टाँप प्रोग्रँमिंग लँग्वेज -Top Programming Languages In Marathi

टाँप प्रोग्रँमिंग लँग्वेज विषयी माहिती -Top Programming Languages In Marathi

आज आपल्याला कुठलेही अँड्राईड अँप तयार करायचे असेल तर त्याकरीता आपल्याला सर्वप्रथम प्रोग्रमिंग तसेच कोडिंग येणे फार गरजेचे असते.

कारण कोडिंग लँग्वेजच्या नाँलेजशिवाय आपण कुठलेही साँफ्टवेअर डेव्हलप करू शकत नसतो.

याचसाठी आज आपण काही अशा टाँप प्रोग्रमिंग लँग्वेजविषयी जाणुन घेणार आहोत.ज्यांचा वापर विविध अँप्लीकेशन,साँफ्टवेअर डेव्हलप करण्यासाठी प्रामुख्याने केला जात असतो.

चला तर मग क्षणाचाही विलंब न करता आपण आपल्या आजच्या मुख्य विषयाकडे वळुया.

टाँप प्रोग्रँमिंग लँग्वेज किती आणि कोणकोणत्या आहेत?- Top Programming Languages In Marathi

टाँप प्रोग्रँमिंग लँग्वेज ह्या अनेक आहेत पण त्यातील काही महत्वाच्या लँग्वेजेस पुढीलप्रमाणे आहेत-

Python :

पायथाँन ही एक फंक्शनल प्रोग्रँमिंग लँग्वेज आहे. पायथाँन ही एक अशी प्रोग्रँमिंग लँग्वेज आहे जिला आपण प्रोग्रँमिंग लँग्वेजेसचे फ्युचर देखील आज म्हणु शकतो.

जर आपण नवीनतम आकडेवारीचा विचार केला तर पायथाँन ही 80 टक्के डेव्हलपर्ससाठी मुख्य प्रोग्रमिंग लँग्वेज आहे.टाँप प्रोग्रँमिंग लँग्वेज विषयी माहिती -Top Programming Languages In Marathi

सध्या पायथाँन ही प्रोग्रँमिंग लँग्वेज ट्रेंडिगला असल्याने लवकरच पायथाँनला प्रोग्रमिंग लँग्वेजेसचा किंग म्हणुन देखील ओळखले जाऊ शकते.

आणि 2022 मध्ये जर आपण ही प्रोग्रँमिंग लँग्वेज शिकुन घेतली तर यश आणि प्रगती दोघे आपण प्राप्त करू शकतो.

पायथाँन ही लँग्वेज शिकायला आणि कोडिंग करायला एकदम सोपी अशी लँग्वेज आहे.ही लँग्वेज GUI सपोर्टेड देखील आहे.

फक्त पायथाँन ही लँग्वेज मोबाईल अँप्लीकेशनच्या डेव्हलपमेंटसाठी योग्य नसते.

आज आपण पाहायला गेले तर आपणास असे दिसुन येते की इंस्ट्राग्राम आणि पिंटरेस्ट यासारख्या सोशल मीडिया साइट पायथाँन लँग्वेज दवारेच तयार करण्यात आल्या आहेत.

पायथाँनचा वापर मुख्यकरून आर्टिफिशल इंटलिजन्स,डेटा सायन्स इत्यादी मध्ये केला जात असतो.

 Java :

जावा ही एक हाय लेव्हल प्रोग्रँमिंग लँगवेज आहे.जावा ही आँब्जेक्ट ओरिएंटेड लँगवेज आहे तसेच जावाला प्लँटफाँर्म इंडिपेंडेंट लँग्वेज म्हणुन देखील ओळखले जाते.

