जागतिक महासागर दिवस 20 घोषवाक्ये -World Ocean Day 20 Slogans In Marathi

जागतिक महासागर दिवस 20 घोषवाक्ये -World Ocean Day 20 Slogans In Marathi

जागतिक महासागर दिवस निमित्त समाजात समुद्र आणि त्याच्या सुरक्षेबाबद जागरूकता सतर्कता निर्माण व्हावी लोकांना आपल्या जीवणात असलेले समुद्राचे महत्व तसेच भुमिका कळावी.

तसेच समुद्रातील दुषित पाण्याचे सेवण केल्याने वाढत असलेल्या समुद्री जीवांच्या मृत्युच्या,रोगराईच्या प्रमाणावर आळा घालण्यासाठी आपण आज जागतिक महासागर दिनासाठी काही 12 महत्वाची घोषवाक्ये जाणुन घेणार आहोत.

1)समुद्र ही आपली एक अमुल्य संपत्ती आहे ह्या संपत्तीचा नाश होऊ देऊ नका.

2) चला सर्व मिळुन निश्चय करुया महासागराचे रक्षण करूया.

3) महासागर हा मानवाला जीवण जगण्यासाठी आवश्यक असलेल्या महत्वपूर्ण संसाधनाचा खजिना आहे आणि ह्या खजिन्याचे रक्षण करणे ही आपली सर्वाचीच प्राथमिक जबाबदारी आहे.

4) चला सर्व मिळुन एकच कार्य करु महासागराचे रक्षण करू.

5) जर आपल्याला पोहण्यासाठी स्वच्छ पाणी हवे असेल तर आपण समुद्र नेहमी स्वच्छ ठेवायलाच हवा.

6) कारखान्यातुन समुद्रात सोडल्या जात असलेल्या सांडपाण्यात अनेक विषारी आणि रासायनिक घटक पदार्थ असतात असे पाणी समुद्रात न सोडता सुरक्षित ठिकाणी त्याचा निचरा करूया.

7) समुद्रात प्लास्टिकचा तसेच कुठल्याही अन्नपदार्थाचा कचरा टाकणे बंद करूया.कारण याने मानव तसेच समुद्रातील इतर जीवांना हानी पोहचते.

8) कमी प्लास्टिकच्या उत्पादनांचा नेहमी वापर करा.

9) सागरी जीवनाचे शोषण करतात अशा वस्तुंचा वापर करणे टाळा.

10) आपण जहाजांमधुन होणारी तेलगळती थांबवायला हवी.त्यासाठी ठोस पाऊले उचलायला हवी.

11) नेहमी समुद्र स्वच्छ ठेवा आणि कमी कचरा करा सर्व कचरा कचराकुंडितच टाका.

12) चला महासागर स्वच्छ ठेवण्यासाठी कार्य करत असलेल्या संस्था संघटनांना पाठिंबा देऊ.

13) समुद्रामुळेच अन्नाला चव आणि स्वाद देणारे मीठ आपल्याला प्राप्त होते याची जाणीव ठेऊन समुद्राचे रक्षण करूया.

14) समुद्रामुळेच आपल्याला जीवणसत्वांनी युक्त स्वादिष्ट मासे खायला मिळतात याची जाणीव ठेऊया.

See also  महाराष्ट्र दिन कोट्स मराठीत । Maharashtra Day Quotes In Marathi

15)समुद्रामुळे आपल्याला विविध खनिजे मिळतात.

16) समुद्र सुरक्षित नसला तर देशातील मासेमारी व्यवसाय बंद पडेल म्हणून समुद्राची रक्षा आपण करायलाच हवी.

17) समुद्र आहे म्हणुनच आज अनेक जीव जंतु वनस्पती जिवंत आहेत.

18) समुद्रातील माशांपासुनच आपल्याला खताची औषधांची निर्मिती करता येते.

19) समुद्राने दिले आपणास बरच काही मग आपण त्याच्या संरक्षणाची जबाबदारी का घेत नाही?

20) समुद्राचे संरक्षण हेच खरे देशाचे संरक्षण.