Accounting लेखांकन विषयी माहीती – Accounting Vishayi Basic information

लेखांकन माहीती  – Accounting Vishayi Basic information

 लेखांकन Account हा विषय आपल्या सर्वानाच माहीत आहे.कारण आज आपण प्रत्येक जण बँकेचे तसेच आर्थिक व्यवहार करत असतो.

अकाऊंटिंग हा विषय इतका महत्वाचा आहे की आज कुठेही बँकेत,संस्थेत,कार्यालयात,काम मिळविण्यासाठी आपल्याला आधी अकाऊंटिंग या विषयात रीतसर पदवी , पडव शिक्षण घेण आवश्यक असते . अश्या लेखांकन (Accounting)  सारख्या महत्वपूर्ण विषयात, नोकरी किंवा व्यासाय करण्यासाठी शिक्षण , अनुभव   एखादा कोर्स करनन आवश्यक असतो आधी अकाऊंट शिकावे लागते.

तेव्हा मग आपल्याला तिथे अकाऊंटंट म्हणुन काम मिळत असते.एवढेच नाही तर आज आपल्याला कोणत्याही आर्थिक व्यवहाराचे रेकाँर्ड ठेवण्यासाठी त्याचे कँल्क्युलेशन करण्यासाठी अकाऊंटींगचे नाँलेज असणे फार गरजेचे आहे.

म्हणुन आजच्या लेखात – Accounting Vishayi Basic information आपण अकाऊंटिंग विषयी सविस्तरपणे माहीती जाणुन घेणार आहोत.

अकाऊंटिंग म्हणजे काय?

कोणत्याही व्यक्तीचा तसेच कंपनीचा प्राँफिट तसेच लाँस जाणुन घेण्यासाठी,त्यांच्या इन्कम एक्सपेंसेस विषयी रोज इंट्री करून नोंद ठेवली जात असते, ताळमेळ ठेवला जात असतो .ह्याच व्यावहारीक हिशोबाला आपण अकाऊंटिंग असे म्हणत असतो.

 अकाऊंटिंग हा एक असा उपयुक्त मार्ग आहे ज्याचा वापर करून आपण कुठल्याही आर्थिक व्यवहाराचा सारांश चेक करू शकतो.त्याचे कँल्क्युलेशन करू शकतो,रेकाँर्ड तयार करून आपल्याकडे त्यांची नोंद ठेवून जपुन ठेवू शकतो.जेणेकरून आपला आर्थिक व्यवहार सुरळीतपणे पार पडेल.

आज प्रत्येक उद्योग व्यवसायात आर्थिक व्यवहारासाठी अकाऊंटींगचाच वापर केला जातो.याने आपल्याला झालेल्या आर्थिक व्यवहाराची नोंद तसेच त्याचा तपशील ठेवता येत असतो.

आपले Financial Status एका वर्षात कसे बदलायचे?

अकाऊंटिंगचे प्रमुख प्रकार किती आणि कोणकोणते आहेत? Accounting Vishayi Basic information

  अकाऊंटिंगचे एकुण तीन प्रमुख प्रकार असलेले आपणास दिसुन येतात.

1)Personal Account :

See also  रोबोटिक्स म्हणजे काय? Robotics basic information Marathi

2) Real Account :

3) Nominal Account :

   

1)Personal Account :

 पर्सनल अकाऊंट हे एक असे अकाऊंट असते जे एखाद्या कंपनी,संस्था किंवा व्यक्तीचे अकाऊंट असते.

ह्या अकाऊंटच्या प्रकारात एखादी व्यक्ती,संस्था तसेच कंपनीचे नाव दिले जात असते.

Personal Account मध्ये खालील दिलेल्या खात्यांचा समावेश होत असतो:

  • एखाद्या व्यक्तीचे अकाऊंट
  • बँकेचे अकाऊंट
  • कस्टमर आणि सप्लायरचे अकाऊंट
  • एखाद्या संस्थेचे अकाऊंट
  • कँपिटल अकाऊंट
  • ड्राँईग अकाऊंट

2) Real Account :

 जेव्हा आपण एखाद्या वस्तु किंवा संपत्तीसाठी आपले अकाऊंट ओपन करत असतो तेव्हा त्याला रिअल अकाऊंट असे म्हणतात. रिअल अकाऊंटमध्ये गुड,सर्विसेस तसेच ज्यामध्ये आपल्याकडून पैसे जात असतात अशा लायबिलीटी रिलेटेड बाबींचा समावेश होत असतो.

रिअल अकाऊंट दोन प्रकारचे असतात.

