Bank Nifty विषयी संपूर्ण माहिती – किती बँक ? कोणत्या बँकेचा किती टक्के वाटा. – Bank nifty Marathi Information

Bank Nifty विषयी संपूर्ण माहिती माहीती  – Bank nifty Marathi Information

 जे लोक शेअर बाजारात आपल्या पैशांची गुंतवणुक करतात त्यांना निफ्टीविषयी ही माहीती असतेच की भारतातील टाँप 50 कंपनींचा निफ्टीमध्ये समावेश होतो.

पण निफ्टी हा शब्द आपल्या कानावर ऐकु येण्यासोबतच बँक निफ्टी हा शब्द देखील खुप वेळा

आपल्याला ऐकायला मिळत असतो.

 तेव्हा आपल्या मनात अनेक प्रश्न निर्माण होतात की बँक निफ्टी काय असते?बँक निफ्टी का बनविण्यात आली?तसेच बँक निफ्टीचे महत्व काय आहे?इत्यादी.

म्हणून आजच्या लेखातुन आपण आपल्या ह्या सर्व प्रश्नांची उत्तरे सविस्तरपणे जाणुन घेणार आहोत.

Bank Nifty म्हणजे काय?

 आपल्याला ही एक बाब माहीतच आहे की बँक निफ्टी ही भारतातील बारा सगळयात मोठया आणि विश्वासु बँकाचे निर्देशांक (इंडेक्स) म्हणुन ओळखले जाते.यावरून आपण हा देखील अंदाजा लावू शकतो की बँकिंग क्षेत्र आज किती वर किंवा खाली चालले आहे.

बँक निफ्टीचा वापर कित्येक लोक इंट्रा डे ट्रेडिंगसाठी देखील करताना आपणास दिसुन येतात.यात आपल्याला ज्या दिवशी शेअर खरेदी केले त्याचदिवशी ते कोणालाही विकण्याची मुभा असते.म्हणजे एका दिवसातच शेअर्सची खरेदी विक्री करता येते.

बँक निफ्टीमधुन आज तेच ट्रेडर्स भरपुर पैसे कमावू शकतात ज्यांना शेअर मार्केटचे उत्तम ज्ञान प्राप्त आहे.

See also  गुरू पौर्णिमा कोटस अणि शुभेच्छा - Guru Purnima quotes and wishes in Marathi

Bank Nifty मध्ये समाविष्ट असलेल्या बारा बँका कोणकोणत्या आहेत?

प्रत्येक  बँकेची टक्केवारी किती

 

 

 

 

या चार्ट मधील माहिती बँकनिफ्टी त किती बँक्स- एकूण 12. कोणत्या तारखेला बँक निफ्टी सूर झाली- सप्टेंबर 25, 2003, बँक निफ्टी सूरु झाल्या पासून ,1 वर्ष, 5 वर्ष किती रिटर्न्स मिळाले. फंडा मेंटल्स – PE – 24.06 P/B- 2.94 Dividend Yield- 0.32

 

(निफ्टी 50 बद्दल संपूर्ण माहिती करता खलील लिंक

NIFTY 50 संपूर्ण माहिती – NIFTY 50 complete information in Marathi )

 

बँक निफ्टीमध्ये एकुण बारा बँकाचा समावेश असलेला आपणास दिसुन येतो.

त्या बारा बँकाची नावे पुढीलप्रमाणे आहेत : Bank nifty Marathi Information

 1. बँक आँफ बडोदा
 2. एचडीएफसी बँक
 3. कोटक महिंद्रा बँक
 4. पंजाब नँशनल बँक
 5. अँक्सिस बँक
 6. स्टेट बँक आँफ इंडिया
 7. आयसी आयसीआय बँक
 8. फेडरल बँक
 9. बंधन बँक
 10. आयडीएफसी फस्ट बँक
 11. इंदुस आय- एन -डी बँक
 12. आर बी एल बँक

वरील सर्व बँकाचा समावेश आपणास बँक निफ्टीमध्ये असलेला पाहावयास मिळते.तसे पाहायला गेले तर भारतात इतरही भरपुर बँक उपलब्ध आहेत.पण वरील बारा बँकानाच बँक निफ्टीमध्ये स्थान देण्यात आले आहे कारण ह्या बँकांचा दर्जा उत्तम आहे.आणि ह्या भांडवल देखील भरपुर असलेले आपणास दिसुन येते.