 • कारण जावा प्रोग्रमिंग हा आपणास कोणत्याही आँपरेटींग सिस्टमवर रन करता येत असतो.
 • जावा ह्या प्रोग्रँमिंग लँग्वेजचा वापर अँड्राईड अँप्लीकेशन डेव्हलपमेंट,वेब तसेच डेस्कटाँप अँप्लीकेशन डेव्हलप करण्यासाठी मुख्यकरून केला जातो.
 • पण जावाची ओनर असलेली सॉफ्टवेअर कंपनी ओरॅकल ही आपल्याकडुन जावा डेव्हलपमेंट किटचा वापर करण्यासाठी काही परवाना शुल्क घेत असते.
See also  डिजी यात्रा सुविधा म्हणजे काय?Digi Yatra facility meaning in Marathi

Php :

मित्रांनो पीएचपीला आपण एक ओपन सोर्स आणि सर्व्हर साईड स्क्रींप्टिंग लँग्वेज म्हणुन ओळखतो.

ही लँग्वेज वेबसाईट डेव्हलप करण्यासाठी विशेषकरून वापरली जात असते.

 • याचसोबत पीएचपी चे अजुन एक खास वैशिष्टय हे आहे की पीएचपी ही लँग्वेज एचटी एम एल,जावा स्क्रीप्ट,सीएस एस सारख्या इतर प्रोग्रँमिंग लँग्वेजसोबत सहजपणे इंटिग्रेट करू शकत असते.

C Language :

 • सी लँग्वेज ही एक स्ट्रक्चरल प्रोग्रँमिंग लँग्वेज आहे.1972 मध्ये बेल लँबरोटरीमध्ये डेनिस रिची आणि आपल्या टीमच्या समवेत ही प्रोग्रमिंग लँग्वेज डेव्हप केली होती.
 • सी लँग्वेजचे वैशिष्टय हे आहे की ह्या लँंग्वेजचा वापर करून आपणास सिस्टम साँफ्टवेअर आणि अँप्लीकेशन साँफ्टवेअर ह्या दोन्ही प्रकारचे साँफ्टवेअर डेव्हलप करता येत असतात.
 • सी ल़ँग्वेजचा वापर विविध प्रकारचे अँप्लीकेशन तसेच गेमिंग अँप्स,अँनिमेटेड साँफ्टवेअर डेव्हलप करण्यासाठी विशेषत केला जात असतो.

 C++ Language :

 • सी++ ही फेमस प्रोग्रामिंग लँग्वेज आहे.
 • सी++ ही लँग्वेज कंप्युटर प्रोग्राम तयार करण्यासाठी वापरली जाते आणि गेमिंग डेव्हलपमेंटमध्ये सुदधा सर्वात जास्त हीच लँग्वेज अधिक जास्त वापरली जात असते.
 • सी ++ लँग्वेज ही सी लँग्वेजचे विस्तारीत आणि परिपक्व स्वरूप(Extended Version) मानले जाते.
 • जसा सी लँग्वेजचा वापर विविध गेमिंग अँप्स तसेच अँनिमेटेड साँफ्टवेअर तयार करण्यासाठी केला जातो एकदम त्याच प्रमाणे सी ++ लँग्वेज देखील विविध गेमिंग अँप्स तसेच अँनिमेटेड साँफ्टवेअर तयार करण्यासाठी वापरली जात असते.

Java Script :

जावा स्क्रिप्ट ह्या लँग्वेजचा वापर विविध प्रकारच्या वेब अँप्स तयार करण्यासाठी केला जात असतो.

 • आणि सगळयात महत्वाची गोष्ट जी आपण नेहमी लक्षात ठेवायला हवी ती म्हणजे जावा आणि जावा स्क्रीप्ट या दोन्ही दोन अलग अलग लँग्वेज आहेत.
  दोन्ही भाषा एकमेकांपासून पूर्णपणे भिन्न आहेत.

जावा स्क्रिप्ट ह्या लँग्वेजचा वापर आपण मॉडर्न वेब तयार करण्यासाठी करत असतो.