1)Tangible Real Account

2) Intangible Real Account

1)Tangible Real Account :

Tangible Account मध्ये अशा साधन संपत्तीचा समावेश होतो.ज्यांना आपण बघुही शकतो आणि स्पर्श देखील करू शकतो.

  • लँण्ड अकाऊंट
  • व्हीईकल अकाऊंट
  • फर्निचर अकाऊंट
  • बिल्डिंग अकाऊंट
  • मशिनरी अकाऊंट इत्यादी.

2)Intangible Real Account :

Intangible Account मध्ये असा साधन संपत्तीचा समावेश होत असतो.ज्याला आपण कुठल्याही प्रकारचा शारीरीक स्पर्श करू शकत नसतो पण त्या संपत्तीची गणना आपण आपल्या संपत्तीमध्ये करू शकतो.

 उदा.

  • ट्रेड मार्क अकाऊंट
  • काँपीराईट अकाऊंट
  • पेटंट अकाऊंट
  • गुड विल अकाऊंट

3) Nominal Account

Nominal Account मध्ये आपले इन्कम किती आहे आपले एक्सपेंसेस किती आहे याच्याशी संबंधित हिशोबाची नोंद ठेवण्यात येत असते.

आणि आपल्याला किती नफा झाला किती नुकसान झाले हे देखील आपल्याला यातुन कळत असते.

Nominal Account हे खालीलप्रमाणे असतात :

  • इंशूरससाठीचे अकाऊंट
  • इंटरेस्ट साठीचे अकाऊंट
  • सँलरी अकाऊंट
  • परचेसिंग अकाऊंट
  • कमिशन पे तसेच रिसिव्ह करण्याचे अकाऊंट
  • डिस्काऊंट अकाऊंट

 Other Accounts :

  • Cash Account
  • Income Account
  • Liabilities Account
  • Expense Account
  • Equity Account

 Personal Account चे Rule कोणकोणते आहेत?

 पर्सनल अकाऊंटमध्ये डेबीट हा Receiver म्हणजेच प्राप्तकर्ता असतो.

  • आणि देणारा म्हणजेच Giver हा क्रेडिट असतो.

 

Real Account चे Rule कोणकोणते आहेत?

  • Real Account मध्ये डेबिटचा सहभाग व्यवसायात होत असतो.
  • पण क्रेडिट हा व्यवसायात येत नसतो तो व्यवसायाच्या बाहेर जात असतो.
See also  मँरीटल स्टेटस कशाला म्हणतात - Marital status meaning in Marathi

Nominal Account चे Rule कोणकोणते आहेत?

  • यामध्ये व्यवसायात होणारा सर्व खर्च तसेच होणारे नुकसान डेबिट मध्ये येते.
  • आणि व्यवसायात होणारा सर्व लाभ तसेच इन्कम हे क्रेडिट असते.

 Accounting मध्ये वापरले जाणारे काही महत्वाचे Terms कोणकोणते आहेत?

1)Account Payable (AP) – देय बिल

2) Account Receivable AR -प्राप्य बिल

3) Accrued Expense (AE)

4) Asset – मालमत्ता

5) Balance Sheet (BS ) – ताळेबंद

6) Book Value (BV) – मूल्य

7) Equity -समभाग

8) Inventory – यादी

9) Liability – दायित्व

10) Gross Margin(GM) – शुद्ध राजस्व

11)Gross Profit (GP) – निव्वळ नफा / उत्पन्न

12)Net Income (NI) – निव्वळ उत्पन्न / आवक

13)Net Margin (NM) – निव्वळ राजस्व

14) Revenue Sales (RS) – महसूल विक्री

15) Cost Of Good Sold (CGS)

16) Expence  -खर्च

 

 1)Account Payable (AP) :

Account Payable मध्ये अशा सर्व खर्चाची नोंद केलेली असते जे आपण व्यवसायात करत असतो.

पण ते अद्याप आपण फेडलेले नसतात म्हणुन आपल्याला फेडायची असलेली रक्कम यात दिली जात असते.

2) Account Receivable(AR) :

 यात अशा खर्चाची नोंद असते जो आपल्या विक्रीनंतर वस्तुच्या बदल्यात आपल्याला प्राप्त होणार असतो.पण अद्याप ते पैसे आपल्याला मिळालेले नाहीयेत.

बँलन्स शीटमध्ये नोंद करताना हा एक अँसेट गृहित धरला जातो कारण इथे आपल्याला पैसे घ्यायचे असतात द्यायचे नसतात.

3) Accrued Expense (AE) :

यात आपण अशा खर्चाची नोंद करत असतो ज्याचे कोणतेही पैसे आपण भरलेले नसतात पण

याचा उल्लेख आपल्या बँलन्स शीटवर जमा खर्च असा केला जात असतो.

