इकोसिस्टम म्हणजे काय?
सजीव जिथं जगण्याकरता एकमेकांशी आणि आपल्या सभोवतालच्या वातावरणाशी दुवा साधतात, संवाद साधतात असा एक पर्यावरणाचा रचनात्मक आणि कार्यात्मक घटक म्हणजेच इकोसिस्टम
इकोसिस्टम म्हणजे काय? What is an Ecosystem Marathi?
हल्ली सोशल माध्यमत बऱ्याचदा इकोसिस्टम शब्द वाचण्यात येत असतो, परुंत तो वेगळ्या अनुषंगाने , बहुतेकदा राजकीय संदर्भ त्याला असतो ,जसे लेफ्ट इकोसिस्टम किंवा राइट किंवा राजकीयपक्षा बाबतचा त्यांच्या इकोसिस्टम ही चर्चा असते
परुंतु मनात विचार येत असतात की नक्की इकोसिस्टम असते तरी काय? आपण प्रथिमिक शाळेत असताना चा इकोसिस्टम बद्दल शिकलो आहोंत
आज जरा नव्याने उजळणी करूयात,इंग्रजी वनस्पती शास्त्रज्ञ एजी टॅनस्ले ह्यानी सर्वात प्रथम ह्या शब्दांचा वापर केला.
आपण पृथ्वीथला वरील सर्व सजीव हे जगण्याकरता एकमेकांवर अवलांबून असतो आणि ह्याशी इकोसिस्टम निगडित आहे
अगदी शास्त्रीय भाषेत म्हणायचं ठरलं तर -सजीव जिथं एकमेकांशी आणि आपल्या सभोवतालच्या वातावरणाशी दुवा साधतात, संवाद साधतात असा एक पर्यावरणाचा रचनात्मक आणि कार्यात्मक घटक म्हणजेच इकोसिस्टम
अजून सोप्या भाषेत म्हणयच तर जीव आणि सभोवतालच वातावरण हयात जी एक संवादची, अन्नसाखळी तयार होते त्यास इकोसिस्टम म्हणतात
आता इकोसिस्टम चा असा काही फिक्स आकार वगरे नसतो अगदी एकाद् मिठाघर असू शकतात किंवा खोल समुद्रातील सागरी जीवन ही असू शकत.
इकोसिस्टम चे किती प्रकार असतात-What is an Ecosystem Marathi?
- स्थलिय परिसंस्था
- जलचर परिसंस्था
स्थलिय जमिनीशी निगडित परिसंस्थेत वेगवेगळ्या संस्था पृथ्वीवर निरनिराळ्या भैगोलीक विभागात पोसल्या जातात ,जसे की
जंगल किंवा वन परिसंस्था-
ह्यात सूक्ष्मजीव वनस्पती ,प्राणी हे पर्यावरण च्या अजैविक घटकांशी मिळून राहतात.वन ही पृथ्वी च तापमान ठिकवून ठेवण्यास मदत करतात, कार्बन शोषून ते हवेत ऑक्सिजन सोडत असतात.-उदाहरण अमेझोन जंगल
गवताळ प्रदेश परिसंस्था
ह्या परिसंस्था गवत, वनस्पती आणि झुडपं वनस्पतींची जास्त वाढ होते. “समशीतोष्ण ,आणि सवाना गवताळ प्रदेश काही उदाहरण होत.
टुंड्रा परिसंस्था
ही परिसंस्था अतिशय थंड वातावरण जोपासली गेलीय आणि इथे पाऊस कमी पडत असतो आणि झाड कमी असतो तसेच हा प्रदेश कैक वर्षांपासून बर्फ़ाने आच्छादित आहे.-उदाहरण- आर्क्टिक प्रदेश
वाळवंट परिसंस्था
दिवसा अति उष्ण आणि रात्री खूप थंड असलेले असे बरेच वाळवंटिय प्रदेश जगात अस्तित्वात आहेत.
जलचर किंवा सागरी परिसंस्था
पाण्याचा अंतरंगात अस्तित्वात असलेल्या जलचर जीवांची संस्था त्यात ही दोन संस्था पोसल्या जातता एक म्हणजे
- सागरी खारट पाण्यातली परिसंस्था
- गोड्या पाण्यातली परिसंस्था.
गोड्यापाण्यातली परिसंस्था म्हणजे ज्यात ज्या पाण्यात मिठाचे प्रमाण कमी असते व आपल्या आजूबाजूला असलेल्या नाले,नद्या,तलाव आणि सरोवरांचा ह्या परिसंस्था त समावेश होतो .खूप जास्त जैवविविधतेने भरलेलले सागरी परिसंस्थेत मिठाचे प्रमाण अर्थातच जास्त असते. सर्व समुद्रह्याचा भाग आहेत
इकोसिस्टमची रचना-इकोसिस्टमची रचना दोन मुख्य घटकांमध्ये विभागली जाऊ शकते, म्हणजेः
जैविक -बायोटिक घटक
अबायोटिक अजैविक घटक
बायोटिक घटक
बायोटिक घटक इकोसिस्टममधील सर्व जीवांचा समावेश होतो . बायोटिक घटकांचे
- ऑटोट्रोफ्स,
- हेटरोट्रोफ्स आणि
- सॅप्रोट्रोफ्स (किंवा विघटन करणारे) मध्ये वर्गीकरण केले जाऊ शकते.
