Lien amount म्हणजे काय ? What is SBI lien amount Marathi information

Lien amount म्हणजे काय ? What is SBI lien amount Marathi information

 आज आपल्यातील कित्येक एस बी आय अकाऊंट होल्डर एसबी आय मधील लियन अमाऊंटच्या बाबतीत नेहमी चिंतित अणि गोंधळलेले असतात.कारण आपल्याला लियन अमाऊंट काय असते?आणि लियन अमाऊंट कशाला म्हटले जाते?हेच माहीत नसते.

आणि त्यातच आपण जर एसबी आयचे अकाऊंट होल्डर आहे किंवा एसबी आयमध्ये आपले अकाऊंट ओपन करणार आहे तर आपल्याला एसबी आय बँक अकाऊंट आणि लियन अमाऊंट विषयी माहीती असणे देखील फार गरजेचे असते.

सगळयात महत्वाची नोंद करण्याची बाब म्हणजे लियन अमाऊंट हे फक्त एसबी आय बँकेतील अकाऊंट होल्डरसाठीच नसते.तर इतर बँकेत देखील अकाऊंट होल्डरच्या खात्यात लागु होत असते.अशा परिस्थितीत आपण बँकेशी त्वरीत संपर्क साधायला हवा आणि याबाबत दक्षतापुर्वक जाणुन घ्यायला हवे.

आजच्या लेखात आपण एसबीआयच्या लियन अमाऊंटविषयी सविस्तरपणे माहीती जाणुन घेणार आहोत.जेणेकरून आपल्या मनात लियन अमाऊंटविषयी असलेल्या सर्व शंका,प्रश्न आणि असलेले गोंधळ त्वरीत दुर होतील.

Lien amount म्हणजे काय?

लियन अमाऊंट मध्ये बँक आपल्या खात्यात जमा असलेल्या रक्कमेपैकी एक विशिष्ट रक्कम एका विशिष्ट कालावधीसाठी लाँक करत असते.

आणि सगळयात महत्वाची बाब म्हणजे आपल्याला बँकेकडुन ही रक्कम एका ठरलेल्या विशिष्ट कालावधीपर्यत वापस देखील घेता येत नसते.आणि ह्या रक्कमेचा वापर देखील आपल्याला तोपर्यत करता येत नाही जोपर्यत बँक ती रक्कम अनलाँक करत नसते.

बँक आपल्या खात्यातुन लियन अमाऊंट का जमा करत असते?त्याचे कारण काय असते?

बँकेकडुन आपल्या खात्यातुन लियन अमाऊंट जमा केले जाण्याची अनेक कारणे असु शकतात.

1) आपण आपल्या बँक अकाऊंट थ्रू आयपीओ साठी अर्ज करत असण्याबाबद सेबीकडुन मागील काही वर्षात आयपीओ साठी अर्ज करण्याच्या सिस्टम मध्ये चेंज करण्यात आला होता.

ज्यात आपण फक्त आपल्या बँक अकाऊंट द्वारे ए एसबीए किंवा अँप्लीकेशन सपोर्टिड बाय ब्लाँक केलेल्या अकाऊंटचा युझ करूनच आपले अकाऊंट युझ करू शकतो.

ह्या प्रकरणामध्ये जोपर्यत आपले वितरण फिक्स केले जात नव्हते तोपर्यत पैसे आपल्या खात्यातुन निघत नव्हते.आपण आयपीओ साठी अर्ज केल्यापासुन ते प्रत्यक्ष वाटप होईपर्यत आपले बँक अकाऊंटमधील पैसे ब्लाँक करून ठेवले जात होते.

See also  डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती शुभेच्छा मराठीत । Dr. Babasaheb Ambedkar Jayanti Wishes In Marathi

आपल्याला वाटप प्राप्त झाल्यानंतर आवश्यक तेवढी रक्कम ही कंपनीला दिली जात होती.आपल्याला वाटप प्राप्त झाल्यावर लियन अमाऊंट काढुन टाकले जात असते.