4) Asset :

आपल्याकडे जे काही असते मग तो पैसा असो जमीन असो किंवा सोने ह्या सगळयांचा समावेश अँसेटमध्ये होतो.

5) Balance Sheet :

Balance Sheet हे एक आपल्या आर्थिक देवाण घेवाणीच्या व्यवहाराची एक पावती असते ज्यात अँसेट,लायबिलीटी आणि इक्विटी वर अहवाल तयार केला जात असतो.

See also  मदर्स डे शुभेच्छा - मातृदिन शुभेच्छा 2023-मदर्स डे कोट्स -Mother Day quotes and wishes in Marathi

6) Book Value (BV) :

बुक व्हल्यु द्वारे आपल्या अशा संपत्तीची मुळ किंमत दर्शवण्याचे काम करतो.ज्याची किंमत दाखवली जात असते.

7) Equity :

इक्विटी असे मुल्य दर्शवण्याचे काम करते जे एखाद्या वस्तु संपत्तीवरची लायबिलीटी काढुन घेतल्यानंतर दर्शवले जात असतात.

8) Inventory :

बहुतेक कंपन्या आपल्या खरेदी केल्या गेलेल्या मालाचे वर्गीकरण करण्यासाठी ज्यांची अजिबात खरेदी केली गेलेली नसते तसेच ते असेच विना विक्री पडुन राहतात अशा मालांसाठी हा शब्द वापरताना आपणास दिसुन येतात.

9) Liability :

आपण ज्या वस्तु तसेच संपत्तीच्या बदल्यात पेमेंट देत असतो.त्याचा समावेश लायबिलीटी मध्ये होत असतो.

10) Expense :

उद्योग व्यवसायात आपण जो काही खर्च करत असतो तो एक्सपेंस मध्ये येत असतो.

11) Gross Margin(GM) :

 कोणत्याही व्यवसायात वस्तु प्रोडक्ट विकुण त्या मागे कंपनीला वरतुन जो प्राँफिट होत असतो त्याला ग्राँस मार्जिन असे म्हटले जाते.

12) Gross Profit (GP) :

एखाद्या उत्पादनाच्या सेवेच्या विक्रीशी संबंधित सर्व खर्च वजा केल्यानंतर जो नफा आपल्याला प्राप्त होत असतो तो Gross Profit असतो.

13) Net Income :

आपण कमावलेल्या रक्कमेमधील खर्च,व्याज,विविध टँक्स देयक काढुन झाल्यानंतर आपल्याला मिळणारी एकुण रक्कम म्हणजेच नेट इन्कम असते.

14)Net Margin :

विकलेल्या सर्व वस्तुंवरील खर्च,व्याज,टँक्स देयक काढुन त्यातुन आपल्याला किती प्राँफिट मार्जिन मिळतो आहे हे नेट मार्जिन मध्ये दिले जाते.

15) Revenue Sales :

आपल्या वस्तुच्या विक्रीनंतर मिळणारे उत्पन्न यात दिले जाते.

16) Cost Of Good Sold :

Cost Of Good Sold म्हणजेच विकलेल्या मालाची किंमत.

Accounting चे फायदे कोणकोणते असतात?

 Accounting द्वारे आपल्याला व्यापार व्यवसायात किती प्राँफिट होतो आहे किती लाँस होतो आहे हे कळत असते.

  • आपण कोणाकडुन किती कर्ज घेतले आहे हे कळते.
  • कुठे पैसे खर्च झाले हे कळते.
  • कोणत्या कर्मचारीचे किती पेमेंट झाले आहे किती बोनस त्याला द्यायचा आहे याचे कँलक्युलेशन आपल्याला करता येत असते. इत्यादी.

आपण अकाऊंटिंग शिकण्यासाठी काय करू शकतो?

अकाऊंटिंग शिकण्यासाठी आपल्याला अकाऊंटच्या साँपटवेअरचे बेसिक नाँलेज असणे फार गरजेचे आहे.

यासाठी आपण आपल्या घराच्या जवळपास असलेल्या एखाद्या कँप्युटर क्लासमध्ये टँली तसेच इतर अकाऊंटींगचे कोर्स देखील करू शकतो.

आणि अकाऊंटींग शिकुन अकाऊंट म्हणुन कोणत्याही संस्था,कार्यालयात,बँकेत अकाऊंटंट म्हणून लागु शकतो.तसेच आपण अकाऊटिंगमध्ये फुलटाईम करिअर देखील करू शकतो.

Accounting and Finance Essentials – A Self-Study Guide to Corporate Finance Paperback – 1 January 2020

3 thoughts on “Accounting लेखांकन विषयी माहीती – Accounting Vishayi Basic information”

Comments are closed.