आरोग्य विमा म्हणजे काय ? आणि का घ्यावा ? – Health Insurance Policy In Marathi

Health Insurance Policy In Marathi

Table of Contents

आरोग्य विमा म्हणजे काय

गेल्या एक दीड वर्षात जीवनात समोर आलेल्या खडतर परिस्थितिने सर्वांनाच एका गोष्टचा गांभीर्याने विचार करायला  भाग पाडले तो म्हणजे वैद्यकीय खर्च , दवाखाना, आजारपण कधी समोर उभे राहील आणि आपल आर्थिक गणित कोलमाडून पडेल सांगता येत नाही . दवाखान्याचा खर्च ही इतका जास्त की हाताळणे अगदी कठीण होवून जात.

पूर्वी पासून आपण मानत अलोय की ‛आरोग्यम धनसंपदा’

आपण कोणत्याही क्षेत्रात का असेना,नेहमी आपला लक्ष्य उत्तम आरोग्यवर  असल पाहिजे.समजा जर तुम्ही आठ तास शारीरिक कष्ट करत असला करत असाल,तर तुमचे आरोग्य चांगले असले पाहिजे.जर तुमचे आरोग्य चांगले नसले तर तुम्ही सलग आठ तास कामच करू शकत नाहीत.चांगले आरोग्य मिळवण्यासाठी तुम्ही नियमित व्यायाम केला पाहिजे,तसेच व्यायामाबरोबर तुम्ही चांगले अन्न घेतलं  पाहिजे आणि शरीराला पुरेषे पाणी आणि पुरीशी झोप घेतली पाहिजे,तरच तुमचे आरोग्य चांगले राहील.

शरीरक आणि मानसिक स्वास्थ सर्वात म्हत्वाचे- Health Insurance Policy In Marathi

आयुष्याचे सगळ्यात मोठं रहस्य म्हणजे मृत्यू .कुणीच आधी सांगु शकत नाही की आपला मृत्यू कधी होणार आहे ते. आज नाही तर काही वर्षाने पण तो अटळ , त्यासाठी अगोदर आर्थिक गोष्टींचे नियोजन नक्की करू शकतो.समजा,देव न करो पण आपला काही दिवसात किंवा महिन्यात अपघात झाला किंवा दुर्दैवाने काही व्याधी आलीच तर आपल्यावर पैश्यांचा दबाव येणारच  म्हणजेच  दवाखान्याच्या खर्च,गोळ्या औषधांचा खर्च येऊ नये म्हणून आपण आरोग्य विमा घेतला पाहिजे.आजच्या काळात आरोग्य विमा ल अंनंन्यसाधारण महत्व आलेल आहे . घेतात.

See also  ऑफिस स्टेशनरी यादी- Office stationery list in Marathi

आपण या लेखात आरोग्य विमा पॉलिसी बद्दल सविस्तर समजून घेणार आहोत.

आरोग्य विमा (Health Insurance ) म्हणजे नक्की काय आणि तो कसा घ्यायचा ?-

तुम्ही एकलच असेल की जसा कार इन्सुरन्स आहे,कार इन्सुरन्स मध्ये आपल्याला कारचा कुठे  काही अपघात झाला आणि कारचे नुकसान झाले तर होणारा सगळा खर्च आपण जिथुन विमा घेतलाय ती कंपनी भरून देते असते  .

आरोग्य विम्याच ही तसाच आहे. भविष्यात जर आपला कुठे अपघात झाला आणि तुम्ही दवाखान्यात असाल.तुमच्या घरातील ही कोणी कर्तेसवर्ते व्यक्ति नसतील आणि जर तुम्ही आरोग्य विमा घेतला असेल तर विमा कँपनी तुमचा सर्व दवाखान्याच्या खर्च दवाखान्याशी संपर्क साधून कॅशलेस करेल.

त्यतल्या त्यात जर आपण मध्यम वर्गीय कुटुंबातून असाल तर तुम्हाला आरोग्य विमा घेणे महत्वाचे आहे,असे मला वाटते.

