कलम 144 म्हणजे काय? What is section 144 in Marathi

कलम 144 म्हणजे काय?

मित्रांनो कालच टिव्हीवर बातम्यांमध्ये आपण सर्वानी ऐकले की पुणे जिल्हयात नागरीकांना अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला.

याचसोबत तिथे कलम 144 देखील लागु करण्यात आला आहे.अशा वेळी आपल्या मनात नक्कीच एक प्रश्न निर्माण झाला असेल की हा कलम 144 नक्की काय भानगड आहे?हा कलम 144 का अणि कधी लागु करण्यात येत असतो.

याचकरीता आपण आजच्या लेखात कलम 144 विषयी सविस्तरपणे माहीती जाणुन घेणार आहोत.

जेणेकरून आपल्या मनातील ह्या सर्व प्रश्नांची आपणास योग्य अणि समाधानकारक उत्तरे प्राप्त होतील.

कलम 144 काय आहे?

कलम 144 हा फौजदारी दंडसंहिता कायद्या अंतर्गत लागु केला जाणारा कलम आहे.

यालाच जमावबंदी तसेच संचारबंदी असे देखील म्हटले जाते.

कलम 144 का?अणि कधी लागु केला जात असतो?

कलम 144 आपात्कालीन परिस्थितीत लागु केला जात असतो.

जेव्हा एखाद्या परिसरामध्ये मोठया प्रमाणात जमाव एकत्र येऊन गर्दी होण्याची,दंगल होण्याची सामाजिक शांतता भंग होण्याची शक्यता असते.

तेव्हा अशा परिस्थितीत त्या परिसरातील जमावावर नियंत्रण प्राप्त करण्यासाठी शांतता प्रस्थापित करण्यासाठी जमावबंदी संचारबंदी करण्यासाठी तिथे कलम 144 लागु केला जात असतो.

कलम 144 पुढील काही विशिष्ट परिस्थितीत लागु केला जात असतो.

उदा, दंगल होणे,एखाद्या ठिकाणी दरोडा पड़णे, हिंसाचार करणे,प्राणघातक हल्ला होणे अशा काही परिस्थितीमध्ये कलम 144 लागु केला जात असतो.

कलम 144 कोणाकडुन लागु केला जातो?

एखाद्या ठिकाणी खुप आपात्कालीन परिस्थिती निर्माण झालेली असते.

See also  Etiquette - शिष्टाचार म्हणजे काय? ईटीक्वेट्स प्रकार ,गरज, महत्व व उदाहरण - Etiquette information in Marathi

तेव्हा त्या परिस्थितीला नियंत्रणात आणण्यासाठी जिल्हा न्याय दंडाधिकारी,कार्यकारी दंडाधिकारी,जिल्हाधिकारी एक तातडीची जमावबंदीची नोटीस जारी करत असतात.

कलम 144 किती कालावधीकरीता लागु केला जात असतो?

कलम 144 एक ते दोन महिन्यांकरीता त्या परिसरातील परिस्थिति नियंत्रणात आणण्यासाठी लागु केला जाऊ शकतो.

समजा एखाद्या ठिकाणी नागरीकांच्या जिवाला धोका पोहचेल अशी दंगलीची परिस्थिती निर्माण झाली असेल तेव्हा त्या परिस्थितीला आटोक्यात आणण्यासाठी ५ महिन्यांसाठी देखील जमावबंदी लागु केली जाऊ शकते.

अणि मग सर्व परिस्थिति नियंत्रणात आली की हा कलम 144 मागे घेतला जात असतो.

एखाद्या परिसरात कलम

144 लागु झाल्यानंतर नागरीकांनी पाळावयाचे नियम –

● जिथे जमावबंदी लागु करण्यात आली आहे तेथील लोकांनी गर्दी करू नये.एका ठिकाणी चार पेक्षा जास्त लोकांनी घोळका करू नये.

● अशा परिसरातील व्यक्तींनी प्राणघातक हत्यारांची देवाणघेवाण करू नये अणि ती जवळ देखील बाळगु नये.

● येथील लोकांना घराबाहेर पडता येत नाही परिसरात फिरता वावरता येत नाही.

● लोकांना एकत्र जमता येत नाही एकत्र फिरता देखील येत नाही.

कलम 144 चा भंग केल्यास आपणास काय शिक्षा होईल?

आपल्या देशातील कायद्याचे सुव्यवस्थेचे पालन करणे आपणा सर्वाचे कर्तव्य आहे.

● कलम 144 पालन न करणारया व्यक्तीस काही वर्षे तुरूंगवास भोगावा लागु शकतो तसेच सोबत शासनाने आकारलेला दंडही भरावा लागत असतो.

जमावबंदी अणि संचारबंदी या दोघांमध्ये काय फरक असतो?

संचारबंदी म्हणजे काय?

संचारबंदीमध्ये एखाद्या विशिष्ट वेळ आणि कालावधीकरीता घरातच राहावे असे लोकांना सुचित केले जाते.

संचारबंदीत सर्व शाळा काँलेज वाहतुक कंपन्या कार्यालये इत्यादी सर्व काही बंद ठेवले जातात.फक्त इमरजन्सी सर्विस जसे की दवाखाने मेडिकल हेच ह्या कालावधीत चालु ठेवले जात असतात.

संचारबंदीचे पालन न केल्यास सहसा कुठलीही कठोर शिक्षा केली जात नाही.पण काही परिस्थितीत पोलिस प्रशासन आपणास समजावुन सोडु शकते.लाठीमार करू शकते किंवा आपल्याकडुन लेखी लिहुन घेतले जाते.किंवा पोलिस आपणास काही महिन्यांसाठी तुरूंगात पण टाकु शकतात.

See also  व्ही आर एस फुलफाँर्म अणि त्याचा अर्थ - VRS meaning and full form in Marathi

जमावबंदी म्हणजे काय?

जमाव बंदीत फक्त जास्त लोकांना एकत्र येता येत नाही,एका ठिकाणी गर्दी करता येत नाही.एकटा व्यक्ती फिरू शकतो.

अशा परिसरातील व्यक्तींनी प्राणघातक हत्यारांची देवाणघेवाण करू नये अणि ती जवळ देखील बाळगु नये.जमावबंदीत शाळा काँलेज वाहतुक कंपन्या सरकारी कार्यालये देखील चालु असते.

Leave a Comment