राजमाता जिजाऊ यांच्याविषयी माहीती – Rajmata Jijau Information In Marathi

Table of Contents

राजमाता जिजाऊ यांच्याविषयी माहीती – Rajmata Jijau Information In Marathi

मित्रांनो आज छत्रपती शिवाजी महाराजहे महाराष्ट्र चे दैवत.छत्रपती शिवाजी महाराज यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापणा केली.

पण म्हणतात ना प्रत्येक यशस्वी पुरूषामागे एक स्त्रीचा हात असतो तसेच आज शिवाजी महाराज यांनी स्वराज्य स्थापणेचे जे महान कार्य केले आहे त्यामागे सुदधा एक स्त्रीचाच हात आहे.आणि त्या स्त्रीचे नाव आहे शिव रायांच्या माता जिजाऊ.

राज माता जिजाऊ यांनीच शिवरायांचे लहानपणापासुन संगोपण केले,त्यांना युदध प्रक्षिक्षण दिले.त्यांच्यावर उत्तम संस्कार केले त्यांच्या मनात स्वराज्य निर्माण करण्याची तीव्र ईच्छा आणि ओढ निर्माण केली.

आजच्या लेखात आपण ह्याच शुरपुत्राच्या शुरमातेविषयी सविस्तरपणे माहीती जाणुन घेणार आहोत.

2022 मध्ये राजमाता जिजाऊ यांची पुण्यतिथी कधी आहे?

2022 मध्ये राजमाता जिजाऊ यांची पुण्यतिथी 17 जुन रोजी आहे.

राजमाता जिजाऊ यांचे पुर्ण नाव काय आहे?

राजमाता जिजाऊ यांचे संपुर्ण नाव जिजाबाई शहाजीराजे भोसले असे आहे.

राजमाता जिजाऊ कोण होत्या?

राजमाता जिजाऊ ह्या लखोजी राजे जाधव,म्हाळसा लखोजी जाधव यांच्या कन्या तसेच शुर आणि पराक्रमी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मातोश्री होत्या.लहानपणापासुनच सर्व जण त्यांना आदराने जिजाऊ असे संबोधित असत.

मराठा साम्राज्याची स्थापणा करण्यात राजमाता जिजाऊ यांचा खूप मोठा हात होता.कारण त्यांच्याच मार्गदर्शनाखाली शिवरायांनी पाऊले उचलून एवढे मोठे स्वराज्य उभे होते.म्हणजेच जिजाऊ ह्या फक्त पत्नी नव्हत्या तर त्या एक शुरमाता,शुर महिला देखील होत्या.

राजमाता जिजाऊ यांचा जन्म कधी आणि कोठे झाला होता?

राजमाता जिजाऊ यांचा जन्म 12 जानेवारी 1598 रोजी बुलढाणा जिल्हयातील सिंदखेड येथे झाला.

राजमाता जिजाऊ यांचे शौर्य –

● राजमाता जिजाऊ ह्या एक शुर महिला होत्या त्या प्रसंगी युदधभुमीत उतरून शत्रुशी लढायला देखील घाबरायच्या नाही.त्यांच्या रक्तात देशप्रेम दाटुन भरलेले होते.

● आपला पुत्र शिवाजी ह्याला घोडयाची सवारी करणे तलवार चालवण्याचे प्रक्षिक्षण स्वता माँसाहेब जिजाऊ यांनीच दिले होते.

● जेव्हा शिवाजी महाराज पन्हाळा किल्ल्यातील वेढयात अडकुन पडले होते तेव्हा त्यांना त्या वेढयातुन बाहेर काढायला स्वता माँसाहेब जिजाऊ घोडयावर सवार झाल्या आणि आपल्या पुत्राचे रक्षण करण्यासाठी चालु लागल्या.

राजमाता जिजाऊ यांचे जीवन –

● राजमाता जिजाऊ यांच्या जीवन सुरूवातीपासुनच खुपचसंघर्षाने भरलेले होते.राजमाता जिजाऊ यांना जीवनात नेहमी त्याग आणि समर्पण करावे लागले.

● राजमाता जिजाऊ यांच्या जीवनामध्ये लागोपाठ संकटे येतच राहिली तरी त्यांनी खचुन न जाता मोठया धाडसाने आणि शौर्याने प्रत्येक संकटाला तोंड दिले.

राजमाता जिजाऊ यांचा स्वभाव कसा होता आणि त्यांचे विचार कसे होते?

राजमाता जिजाऊ ह्या अत्यंत स्वतंत्र विचारी होत्या.त्याच्या हदयात आपला देश आणि धर्म याविषयी अपार प्रेम होते.

