Web Series म्हणजे काय? बेस्ट ओटीटी प्लेटफॉर्म- What Is a Web Series and OTT platform

 Web Series माहिती –What Is a Web Series and OTT platform

आज वेब सीरीजची क्रेझ ही अधिकच वाढत चालली आहे.इंटरनेटवर सोशल मिडियावर आपल्याला जागोजागी वेब सीरीजविषयीच चर्चा होताना दिसून येत असते.

आज प्रत्येक जण वेब सीरीजमधील डायलाँग तसेच त्यातील कँरेक्टरविषयी सांगत असतो.आज अशा अनेक वेबसीरीज बाजारात आल्या आहेत ज्यातुन आपल्याला काहीतरी नवीन शिकायला मिळत असते तसेच प्रेरणा प्राप्त होत असते.म्हणुनच नवीन वेबसीरीज आल्यावर त्याची चर्चा प्रत्येक ठिकाणी चालत असते.

पण आपल्यातील खुप जण असे देखील असतात. ज्यांनी वेब सीरीजविषयी खुप जणांच्या तोंडुन ऐकलेले असते पण वेबसीरीज म्हणजे नेमक काय हेच त्यांना माहीत नसते.

 

याचसाठी आज आपण वेब सीरीज विषयी सविस्तरपणे माहीती जाणुन घेणार आहोत.जेणेकरून आपल्या मनातील सर्व शंका दुर होतील.

 

वेब सीरीज म्हणजे काय? What Is a Web Series?

इंटरनेटच्या जगात वेगवेगळया पार्टसमध्ये डिव्हाईड करून सीरीजच्या फाँरमेटमध्ये तसेच वेगवेगळया एपिसोडच्या स्वरुपात काही शो दाखवले जात असतात.ज्याला आपण इंग्रजीत वेब सीरीज असे म्हणत असतो.

आज आपण इंटरनेटचा वापर करून अनेक मोबाईल अँप्लीकेशन तसेच वेबसाईटवर जाऊन विविध भाषेत वेब सीरीज बघण्याचा आनंद लुटु शकतो.

वेब सीरीज ह्या आपण टिव्हीवर बघू शकत नसतो यासाठी आपल्याला ओटीटी प्लँटफाँर्म,मोबाईल अँप्लीकेशन,तसेच विविध वेबसाईटसवर जावे लागते.

See also  आंतरराष्ट्रीय विवेक दिवस २०२३ तारीख, थीम, इतिहास, महत्त्व । International Day of Conscience 2023 In Marathi

वेब सीरीजचे सर्व एपिसोड एकाच वेळी प्रकाशित होत असतात जे आपण एकाच वेळी बघू शकतो किंवा आठवडयातुन एकदा अशा पदधतीने देखील एपिसोड दाखवले जातात.

 

वेब सीरीजवर वेळेची कुठलीही मर्यादा नसते.वेब सीरीजचे दहा ते बारा एपिसोड देखील असु शकतात.याचसोबत एकापेक्षा जास्त सीन त्यात असतात.

एका एपिसोडचा कालावधी साधारणत यात 25 ते 40 मिनिटांचा असतो.

लोकांमध्ये वेब सीरीज बघण्याची क्रेझ दिवसेंदिवस का वाढते आहे?Why web series getting so popular

 आज लोकांमध्ये वेब सीरीज विषयी खुप जास्त क्रेझ निर्माण झाली आहे.याच्यामागे अनेक कारण आहेत.

 • टीव्हीवर दाखवल्या जात असलेल्या मालिकांचे कथानक एका विषयावर आधारीत असते आणि त्या त्या अवतीभोवतीच ते फिरताना दिसुन येते पण येथे वेब सीरीजमध्ये नवनवीन प्रकारचे कंटेट आँडियन्सला अनुभवायास मिळतात.कारण इथे कथानकासोबत अलग अलग प्रयोग केले जात असतात.ज्यामुळे आँडीयन्स तेच तेच एपिसोड बघून बोर देखील होत नसते.

 

 • टिव्ही बघत असताना जसे मोठमोठे ब्रेक घेतले जातात तसे कुठलेही मोठे ब्रेक येथे घेतले जात नाहीत.शिवाय सासु सुनेची बोरींग रडकी स्टोरी इथे दाखवली जात नसते.

 

 • चित्रपट मालिकेत एखादा अँडल्ट सीन आल्यावर डायरेक्टर आणि प्रोडयुसरला सेन्साँर बोर्डाला तोंड द्यावे लागते.पण आँनलाईन डिजीटल प्लँट फाँर्मवर असा कुठलाच प्रकार नसतो.

 

 • वेब सीरीजकडे प्रेक्षकांचा वाढलेला कल बघुन सैफ अली खान,विवेक ओबेराँय,अली फैजल इत्यादी बाँलीवूड अभिनेते देखील वेब सीरीजकडे हळु हळु वळताना दिसुन येत आहे.

