YoY (Year-Over-Year) म्हणजे काय ? YoY explained in Marathi

YoY (Year-Over-Year) माहिती व महत्व ? YoY explained in Marathi

वर्ष दर वर्ष (Year on Year) ही वार्षिक आधारावर दोन किंवा त्यापेक्षा अधिक मोजता येत येण्यासारख्या गोष्टींची , आकडेवारींची किंवा financial aspects ची तुलना करण्यासाठी वापरली जात असलेली एक आर्थिक तुलना असते.

कुठल्या कंपनीच्या वित्तीय प्रदर्शनात सुधारणा होते आहे,किंवा ते स्थिर होते आहे किंवा ते दिवसेंदिवस अधिक खराब होत चालले आहे हे याचे आकलन आपणास YOY performance बघुन होत असते.

उदा.अनेक फायनान्शिअल रिपोर्टमध्ये आपण असे वाचत असतो की कुठल्यातरी एका विशिष्ट व्यवसायाने गेल्या तीन वर्षात,वर्षाच्या आधारावर आपल्या इन्कममध्ये वाढ झाली असल्याची नोंद केली आहे.

आजच्या लेखात ह्याच YOY विषयी अधिक सविस्तरपणे माहीती जाणुन घेणार आहोत.

YOY चा फुलफाँर्म काय आहे?

YOY चा फुल फाँर्म year over year तसेच year on over असा होत असतो.ज्याला मराठीत आपण साल दर साल किंवा वर्ष दर वर्ष असे देखील म्हणत असतो.

YOY म्हणजे काय?

  • YOY हे दोन किंवा त्यापेक्षा अधिक मोजलेल्या event चे मुल्यांकन(evaluation) करण्याची पदधत असते.यात आपण एका कालावधीतील result चे comparison वार्षिक आधारावर इतर तुलनात्मक कालावधींशी करत असतो.
  • कुठल्याही कंपनीच्या आर्थिक कामगिरीचे(financial performance evaluation) मुल्यांकन करण्याचा YOY measurement हा एक लोकप्रिय तसेच प्रभावी मार्ग असतो.
  • ज्या investors ला कुठल्याही कंपनीच्या financial performance ची measurement करायची असते असे investors त्या कंपनीचा YOY अहवाल चेक करत असतात.जेणे ती कंपनी loss मध्ये चालली आहे की profit मध्ये हे investors ला कळत असते.
  • YOY comparison हे कुठल्याही कंपनीच्या financial performance आणि गुंतवणुकीतील कामगिरी या दोघांचे मुल्यांकन करण्याचा एक चांगला मार्ग असतो.
  • YOY मध्ये मागील वर्षाच्या फरकाच्या आधारावर विशिष्ट श्रेणीत व्यवसाय कशा पदधतीने कार्य करतो आहे.हे निर्धारीत करण्यासाठी YOY चा वापर केला जात असतो.
  • YOY कुठल्याही मँट्रिक्सची तुलना करत असते.ज्यात वार्षिक(year),त्रैमासिक(3 month),मासिक(monthly) आपल्या कंपनीच्या अहवाल आवश्यकतेनुसार पुनरावृत्ती होत असते.
See also  Bond म्हणजे काय?what is bond in finance

YOY चा फायदा काय असतो?

● YOY measurement डेटाच्या संचाची क्राँस तुलना सुलभ करत असते.

● YOY डेटाचा वापर करून कंपनीच्या पहिल्या तिमाही कमाईसाठी financial analyst तसेच investor first quarter डेटाची वर्षाची तुलना करू शकतात.आणि कंपनीच्या महसुलात वाढ होते आहे का कमी होते आहे हे चेक करू शकतात.

उदा 2021 च्या पहिल्या तिमाहीत कोका कोला काँपरेशनने मागील वर्षाच्या पहिल्या तिमाहीच्या तुलनेमध्ये निव्वळ महसुलामध्ये पाच टक्के वाढ नोंदवली आहे.

● कुठल्या कंपनीचा performance वेळोवेळी कसा बदलत आहे हे बघण्यासाठी investors ला YOY performance analysis करायला आवडत असते.

● हे गुंतवणुक पोर्टफोलिओची तुलना सुलभ करत असते.

YOY मागील तर्क :

कुठल्याही कंपनीच्या कार्यक्षमतेचे विश्लेषण करीत असताना YOY comparision अत्यंत लोकप्रिय ठरते.कारण ते हंगामीपणा कमी करायला मदत करत असते.

