SOS विषयी माहीती – What dose SOS mean in Marathi

SOS माहीती What dose SOS mean in Marathi

 एस ओ एस (SOS )  ही एक आपत्कालीन संकेत किंवा खूण असते ज्या द्वारे आपण संकटात आहात आणि आपल्याला तातडीने मदतीची गरज आहे आणि ती मदतची हाक देण्यासाठी मदतकार्य संस्थांना (Rescue teams) आजुबाजुच्या लोकांना संदेश पाठवत असतो.

 आणि एस ओ एस शब्द आपल्याला खुप ठिकाणी वाचायला तसेच ऐकायला देखील मिळत असतो.पण याचा नेमका अर्थ काय होतो?एस ओ एसचे महत्व काय असते?हेच आपल्याला माहीत नसते.

चला तर मग जाणुन घेऊया आजच्या लेखातुन

SOS म्हणजे काय असते?विविध क्षेत्रात असलेले SOS चे फुलफाँर्म आणि SOS चा फायदा काय असतो?SOS सिग्नल कसा पाठवला जातो?इत्यादी बाबींविषयी ते ही एकदम सविस्तरपणे.

SOS म्हणजे काय? What dose SOS mean in Marathi

 SOS हा एक कोड तसेच सिग्नल असतो जो आपण संकटात असताना एखाद्याला मदतीसाठी पाठवत असतो.

SOS हा एक सिग्नल असतो तसेच एक नोटिफिकेशन असते जे आपण संकटात असताना इमरजन्सी मध्ये आपल्याला मदत करावी यासाठी एखाद्याला पाठवत असतो.जेणेकरून आपला जीव वाचेल.

SOS सिग्नल हे आज अनेक ठिकाणी धोक्याची सुचना देण्यासाठी आणि त्वरीत मदत प्राप्त व्हावी यासाठी वापरले जात असतात.

 स्थापणा कोणी आणि कधी केली होती?

SOS ची स्थापणा ही जर्मन सरकारद्वारे करण्यात आली होती.आणि ही स्थापणा 1905 मध्ये करण्यात आलेली आपणास दिसुन येते.

SOS full form चे वेगवेगळे फुल फाँर्म काय आहेत?

 SOS चा अथ होतो आम्हाला वाचवा किंवा मला वाचवा.म्हणजेच अडचणीच्या संकटाच्या काळात मदतीसाठी आपण हा सिग्नल वापरत असतो.आणि हा सिग्नल आज अनेक ठिकाणी मदत मागण्यासाठी वापरला जातो त्यामुळे आपल्याला SOS चे प्रत्येक क्षेत्रात काही वेगवेगळे फुल फाँर्म देखील पाहावयास मिळत असतात.

See also  क्लाऊड कॉम्प्युटिंग म्हणजे काय ? Cloud computing Marathi Mahiti

SOS चे विविध फुलफाँर्म पुढीलप्रमाणे आहेत:

 SAVE OUR SHIP(IN SHIP)

  • SAVE OUR SOUL(IN POLICE)
  • SIGNIFICANT OTHER SCALE(MEDICAL FIELD)

 SOS सिग्नल कसा पाठवला जातो?

 SOS सिग्नल आपल्याला अनेक पदधतीने पाठवता येतो.

 यातीलच काही प्रमुख महत्वाच्या पदधती पुढील प्रमाणे आहेत :

 1) TAPPING द्वारे :

2) LIGHT द्वारे :

3) MIRROR आरशाद्वारे :

4) SMOKE द्वारे :

5) FLAME द्वारे :

  

1) TAPPING द्वारे :

TAPPING ही एक भाषा असते जिच्याद्वारे आपण न बोलता तसेच कोणत्याही प्रकारची हालचाल न करता देखील समोरच्या व्यक्तीशी गुप्तपणे संवाद साधू शकतो.

पण TAPPING LANGUAGE द्वारे एखाद्याशी संवाद साधण्यासाठी आपल्याला टँपिक लँग्वेजचे नाँलेज असणे खुप महत्वाचे आहे.तरच आपण याद्वारे समोरच्याशी संवाद,संपर्क साधु शकतो.