आणि हाच वारसा त्यांनी आपल्या मुलाला देत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मनात देखील राष्ट्राविषयी अपार प्रेम,धर्मनिष्ठा,निर्माण केली.

आणि राजमाता जिजाऊ यांच्याकडुन प्राप्त झालेल्या ह्याच संस्कारांच्या बळावर छत्रपती शिवाजी महाराज यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापणा केली.

राजमाता जिजाऊ यांनी शिवरायांवर केलेले संस्कार आणि त्यांना दिलेली शिकवण –

● लहानपणापासुन छत्रपती शिवाजी महाराज यांचे संगोपन लालन पालन करून त्यांच्यात अनेक कौशल्ये रूजवण्याचे कार्य माँसाहेब जिजाऊ यांनीच केले होते.शिवरायांमध्ये युदध कौशल्य,देशप्रेम धर्मनिष्ठता हे गुण त्यांनीच रूजवले होते.

● लहानपणापासुन राजमाता जिजाऊ यांनी शिवरायांना रामायण महाभारत कौरव पांडव यांचे युदध याविषयी सांगत त्यांच्यात शौर्य आणि धाडस ह्या गुणांची निर्मिती केली.

● लहानपणापासुनच राजमाता जिजाऊ यांनी शिवरायांनी महिलांचा आदर आणि सम्मान करायची परस्त्रीला माता बहिणीचा दर्जा देण्याची शिकवण शिवरायांना दिली.आपण सर्व प्राणी मात्रांचा आदर करायला हवा त्यांच्यावर प्रेम करायला हवे ही शिकवण सुदधा दिली.

● वेळप्रसंगी आपल्या प्रजेचे रक्षण करण्यासाठी काय करायचे शत्रुचा सामना कसा करायचा अपराधीला शासन कसे करायचे याचे धडे त्यांनी शिवबांना लहानपणापासुनच दिले.

● घोडा चालविणे तलवारबाजी करणे हे देखील राजमाता जिजाऊ यांनीच शिवरायांना शिकवले आणि त्यात त्यांना अत्यंत पारंगत आणि निपुन केले.

● शिवाजी महाराज यांच्या हदयात स्वराज्य निर्माण करण्याची ओढ आणि तीव्र ईच्छा मासाहेब जिजाऊ यांनीच निर्माण केली होती.

राजमाता जिजाऊ यांचा इतिहास –

राजमाता जिजाऊ यांनेच शिवबासारख्या शुर पुत्राला जन्म देऊन स्वराज्याचे तोरणे बांधले होते.माँ जिजाऊ यांचे वडीलच निजामशाही काळातील सरदार असल्याने त्यांना लहानपणापासुन घरातुनच राजकारणाचे ज्ञान प्राप्त झाले.आणि माँसाहेब जिजाऊ यांनी स्वराज्यास आरंभ हा सर्वप्रथम तोरणा गडावरूनच केला.

राजमाता जिजाऊ यांच्या वडिलांचे नाव काय होते?

राजमाता जिजाऊ यांच्या वडिलांचे नाव लखोजीराजे जाधव असे होते.जे निजामशाहीच्या काळातील सरदार होते.

राजमाता जिजाऊ यांच्या आईचे नाव काय होते?

राजमाता जिजाऊ यांच्या आईचे नाव म्हाळसा लखोजी राजे जाधव असे होते.

राजमाता जिजाऊ यांच्या पतीचे नाव काय होते?

राजमाता जिजाऊ यांच्या काळात लहानपणीच लग्न लावून देण्याची प्रथा परंपरा होती यामुळे जिजाऊ यांचे लग्न देखील डिसेंबर 1604  मध्ये त्या लहान असतानाच झाले त्यांच्या पतीचे नाव शहाजीराजे भोसले असे होते.जे भोसले घराण्यामधल्या मालोजीराजे भोसले यांचे पुत्र होते.

राजमाता जिजाऊ यांच्या मुलांची नावे काय होती?

राजमाता जिजाऊ यांच्या मुलांची नावे शिवाजी आणि संभाजी असे होते.राजमाता जिजाऊ यांनी एकूण सहा मुले होती त्यात चार मृत्यु पावली.

राजमाता जिजाऊ यांना लोकांनी कोणती पदवी बहाल केली होती?

राजमाता जिजाऊ यांना लोकांनी माँसाहेब, राजमाता,जिजाऊ अशा अनेक पदवी बहाल केल्या होत्या.

राजमाता जिजाऊ यांचा मृत्यु कधी आणि कोठे झाला?

राजमाता जिजाऊ यांचा मृत्यु हा 17 जुन 1674 रोजी झाला होता.

2 thoughts on “राजमाता जिजाऊ यांच्याविषयी माहीती – Rajmata Jijau Information In Marathi”

Leave a Comment