Bank Nifty ची सुरूवात कधी झाली होती?

 बँक निफ्टीची सुरूवात ही 2003 सालात झाली होती आणि ही सुरूवात इंडियन इंडेक्स सर्विस प्रोडक्ट द्वारे शेअर बाजारात प्रथम करण्यात आली होती.

आणि महत्वाची बाब म्हणजे तेव्हा बँक निफ्टीमध्ये फक्त बारा बँकाचा समावेश होता आणि आज देखील तेवढ्याच बँकाचा सहभाग यात आपणास दिसुन येतो.

 Bank Nifty मध्ये कोणत्या बँकाना समाविष्ट केले जाते?

 आज आपल्या प्रत्येकाच्या मनात प्रश्न असतो की बँक निफ्टीमध्ये कोणत्या बँकाचा समावेश केला जातो आणि हा समावेश कोणत्या आधारावर केला जात असतो.

See also  फ्रेडरिक टेलर- शास्त्रीय व्यवस्थापन- Frederick Taylor's 5 Principles of Scientific Management

बँक निफ्टीमध्ये आत्तापर्यत जेवढयाही बँकेचा समावेश करण्यात आला आहे.हा समावेश त्यांचे फ्लोट अँडजेस्टमेंट मार्केट कँपिटलायझेशन बघुन करण्यात आला आहे.

Bank Nifty मध्ये खालील प्रकारच्या बँकाना समाविष्ट केले जाते :

 • जी बँक भारतातील आहे.
 • ज्या बँकेच्या शाखा भारतातच आहेत तसेच तिचे मुख्य कार्यालय देखील भारतात आहे.
 • ज्या बँकेचे Highest Market Capitalization आहे.
 • तसेच आधी बँकेचे रेट पाहिले जातात आणि सेन्सेक्स निफ्टीमध्ये त्याचे Weightage Percentage किती आहे हे देखील बघितले जाते.मगच कोणत्याही बँकेचा बँक निफ्टीत समावेश केला जातो.

Bank Nifty चे Lot Size काय आहे?

 बँक निफ्टीमध्ये ट्रेडिंग करण्यासाठी आपल्याला कमीत कमी एक Lot तरी खरेदी करणे गरजेचे आहे.इथे फक्त १० ते १५ काँटिटीची खरेदी करून मुळीच चालत नसते.

कारण बँक निफ्टीमधील वर्तमान स्थितीचा आढावा घ्यायला गेले तर आपणास दिसुन येते की याच्या एका Lot मध्ये 25 शेअर्स समाविष्ट केलेले आहेत.म्हणजे जर आपण एक Lot खरेदी केला तर आपण 25 शेअर्स खरेदी केले असे गृहित धरण्यास काहीच हरकत नाही.

म्हणजे आपल्याला 25 शेअर्स खरेदी करायचे असतील तर एक Lot आपल्याला खरेदी करावाच लागतो.आणि यात आपल्या शेअर्सचे पाँईण्ट वाढले तर प्राँफिट देखील वाढत असतो.आणि शेअर्सचे पाँईण्ट कमी झाले तर आपल्याला लाँस देखील होऊ शकतो.

Bank Nifty मधील Options काय असते?

 Options ह्या पर्यायाचा वापर करून आपल्याला बँक निफ्टीमध्ये ट्रेडिंग करून पैसे कमवता येत असतात.

Options द्वारे आपल्याला अंदाज लावून ट्रेडिंग करायची असते.म्हणजे समजा आपल्याला जर असे वाटत असेल बँक निफ्टीमध्ये आता शेअर्सच्या किंमतीमध्ये वाढ होईल अशा वेळी आपण सध्याच्या किंमतीपेक्षा थोडया जास्त किंमतीचे काँल आँप्शन खरेदी करू शकतो.

आणि याचठिकाणी आपल्याला जर वाटत असेल की बँक निफ्टीमध्ये शेअर्सच्या किंमतीत घसरण होऊ शकते तर अशा परिस्थितीत आपण आपल्याला काहीही नुकसान होऊ नये यासाठी सध्याच्या किंमतीपेक्षा थोडया कमी किंमतीचे Poot Option खरेदी करणे आपल्यासाठी फायदेशीर ठरते.

See also  Lien amount म्हणजे काय ? What is SBI lien amount Marathi information

अशा पदधतीने आपल्याला मार्केटचा अंदाज घेऊन ट्रेडिंग करण्यासाठी Options खुप फायदेशीर ठरत असते.