 

 • वेब सीरीजच्या कथा खुप मनोरंजक असतात ज्या लोकांना पाहायला खुप जास्त आवडते आणि लोक याची स्टोरी आपल्या मित्र मैत्रीणींना सांगत देखील असतात.

 

 

 • वेब सीरीज आपण कुठेही बघू शकतो प्रवासात असताना वेब सीरीज बघुन आपले प्रवासात मनोरंजन होत असते

 

वेब सीरीजचे कोणकोणते प्रकार असतात?

 वेब सीरीज ह्या एकाच प्रकारच्या नसुन पुढीलप्रमाणे विविध प्रकारच्या असतात.सस्पेन्स वेब स्टोरी

 • काँमेडी वेब स्टोरी
 • रोमँटिक वेब स्टोरीज
 • हाँरर वेब स्टोरी
 • अँक्शन वेब स्टोरी
 • मोटीव्हेशनल वेब स्टोरी
 • थ्रिलर वेब स्टोरी
See also  प्रादेशिक परिवहन कार्यालयाची कार्ये, राज्यांचे RTO कोड | RTO Codes of Indian States In Marathi

इत्यादी अशा अनेक प्रकारच्या वेब स्टोरी असतात.

 

वेब सीरीज आणि टिव्ही मालिका,सीरीअल या दोघांमध्ये काय फरक असतो?

 

 • वेब सीरीज आणि टीव्ही सीरीयल यात खुप फरक असतो.टिव्ही सीरीअल ही आपल्याला इंटरनेटचा वापर न करता आँफलाईन पदधतीने टिव्हीवर बघता येत असते.
 • पण वेबसीरीज बघण्यासाठी आपल्याला डिजीटल प्लँटफाँर्मचीच आवश्यकता असते.वेब सीरीज आपण टिव्हीवर बघु शकत नाही.
 • टिव्हीवर जे मालिकेचे एपिसोड दाखवले जातात त्यांचा एक फिक्स टाईम असतो.आणि फिक्स चँनल असते तिथेच त्या वेळेवर आपल्याला त्या मालिकेचा एपिसोड बघता येतो.
 • पण वेब सीरीजमध्ये असा कुठलाही प्रकार नसतो इथे आपण कधीही कोणतीही वेबसीरीज पाहु शकतो.
 • टिव्हीवर दाखवल्या जात असलेल्या मालिकेचे अनेक एपिसोड असतात जे रोज एक एक करून कित्येक वर्ष आपणास दाखवले जातात.पण वेब सीरीजच्या एका सिजनमध्ये फक्त आठ ते दहाच एपिसोड असतात.

 

वेब सीरीज आपण कुठे कुठे बघु शकतो?

वेब सीरीज पाहण्यासाठी आपण विविध डिजीटल प्लँटफा़र्मचा वापर करू शकतो.ज्यात आपण वेगवेगळया मोबाईल अँप्स,वेबसाईट तसेच ओटीटी प्लँटफाँर्मचा वापर देखील करू शकतो.

 

 वेब सीरीज बघण्याचे पैसे लागत असतात का?

यातील काही ओटीटी प्लँटफाँर्मचा वापर करण्यासाठी आपल्याला ते सबस्क्राईब करावे लागते तसेच त्याचा मंथली तसेच ईयरली मेंबरशीप चार्ज द्यावा लागत असतो.आपल्याकडुन किती वेळेसाठी किती चार्ज घेतला जाईल हे देखील आपण तिथे विविध पर्यायात जाऊन बघु शकतो.

 

पण काही प्लँटफा़र्म असे देखील असतात जिथे आपल्याकडून कोणताही मेंबरशीप चार्ज घेतला जात नसतो.आपण कुठलीही वेब सीरीज फ्री मध्ये देखील बघु शकतो.

उदा.युटयुब

 

वेब सीरीज बघण्यासाठी बेस्ट अँप कोणकोणत्या आहेत?  List of Best Web series OTT platform

 वेब सीरीज बघण्यासाठी बेस्ट OTT platform पुढीलप्रमाणे आहेत.

 नेटफ्लीक्स

 • अँमेझाँन प्राईम व्हिडिओ
 • डिजने + हाँट स्टार
 • सोनी लाईव्ह
 • झी 5
 • उल्लू
 • एम एक्स प्लेअर
 • वुट अँप
 • टेलिग्राम
 • युटयुब
See also  फादर्स डे विषयी माहीती - Fathers day information in Marathi

 

यातील काही अँप्सवर आपण वेबसीरीज सोबत टिव्ही मालिका तसेच चित्रपट देखील पाहु शकतो.यात आपल्याला प्रत्येकाला वेगवेगळे चार्ज द्यावे लागत नसतात.एकाचवेळी सगळयांचा मंथली तसेच ईअरली चार्ज आपण देऊ शकतो.

मराठीतील काही अत्यंत प्रसिदध वेबसीरीज कोणकोणत्या आहेत?Best Web series in Marathi to watch

 

 • समांतर
 • आणि काय हवे
 • भाडखाऊ
 • काळे धंदे
 • शाळा
 • गोंडया आला रे