गोपाळ गणेश आगरकर यांच्याविषयी माहीती – Gopal Ganesh Agarkar Information In Marathi

गोपाळ गणेश आगरकर यांच्याविषयी माहीती – Gopal Ganesh Agarkar Information In Marathi

आज असे अनेक महापुरुष समाजसुधारक घडुन गेले ज्यांनी आपल्या महाराष्टाला घडवण्यासाठी आपले अमुल्य योगदान दिले.

ह्या सर्व समाजसुधारकांनी समाजाच्या हिताचा विचार करत त्या दृष्टीने विविध सामाजिक सुधारणा घडवून आणल्या.

असेच एक थोर समाजसुधारक म्हणजे गोपाळ गणेश आगरकर.ज्यांनी आपल्या लेखणीतुन सामाजिक सुधारणाविषयक विचार मांडले.

आजच्या लेखात आपण ह्याच गोपाळ गणेश आगरकरांविषयी अधिक सविस्तरपणे माहीती जाणुन घेणार आहोत.

गोपाळ गणेश आगरकर हे कोण होते?

गोपाळ गणेश आगरकर हे एक थोर विचारवंत समाजसुधारक,उत्कृष्ठ लेखक,पत्रकार,आणि शिक्षणतज्ञ देखील होते.

2022 मध्ये गोपाळ गणेश आगरकरांची पुण्यतिथी कधी आहे?

2022 मध्ये गोपाळ गणेश आगरकर यांची पुण्यतिथी 17 जुन रोजी आहे.

2022 मध्ये गोपाळ गणेश आगरकरांची जयंती कधी आहे?

2022 मध्ये गोपाळ गणेश आगरकरांची जयंती 14 जुलै रोजी असणार आहे.

गोपाळ गणेश आगरकरांचा जन्म कधी आणि कोठे झाला?

गोपाळ गणेश आगरकरांचा जन्म 14 जुलै 1856 रोजी सातारा जिल्हयातील कराड तालुक्यातील टेंभु नावाच्या एका छोटयाशा गावी झाला.

गोपाळ गणेश आगरकरांच्या जीवनातील सुरूवातीचा काळ-

14 जुलै 1856 रोजी सातारा जिल्हयातील कराड तालुक्यातील टेंभु नावाच्या एका छोटयाशा गावी जन्मलेल्या गोपाळ गणेश आगरकरांचे सुरूवातीचे जीवन कष्ट करण्यामध्येच गेले.घरची परिस्थिती अत्यंत गरीबीची असल्यामुळे त्यांना पाहिजे तेवढया शैक्षणिक सुविधा प्राप्त झाल्या नाहीत.

स्वताचे दहावीपर्यतचे शिक्षण पुर्ण करण्यासाठी आगरकरांनी हातात येईल ते काम केले कधी मधुकरी मागितली तर कधी तर कधी कचेरीत उमेदवारी देखील केली आणि मँट्रिक पास झाले.

See also  अक्षय तृतीयेच्या शुभेच्छा ,कोटस तसेच संदेश - Akshay Tritiya Quotes ,sms Shubhechha 2023 in Marathi

गोपाळ गणेश आगरकर आपले शिक्षण पुर्ण करण्यासाठी कधी रत्नागिरी येथे गेले तर कधी अकोला कर्हाड येथे गेले.

मग आपले मँट्रिकपर्यतचे प्राथमिक शिक्षण पुर्ण केल्यानंतर ते पुण्यात महाविद्यालयीन शिक्षण घेण्यासाठी डेक्कन काँलेजमध्ये आले.

पुण्यात असताना देखील आपला उदरनिर्वाह करण्यासाठी त्यांनी वर्तमानपत्रात लेख लिहिले विविध वक्तृत्व स्पर्धेत भाग घेऊन बक्षिसे जिंकली आणि त्यात जे पैसे मिळाले त्यात स्वताचे गुजरान केले.

आगरकर आणि टिळक यांची भेट –

गोपाळ गणेश आगरकर आणि लोकमान्य टिळक या दोघांची पुण्यातच झाली जेव्हा आगरकर पुण्यात आपले महाविद्यालयीन शिक्षण पुर्ण करण्यासाठी आले होते तेव्हा तिथेच एम ए चे शिक्षण करताना त्यांची भेट लोकमान्य टिळक यांच्याशी झाली.