ह्या सर्व प्रोसेसचा आपल्याला हा बेनिफिट होत असतो की आपल्याला वाटप नाही झाल्यावर पैशांची वाट पाहत बसावे लागत नाही.आणि आपल्या अकाऊंट मधील पैशांवर आपल्याला अजुन व्याज प्राप्त होत असते.

2) एसबी आय बँक तसेच इतर बँक आपल्याला व्हर्चुअल डेबिट कार्डची फँसिलिटी देत असते.हे व्हरचुअल कार्ड आपल्याला आँनलाईन ट्रान्झँक्शनसाठी सिक्युरीटी प्रोव्हाईड करत असतात.

हे व्हर्चुअल कार्ड देखील दिसायला फिजिकल कार्डसारखीच असतात फक्त यांचा वापर आपल्याला आँनलाईन ट्रान्झँक्शनसाठी करता येत असतो.आणि हे लिमिटेड टाईम पिरीअडसाठी अँक्टिव्ह राहत असतात.

जेव्हा आपण ठाराविक विशिष्ट अमाऊंट असलेले व्हर्चुअल कार्ड तयार करत असतो तेव्हा त्याची सर्व अमाऊंट एसबी आय थ्रु लियन वर टाकली जात असते.

आणि जेव्हा आपण आपल्या व्हर्चुअल कार्डचा उपयोग करून ट्रान्झँक्शन करत असतो तेव्हाच हे अमाऊंट डेबिट केले जात असते.

आणि समजा आपण कार्डची व्हँलीडिटी संपेपर्यत(जी साधारणत 48 तासांची असते) ते वापरात आणले नाही तर धारणाधिकार आपोआप अकाऊंटमधून काढुन टाकला जात असतो.

याचसोबत जर आपण व्हर्चुअल कार्ड तयार केलेले असेल आणि आपल्याला त्याची अजिबात आवश्यकता भासत नसेल तर आपल्याला फक्त व्हर्चुअल कार्ड रद्द करावे लागत असते.यानंतर लियन अमाऊंट लगेच सोडले जात असते.

3) जेव्हा आपण बँकेचे सर्विस चार्ज फेडण्यास असमर्थ तसेच अपयशी ठरत असतो तेव्हा बँक आपल्या खात्यातील विशिष्ट रक्कम लियन अमाऊंट म्हणून ठेवू शकते.यात बँकेच्या विविध चार्जेसचा समावेश देखील केला जात असतो.

4) समजा आपली क्रेडिट हिस्टरी जर एकदम खराब असेल तर आपण फिक्स डिपाँझिटवर देखील क्रेडिट कार्ड प्राप्त करू शकतो.ही कस्टमर म्हणजेच बँक अकाऊंट होल्डर आणि बँक या दोघांमधील एक विन विन सिच्युएशन असते.

जेव्हा बँकेकडुन आपले हे क्रेडिट इशु केले जात असते

तेव्हा बँक आपल्या क्रेडिट कार्डच्या क्रेडिट लिमिटपर्यत आपल्या फिक्स डिपाँझिटवर लियन अमाऊंटची मार्किग करत असते.

5) आपण जर बँकेचे क्रेडिट कार्डचे अमाऊंट पे केले नसेल तर अशा परिस्थितीत सुदधा बँक आपल्या अकाऊंटवर लिन अमाऊंटची मार्किंग करू शकते.

6) समजा आपण ज्या बँकेत लोन काढले आहे त्याच बँकेत आपले अकाऊंट देखील असेल तर आपण आपले ईएम आय पेमेंट न भरल्यावर आपल्या बँक अकाऊंटवर लिन अमाऊंट मार्किग करण्याचा बँकेला पुर्णपणे अधिकार असतो.

