करिअर काऊन्सिलिंग म्हणजे काय?करिअर काऊंसिलर कसे बनावे? – What is career counselling

करिअर काऊन्सिलिंग म्हणजे काय?- What is career counselling

दहावी बारावी पर्यंतचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर सर्व विद्यार्थ्यांना करिअरसाठी आपले एक क्षेत्र निवडायचे असते.

सर्व आईवडिलांची इच्छा असते की आपल्या इतर भावंडांची नातलगांची मित्र मैत्रिणींची मुले ज्या क्षेत्रात शिक्षण घेत आहेत आपल्या मुलाने देखील त्याच क्षेत्रात आपले करीअर करायला हवे.

होते असे की मुलाला आर्ट्स मध्ये रूची असते अणि आईवडीलांची इच्छा असते की आपल्या मुलाने सायन्स ही शाखा निवडावी.

अशा वेळी मुले ही अत्यंत गोंधळुन जात असतात त्यांना समजत नसते आईवडिलांचे ऐकुण सायन्स घ्यावे की आपल्या आवडीच्या आर्ट्स शाखेतच प्रवेश घ्यावा.

अशा गोंधळलेल्या मनस्थितीत विद्यार्थ्यांने कोणत्या शाखेत करीअर करणे त्याच्यासाठी योग्य अणि उत्तम आहे याविषयी योग्य अशा मार्गदर्शनाची आवश्यकता असते अणि हे मार्गदर्शन करण्याचे काम करिअर काऊंसिलर करत असतो.

कोणत्या शाखेत प्रवेश घ्यावा कोणत्या क्षेत्रात अॅडमिशन घ्यावे अशा दविधा मनस्थितीत असलेल्या विद्यार्थ्यांच्या वाढत्या संख्येमुळे ह्या क्षेत्राचे डिमांड अधिक वाढत चालले आहे.

विद्यार्थ्यांना करीअरविषयी योग्य ते गाईडन्स करण्यासाठी दिवसेंदिवस करीअर काऊंसिलरच्या वाढत्या मागणीमुळे ह्या क्षेत्रात करीअर करण्याला अधिक महत्व प्राप्त होत आहेत.

आपल्याला देखील ह्या क्षेत्रात करीअर करायचे आहे ह्या क्षेत्राविषयी अधिक माहिती प्राप्त करायची असेल तर आपण एकदम योग्य ठिकाणी आलेले आहात.

आजच्या लेखात आपण करिअर काऊन्सिलिंग म्हणजे काय अणि करीअर काऊंसिलर बनण्यासाठी काय करायला हवे ह्या विषयीं सविस्तरपणे माहिती जाणून घेणार आहोत.

See also  भारत इलेक्ट्रॉनिक लिमिटेड मार्फत विविध पदांकरीता भरती सुरू - BEL recruitment 2023 in Marathi
What is career counselling

करीअर काऊंसिलर कोण असतो?

करीअर काऊंसिलर हा एक असा प्रोफेशनल व्यक्ती असतो जो फ्रेशर्स विद्यार्थ्यांना करीअरविषयी योग्य ते मार्गदर्शन करीत असतो.

विद्यार्थ्यांनी आपल्या आवडी निवडी,छंद व्यक्तीमत्व, शैक्षणिक अर्हता,अंगात असलेले कला कौशल्य यानुसार

कोणते क्षेत्र करीअरसाठी निवडायला हवे कोणते क्षेत्र निवडणे त्यांच्यासाठी योग्य अणि अधिक उत्तम आहे कोणता कोर्स करणे त्यांच्यासाठी अधिफ फायदेशीर ठरेल हे सांगण्याचे काम करीअर काऊंसिलर करत असतो.

विद्यार्थ्यांच्या मनात आपल्या करीअरविषयी असलेल्या सर्व शंका दुर करण्याचे काम करीअर काऊंसिलर करतो.

करीअर काऊंसिलर बनण्यासाठी शैक्षणिक पात्रता काय हवी?

करीअर काऊंसिलर बनण्यासाठी सर्वप्रथम आपणास कुठल्याही एका शाखेतून बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.यानंतर सायकोलाॅजी ह्या विषयात बीए नंतर एम ए करायचे आहे.किंवा आपण यात एखादा डिप्लोमा कोर्स देखील करू शकतो.

यात आपणास बीए ओनर्स इन सायकोलाॅजी,एम एस सी इन सायकोलाॅजी,पीजी डिप्लोमा इन सायकोलाॅजी,पीजी डिप्लोमा इन गाईडन्स अॅण्ड काऊंसिलिंग देखील करता येते.