 Html Language :

एचटीएम एल ही एक कोडिंग लँग्वेज आहे जिचा वापर वेबसाईटचे एक स्ट्रक्चर तयार करण्यासाठी केला जात असतो.टाँप प्रोग्रँमिंग लँग्वेज विषयी माहिती -Top Programming Languages In Marathi

See also  Android फोनवरून Windows PC वर कर आपल्या फाईल शेअर, Google चे नवीन अ‍ॅप लाँच

एचटी एम एल ही एक वेब पेज आणि वेब बेझ्ड अँप्स तयार करण्यासाठी वापरली जाणारी मार्कअप लँग्वेज आहे.

 C Sharp :

सी# ह्या लँग्वेजलाच सी शार्प लँग्वेज असे देखील म्हणतात.

 • सी शार्प ही मायक्रो सॉफ्ट ह्या कॉर्पोरेशनकडुन म्हणजेच कंपनीकडुन डेव्हलप करण्यात आलेली एक टाइप सेफ ऑब्जेक्ट-ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेज आहे.
 • ह्या लँग्वेजचा वापर करून डेव्हलपर्सला विविध सिक्युअर आणि स्ट्राँग अँप्लीकेशन डेव्हलप करता येत असतात.
 • सी शार्प ह्या प्रोग्रमिंग लँग्वेजचा वापर विविध वेब अँप्लीकेशन तसेच डेस्कटाँप अँप्लीकेशन तयार करण्यासाठी तसेच गेमिंग अँप्स तयार करायला प्रामुख्याने केला जातो.

 Swift :

स्वीप्ट ही एक ओपन सोर्स मल्टी पँराडाईगम प्रोग्रमिंग लँग्वेज आहे.

स्विप्ट ही प्रोग्रमिंग लँग्वेज मोबाईल अँप्लीकेशन डेव्हलप करण्यासाठी,अनुभवी तसेच तज्ञ इंजिनिअरकडुन युझ केली जात असते.

स्विप्ट ह्या प्रोग्रमिंग लँग्वेजचा वापर साँफ्टवेअर डेव्हपमेंटच्या कामासाठी साँफ्टवेअर इंजिनिअर्सकडुन विशेषत केला जात असतो.

 Ruby :

 • रूबी ही एक आँब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रमिंग लँग्वेज आहे.
 • ह्या लँग्वेजला आपण इंटरप्रिटीड लँग्वेज म्हणुन देखील संबोधित असतो.कारण ह्या लँग्वेजला कंपाईल करण्याची कुठलीही आवश्यकता नसते.

रूबी लँग्वेज वेगवेगळया प्रकारचे अँप्लीकेशन डेव्हलप करण्यासाठी वापरली जात असते.

11) Sql :

एस क्यु एल ही एक प्रोग्रमिंग लँग्वेज आहे.

ह्या लँग्वेजचा वापर डेटाला मँनेज करण्यासाठी केला जातो.ह्या लँग्वेजचा वापर करून आपण डेटामध्ये आपल्याला हवे ते चेंजेस करू शकतो.

Perl :

 • पर्ल ही एक हाय लेव्हल प्रोग्रमिंग लँग्वेज आहे.पर्ल लँग्वेज ही आँब्जेक्ट ओरिएंटेड तसेच प्रोसिडयुरल या दोन्ही प्रकारच्या लँग्वेजला सपोर्टिव अशी लँग्वेज असते.
 • वेगवेगळया पब्लिक तसेच प्रायव्हेट सेक्टरमध्ये विविध महत्वाच्या प्रोजेक्टमध्ये ही लँग्वेज युझ केली जात असते.
 • आणि सगळयात महत्वाची गोष्ट म्हणजे पर्ल ही एक ओपन सोर्स लँग्वेज आहे म्हणजेच ही लँग्वेज यूझर्सला फ्री मध्ये वापरता येत असते.

Rust :

रस्ट ही सुदधा एक नवीन प्रोग्रमिंग लँग्वेज आहे.मोजिले यांनी ह्या प्रोग्रमिंग लँग्वेजला तयार केले आहे.

See also  सर्वर म्हणजे काय? सर्वरचे प्रकार , कार्य व उपयोग - Server Meaning In Marathi

रस्ट ही एक मल्टीफिचर लँग्वेज आहे ज्यात एकापेक्षा अधिक फिचर असलेले आपणास दिसुन येतात.

