बिटकॉईन म्हणजे काय? बिटकॉईन मायनिंग काय असते ? सोप आणि साध !!

बिटकॉईन म्हणजे काय?

बिटकॉईन Bitcoin एक डिजिटल करन्सी, पैश्यांच वेगळं स्वरूप असून , जसे रुपये, डॉलर किंवा युरो तसेच ह्याला ही किंमत आहे, फक्त हे ब्लॉकचेन तंत्रज्ञान वर आधारित असल्यामुळे ह्याला भौतिक स्वरूप नाही म्हणजेच  आपण त्याला नाणे किंवा नोटे  सारख स्पर्श करू शकत नाही किंवा पाहू शकत नाहीत.

बिटकॉईन हे एक नवीन आधुनिक चलन असून जे नव्या विचारांवर,नवीन साठवणूक करण्याबाबत आणि नव्या आर्थिक व्यवहार पद्धतीवर आणि नवीन विनिमय पद्धतीचा अवलंब करते.

तसेच  ब्लॉकचेन तंत्रावर आधारित असल्याने ह्यास क्रिप्टोकरन्सी  म्हणून  ही ओळखले जाते.

खूप काही कठीण अवघड किंवा क्लिष्ठ प्रकार नसून फक्त वेगळ्या प्रकारचं एक चलन आहे,, बस!!

सतोषी नाकमोटो ह्यानी २००९ साली सुरू झालेली बिटकॉईन ही पहिली क्रिप्टोकरन्सी असून मागील लेखात पाहिलेल्या ब्लॉकचेन वर आधारित आहे. बिटकॉईन आपण  mining मायनिंग करून नवीन निर्माण करू शकतो करून किंवा विनिमयात, संचलनात असलेल्या  साठ्यातून खरेदी करू शकतो .

बिटकॉईन कुठं ठेवू शकतो?

त्याकरता आपल्या जवळ BTC व्हॅलेट  असणे गरजेचे आहे.  फक्त बिटकॉईन म्हणजे काय?करता किंवा बाकी जगातील क्रिप्टोकरन्सी साठवण्या करता असेलल मल्टीकरन्सी व्हॅलेट सुद्दा उपलब्ध असतात जे आपण अगदी १०-२० मिनिटात काही ऑनलाइन साइट्स वरून आपण खरेदी करू  शकता.

ह्यात कॉम्पुटर आणि मोबाईल दोन्ही करता व्हॅलेट उपलब्ध असतात , कुणाकडून बिटकॉईन घ्यायचे असतील तर तुमचा BTC पत्ता त्याला द्या तसेच कुणाला ट्रान्स्फर कारायचे असेल तर त्याचा BTC पत्ता घेऊन त्याला पाठवता येतात.

काही नामवंत कंपनी जश्या मायक्रोसॉफ्ट, इटसी किंवा पेपल ह्यांनी बिटकॉईन चलन स्वीकारण्यास सुरवात केली आहे.

नवीन क्रेप्टोकरन्सीज निर्माण झाल्या  आहेत त्यात  मुख्य – Ethereum, Dogecoin,Tether, Cardano, Binance Coin, , Ripple (Cryptocurrencies) या नावाने बाजारात ओळखल्या जातात

बिटकॉईन चे फायदे

 • तात्काळ खात्यात पैसे जमा होतात जरी आपण दुसऱ्या देशात असलात तरी, जगात कुठं ही एका क्षणात तुमी ट्रान्स्फर करू शकता.
 • एकदा केलेले व्यवहार रद्द होत नाहीत
 • खूपच कमी transaction फि,सरकार किंवा कुणाची मध्यस्थी शक्यता ना
 • व्यवहार पारदर्शी आणि खोटे किंवा नकली व्यवहार शक्यात नाहीच
 • mining मायनिंग करण्याकरता  कसली ही स्वतःची ओळख पठवून देणायची गरज नाही
 • कुठल्य ही सीमा नाहीत, वर म्हटलं प्रमाणे ह्याला वजन, वास किंवा स्पर्श करू शकत नाहीत.
 • बिटकॉईन इतकं टिकाऊ आणि मजबुत चलन कुठलंही नाही ,गेल्या १०वर्षा त कधीही ह्यात हेरफर केली गेली नाही किंवा नकली बिटकॉईन उत्पादन केलं गेलं नाही.
 • बिटकॉईन ची किंमत कमी होईल अशी कुठली ही गोष्ट करता येत नाही, कारण कुठं  स्थावर मालमत्ता नाही किंवा काही मूलभूत सोयीसुविधा स्थान नाही जे नष्ट करता येईल म्हणजेच बिटकॉईन कुणावर ही विसुंबून नाही.
 • किंवा कुणी व्यक्ती विशेष किंवा संस्था नाही ज्या वर बिटकॉईन अवलंबून आहे.