See also  Possessive म्हणजे काय? Possessive meaning in Marathi

7) कोर्टाच्या आदेशानुसार देखील आपल्या खात्यातील लियन अमाऊंट जमा केले जात असते.

8) आपण जर टँक्स भरला नसेल तर इन्कम टँक्स डिपार्टमेंट आपल्या बँक अकाऊंटमधून लियन अमाऊंट जमा करू शकते.फक्त त्यासाठी काही प्रोसीजर असते जे त्यांना पुर्ण करावे लागत असते.

9) चेक किंवा ड्राफ्टचा काही इशु झाला असेल तर अशा परिस्थितीत देखील आपल्या अकाऊंटमधुन लियन अमाऊंट जमा केले जात असते.

10) साँफ्टवेअरमधील टेक्निकल इशुमुळे किंवा बँक अकाऊंट होल्डरकडुन झालेल्या मँन्युअल फाँल्टमुळे देखील आपल्या बँक अकाऊंटमधुन लियन अमाऊंट जमा केले जात असते.

अशा प्रकरणामध्ये लियन अमाऊंट काढुन टाकण्यासाठी आपल्याला कस्टमर केअर किंवा बँक मँनेजरशी बोलावे लागत असते.

आपण आपल्या bank account मधुन Lien amount कसे remove करू शकतो?

  • आपल्या बँक अकाऊंटमधून लियन अमाऊंट म्हणजेच अकाऊंटमधील विशिष्ट रक्कम विशिष्ट कालावधीसाठी लाँक होण्याचे कारण समजुन घेतल्यावर आपल्याला आपल्या बँक अकाऊंटमधुन लियन अमाऊंट कसे रिमुव्ह करावे हे ठरवण्यासाठी फायदेशीर ठरत असते.
  • आपले बँक अकाऊंट जर ए-एस-बीए मुळे लियन अमाऊंटवर असेल आणि आपल्याला लियन अमाऊंट काढुन टाकायचा असेल तर आपल्याला यासाठी आयपीओच्या रजिस्ट्रारला इशुसह अमाऊंट काढायची रिक्वेस्ट सेंड करावी लागेल.
  • आणि समजा आपण वेट करू शकत असु तर आपल्याला आयपीओचे वाटप न भेटल्यावर देखील लियन अमाऊंट काढुन टाकले जात असते.
  • याने आपली बोली रदद केली जाऊन आपली कँश अन्ब्लाँक करण्यासाठी एस सी एसबीला सुचित केले जाते.
  • आपले लियन अमाऊंट जर व्हर्चुअल कार्डमुळे जमा करण्यात आले असेल तर अशा परिस्थितीत आपण आपले कार्ड रदद करून देखील लियन अमाऊंट आपल्या अकाऊंटवरून ताबडतोब काढुन टाकु शकतो.
  • आपल्या कार्डची रक्कम ही सुमारे 48 तासानंतर संपत असते.त्यानंतर आपले लियन अमाऊंट काढुन टाकले जात असते.
  • याचसोबत जर आपल्या क्रेडिट कार्डच्या फिक्स डिपाँझिट वरील लियन अमाऊंट रदद करायला आपण बँकेशी थेट संपर्क साधू शकतो.किंवा आपले कार्ड देखील कँन्सल करू शकतो.
  • आणि बाकीच्या कंडिशनमध्ये जिथे टँक्स न भरल्यामुळे,लोन न फेडल्यामुळे,तसेच बँकेचे इतर चार्जेस पे न केल्यामुळे जे लियन अमाऊंट जमा केले जात असते.ते आपण बँकेला योग्य तो दंड भरून परत करू शकतो.आणि आपल्या अकाऊंटवर असलेले लियन अमाऊंट काढुन टाकु शकतो.
  • अशा पदधतीने आपल्या अकाऊंटवरील लियन अमाऊंट आपल्याला विविध पदधतीने काढुन टाकता येत असते.
  • आणि आपल्या अकाऊंटवरून लियन अमाऊंट का जमा केले जाते आहे हे जाणुन घेण्यासाठी आपण बँकेशी काँन्टँक्ट देखील करू शकतो.
  • मग बँक आपल्याला आपल्या अकाऊंटवरून लियन अमाऊंट जमा करण्याचे कारण सांगत असते.आणि हा इशु साँल्वह करण्यासाठी आपण काय उपाय करायला हवा ते देखील सांगत असते.
See also  नाम म्हणजे काय आणि नामाचे प्रकार किती? Definition And Types Of Nouns In Marathi