रस्टचे फिचर पुढीलप्रमाणे आहेत:

● ही एक इंपेरेटिव्ह डिक्लेरिटीव्ह तसेच प्रोसिज्युरल लँग्वेज सुदधा आहे.

Kotlin :

कोटलीन ही एक प्रोग्रमिंग लँग्वेज आहे.ह्या लँग्वेजचा वापर विशेषकरून अँड्राईड अँप तयार करण्यासाठी केला जातो.

कारण कोटलीन लँग्वेजचा वापर करून आपणास जलदगतीने कोणतेही अँड्राईड अँप्लीकेशन झटक्यात तयार करता येत असते.

15) Scala:

स्काला ही सुदधा एक स्टँटिकली टाईप प्रोग्रमिंग लँग्वेज आहे जिचे नाव आपण जास्त ऐकलेले नाहीये कारण ही लँग्वेज इतकी लोकांमध्ये अद्यापही प्रसिदध झालेली नाहीये.

स्काला हे लँग्वेज आँब्जेक्ट ओरिएंटेडला सपोर्टिव लँग्वेज असते.स्केलाच्या सोर्स कोडला जावा बाईट कोडमध्ये रूपांतरीत केले जात असते.आणि जेव्हीएम वर याला रन करण्यात येते.

ज्यांना जावा लँग्वेजचे उत्तम नाँलेज आहे ते स्काला लँग्वेजला सहजपणे शिकु शकतात.कारण स्काला लँग्वेज ही जावा सारखीच लँग्वेज आहे.

स्काला ह्या प्रोग्रमिंग लँग्वेजचा वापर करून आपण वेब अँप्स,डेस्कटाँप अँप्लीकेशन तयार करू शकतो.

16) Fortran :

फाँरट्रन ही एक हाय लेव्हल प्रोग्रँमिंग लँग्वेज आहे जिचा वापर इंजिनिअरींग अँप्लीकेशनमध्ये प्रामुख्याने केला जात असतो.

ह्या लँग्वेजचे वेगवेगळे व्हरझन सुदधा उपलब्ध आहेत.

17) Cobol :

कोबोल ही एक काँमन बिझनेस ओरीएंटेड प्रोग्रमिंग लँग्वेज आहे.

ही लँग्वेज प्रोफेशनल वापराकरीता खासकरून डिझाईन केली गेली आहे.

म्हणजेच बिझनेड संबंधित अँप्लीकेशन तयार करण्यासाठी ही लँग्वेज वापरली जात असते.

18) Ada :

अँडा ही एक स्ट्रक्चरल,स्टँटिकली टाईप इंपरेटिव्ह आणि आँब्जेक्ट ओरीएंटेड लँग्वेज आहे.

अँडा लँग्वेजचा वापर केल्या जात असलेल्या अनेक सिस्टीम आहेत ज्यात रेल्वे,बँकिंग,हवाई वाहतूक नियंत्रण इत्यादींचा समावेश होतो.

19) Lisp :

लिस्प ही एक अशी प्रोग्रामिंग लँग्वेज आहे जिचा वापर डेटा स्ट्रिंगच्या सुलभ हाताळणीसाठी केला जातो.

ह्या लँग्वेजचा सामान्यता आर्टिफिशल इंटलिजन्ससाठी वापर केला जातो.ह्या लँग्वेजला जाँन मँककार्थी यांनी 1959 मध्ये डेव्हलप केले होते.

20) Pascal :

पास्कल ही प्रोग्रँमिंग इंस्ट्रक्शनसाठी अधिक प्रमाणात वापरली जात असलेली प्रोग्रमिंग लँग्वेज आहे.आणि ही लँग्वेज जवळ जवळ सर्व कंप्युटरमध्ये आपणास उपलब्ध होत असते.

ही लँग्वेज एज्युकेशनल पर्पजसाठी तसेच प्रोडक्शन साँप्टवेअरकरीता विशेषकरून वापरण्यात येते.