बिटकॉईन बाबतच्या काही चिंता

 • पण ह्यात आपल्या नेहमीच्या व्यवहार पेक्ष्या वेळ जास्त जातो, सध्या आपल्या डेबिट कार्ड ने मिनिटाला जेंव्हा हजार व्यवहार होऊ शकतात तिथं बिटकॉईने १० मिनिटात एक च transaction होऊ शकत.
 • ह्यावर ही बिटकॉईन तर्फे जलद पेमेंट पद्धत आणण्याचा प्रयत्न सुरू असून जिला लायटनिंग नेटवर्क मम्हणुन ओळखलं जाते.
 • काही देशांनी ह्यावर बंदी घातलेली आहे तसेच अगदीच अनोळखी व्यवहार मूळे हॅकर्स हल्ला करण्याचा प्रयत्न करत असता

बिटकॉईन डाटा मायनिंग म्हणजे काय?

बिटकॉईन मायनिंग म्हणजे काय

आपण जाणतोच की सोन ,चांदी किंवा काही बाकी मौल्यवान धातू ,खनिज मिळवण्यासाठी आपण खाणी त खणणं करत असतो त्या प्रक्रियेला खणणं म्हटल जाते किंवा काही वेळेस रासायनिक प्रक्रिया ही ह्यात असतात.आपल्या नोटेच चलन हवे असल्यास ते सरकार चलन छापणाऱ्या कारखान्यातुन छफाई करत असते  त्याला आपन नोटछफाई म्हणतात

तसेच ज्यात बिटकोईन पासून नवीन बिटकॉईन  निर्माण केले जातात त्या प्रक्रियेस mining म्हणतात.

पण ही पद्दत इतकी सोपी नसून नवीन बिटकॉईन  निर्माण करण्या करता उच्च  दर्जाच्या संगणक शक्ती च्या मदतीने कठीण  अगदी क्लिष्ठ अशी गणित सोडवावी लागतात त्यालाच mining म्हणतात.

२००९साली सटोषी ने बिटकॉईन स्थापना केली तेव्हा त्याची किंमत फक्त 10 सेन्ट्स होती ती पुढे जाऊन २०१७ त २०००० डॉलर्स पर्यन्त वाढली आणि आज तर एका बिटकॉईन साधारण 24 लाख आहे.

बिटकॉईन चा सर्वात लहानात लहान भागाला Satoshi असे म्हणतात आणी हा एक बिटकॉईन च्या १०करोडवा इतक्या सूक्ष्म भाग इतका असतो ०.००००००००१BTC

पाहिला बिटकॉईन व्यवहार हा २०१०मध्ये झाला त्यात 1 लाख बिटकॉईन वर दोन पिझा विकत घेतले गेलेत.आज च्या किमती नुसार आज काहीअब्जावधी रुपायांपेक्षा जास्त आहे

बिटकॉईन खरेदी करता लागणाऱ्या महत्वाच्या बाबी

 • बिटकॉईन की KEY – हा तुमचा बिटकॉईन चा पत्ता  तो दिला की तुमच्या त्या डिजिटल पत्त्यावर बिटकॉईन खरेदी केल्या नंतर येते.
 • बिटकॉईन व्हॅलेट- इथं आपण आपला बिटकॉईन साठवू शकता स्टोअर करू शकता.व्हॅलेट म्हणजे संगणकवर किंवा मोबाईल वर असलेली एकाद संगणक प्रणाली सॉफ्टवेअर असते
 • बँकेचे कार्ड – खरेदी वा विक्री साठी
 • ओळख पत्र- खरेदी साठी

वाचकां करता फक्त थोडी बेसिक माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे आपल्या काही अडचणी, प्रश्न असेल तर नक्की कामेंट्स मधून विचारा

1 thought on “बिटकॉईन म्हणजे काय? बिटकॉईन मायनिंग काय असते ? सोप आणि साध !!”

Leave a Comment