विनायक मेटे यांचे निधन- Vinayak Mete Passed Away In Marathi

विनायक मेटे यांचे निधन- Vinayak Mete Passed Away In Marathi

मित्रांनो न्युज मध्ये सांगितले जात आहे की विनायक मेटे यांचे नुकतेच एका कार अपघातात दुखद निधन झाले आहे.

मुंबई पुणे एक्सप्रेस वळण येथील खालापुर ह्या टोलनाक्यावर त्यांचा अपघात झाला होता.ज्यात त्यांच्या मेंदूला जबर मार लागला होता.

अपघातानंतर पनवेल मधील एम जी एम नामक रूग्णालयात त्यांना उपचारासाठी देखील दाखल करण्यात आले होते.पण उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले.

राजकीय क्षेत्रात विनायक मेटे यांच्या मृत्युविषयी हळहळ व्यक्त केली जात आहे.

आपल्यातील खुप जणांना प्रश्न पडला असेल की हे कार अपघातात निधन झालेले विनायक मेटे नेमकी कोण होते?त्यांच्या मृत्युविषयी सर्वत्र एवढी चर्चा का होत आहे.

आपल्या ह्याच सर्व प्रश्नांची उत्तरे आजच्या लेखात आपण थोडक्यात जाणुन घेणार आहोत.

विनायक मेटे कोण होते?

विनायक मेटे हे भारतीय राजकीय कार्यकर्ता,माजी आमदार तसेच शिवसंग्राम ह्या पक्षाचे अध्यक्ष म्हणुन आपणा सर्वाना परिचित होते.

3 जुन 2016 रोजी त्यांची महाराष्ट्र विधान परिषदेत बिनविरोध निवड झाली होती.2014 च्या कालावधीपर्यत विनायक मेटे हे राष्टवादी कांग्रेस पक्षाचे सदस्य देखील होते.

विनायक मेटे हे 2014 मधील भाजपचे महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत बीड मधुन विधानसभा मतदारसंघाकडुन उमेदवार म्हणुन उभे राहिले होते.पण यात जयदत्त क्षिरसागर यांनी त्यांना पराभुत केले होते.

विनायक मेटे यांचा जन्म कधी झाला होता?

विनायक मेटे यांचा जन्म हा 30 जुन 1970 रोजी झाला होता.

विनायक मेटे यांचे वय काय होते?
विनायक मेटे यांचा कार अपघातात मृत्यु झाला आहे मृत्यु झाला तेव्हा त्यांचे वय 53 होते.

विनायक मेटे यांचा मृत्यु कधी अणि कसा झाला झाला आहे?
विनायक मेटे यांचा एका 14 आँगस्ट रोजी एका कार अपघातात मृत्यु झाला आहे.

See also  जीवनावर प्रेरणादायी मराठी विचार -30 Life Quotes