तुम्हाला आरोग्य विमा पॉलिसी  का घेतली पाहीजेल ? – Health Insurance Policy In Marathi

  • घरात फक्त आपणच नसून , वृद्ध आई वडील किंवा लहान मूल सुद्धा असतात , एका कुटुंब विमा योजने ने सर्वांच्या आरोग्याची काळजी घेतली  जावू शकते
  • कोरोनाच्या काळात आजारांचा प्रादुर्भाव खूप वाढलाय.या काळात आरोग्य विमा असणे गरजेचे आहे.
  • तुम्ही दवाखान्यात भरती झाला आणि तुम्ही जर आरोग्य विमा पॉलिसी घेतली नसेल तर ओषधे गोळ्यांच्या खर्चाचा डोंगर आपल्या समोर उभा राहतो .
  • आरोग्य विमा घेतल्यामुळे आपण आपल्या बचतीतून काहीही रक्कम खर्च न करता आजारातून बरे होऊ शकतो.आर्थिक पाठबळ मिळू शकते
  • भारताच्या आयकर अधिनियम विभागातील धारा 80 D च्या नुसार तुम्ही कर लाभ प्राप्त करू शकता.
  • काही कंपनी जो वार्षिक आरोग्य तापसणी करता मोबदला देतात ते घेवून आपण आपल्या आरोग्यची काळजी घेवू शकता. .
  • आपल्या कुटुंबातील सदस्यांसाठी असे आरोग्य सरक्षण कवच असणे काळाची गरज आहे.

आपण चांगला आरोग्य विमा कसा निवडाना कोणत्या बाबी लक्ष्यात घ्याल ? Health Insurance Policy In Marathi

विमा हफ्ता- प्रीमियम रक्कम –Premium

आरोग्य विमा पॉलिसी  घेतलेल्या कंपनीकडे काही क्लावधी जसे महिना, क्वार्टर ,सहा महीने , वार्षिक नंतर प्रीमियम रक्कम भरावी लागते.आपण इंटरनेट च्या मदतीने विमा कंपनी वेबसाईटवर प्रीमियम कॅल्क्युलेटर वरून प्रीमियम रक्कम किती भरावी लागेल याची माहिती घेवू शकता.हे प्रीमियम कॅल्क्युलेटर तुमचे वय,तुमच्या कुटुंबातील सदस्यांची संख्या,तुमचा मेडिकल इतिहास ह्यावरून प्रीमियम रक्कम चा एक अंदाज आपल्या देवू शकते .

See also  What About You चा अर्थ काय होतो? - What about you meaning in Marathi

विमा रक्कम किंवा जास्त कव्हरेज –Sum assured

ही गोष्ट महत्वाची आहे ,साधारण आरोग्य विमा योजनेत  मोठे आजार जसे की कॅन्सर ,स्ट्रोक,किडनी फेलियोर,यांना कव्हर केले जात नाही किंवा काही बंधन असतं .ह्यासाठी गंभीर आजार कवर करणारी विमा  पॉलिसी  घ्यायला हवी.जेणेकरून तुमच्या गंभीर आजाराचे निवारण व उपचार  होतील तुमच्यावर आर्थिक भार पडू नये ह्यासाठी तुम्हाला अश्या योजना निवडल्या  पाहिजेत ,ज्यात जास्त कव्हरेज मिळू शकेल.

कुठले विकार , व्याधी वागळलेले आहेत ते पाहणे -Exclusion

आरोग्य विमा पॉलिसी  मध्ये तुम्हाला काही व्याधी किंवा विकार वर क्लेम मिळत नाही.ह्यासाठी तुम्हाला हे जाणणे गरजेचे आहे की पॉलिसी  कव्हरेज मधून कोणकोणत्या गोष्टी आधीच वगळल्या आहेत किंवा बाहेर ठेवल्या आहेत आणि ठराविक कालावधीनंतर कोणते उपचार पॉलिसी  मध्ये कव्हर केल्या जाणार आहेत.तुम्हाला अशी पॉलिसी  निवडली पाहिजे की त्यात जास्तीत जास्त कव्हरेज आणि कमीत कमी exclusion असावं. काही आजारांवर waiting

प्रतीक्षा कालावधी ते समजावून घेतलं पाहिजे

आरोग्य विमा पॉलिसी  घ्यायच्या अगोदर जर तुम्हाला कोणता आजार असेल तर पूर्व व्याधी आहेत का ? असतील तर अश्या व्याधी करता कालावधी जवळजवळ 48 महिन्यांचा प्रतीक्षा कालावधी असतो.तुम्ही घेतलेल्या पॉलिसी  मध्ये प्रतीक्षा कालावधी कमी असावा

कॅशलेस दवाखान्यात भरती –

आजच्या कोरोना काळात आजारांसाठी पैशाचे नियोजन करने फार कठीण झाले आहे.त्यासाठी हे गरजेचे आहे की,तुम्ही अशी आरोग्य विमा योजना निवडली पाहीजेल की त्यात कॅशलेस अॅडमिट करून करण्याची सुविधा असावी.जेणेकरून आर्थिक ताण पडणार नाही

जलद आणि सोपे पेमेंट –

तुम्ही आरोग्य विमा पॉलिसी  निवडताना अशी निवडली पाहिजे की त्यात तुम्ही सहजरित्या त्या कंपनीचे पेमेंट किंवा पुढे जावून रीनिवल  भरू शकाल.