याचा उपयोग अशा वेळी करू शकतो जेव्हा आपण बोलु शकत नाही,तसेच काही हालचाल देखील करू शकत नाही जसे की समजा आपले एखाद्याने अपहरण केले आणि त्याने आपल्या तोंडावर पटटी बांधुन ठेवलेली आहे.आपल्याला एखाद्या दोराने बांधुन ठेवलेले आहे ज्यामुळे आपण कुठलीही हालचाल करू शकत नाही.

अशा परिस्थितीत आपण टँपिंगद्वारे समोरच्याला मदतीसाठी सिग्नल पाठवू शकतो.

 2)LIGHT द्वारे :

 जर आपण रात्रीच्या वेळी एखाद्या संकटात सापडलो तर अशा वेळी सगळीकडे अंधार असताना आपण एखाद्या टाँर्चचा लाईट लावून मोबाईलचा फ्लँश लाईट चालु करून किंवा आगेची शेकोटी करून सुदधा मदतीसाठी एखाद्याला सिग्नल देऊ शकतो.

याचा आपण अशा वेळी करू शकतो जेव्हा आपण रात्रीचे चालताना एखाद्या खडडयात पाय घसरून पडलो आहे किंवा अंधारात कुठेतरी हरवलो आहे इत्यादी अशा परिस्थितीत आपण टाँर्च लाईटचा सिग्नल देऊन मोबाईलचा फ्लँश लाईट सुरू करून समोरच्याला मदतीसाठी आवाहन करू शकतो.

3) MIRROR आरशाद्वारे :

 आरशाचा उपयोग करून देखील आपण एखाद्याला सिग्नल पाठवू शकतो.पण यासाठी सुर्याचा प्रकाश असणे खुप आवश्यक असते.याच्याने आपण एखाद्या आरशावर सुर्य किरणांना रिफ्लेक्ट म्हणजेच परावर्तित करून एखाद्याला मदतीसाठी आवाहन करू शकतो.

See also  फुलांची माहीती - Flowers Information In Marathi

 4) SMOKE द्वारे :

SOS SMOKE SIGNAL
धुरा द्वारे SOS सिग्नल देवून मदतीची याचना करताना

 

 

 आपण धुराद्वारे देखील SOS सिग्नल पाठवू शकतो.कारण धुर ही एक अशी गोष्ट आहे जी आपण कितीही दुर असलो तरी लगेच आपल्याला दिसुन येत असतो.आणि समोरच्या व्यक्तीला धुर दिसल्यावर साहजिकच आहे त्याला वाटणार की इथे आग लागली आहे किंवा काहीतरी इमरजन्सी आहे मग तो लगेच आपल्याला मदत करण्यासाठी तेथे येऊ शकतो.आणि आपले प्राण वाचु शकतात.

हा देखील एक चांगला पर्याय आहे मदतीसाठी आवाहन करण्याचा.

5) FLAME द्वारे :

 आपण आगेचे लाट म्हणजेच FLAME द्वारे देखील एखाद्याला मदतीसाठी बोलवू शकतो.समजा आपण एका अशा ठिकाणी फसलो आहे जिथे दूरपर्यत कोणीच मदतीसाठी आपल्याला दिसुन येत नाहीये.

अशा परिस्थितीत आगीच्या लाटांचा वापर करायला हवा कारण आगीच्या लाटा खुपच भयानक असतात त्या इतक्या उंच जातात की त्या बघून खुप दुरवरच्या व्यक्तीला देखील कळुन जाते की दूर अंतरावर कुठेतरी आग लागली आहे तसेच कोणी संकटात सापडलेले आहे.

आणि अशा परिस्थितीत वरतुन एखादे हेलिकाँप्टर जात असले तर त्यांना देखील लक्षात येते की इथे काहीतरी इमरजन्सी आहे.मग ते आपल्या मदतीसाठी धावू शकतात.