SBI मधील Lien amount विषयी विचारले जाणारे काही महत्वाचे प्रश्न

 1) एस बी आयमधील लियन अमाऊंटवर बँकेकडुन व्याज दिले जाते का?

 होय बँकेकडुन लियन अमाऊंटच्या रक्कमेवर व्याज देखील दिले जात असते.पण यात आपण व्याज काढु शकतो पण लियन अमाऊंटची रक्कम नाही काढु शकत.

2) एसबी आय मधील लियन अमाऊंटची रक्कम आपण कशी काढु शकतो?

 एसबी आयमधील लियन अमाऊंटची रक्कम काढुन टाकण्यासाठी त्या विषयी असलेला मेन इशु आधी साँलव्ह करावा लागतो.म्हणजेच आपल्या अकाऊंटमधून लियन अमाऊंट का जमा केले गेले आहे याचे कारण जाणुन घ्यावे लागते.

आणि मग कारणाची चौकशी करण्यासाठी आपण बँकेला भेट देऊ शकतो.आणि ही समस्या साँल्व्ह करायला ह्या समस्येवर आपल्याला काय उपाय योजना करता येईल याची सर्व प्रोसेस बँकेकडून जाणुन घेऊ शकतो.

3) आपल्या बँक अकाऊंटवर लियन अमाऊंट असणे हे वाईट असते का?

 बँक अकाऊंटवरील लियन अमाऊंट हे दोन प्रकारचे असते.स्वैच्छिक आणि अनैच्छिक.जर लियन अमाऊंट हे आपल्या बँक अकाऊंटसाठी ऐच्छिक असेल तर आपल्याला कुठलीही अडचण येत नसते.

पण याचठिकाणी बँकेने अकाऊंट होल्डरच्या ईच्छेविरूदध स्वताहुन लियन अमाऊट जमा केले तर ते अकाऊंट होल्डरच्या क्रेडिट स्कोअरवर निगेटिव्हली इफेक्ट करत असते.

4) लियन अमाऊंटचे उदाहरण कोणते असु शकते?

 समजा आपण बँकेकडुन लोन घेऊन एखादी कार खरेदी केली आहे.आणि बँकेकडून नोटीस आल्यानंतरही आपण आपला ई एम आय फेडला नाही.अशा परिस्थितीत ई एम आयचे पेमेंट वसुल करण्यासाठी बँक आपल्या अकाऊंटमधील रक्कम लियन अमाऊंट म्हणुन जमा करत असते.

5) एसबी आय लियन अमाऊंटचा कालावधी किती असतो?

 एसबी आय लियन अमाऊंटचा टाईम पिरिअड हा त्याच्या कारणावरून ठरत असतो.

म्हणजेच जर लियन अमाऊंट हे व्हर्चुअल कार्ड तयार करण्याच्या विरोधाबाबत असेल तर याला 48 तास पुरेसे असतात.

आणि याचठिकाणी एएसबीए मार्फत आयपीओ साठी दहा दिवसांकरीता असेल तर वाटप अंतिम होईपर्यत वेळ लागु शकतो.तसेच कोर्टाचा आदेशावरून आणि टँक्स न भरण्यावरून लियन अमाऊंट जमा केले जात असेल तर मुळ समस्या दुर होईपर्यत हे टिकत असते.