आर्थिक नियोजनाचे महत्व – Financial Planning In Marathi

आर्थिक नियोजनाचे जीवनातले महत्व – Financial Planning In Marathi

आज पैसा तर सर्वच जण कमवितात पण आज श्रीमंत आणि Financially Free तेच लोक आहेत जे आपल्या पैशाचा कुठे खर्च होतो?किती खर्च होतो?त्याची गुंतवणुक कशी आणि कुठे केली जाते आहे?इत्यादी सर्व बाबींचा हिशोब ठेवत असतात.

तसे पाहायला गेले तर आपण जो दिवसरात्र कष्ट करून पैसा कमवितो तो योग्य कार्यासाठीच,योग्य ठिकाणीच आणि आपल्या अत्यावश्यक गरजा भागवण्यापुरताच खर्च व्हावा अशी आपली प्रत्येकाची मनापासुन ईच्छा असते.कारण आपल्यापैकी कोणालाही आपला कष्टाचा पैसा वायफळ खर्च झालेला चालत नसते.

  • म्हणुन आज बहुतेक जण आपला पैसा कुठे किती आणि कसा खर्च होतो आहे?त्यात किती पैशांची बचत होते आहे?किती पैसे दिर्घकाळासाठी गुंतवले जात आहेत?
  • हे जाणुन घेण्यासाठी तसेच या सर्वाचा हिशोब ठेवण्यासाठी आर्थिक नियोजन(Financial Planning) या महत्वाच्या संकल्पणेचा वापर करत असतात.
  • पण भारतात अजुनही खुपच कमी असे लोक आहेत जे आर्थिक नियोजनाचे महत्व जाणतात आणि आर्थिक नियोजनाकडे अधिक लक्ष देतात.
  • कारण इतर देशांमध्ये जेवढी आर्थिक नियोजनाविषयी जागृकता आहे.तेवढी जागृकता भारतात अजुनही नाहीये.
  • याला कारण पैसे कमविण्याचा विचार आपण सर्वच जण करतो पण त्या कमवलेल्या पैशाचे व्यवस्थापन कसे करायचे तो कुठे आणि कसा खर्च करायचा? त्याची गुंतवणुक कुठे करायची?याचा फारसा विचार आपण करत नसतो.

आर्थिक नियोजनाविषयीचे हेच अज्ञान दुर करण्यासाठी आजच्या लेखात आपण आर्थिक नियोजन (Financial Planning) ह्या महत्वाच्या संकल्पणेविषयी सविस्तरपणे माहीती जाणुन घेणार आहोत.

ज्यात आपण आर्थिक नियोजन(Financial Planning)कशाला म्हणतात?आर्थिक नियोजन(Financial Planning) कसे केले जाते?आर्थिक नियोजन(Financial Planning) का केले जाते?आर्थिक नियोजनाचे फायदे कोणकोणते असतात?इत्यादी महत्वाच्या बाबींचा विचार करणार आहोत.

चला तर मग क्षणाचाही विलंब न करता आपल्या आजच्या मुख्य विषयाकडे वळुया.

आर्थिक नियोजन कशाला म्हणतात? Meaning Of Financial Planning In Marathi

आर्थिक नियोजन ही आपण कमवलेल्या पैशाचे योग्य पदधतीने व्यवस्थापन करण्याची प्रक्रिया आहे.

See also  MSF 2022 अंतिम निवड आणि प्रतीक्षा यादी. - MSF Final Merit List & Waiting List.pdf

आपल्या पैशाचा कुठे खर्च होतो आहे?तो किती खर्च होतो आहे ?त्याची गुंतवणुक कशी आणि कुठे केली जाते आहे?

त्यात वर्तमानातील खर्चासाठी किती पैशांची बचत होते आहे?किती पैसे दिर्घकाळासाठी गुंतवले जात आहेत?किती पैसे वायफळ खर्च होत आहेत आणि ते कुठे खर्च होत आहेत?सध्या इमरजन्सीसाठी किती फंड आपल्याकडे शिल्लक आहे?इत्यादी सर्व बाबींचा हिशोब आर्थिक नियोजनात समाविष्ट होत असतो.

थोडक्यात वर्तमानकाळात तसेच भविष्यात आपल्याला पैशांची जी गरज भासत असते ती पुर्ण करण्यासाठी आजपासुनच आपल्या कमवलेल्या प्रत्येक पैशाचे व्यवस्थापन करण्याची प्रक्रिया म्हणजे आर्थिक नियोजन(Financial Planning) होय.

आर्थिक नियोजन कसे केले जाते?- How Financial Planning Is Done

आर्थिक नियोजनाचा सर्वात महत्वाचा भाग बचत आणि गुंतवणुक हा आहे.

म्हणजेच जर आपणास पुढील पाच ते दहा वर्षानंतर आर्थिक स्वातंत्र्य प्राप्त करायचे असेल तर त्यासाठी आजपासुन आपण किती पैशांची बचत आणि गुंतवणुक करायला हवी याचे एक निश्चित नियोजन करणे होय.

आर्थिक स्वातंत्र्य प्राप्त करण्याकरिता आपल्याला एकुण किती पैशांची आवश्यकता आहे हे आपण आधी यासाठी ठरवून घ्यायला हवे.

म्हणजेच किती वय होईपर्यत आपल्यालाकडे किती पैसा असायला हवा हे आणि तेवढा पैसा प्राप्त करण्यासाठी आपण कुठे गुंतवणुक करायला हवी जेणे आपले ध्येय आपणास त्या कालावधीत गाठता येईल

थोडक्यात आपले गुंतवणुकीचे एक निश्चित उददिष्ट आपणास माहीत असणे गरजेचे आहे.कारण त्यानुसार आपणास किती काळासाठी कुठे आणि किती गुंतवणुक करावी लागणार आहे हे ठरवायचे असते.

गुंतवणुकीची अनेक ध्येये अनेक असु शकतात ज्यात मुलाच्या मुलीच्या शिक्षणाचा खर्च,वृदधाल्पकाळासाठी पैशांची बचत,मुलीच्या किंवा मुलाच्या लग्नासाठी भविष्यात करायचा खर्च,भविष्यात एखादी कार विकत घेण्याचे स्वप्र,स्वताचा फ्लँट विकत घेण्याचे स्वप्र अशा अनेक उददिष्टांचा समावेश होत असतो.

याचसोबत सध्या आपल्या कुठल्या बँक खात्यात किती पैसे सेव्ह आहेत.आपल्यावर एखादे बँकेचे कर्ज आहे का?आणि असेल तर ते फेडायला किती दिवस अजुन लागणार आहेत हे देखील बघायला हवे.

आपले गुंतवणुकीचे ध्येय ठरलेल्या कालावधीत पुर्ण करण्यासाठी आपण आजपासुन रोज किती पैशांची बचत तसेच दिर्घकाळासाठी गुंतवणुक करायला हवी?
ह्या सर्व गोष्टींचा आपण आर्थिक नियोजन करताना विचार करणे फार गरजेचे आहे.

आर्थिक नियोजन करत असताना आपण पुढील गोष्टी करायला हव्यात-

1)कमाई आणि कमाईची साधने किती आणि कोणकोणती आहेत ते आधी बघणे (Income And Income Sources)

2) आधी पैशांची बचत करणे (Money Saving) :

3) पैशांची गुंतवणुक करणे (Money Investment) :

4) इमरजन्सी फंड तयार करणे (Emergency Fund)

5) महत्वाच्या विमा पाँलिसी विकत घेणे (Insurance Policy)

See also  महागाई म्हणजे काय ?Inflation information Marathi

6) प्रत्येक खर्चाचा हिशोब ठेवणे (Tracking All Expenses) :

7) अनावश्यक खर्च टाळणे (Avoid Unnecessary Expenses)

8) आवश्यकता भासल्यास आर्थिक सल्लागारांचा सल्ला घेणे:

9) आरोग्याची काळजी घेणे :

कमाई आणि कमाईची साधने किती आणि कोणकोणती आहेत ते आधी बघणे- (Income And Income Sources

आर्थिक नियोजनाचा पहिला भाग म्हणजे आपली कमाई किती आहे हे बघणे कारण आपली कमाई कमी असेल आणि खर्च जास्त असेल तर आपल्याला पाहिजे तेवढी बचत आणि गुंतवणुक करता येत नसते.

म्हणुन आपण आपली कमाई किती होते आहे आणि त्या कमाईची साधने माध्यमे कोणकोणती आणि किती आहेत हे देखील बघणे फार गरजेचे असते.

 आधी पैशांची बचत करणे (Money Saving) :

आपल्या प्रत्येकाला सवय असते की सँलरी तसेच इन्कम आल्यावर पहिले पैसे खर्च करायचे मग थोडेफार उरल्यावर सेविंग करायची याने आपल्याला पाहिजे तेवढी पैशांची बचत करता येत नसते.

म्हणुन आपण आधी बचत मग खर्च ह्या नियमाचे पालन करायला हवे.

पैशांची गुंतवणुक करणे (Money Investment) :

  • आपण सर्वच जण एवढेच नही तर आर्थिक नियोजनाचे ज्ञान नसलेले शाळेत जाणारी लहान मुले सुदधा आपला छोटासा गल्ला तयार करून पैशांची बचत करत असतात.
  • अडीअडचणीसाठी आपण सर्वच जण पैशांची बचत करत असतो पण आपल्यातील खुप कमी जण असतात जे पैशांची योग्य ठिकाणी गुंतवणुक करत असतात.
  • बचत केल्याने आपण वर्तमानातील तात्पुरता स्वरूपाचा खर्च तर भागवू शकतो पण भविष्याची मोठमोठी आर्थिक ध्येये(मुलाच्या मुलीच्या शिक्षणाचा खर्च,वृदधाल्पकाळासाठी पैशांची बचत,मुलीच्या किंवा मुलाच्या लग्नासाठी भविष्यात करायचा खर्च,भविष्यात एखादी कार विकत घेण्याचे स्वप्र,स्वताचा फ्लँट विकत घेण्याचे स्वप्र) पुर्ण करण्यासाठी गुंतवणुक हाच एक एकमेव पर्याय आपल्याकडे असतो.
  • कारण गुंतवणुकीने आपल्याला आपल्या पैशांवर कंपाऊंडिंग इंटरेस्ट प्राप्त होत असतो जो खुप अधिक असतो दिवसेंदिवस त्यात वाढ देखील होत जाते.

गुंतवणुकीसाठी आज आपल्याकडे पुढीलप्रमाणे अनेक पर्याय आहेत ज्यात आपण आपल्या आर्थिक गरजेनुसार आर्थिक ध्येयानुसार पाहिजे तेवढी गुंतवणुक करू शकतो.

एफ डी (यात फिक्स इंटररेस्ट प्राप्त होतो)

● आर डी

● शेअर मार्केट

● म्युच्अल फंड

● एस आयपी

● रिअल इस्टेट,प्राँपर्टी

● विविध सरकारी योजना

इमरजन्सी फंड तयार करणे (Emergency Fund :

समजा आपण एखादी नोकरी करतो आहे आणि ती नोकरी आपण अचानक गमावली तर जोपर्यत आपल्याला आपल्या आवश्यकतेनुसार एक चांगल्या पगाराची नोकरी प्राप्त होत नाही तोपर्यत खर्च भागविण्यासाठी आपल्याकडे एक इमरन्सी फंड बाजुला असणे फार गरजेचे आहे.

इमरजन्सी फंड हा अचानक काही आर्थिक अडी अडचण आल्यावर तसेच दवाखान्याचा,वैदयकीय खर्च उदभवल्यास आर्थिक संकटातुन बाहेर पडण्यासाठी फार गरजेचा असतो.

See also  बांधकाम कामगार योजना 2022 माहीती , पात्रता, नोंदणी व लाभ - Bandhkam Kamgar Yojana 2022

तसेच जर आपण एखादी नोकरी करतो आहे आणि ती नोकरी आपल्याला करायची नाहीये आणि स्वताचा व्यवसाय करायचा आहे तर जोपर्यत आपल्याला आपल्या आवश्यकतेनुसार एक चांगले इन्कम आपण करतो आहे त्या व्यवसायातुन येणे सुरू होत नाही तोपर्यत घरातील खर्च भागविण्यासाठी आपल्याकडे सहा महिन्याचा एक इमरन्सी फंड बाजुला असणे फार गरजेचे आहे.

महत्वाच्या विमा पाँलिसी विकत घेणे (Insurance Policy):

आयुष्याचा आज काहीच भरवसा राहिला नाहीये कधी कोणाला काय होईल काहीच सांगता येत नाही.कधी आरोग्य विषयक कोणती समस्या निर्माण होईल हे देखील आपण सांगु शकत नाही.

म्हणुन आपण आपल्या आणि आपल्या कुटुंबाच्या आर्थिक सुरक्षेसाठी महत्वाचे इंशुरन्स विकत घेणे फार गरजेचे आहे.
उदा,(हेल्थ इंशूरन्स,लाईफ इंशुरन्स,टर्म इंशुरन्स इत्यादी)

कारण जेव्हा आपणास आरोग्यविषयक कुठलीही गंभीर समस्या निर्माण होत असते तेव्हा त्या आजारातुन बरे होण्यात आपली सर्व आयुष्यभराची कमाई,सेविंग आपणास खर्च करावी लागत असते.

म्हणुन आपण किमान आपला हेल्थ इंशुरन्स काढुन घेणे फार आवश्यक आहे.कारण हेल्थ इंशुरन्स घेतल्यावर असा काही खर्च उदभवल्यास आपल्यावतीने हा सर्व खर्च इंशुरन्स कंपनी करत असते.ज्याने आपल्याला आपली सेविंग मोडावी लागत नाही.

प्रत्येक खर्चाचा हिशोब ठेवणे (Tracking All Expenses) :

आपण आपल्या प्रत्येक खर्चाचा हिशोब ठेवायला हवा.याने आपले पैसे कुठे खर्च होत आहेत?किती खर्च होत आहेत?याची नोंद आपल्याला घेता येते.

याचा फायदा हा असतो की समजा यात आपल्या निर्दशनास आले की एखाद्या ठिकाणी आपले अनावश्यक पैसे खर्च होता आहे तर आपल्याला तो खर्च कमी करता येत असतो.

म्हणुन आपण आपल्या सर्व लहान पासुन मोठया खर्चांचा देखील हिशोब ठेवायलाच हवा.

अनावश्यक खर्च टाळणे (Avoid Unnecessary Expenses)

जी वस्तु खरेदी करण्याची सध्या आपणास कुठलीही अत्याधिक आवश्यकता नाही.असा वस्तुंची खरेदी करण्यात आपले पैसे अनावश्यक खर्च करू नये.

आवश्यकता भासल्यास आर्थिक सल्लागारांचा सल्ला घेणे:

शक्य असल्यास आपण आर्थिक नियोजन कसे करावे हे जाणुन घेण्यासाठी एखाद्या तज्ञ आर्थिक सल्लागाराचा सल्ला घ्यायला हवा.

कारण ते ह्या क्षेत्रातील तज्ञ असल्याने आपणास ते अधिक चांगल्या पदधतीने आर्थिक नियोजनाचा सल्ला देऊ शकतात.

आरोग्याची काळजी घेणे :

आपले शरीर ही आपली सर्वात अमुल्य संपत्ती आहे पण आपण ह्या संपत्तीची काळजी कधीच घेत नाही आणि रोजच्या नोकरीच्या व्यवसायाच्या धडपडीत शरीराकडे दुर्लक्ष करत असतो ज्याने आपल्याला भविष्यात अनेक आजार जडत असतात.

आणि मग ह्या आजारांतुन बरे होण्यातच आपली सर्व कमाई बचत खर्च होत असते.मग आपण पस्तावा करतो की आपण आपल्या आरोग्याची नियमित काळजी घेतली असती तर आज आजारपणातुन बाहेर पडण्यासाठी आपली आयुष्यभराची सर्व सेविंग खर्च झालीच नसती.

म्हणुन आरोग्याची काळजी घेणे हा देखील आर्थिक नियोजनाचा एक महत्वाचा भाग आहे.जो आपण कधीच टाळु नये.

आपण आर्थिक नियोजन का करायला हवे? त्याचे फायदे कोणकोणते असतात?

● आपल्यावर भविष्यात कुठलेही आर्थिक संकट उदभवल्यास आपल्याकडे त्यातुन बाहेर पडण्यासाठी पुरेसा फंड असायला हवा यासाठी आर्थिक नियोजन गरजेचे आहे.

● आपली भविष्यातील आर्थिक ध्येये साध्य करण्यासाठी आर्थिक नियोजन फार गरजेचे आहे.

● आपला कमवलेला पैसा कुठे जातो आहे कसा आणि किती खर्च होतो आहे हा त्या पैशांचा सर्व हिशोब ठेवण्यासाठी आर्थिक नियोजन आवश्यक आहे.

 

[ultimate_post_list id="39129"]

3 thoughts on “आर्थिक नियोजनाचे महत्व – Financial Planning In Marathi”

Comments are closed.