About Us

About Us:

मित्रांनो ह्या आपल्या वेब शोध ब्लॉग मधून  आपण महाराष्ट्रल्या तंत्रज्ञान ,सामाजिक , आर्थिक व कृषी  क्षेत्रातल्या नाविन्यपूर्ण,असामान्यकामगिरी करणार्‍या प्रेरणादायी घटनांचा मागोवा घेण्याचा एका छोटासा प्रयत्न आहे.

मित्रांनो आपण सर्व शेतीच महत्व जाणतो, आपल्या देशातली कृषि (agriculture) हें सर्वात मोठ उपजिविकेचे साधन आहे, लोकसंख्येच्या साधारणतः ६० % कुटुंब हे शेतीवर अवलंबून आहेत. आज़ आपल्या जीवनात तंत्रज्ञान technology वापर हा अविभाज्य भाग झालाय, अगदी लहानसहान काम मोबाईल रीचार्जिंग, तिकीट बुकिंग  सर्व माहिती  शोधण्या करता गुगलचे वापर  केला जातो.

ह्या तंत्रज्ञान चा वापर करून शेती पिकांच्या लगावडीची,नवीन संशोधीत बियाणे,खत,कीटकनाशके.नवीन शेतीयोजना, नवीन शेतीउपयोगी साधन किंवा औजार ह्याची माहिती खेडोपाडातल्या शेतकर्‍यांपर्यन्त पोहचते का?

भारत सरकारने वर्ष २०२२ पर्यन्त शेतीउत्पादन दुप्पट करायचं उद्दिष्ट समोर ठेवलय. हे उद्दिष्ट पूर्णहोण्याकरता नक्कीच शेती , शेतीउद्योगात गुंतवणूक वाढली पाहिजे , शेतीतल्या पायभूत सुविधा जसे पीक विमा ,सिंचन, अखंडित वीजपुरवठा,शितगृह, कृषि निर्यात ह्यावर अजून भर दिला गेला पाहिजे.

हे सर्व नक्कीच आपण achieve करू शकतो आणि ह्या करता एकं महत्वाचा मार्ग आहे माहितीचा  श्रोत.

कृषि क्षेत्रातली योजना, काही शेतकर्‍यांनी शेतीत केलेले नाविन्यपूर्ण प्रयोग ह्याची महिती लहान मोठ्या शेतकर्‍यां पर्यन्त पोहचवून उत्पन्न वाढणी करता उद्युक्त केल जात आहेच.

गेल्या काही वर्षपासून शेतीची GPS GSI technology ITC tool माध्यमांचा चां बरच उपयोग करण्यात येत आहे, ह्या साधनाचां उपयोग करून तालुका,सर्कल लेवल वर् शेतीच्या सध्य परिस्थिचा आढावा घेवून , शेतीला आवश्यक असणारी माहिती (बियाणे, खत ,हवामान) शेतकर्‍यां पर्यन्त पोहोचवली जाते. तसेच पुढे येणार्‍या संभाव्य परिस्तिथी चा आढावा घेवून योजना तयार केल्या जातात.

बर्‍याचदा अवकाळी पाऊस,वादळ गारपीठ ह्यामुळे पिकांच अतोनात नुकसान होत,जमीनदोस्त  होतात अशा वेळी आर्थिक पाठबळ कसे मिळेल शासनाच्या काय योजना असतात ह्या संदर्भात माहिती शेतकर्‍यांना असायला हवी. दोन,तीन वर्षापूर्वी विदर्भात किटनाशक  मुळे विषबाधा होवून काही शेतकर्‍यांना आपला जीव गमवावा लागला , अश्या स्थितीत प्रभावी उपाययोजना बनवून त्याची माहिती शेतकर्‍यांना दिली गेली पाहिजे.

मित्रांनो ह्या ब्लॉग चा आमचा उद्देश हाच आहे की वर म्हटल्या प्रमाणे  जीवनाच्या सर्वच क्षेत्रातल्या लहानसहान घटनाचा मागोवा घेवून ती माहिती सर्व मराठी जना पर्यन्त पोहचवावी.

  • इंटरनेट वर शेती बाबत विचारलेल्या प्रश्न ची उत्तर देण्याचा एक प्रयत्न करावा.
  • कृषिक्षेत्रात असामान्य कामगिरी करणार्‍या कृषि उद्योजकांची माहिती सामान्या शेतकर्‍या पर्यन्त पोहचून त्यांना प्रेरणा मिळावी आणि शेती क्षेत्रात योगदान करावं.
  • मराठी तरुणांनी मराठी ब्लॉगिंग कडे वळाव,आपण पारंगत असलेल्या ,सखोल माहिती असलेल्या विषयवार लेख लिहवेत. आपल्या असलेल्या ज्ञानाचा उपयोग स्वतच्या विकासा सोबत आपल्या समाजा चा विकास करावा.

त्यांनी ह्याच उपयोग करून उत्पन्न वाढवाव, स्वतचा कुटुंब आर्थिकदृष्ट्या स्वालंबी बनवाव आणि स्वत:सोबतच देशच्या विकासात भर घालावी.

संजय पाटील

टीम वेबशोध