संवाद कौशल्य म्हणजे काय? महत्व व उत्तम संवाद कौशल्यची आवश्यकता काआहे? Why communication skills most important in our life to achieve success in any other field

संवाद कौशल्य म्हणजे?उत्तम संवाद कौशल्याचे महत्व काय आहे?आपल्या अंगी उत्तम संवाद कौशल्य असणे का आवश्यक आहे?Why communication skills most important in our life to achieve success in any other field

संवाद कौशल्य आपल्या दैनंदिन जीवनात फार महत्वाची भुमिका पार पाडत असते.

जीवनात आपणास कुठल्याही क्षेत्रात यशस्वी व्हायचे असेल त्या क्षेत्रात आपली एक वेगळी ओळख निर्माण करायची असेल तर आपल्या अंगी उत्तम संवाद कौशल्य(best communication skill) असणे गरजेचे आहे.

आज जेवढेही व्यक्ती आपणास जीवनात यशस्वी झालेले दिसुन येतात ते सर्व व्यक्ती आपल्या उत्तम संवाद कौशल्यामुळेच आज जीवनात एवढे यशस्वी झाले आहेत.

म्हणुन जीवनात यशस्वी होण्यासाठी आपण आपल्या राहणीमाना सोबत पर्सनॅलिटी सोबत आपल्या संवाद कौशल्यावर देखील विशेष भर देणे आवश्यक आहे.त्यात सुधारणा घडवून आणने आवश्यक आहे.

संवाद कौशल्य ही एक कला तसेच कौशल्य आहे ज्यात आपण आपले विचार,मत भावना योग्य पद्धतीने इतरांसमोर त्यांना आवडेल अशा स्वरुपात व्यक्त करीत असतो.

म्हणजे समोरच्या व्यक्तीला जी गोष्ट ज्या पद्धतीने हवी असेल त्याच पद्धतीने त्याला समजावण्याचा प्रयत्न करणे, ती गोष्ट त्याच पद्धतीने त्यांच्यासमोर मांडणे ज्या पद्धतीने मांडल्यास त्याला स्वताचा फायदा दिसेल.याला उत्तम संवाद कौशल्य असे म्हटले जाते.

संवाद कौशल्यामध्ये आपल्या बोलण्यामध्ये अशी एक कला असायला हवी जिने आपण समोरच्या व्यक्तीला आपले मत सहजरीत्या पटवून देऊ शकतो.

आपले विचार त्यांच्यासमोर मांडल्यावर लगेच तो व्यक्ती आपल्या विचार मताशी बोलण्याशी सहमत झाला पाहिजे.असे सामर्थ्य अणि कौशल्य आपल्या संवाद साधण्याच्या पद्धतीत असायला हवे.

आपल्याला आपल्या भावना,विचार,मत कल्पणा इतरांसमोर अशा पद्धतीने सादर करता आल्या पाहिजे मांडता आल्या पाहिजे ज्यामुळे इतर लोक देखील आपल्या मताशी सहमत होतील,आपल्या मताशी कन्व्हेयन्स होतील.आपण सहजरीत्या त्यांना आपले मत विचार पटवून देऊ शकतो.

उत्तम संवाद कौशल्य अंगी असल्याने आपण इतरांचे नेतृत्व करू शकतो.त्यांचे लीडर बनत असतो.

See also  रिलायन्स फाऊंडेशन स्कॉलरशिप २०२३ विषयी माहिती - Reliance Foundation Scholarship

उत्तम संवाद कौशल्य अंगी असल्यास घरात,समाजात,कामाच्या ठिकाणी,चारचौघात बसता उठताना देखील आपली इतरांवर चांगली छाप पडते.

कंपनीत मिटिंग वगैरे मध्ये प्रेझेंटेशन मध्ये बोलताना आपल्या बोलण्याचा इतरांवर चांगला प्रभाव पडतो.अणि क्लाईट देखील आपल्यासोबत डील करण्यासाठी एका झटक्यात कन्व्हेयन्स होत असतो.फक्त आपल्या उत्तम संवाद कौशल्यामुळे.

उत्तम संवाद कौशल्यामुळे आपले इतरांशी असलेले संबंध देखील चांगले राहत असतात.समाजात,नातेसंबंधात कामाच्या ठिकाणी आपले एक चांगले नाव राहत असते.

Why communication skills most important in our life

उत्तम संवाद कौशल्य साधण्यासाठी कोणते गुण आपल्या अंगी असणे आवश्यक आहे?

१) उत्तम वाचन –

उत्तम संवाद कौशल्य निर्माण करण्यासाठी आपणास भरपुर वाचन करावे लागेल.कारण वाचनाने आपल्याला नवनवीन गोष्टी शिकायला मिळतात.आपल्या विचारांमध्ये समृद्धी येते.
अणि आपल्या शब्दसाठयात देखील वाढ होते.

वाचनाने आपल्या बौद्धिक क्षमतेत विचार क्षमतेत वाढ होते.आपण विचारसंपन्न बनत जातो.

२) आत्मविश्वास –

इतरांशी उत्तम रीत्या संवाद साधण्यासाठी आपल्यामध्ये आत्मविश्वास असणे आवश्यक आहे त्यासाठी आपले विचार जीवनाकडे बघण्याचा दृष्टीकोन सकारात्मक असणे आवश्यक आहे.

आपल्यामधील आत्मविश्वासामध्ये वाढ होण्यासाठी आपण इतरांची मदत करायला हवी.

३) आपल्या व्यक्तिमत्त्वातील कमतरता भरुन काढण्याचा प्रयत्न करणे –

आपल्या प्रत्येकाच्या व्यक्तीमत्वात काही कमतरता असतात ज्या भरून काढण्याची आपणास आवश्यकता असते.म्हणुन आपण आपल्यातील कमतरता जाणुन घेऊन त्या भरून काढण्यासाठी प्रयत्न करायला हवे.

जेव्हा कोणी आपल्यातील दुर्गुणांविषयी सांगत असते तेव्हा राग न मानता त्यांच्याशी भांडण न करता आपल्यातील ते दुर्गुण कमतरता आपण स्वीकारल्या पाहिजे अणि ते दुर्गुण दुर करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे.