डबल्यु एचओचा फुलफाॅम काय होतो – WHO full form in Marathi

डबल्यु एचओचा फुलफाॅम काय होतो WHO full form in Marathi

डब्लयु एचओचा फुलफाॅम world health organization असा होत असतो.यालाच आपण मराठी मध्ये जागतिक आरोग्य संघटना असे देखील म्हणतो.

डबल्यु एचओ काय आहे?

डबल्यु एचओ ही एक जागतिक पातळीवरील आरोग्य संघटना आहे.

डबल्यु एच ओचे मुख्य उद्दिष्ट काय आहे?

डबलयु एच ओचे मुख्य उद्दिष्ट जगभरातील निर्माण होत असलेल्या आरोग्य विषयक समस्या अडी अडचणी संकटे यांना दूर करणे हे आहे.

डबल्यु एच ओ ही एक जागतिक आरोग्य संघटना आहे जी आपल्या सभासद राष्ट्रांना आरोग्य विषयक मार्गदर्शन करण्याचे काम करते त्यांच्या आरोग्य विषयक विविध समस्या अडचणींवर उपाययोजना करण्याचे काम करते.

जागतिक आरोग्य संघटनेकडुन दरवर्षी एक अहवाल सादर केला जात असतो ह्या अहवालात कोणत्या आरोग्य विषयक समस्येवर आजारावर काय उपाययोजना करायला हव्यात ह्या बाबद जागतिक आरोग्य संघटनेने सांगितलेले असते.

जागतिक आरोग्य संघटना ही united nation organization युनोचा एक भाग म्हणून देखील काम करते.

जागतिक आरोग्य संघटनेची काही इतर प्रमुख उद्दिष्ट पुढीलप्रमाणे आहेत –

आपल्या सर्व सभासद राष्ट्रांना आरोग्य विषयक विविध समस्या अडी अडचणी संकट यांवर मार्गदर्शन करणे.यासाठी योग्य अणि आवश्यक त्या गाईडलाईनस तयार करणे.

आंतरराष्ट्रीय संस्था,संयुक्त राष्ट्र,विशेष संस्था ह्यांच्या साहाय्याने आरोग्य विषयक सोयी सुविधांचे विविध कार्यक्रम राबविणे हे आहे.

See also  राष्टीय टपाल कामगार दिवस - National Postal Worker Day In Marathi

आपल्या सर्व सभासद राष्ट्रांच्या आरोग्य सेवा मजबुत करण्यासाठी सदैव प्रयत्नशील असणे.

सर्व सभासद राष्ट्रांना विविध शासकीय तसेच प्रशासकीय कार्यामध्ये साहाय्य प्रदान करणे.

उत्तम आरोग्यासाठी स्वच्छता पर्यावरण तसेच पोषक आहार याबाबत मार्गदर्शन प्रदान करणे हे आहे.

आरोग्य संबंधित केल्या जात असलेल्या विविध संशोधनांवर विशेष भर देणे.

डबल्यु एच ओची स्थापणा कधी करण्यात आली होती?

डबलयु एच ओ म्हणजेच जागतिक आरोग्य संघटनेची स्थापना ७ एप्रिल १९४८ रोजी करण्यात आली होती.हया संघटनेची स्थापना झाल्यानंतर ७ एप्रिल १९५० पासुन जागतिक आरोग्य दिवस साजरा केला जाऊ लागला.

डबल्यु एच ओचे सभासद राष्ट्र किती आहेत?

डबलयु एच ओचे एकुण १९४ सभासद राष्ट्र आहेत.म्हणजे तब्बल १९४ राष्ट्रांनी ह्या संघटनेचे आतापर्यंत सभासदत्व स्वीकारले आहे.

आपला भारत देश सुदधा ह्या सभासद राष्ट्रांमध्ये समाविष्ट आहे भारत देशात जागतिक आरोग्य संघटनेचे मुख्यालय दिल्ली येथे स्थापित करण्यात आले आहे.

आपला भारत देशाने १२ एप्रिल १९४८ मध्ये ह्याचे सभासदत्व स्वीकारले होते.

डबल्यु एच ओचे मुख्यालय कोठे आहे?

डबल्यु एच ओचे मुख्यालय स्वित्झर्लंड देशातील जिनिव्हा ह्या शहरात आहे.

संपूर्ण जगभरात ह्या संघटनेची १५० मुख्यालये कार्यरत आहेत.

जागतिक आरोग्य संघटनेने पुरस्कृत केलेली आधारभुत जीवन कौशल्ये कोणकोणती आहेत?

  1. समस्या निराकरण
  2. निर्णयक्षमता
  3. तणावाचे निराकरण करणे
  4. परिणामकारक संभाषण कौशल्य
  5. आंतरमानवीय नातेसंबंध व्यवहार जपणे
  6. भावनांचे निराकरण करणे
  7. स्व जाणीव
  8. सहसंवेदना

सृजनात्मक तसेच चिकितसात्मक विचार

जागतिक आरोग्य संघटनेचे डायरेक्टर कोण आहेत?

जागतिक आरोग्य संघटनेच्या डायरेक्टर पदी Tedros Ad Janome Ghebreyesus यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

Leave a Comment