Bank Nifty का बनविण्यात आले आहे?

 आज आपण पाहायला गेले तर निफ्टीमध्ये आज अशा अनेक कंपन्यांचा समावेश असलेला आपणास दिसून येतो.वेगवेगळया क्षेत्रात कार्यरत आहेत.

पण अशी गोष्ट बँक निफ्टीच्या बाबतीत अजिबात आपणास दिसुन येत नाही.इथे फक्त बँकांचा समावेश असलेला आपणास दिसुन येतो.त्यातही अशाच बँका यात समाविष्ट आहे ज्यांचे Market Capitalization High आहे.

म्हणजे ह्यावरून आपल्याला लक्षात येते की बँक निफ्टी हे बँकांची ग्रोथ,आणि प्रोग्रेस ट्रँक करण्याचे काम करते.

आणि याचसाठी बँक निफ्टी विशेषकरून बनवली गेलेली आपणास दिसुन येते.

बँक निफ्टीचा अजुन एक फायदा आहे की इथे आपण बँक सेक्टरविषयी कोणतीही माहीती प्राप्त करू शकतो.

Bank Nifty मध्ये ट्रेडिंग कशी करतात?

 बँक निफ्टीमध्ये जर आपल्याला ट्रेडिंग करायची असेल तर आपण दोन पदधतीने ट्रेडिंग करू शकतो.

1) Option Trading

2) Future Trading

या दोघांमध्ये शेअर्सच्या किंमतीचा अंदाज लावून आपल्याला ट्रेडिंग करता येते.पण आपल्याला असे देखील दिसुन येते की फ्यूचर ट्रेडिंगमध्ये आँप्शन ट्रेडिंगच्या तुलनेत थोडी जास्त रिस्क असते.

म्हणुन जे ट्रेडर्स ट्रेडिंगमध्ये प्रोफेशनल आणि एक्सपर्ट आहेत तेच ट्रेडर्स इंट्रा डे ट्रेडिंगसाठी प्युचरची खरेदी विक्री करत असताना आपणास दिसुन येतात.

म्हणजेच येथे आपण इंट्रा डे मध्ये देखील ट्रेडिंग करू शकतो ज्यात एका दिवसात शेअर्स खरेदी करून आपण ते इतर कोणालाही विकु शकतो.

आपण बँक निफ्टीमध्ये गुंतवणुक कशी करू शकतो?

 जर आपल्याला बँक निफ्टीमध्ये आपल्या पैसे गुंतवायचे असतील तर आपण ETF द्वारे देखील बँक निफ्टीमध्ये गुंतवणुक करू शकतो.

ETF हे एक Exchange Trading Fund असते ज्याचा वापर करून आपल्याला आपल्या पैशांची बँक निफ्टीमध्ये गुंतवणुक करता येत असतात.

Bank Nifty विषयी वारंवार विचारले जाणारे काही महत्वाचे प्रश्न

 1)Bank Nifty च्या Option मध्ये ट्रेड करणे सुरक्षित आहे का?

 ट्रेडिंग हा एक बिझनेस आहे आणि बिझनेस म्हटले तर त्यात चढ उतार येणे,तेजी मंदी येणे हे साहजिकच असते.पण आपण योग्य पदधतीने मार्केट रिसर्च करून अँनेलाईज करून ट्रेडिंग केली तर आपल्याला ट्रेडिंगमध्ये कोणतेही नुकसान सहन न करता ट्रेडिंग करणे खुप सोपे जात असते.

आणि बँक निफ्टीमध्ये अशाच लोकांनी ट्रेडिंग करायला हवी ज्यांना शेअर मार्केटचे उत्तम ज्ञान आहे कारण इथे कधीही शेअर्सच्या किंमतीमध्ये वाढ तसेच घट देखील होत असते.म्हणुन शेअर मार्केटचा अनुभव तसेच ज्ञान नसलेल्या नवख्या व्यक्तींनी इथे ट्रेडिंग करणे शक्यतो टाळायलाच हवे.

 

ग्लोबल शेअर बाजार चे निर्देशांक कोणते आहेत

 

2 thoughts on “Bank Nifty विषयी संपूर्ण माहिती – किती बँक ? कोणत्या बँकेचा किती टक्के वाटा. – Bank nifty Marathi Information”

Comments are closed.