मेडिटेशन म्हणजे काय -? What is meditation and its benefits

मेडिटेशन म्हणजे काय – ? – What is meditation and its benefits

मेडिटेशन म्हणजे ध्यान-मनन -चिंतन तसेच साधना होय.

मेडिटेशन करण्याचे 20 फायदे कोणकोणते आहेत?

मेडिटेशन करण्याचे पुढील महत्वाचे 20 फायदे –

1)आपली एकाग्रता क्षमता कमी असेल कुठलेही काम तसेच अभ्यास आपणास पुर्ण एकाग्रतेने करता येत नसेल तर अशावेळी रोज सकाळी मेडिटेशन केल्याने आपली एकाग्रता वाढत असते.आणि आपण पुन्हा नेहमीप्रमाणे आपले कोणतेही काम तसेच अभ्यास पुर्ण एकाग्रतेने करू लागतो.

2) समजा आपण काही कारणास्तव नेहमी चिंतेत आणि तणावात राहत असलो आणि अशावेळी जर आपण रोज मेडीटेशन करायला सुरूवात केली तर आपली सर्व चिंता आणि तणाव दुर होण्यास मदत होत असते.आणि आपल्याला तणावमुक्त वाटु लागते.

3) जी व्यक्ती नेहमी निराश राहत असेल आणि सदैव नैराश्याने ग्रस्त राहत असेल अशा व्यक्तीने जर रोज मेडिटेशन केले तर त्याच्या मनातील नैराश्याची भावना दूर होण्यास मदत होत असते.

4) मेडिटेशन केल्याने आपल्या कार्यक्षमतेत देखील वाढ होत असते.कुठलेही काम करण्याच्या आपल्या कार्यक्षमतेत वाढ होऊ लागते.

5) रोज नियमितपणे मेडिटेशन केल्याने आपल्या विचार भावनेवर,इंद्रियांवर आपले नियंत्रण वाढु लागते.आपल्या मनात येणारया कुठल्याही वाईट,नकारात्मक विचार भावनेकडे आपल्याला तटस्थपणे बघता येते.आणि ते विचार किती योग्य आहे अयोग्य आहे हे ठरवून त्या विचार तसेच भावनांना वेळीच नियंत्रित करता येते.

6) ज्या व्यक्तीला खुपच राग येत असेल त्याचे त्याच्या रागावर नियंत्रण राहत नसेल अशा व्यक्तीने जर मेडिटेशन करायला सुरूवात केली तर त्याचा सर्व राग चिडचिड हळुहळु शांत होऊ लागते.

7) रोज मेडिटेशन केल्याने कुठलेही काम आपण न चुकता एकदम तंतोततपणे हळुहळु करू लागतो.

8) मेडिटेशन केल्याने आपल्या सहनशीलतेत देखील वाढ होत असते.म्हणजेच समजा कोणी आपल्याला वाईट तसेच अपशब्द बोलले तर आपण त्याला त्यावर लगेच प्रतिक्रिया न देता त्या परिस्थीतीकडे तटस्थपणे पाहु लागतो आणि अशावेळी समोरच्या व्यक्तीला आपण तडकाफडकी कुठलीही प्रतिक्रिया देत नसतो.

See also  २ एप्रिल रोजी घेण्यात येणार असलेली पोलिस भरती लेखी परीक्षा पुढे ढकलण्यात येण्याची शक्यता?

9) ज्यांना उच्च रक्तदाबाचा त्रास आहे अशा व्यक्तींनी जर रोज मेडिटेशन केले तर त्यांचा हा त्रास दुर होऊ शकतो.

10)नियमित मेडिटेशन केल्याने आपल्या निर्णयक्षमतेत अणि स्मरणशक्तीत देखील वाढ होत असते.

11) जी व्यक्ती रोज मेडिटेशन करते तिला कितीही गडबड गोंधळमध्ये ठेवले तरी देखील तिचे आपल्या ध्येयावरून लक्ष विचलित होत नसते.

12) नियमित मेडिटेशन केल्याने आपले विचार सकारात्मक होऊ लागतात.कुठल्याही घटना परिस्थीतीकडे बघण्याचा आपला दृष्टीकोन देखील सकारात्मक होऊ लागतो.

13) मेडिटेशन केल्याने आपल्याला शांत आणि चांगली झोप येत असते.आणि रात्री झोप पुर्ण न झाल्याने,झोप लागत नसल्याने ज्या आरोग्याच्या समस्या आपणास उदभवत असतात त्या कधीच उदभवत नाही.

14) मेडिटेशन करण्याचा अजुन एक फायदा आहे तो म्हणजे नियमित मेडीटेशन केल्याने आपल्या शरीरातील आजारांशी लढा देण्याची जी क्षमता आहे ती वाढत असते.ज्याने आपण लगेच आजारी देखील पडत नसतो.

15) मेडिटेशन केल्याने आपल्याला हदयाशी संबंधित कुठल्याही आजाराचा त्रास जाणवत नाही.
उदा, हार्ट अटँक

16) जी व्यक्ती रोज मेडिटेशन करते ती हळुहळु अध्यात्माकडे वाटचाल करू लागते.अशा गोष्टी आपल्याला कळु लागतात ज्या याआधी आपल्याला कधीच कळाल्या नाही.जाणवल्या नव्हत्या.

17) जी व्यक्ती मेडिटेशन करते ती कधीच वाईट व्यसनांच्या आहारी जात नसते.कारण तिचे आपल्या इंद्रियांवर विचारांवर भावनांवर नेहमी नियंत्रण राहत असते.

18) मेडिटेशन केल्याने आपणास अंतर्गत शांतीचा अनुभव प्राप्त होतो.

19) मेडिटेशन केल्याने आपल्या मधील दया,सहानुभूती, करूणा ह्या भावना अधिक विकसित होऊ लागतात.आपल्या मनात प्राणीमात्रां विषयी इतर जीवांविषयी दया तसेच करूणेची भावना निर्माण होत असते.

20) मेडीटेशन केल्याने आपल्या प्रत्येक विचार भावना इंद्रिय यांबददल आपल्या मध्ये एक आत्मजागृकता निर्माण होत असते.