हा घटक बर्याच व्यवसायांवर प्रभाव टाकु शकतो.विक्री नफा आणि इतर इकोनाँमिकल मँट्रिक्समध्ये वर्षाच्या अलग अलग कालावधीत बदल घडुन येत असतो.कारण व्यवसायाच्या बहुतेक लाईन्सचा पीक सिजन आणि कमी मागणीचा हंगाम असतो.

उदा.किरकोळ विक्रेतास सुटटीच्या खरेदी हंगामामध्ये सर्वाधिक मागणी असते.जी वर्षाच्या चौथ्या तिमाहीत येत असते.

कुठल्याही कंपनीच्या कार्यक्षमतेचे योग्य प्रमाण जाणुन घेण्यासाठी वर्ष दर वर्ष महसुल आणि आणि नफा यांची तुलना करणे अर्थपुर्ण असते.

एका वर्षातील चौथ्या तिमाहीतील कामगिरीची इतर वर्षीच्या चौथ्या तिमाहीतील कामगिरीशी तुलना करणे महत्वाचे असते.

जर एखाद्या इन्वहेस्टरने चौथ्या तिमाहीतील किरकोळ विक्रेत्याचे रिझल्ट आधीच्या तिसरया तिमाहीच्या तुलनेत जर बघितले तर आपणास असे दिसुन येत असते की एखाद्या कंपनीमध्ये अभुतपुर्ण वाढ होत आहे.जेव्हा ती हंगामी परिणामांवर परिणाम करत असते.

त्याचप्रमाणे चौथ्या तिमाहीच्या तुलनेत पुढील पहिल्या तिमाहीत एक नाट्यमय घट देखील दिसून येऊ शकते.

YOY हा मागील महिन्यापेक्षा एक चतुर्थांश किंवा महिना मोजत असतो.आणि इन्वहेस्टरला रेखीव वाढ बघण्याची परमिशन देत असते.

See also  Scheduled आणि Non Scheduled Bank यात काय फरक आहे? - Difference in Scheduled Non Scheduled Bank

YOY कशासाठी वापरले जात असते?

YOY चा वापर एका कालावधीचा आणि एका वर्षापुर्वीच्या कालावधीची तुलना करण्यासाठी केला जात असतो.

YOY कसे calculate करतात?

यात चालू वर्षाचे मुल्य घेऊन त्यास मागील वर्षीच्या मुल्याने भागले जात असते.आणि 1 वजा करणे समाविष्ट असते.(या वर्षी आणि गेल्या वर्षी -1).

म्हणजेच वर्तमान मुल्य आणि मागील वर्षाच्या मुल्यांचा याची गणना केली जात असते.

YOY आणि YTD मध्ये काय फरक आहे?

YOY(year on year) बारा महिन्यांच्या बदलाकडे पाहत असते तर वर्ष ते तारीख (year to date)वर्षाच्या सुरूवातीचा बदल पाहत असते.(1 जानेवारी)

जर आपणास एका वर्षापेक्षा कमी कालावधीसाठी तुलना करावयाची असेल तर आपण काय करावे?

जर आपल्याला एका वर्षापेक्षा कमी कालावधीसाठी तुलना करावयाची असेल तर आपण YOY प्रमाणेच महिना ते महिना(MOM) तसेच QOQ चे calculation करू शकतो.

YOY संबंधित वारंवार विचारले जाणारे अत्यंत महत्वाचे प्रश्न खालीलप्रमाणे – YOY FAQ

1)QOQ काय असते?

QOQ चा फुल फाँर्म quarter over quarter असा होत असतो.हे एका आर्थिक तिमाही,मागील आर्थिक तिमाहीमधील टक्केवारीतील फरक मोजण्याचे एक तंत्र आहे.

हे एखाद्या गुंतवणुकीचे किंवा कंपनीच्या एका तिमाहीपासुन दुसरया तिमाहीपर्यतचे वाढीची measurement असते.

2)Sequential growth कशाला म्हणतात?

Sequential growth ही कंपनीच्या अलीकडच्या कालावधीतील financial performance चे measurement असते.जी त्याच्या आधीच्या कालावधीच्या तुलनेत असते.

EXAMPLE HDFC RESULTS

HDFC Bank Quarterly Results, HDFC Bank Financial Statement Accounts
HDFC Bank Q3 Results: Profit jumps 18% YoY to Rs 10,342 crore

 

Discount Broker की Full Service Broker कोणता निवडावा: शेअर मार्केट  ?

Discount Broker की Full Service Broker कोणता निवडावा: शेअर मार्केट  ? Difference in discount broker and full service broker