अशा पदधतीने आपण वरील विविध पदधतींचा वापर करून समोरच्याला आपल्या मदतीसाठी बोलावू शकतो.आणि मदत प्राप्त करू शकतो.

 ANDROID MOBILE मध्ये SOS CODE कसा ENABLE केला जातो?

 आज आपल्याला अँड्राईड मोबाईल मध्ये देखील SOS चे फिचर पाहायला मिळते.अँड्राईड मध्ये नवीनच हे फिचर अँड करण्यात आलेले आपल्याला दिसुन येते.

आज आपण अँड्राईड मोबाईल मधुन देखील SOS सिग्नल पाठवू शकतो.यासाठी आपल्याला आपल्या मोबाईलमध्ये तशी सेटिंग आधीपासुन करून ठेवावी लागते.

ANDROID MOBILE मध्ये SOS CODE ENABLE करण्याची प्रक्रिया पुढीलप्रमाणे आहे :

  • यासाठी आपण सगळयात पहिले आपल्या मोबाईल मधील सेटिंग ह्या आँप्शनवर जायचे असते.
  • मग सेटिंगमध्ये गेल्यावर SOS EMERGENCY नावाचे एक आँप्शन दिसुन येत असते.हे आँप्शन आपल्याला खाली किंवा वर देखील दिसुन जाते.
  • मग हे SOS EMERGENCY चे आँप्शन सापडल्यावर आपण त्यावर क्लीक करून ते आँप्शन इनेबल करायचे असते.
  • मग SOS EMERGENCY चे आँप्शन ईनेबल करून झाल्यावर आपल्याला इमरजन्सी साठी एक काँन्टँक नंबर तिथे अँड करण्यास सांगितले जाते.इथे आपण त्याच व्यक्तीचा नंबर अँड करावा ज्याला इमरजन्सीमध्ये आपल्याला सिग्नल पाठवायचा असतो.
  • इथे आपण एकाच व्यक्तीला नाही तर पुर्ण काँन्टँक्ट लिस्टवर इमरजन्सी मँसेज पाठवू शकतो फक्त आपल्याला तशी सेटींग आधीपासुन करून घ्यावी लागते.
  • आता आपण जेव्हाही आपल्या मोबाईलमधील पाँवर बटण पाच वेळा दाबु तेव्हा आपला इमरजन्सी मँसेज आपण दिलेल्या इमरजन्सी नंबरवर पाठवला जात असतो.
See also  ज्ञानपीठ पुरस्कार विजेत्या साहित्यिकांची  नावे - Gyanpeeth Award List in Marathi

SOS CODE SYSTEM चे फायदे कोणकोणते असतात?

 SOS CODE सिस्टमचे आज अनेक फायदे आपणास पाहायला मिळत आहेत.आणि याचा अनेक ठिकाणी संकटाच्या काळात मदत प्राप्त साठी उपयोग देखील केला जातो आहे.

  • संकटाच्या तसेच अडीअडचणीच्या काळात आपण ह्या फिचरचा वापर करून कोणालाही मदतीसाठी सिग्नल देवून बोलवू शकतो.
  • SOS SYSTEM चा वापर करून स्वताचा तसेच इतर अनेक व्यक्तींचा जीव वाचवला जाऊ शकतो.
  • महिलांसाठी SOS SYSTEM ही खुप फायदेशीर आहे समजा त्या काही अडचणीत असतील तर ह्या फिचरचा वापर करून त्या आपल्या परिवारातील व्यक्तींना,नातेवाईकांना तसेच पोलिस प्रशासनाला आपल्या मदतीसाठी बोलावू शकतात.
  • SOS द्वारे आपली लोकेशन देखील समोरच्याला सेंड होत असते जेणेकरून समोरचा लगेच आपण आहे त्या ठिकाणी आपल्या मदतीसाठी येऊ शकतो.आणि आपली मदत करू शकतो.

नक्की वाचा – -SOP म्हणजे काय ?