कर सूट -Tax benefits

आरोग्य विम्यासाठी तुम्ही प्रीमियम रक्कम / विमा हफ्ता भरत असाल,त्यावर आयकर विभाग अधिनियम 80D नुसार सूट मिळते.स्वतः,आई-वडील,पत्नी आणि मुले-बाळे ह्यांच्यासाठी प्रीमियम रक्कमेवर 50,000 पर्यंत सूट मिळते.

See also  पोलिस कोठडी आणि न्यायालयीन कोठडी मधील फरक- Difference Between Police Custody And Judicial Custody In Marathi

अतिरिक्त लाभ –

एक योग्य आरोग्य विमा योजना  तुम्हाला जास्त कव्हर ही देतो.काही आजार नाही उद्भभवले तर तर वार्षिक नो क्लेम बोनस,वार्षिक हेल्थ चेकअप,कॅशलेस भरती ह्यांसारखे खूप काही अतिरिक्त लाभही काही विमा पॉलिसी  देत असतात .

आरोग्य विम्याचे फायदे –

  • जर आपण आज आरोग्य विमा घेतला आणि समजा दुर्दवाने 15 दिवसांनी अपघात झाला तर,विमा कंपन्या नियमांनुसार तुमचा सर्व वैद्यकीय खर्च देते.-
  • आरोग्य विम्यामध्ये दवाखान्यात भरती झाल्यापासून साधारण 60 दिवसापर्यत कंपनी दवाखान्याचा खर्च कव्हर करते.
  • अतिदक्षता विभागातिल खर्च ही विमा पॉलिसी देत असते -कव्हर करते.
  • काही अटींची पूर्तता केली तर रुग्णांना घरी उपचार करण्याची व्यवस्थाही विमा कंपनी करते.
  • काही विमा योजना अश्या आहेत ज्यात तुम्ही तुमच्या आरोग्यासाठी असलेल्या पॉलिसी  अंतर्गत दरवर्षी क्लेम बोनस प्राप्त करू शकता.ह्यामुळे तुमची विमा राशी वाढत जाते
  • तुम्ही आरोग्य विमा पॉलिसी अंतर्गत वार्षिक आरोग्य तपासणी करू शकता आणि निरोगी राहू शकता.
  • आपल्याला हवे असेल तर तुम्ही आजीवन पॉलिसी ठेऊ शकता ,
  • आरोग्य विमा योजने अंतर्गत कोणकोणत्या गोष्टी साधारणपणे कव्हर केल्या जात नाहीत
  • विमा अर्ज करताना – वय , व्यसन सध्या असलेले काही आजार ही माहिती योग्य व खरी द्यावी , अशी माहिती चुकीची दिल्यास पुढे विमा दावे फेटाळले जातात.

Top Term Insurance Company

  1. Life Insurance Corporation India (LIC)
  2. Star Health
  3. HDFC Life Insurance
  4. Tata AIA Life
  5. Bajaj Allianz Life Insurance
  6. Max Life Insurance
  7. ICICI Prudential Life Insurance
  8. Aditya Birla Sun Life Insurance
  9. Bharti Axa Life Insurance
  10. SBI Life Insurance
  11. Kotak Life Insurance

आरोग्य विमा घेताना हे खालील बाबी नक्की विचारात घ्या -Important things to consider Before buying any Health policy

  • तुमच्या घराजवळील नेटवर्क हॉस्पिटलची यादी
  • समाविष्ट असलेल्या डे केअर उपचारांची यादी
  • विद्यमान रोगांसाठी असलेला प्रतीक्षा कालावधी
  • रुगणालायत दाखल होणाच्या पूर्व व नंतर होणाऱ्या खर्चाची मर्यादा आणि कालावधी
  • नेटवर्क रुग्णालया द्वारे कॅशलेस उपचार दिले जातात किंवा नाही
  • रिम्बर्समेन्ट दाव्याच्या प्रतिपूर्ती साठी लागणार कालावधी
  • दावा हिशेबपूर्तीची प्रतिक्रिया कंपनी द्वारे केली जाते की तृतीयपक्षा द्वारे
  • विमाधारकाने वहन केलेल्या % पर्यंतच्या रकमेसाठी सह-पेमेंट कलम

वाचा – कार इन्शुरन्स

लेखक : Post Author


पुस्तके – फिशिंग

2 thoughts on “आरोग्य विमा म्हणजे काय ? आणि का घ्यावा ? – Health Insurance Policy In Marathi”

Comments are closed.