 152 जागांसाठी भरती सुरू - SAI recruitment 2023 in Marathi

ह्या योजनेच्या अंतर्गत दरवर्षी निर्धारित केलेल्या संख्येत गावातील लोकांना मालमत्ता कार्डचे वितरण केले जाते.

ह्या प्राॅपर्टी कार्ड मध्ये आधार कार्ड सारखाच एक युनिक नंबर प्रत्येकाला दिला जातो.

स्वामित्व ह्या योजनेअंतर्गत देशभरात सुमारे 300 रेग्युलर ऑपरेशन सिस्टीम स्टेशन्स म्हणजेच CORS ची स्थापना ह्या योजनेअंतर्गत केली जाणार आहे.

स्वामित्व ह्या योजनेअंतर्गत निवासी जमिनीचे मोजमाप हे ड्रोन तंत्रज्ञान आणि सीओआरएसद्वारे केले जाणार आहे.

स्वामित्व ह्या योजनेअंतर्गत ड्रोन वापरून मालमत्तेचे सर्वेक्षण करण्यासाठी सर्वे ऑफ इंडियाची नोडल एजन्सी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

स्वामित्व योजनेचा मुख्य हेतु काय आहे?

स्वामित्व योजनेचा मुख्य उद्देश हा जमिनीच्या अचूक नोंदी करणे मालमत्तेशी संबंधित वाद कमी करणे हा आहे याचसोबत आर्थिक तरलतेत वाढ करणे हा देखील ह्या योजनेचा मुख्य उद्देश आहे.

याचसोबत सरकारद्वारे चालवल्या जाणार्‍या इतर योजनांची चांगल्या प्रकारे अंमलबजावणी करणे,महसूल संकलनात सुसूत्रता आणणे आणि ग्रामीण भागातील मालमत्तेच्या अधिकारांबाबत स्पष्टता सुनिश्चित करणे हे देखील ह्या योजनेच्या मुख्य उद्दिष्टात समाविष्ट आहे.

स्वामित्व योजनेची सुरुवात का करण्यात आली होती?

आपल्या भारत देशातील सुमारे 60 टक्के लोकसंख्या ही ग्रामीण भागात राहते,परंतु बहुतांश गावकऱ्यांकडे त्यांच्या घराच्या मालकीची कागदपत्रे नव्हती.

तसे पाहायला गेले तर ब्रिटीश काळापासूनच गावातील शेतजमिनींची नोंद ठेवली जात होती, परंतु लोकांना त्यांचा मालकी हक्क मिळाला पाहिजे, याची कुठलीही दखल घेण्यात आली नव्हती.

अशी अनेक राज्ये होती जिथे मालमत्ता पडताळणीच्या दृष्टीने गावांच्या निवासी भागांचे सर्वेक्षण आणि मॅपिंग व्यवस्थित रीत्या केले गेले नाही.

ज्यामुळे गावातील अनेक घरांच्या मालकांकडे आजही आपल्या संपत्तीचा मालकी हक्क नाहीये यामुळे अनेक समस्या निर्माण होऊ लागल्या.

जसे की मालमत्तेचे वाद,शासकीय योजनांची अंमलबजावणी न होणे,अचूक महसुलाची वसुली न होणे अशा सर्व प्रकारच्या समस्या निर्माण झाल्या.

ह्या सर्व समस्यांवर तोडगा म्हणून स्वामित्व ही योजना सुरू करण्यात आली होती.

See also  एच आर मॅनेजर म्हणजे काय?एच आर मॅनेजरची भुमिका,वेतन अणि जबाबदारी- What is HR manager?HR manager job,roles,salary and responsibilities in Marathi

स्वामित्व योजनेचे फायदे-

स्वामित्व ह्या योजनेच्या माध्यमातून ग्रामीण भारतात आर्थिक स्थैर्य आणण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.

सरकारी योजना तयार करण्यासाठी शासनाकडे अचुक जमिनीचे रेकॉर्ड उपलब्ध असतील.

ह्या योजनेतून प्राप्त झालेल्या डेटाद्वारे, सरकार सर्वेक्षण पायाभूत सुविधा आणि भौगोलिक नकाशे तयार करणार आहे यांचा वापर कोणत्याही विभागाद्वारे केला जाऊ शकतो.

सर्व मालमत्तेच्या मालकांना आपला मालकी हक्क ह्या योजनेमुळे प्राप्त होईल.संपत्ती मालमत्ता कोणाची आहे हे स्पष्ट झाल्यानंतर त्याची किंमत देखील सहजरीत्या ठरविता येईल.

मालमत्ता कार्डचा वापर करून आपणास बॅकेतुन कर्ज प्राप्त करता येईल.