आगरकरांची पत्रकारीता आणि सुरू केलेली सामाजिक सुधारणेची चळवळ –

पुण्यात एकत्र शिक्षण करत असताना आगरकर आणि टिळक या दोघांनी मिळुन केसरी नावाचे एक वृतपत्र देखील सुरू करण्याचे ठरवले.ज्यात विष्णुशास्त्री चिपळुनकर यांनी देखील सहभाग घेतला होता.

मग 1881 मध्ये टिळक आगरकर या दोघांनी मिळुन केसरी हे वृतपत्र सुरु केले.ज्याचे पहिले संपादक देखील आगरकर हेच होते.

केसरी ह्या वृतपत्रातुन आगरकरांनी सामाजिक सुधारणांवर अनेक लेख लिहिले.आगरकरांची लेखणीची भाषा ही एक परखड अणि सडेतोड अशी होती.

आगरकरांनी केसरी ह्या वृतपत्राचे संपादक तब्बल सहा ते सात वर्ष सांभाळले आणि1887 ते 1888 याकालावधीमध्ये केसरीचे संपादक पद सोडले.कारण पुढे जाऊन टिळक आणि आगरकर या दोघांमध्ये वैचारिक मतभेद झाले.

गोपाळ गणेश आगरकर यांनी लोकमान्य टिळक यांच्यासोबत मिळुन 1881 मध्ये केसरी सोबत अजुन एक वृतपत्र सुरू केले होते.ज्याचे नाव मराठा असे होते हे वृतपत्र इंग्रजी भाषेमधुन प्रकाशित केले जायचे.

न्यु इंग्लिश स्कुलच्या कार्यामध्ये हातभार-

पुण्यात शिक्षण घेत असतानाच आगरकर यांच्या मनामध्ये स्वदेश प्रेमाची भावना जागृत झाली होती.म्हणुन त्यांनी चिपळुणकरांनी सुरू केलेल्या न्यु इंग्लिश स्कुलच्या कार्याला स्वताशी जोडुन घेतले.

See also  लोकसंख्या वाढीचे कोणते दुष्परिणाम होत असतात? Population explosion effects

डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापणा –

गोपाळ गणेश आगरकर यांनी 1884 मध्ये लोकमान्य टिळकांसोबत मिळुन डेक्कन एज्युकेशन सोसायटी
स्थापित केली.आणि त्याच दवारे फग्युसन काँलेज सुरू करण्यात आले जिथे शिकवत असताना पुढे जाऊन आगरकर तेथील प्राचार्य बनले होते.

आगरकरांनी सुरू केलेले सुधारक वृतपत्र –

पुण्यात शिक्षण घेत असताना आगरकरांनी टिळकांसोबत मिळुन केसरी हे वृतपत्र सुरू केले होते पण टिळकांसोबत काही वैचारिक मतभेद झाल्यामुळे आगरकरांनी केसरीचे संपादक पद सोडले आणि सूधारक नावाचे स्वताचे एक वृतपत्र सुरू केले होते.ज्यात त्यांनी समाजातील अनिष्ठ रूढी परंपरा यावर लेखन करत आपले सुधारणावादी विचार मांडले.आणि कार्य करत असताना त्यांना समाजाच्या शारीरीक आणि मानसिक त्रासाला देखील सामोरे जावे लागले होते.

आगरकर टिळक यांच्यातील वैचारिक मतभेद –

आगरकरांचे मत होते की राजकीय स्वातंत्र्यापेक्षा आपण सामाजिक सुधारणेला अधिक महत्व द्यायला हवे.आणि त्यातच टिळकांचे मत असे होते की आपण राजकीय स्वातंत्र्य आधी प्राप्त झाले तर नंतर आपणास सामाजिक सुधारणा करता येऊ शकतात.

गोपाळ गणेश आगरकर यांच्या वडीलांचे नाव काय होते?

गोपाळ गणेश आगरकर यांच्या वडिलांचे नाव गणेश आगरकर असे होते.

गोपाळ गणेश आगरकर यांच्या पत्नीचे नाव काय होते?

गोपाळ गणेश आगरकर यांच्या पत्नीचे नाव यशोदाबाई आगरकर असे होते.

गोपाल गणेश आगरकर यांना एकुण किती अपत्ये होती?

गोपाळ गणेश आगरकर यांना यशवंत आणि माधव नावाचे दोन मुले आणि दोन मुली अशी एकुण चार अपत्ये होती.

गोपाळ गणेश आगरकरांचा मृत्यु कधी आणि कोठे झाला?

गोपाळ गणेश आगरकरांचा मृत्यु 17 जुन 1895 रोजी महाराष्टातील पुणे ह्या जिल्हयात झाला होता.