ऑटोट्रोफ- उत्पादकांमध्ये वनस्पतींसारख्या सर्व ऑटोट्रोफचा समावेश आहे. प्रकाशसंश्लेषण प्रक्रियेद्वारे ते अन्न तयार करू शकतात म्हणून त्यांना ऑटोट्रोफ म्हणतात. परिणामी, अन्न साखळीवर उच्च असलेले इतर सर्व जीव अन्नासाठी उत्पादकांवर अवलंबून असतात.
हेटरोट्रोफ – ह्या उलट हेटरोट्रोफ हे असे जीव असतात जे अन्नासाठी इतर जीवांवर अवलंबून असतात. हेटरोट्रोफ ग्राहकांना तीन प्रकारे विभागल गेलाय जसे
- प्राथमिक ग्राहक,
- दुय्यम ग्राहक आणि
- तृतीय ग्राहकां
- प्राथमिक ग्राहक सहसा शाकाहारीच असतात व ते अन्नासाठी ऑटोट्रोफ उत्पादकांवर अवलंबून असतात.
- दुय्यम ग्राहक जे आपल्या शरीराला लागणार्या अन्न व उर्जेसाठी प्राथमिक ग्राहकांवर अवलंबून असतात. ते दोन्ही मांसाहारी किंवा शाकाहारी असतात
- तृतीक ग्राहक ह्यात अश्या जीवांचा समावेश होतो त जे अन्नासाठी दुय्यम ग्राहकांवर अवलंबून असतात. तृतीयक ग्राहक देखील मांसाहारी किंवा शाकाहारी असतात
आता ह्यात काही प्रमाणात चौथा घटक सुददा असतो जो काही खाद्य साखळ्यांमध्ये पाह्यला मिळत असतात. हे जीव उर्जेसाठी तृतीयक ग्राहकांवर अवलबून असतात तसेच त्यांच्यावर पोसणार कुणी ही नैसर्गिक जीव नसल्यामुळे सहसा अन्न साखळीच्या उच्च स्थानी असतात.
विघटक किंवा डिकॉमोजरमध्ये बुरशी आणि जीवाणूसारख्या सप्रोफाईट्सचा समावेश होतो . ते मृत आणि सडत असलेल्या जीव जंतु वर पोसले जातात . इकोसिस्टमसाठी हे विघटनशील जीव सर्वात म्हत्वाचे असतात कारण ते वनस्पतीं करता आवश्यक असणारे पोषक द्रव्यांचा र्विघटित करून त्यांचा पुनर्वापर करण्यास मदत करतात.
अजैविक घटक-परिसंस्थेचा अजैविक घटकत सर्व निर्जीव घटकांचा समावेश होतो जसे हवा, पाणी, माती, खनिजे, सूर्यप्रकाश, तापमान, पोषके , वारा इत्यादींचा
इकोसिस्टमची कार्ये-परिसंस्थेची कार्ये खालीलप्रमाणे आहेतः
- हे आवश्यक अश्या पर्यावरणीय प्रक्रियेचे नियमन करते, जीवन प्रणालींना जगण्यास मदत करते आणि स्थिरता बनवते .
- बायोटिक आणि अबायोटिक घटकांमधील पोषक द्रव्यांच्या प्रवाह स देखील हे मदत करणे
- हे इकोसिस्टममधील विविध तिन्ही स्तरांमध्ये संतुलन राखते.
- हे जीवावरण तून खनिजे मिळवण्यास मदत करते
- अजैविक घटक सेंद्रिय घटकांच्या संश्लेषणात मदत करतात ज्यातून जीवांना आवश्यक त्या उर्जेची देवाणघेवाण होते.
इकोसिस्टम पर्यावरणीय संकल्पना
फूड चेन
सूर्य हा पृथ्वीवरील उर्जेचा सर्वात मोठा स्रोत आहे. तो सर्व वनस्पतींच्या जीवनासाठी आवश्यक ऊर्जा देत असतो . वनस्पती या उर्जेचा प्रकाशसंश्लेषणाच्या प्रक्रियेसाठी उपयोग करतात, जे त्यांचे अन्न संश्लेषित करण्यासाठी वापरल जाते.या जैविक प्रक्रियेदरम्यान, उर्जा ही रासायनिक उर्जेमध्ये परावर्तीत होते आणि ती खाली सर्व घटका कडे जात राहते
उत्पादकाकडून- ग्राहकांकडे आणि अखेरीस, मोठ्या जीवकडे आणि अशी इकोसिस्टम तयार होते तिलाच आपण अन्न साखळी असे म्हणतात.
मृत आणि सडत जाणारे पदार्थ तसेच सेंद्रिय घटक हे बुरशी आणि जीवणूकडून विघटित केले जातात ह्या विघटन मधून निर्मित ऊर्जा लहान कणा द्वारे पुन्हा वाटवरणात सोडली जाते व ती तिथून पुन्हा उत्पदांकडून वापरली जाते
आता आपण एक लहान ससमजण्या सारखं उदाहरण पाहुयात
शेततातील नाकतोडे हे गहू , कापशी अश्या पिकावर जगतात , ह्या नाक तोड्याना शेतातीललाच उंदीर खातात आणि उंदरना मोठ्या साप आणि सापांना घारी खातात असे ही एक अन्न साखळी तयार होते
थोडक्यात इकोसिस्टम म्हणजे काय तर एकेमेकांना पूरक अशी जीव संस्था जिथे सजीवना लागणारे अन्न आणि उर्जे करता पर्यावरणतिल घटक एकमेकांवर अवलबून , मदत करत असतात व जीवन जगत असतात.
I want some ideas on ecosystem heath and invision. .please answer