करीअर काऊंसिलर क्षेत्रात करीअर करण्यासाठी सर्वप्रथम आपणास एक प्रवेश परीक्षा द्यावी लागते त्यात उत्तीर्ण झाल्यानंतर आपणास महाविद्यालयात करिअर काऊन्सिलिंगच्या अभ्यासक्रमासाठी कोर्ससाठी प्रवेश दिला जातो.काही ठिकाणी डायरेक्ट अॅडमिशन देखील ह्या अभ्यासक्रमासाठी दिले जाते.

करीअर काऊंसिलिंगचे काही उत्तम कोर्सेस –

१)डिप्लोमा इन गाईडन्स अॅण्ड काऊंसिलिंग –

हा एक वर्षाचा डिप्लोमा असतो ज्याची फी ३० ते ४० हजार इतकी असते.

२)बीए इन हयुमन रिसोर्स मॅनेजमेंट –

हा तीन वर्षांचा कोर्स आहे.ज्याची फी साधारणतः ४ ते ८ लाख इतकी आहे.

३) एम ए इन करिअर काऊन्सिलिंग –

हा दोन वर्षांचा कोर्स आहे ज्याची फी साधारणतः १५ ते २५ हजार इतकी असते.

४) एम फिल इन करीअर काऊंसिलिंग –

हा एकुण १८ महिने इतक्या कालावधीचा कोर्स आहे ज्याच्यासाठी आपणास १ ते दीड लाख इतकी फी लागु शकते.

See also  कोल्ड काॅलिंग म्हणजे काय?Cold calling information

५) पीएचडी इन करीअर काऊंसिलिंग –

हा एकुण तीन वर्षांचा कोर्स आहे ज्याची फी साधारणतः अडीच ते तीन लाख इतकी आहे.

करीअर काऊन्सिलिंगच्या अभ्यासक्रमासाठी कोर्सला प्रवेश घेण्यासाठी लागणारी एकुण फी –

शासकीय महाविद्यालयात आपणास करीअर काऊंसिलरच्या अभ्यासक्रमासाठी कोर्ससाठी २० ते ३० हजारात प्रवेश प्राप्त होतो.

पण खाजगी महाविद्यालयात आपणास करीअर काऊंसिलरच्या अभ्यासक्रमासाठी कोर्ससाठी प्रवेश घ्यायला महाविदयालयानुसार ६० हजार ते ३ लाखापर्यंत खर्च देखील येऊ शकतो.

करीअर काऊंसिलर म्हणून नोकरीच्या संधी –

करीअर काऊंसिलर म्हणून आपणास वेगवेगळ्या शाळा महाविद्यालयात,एनजीओ,युनिव्हसिर्टी,कोचिंग सेंटर तसेच सामाजिक कल्याण संस्थानात नोकरी करता येते.

याचसोबत करीअर काऊंसिलर म्हणून आपण एखाद्या सरकारी एजन्सी मध्ये काॅर्पोरेट हाऊस मध्ये,खाजगी विद्यापीठ,संशोधन संस्था इत्यादी मध्ये नोकरीला लागु शकतो.

करीअर काऊंसिलरचे वेतन –

करीअर काऊंसिलर म्हणून सुरूवातीला आपणास २० ते २५ हजारांपर्यंत वेतन प्राप्त होते.आपल्या अनुभवानुसार स्कीलनुसार ह्या वेतनात पुढे वाढ देखील केली जाते.

भारतापेक्षा परदेशात युके तसेच अमेरिका सारख्या ठिकाणी करीअर काऊंसिलरला अधिक वेतन प्राप्त होते हे वेतन किमान ३ लाख ते १० लाखापर्यंत असते.

करीअर काऊंसिलिंगचे फायदे-

करीअर काऊंसिलिंगमुळे विद्यार्थ्यांना आपल्या आवड कौशल्य अणि क्षमतेनुसार योग्य ते करिअर निवडायला मदत प्राप्त होते.

करीअर काऊंसिलिगचे कोर्स आॅफर करणारया भारतातील काही टॉप युनिव्हसिर्टीची नावे –

१) निर्मला शिक्षण संस्था

२) श्री वासवी काॅलेज

३) राजीव गांधी राष्ट्रीय युवा विकास संस्था

४) आॅल इंडिया मॅनेजमेंट असोसिएशन