SMALL CASE इन्वेस्टमेंट म्हणजे काय ? Small case investment mhanje kay

SMALL CASE  इन्वेस्टमेंट –  Small case investment mhanje kay

 आज आपण प्रत्येकजण शेअर बाजारात आपल्या पैशांची गुंतवणुक करत असतो.आणि ही गुंतवणुक करण्यासाठी आपण वेगवेगळया पदधतीचा वापर देखील करत असतो.

स्माँल केस ही एक अशीच नवीन पदधत आहे जिचा वापर करून आपण शेअर बाजारात आपल्या पैशांची गुंतवणुक करू शकतो.

आणि स्माँल केस हे म्युच्अल फंडपेक्षा थोडे अलग असलेले आपणास दिसुन येते कारण म्युच्अल फंडमध्ये आपल्या पैशांची गूंतवणुक करण्यासाठी आपल्याला आधी डिमँट अकाऊंट उघडावे लागायचे.

पण स्माँल केसमध्ये आपल्या पैशांची गुंतवणुक करण्यासाठी आपले डिमँट अकाऊंटसोबत ट्रेडिंग अकाऊंट देखील असणे गरजेचे असते.

आजच्या लेखात आपण ह्याच स्माँल केसविषयी सविस्तरणे माहीती जाणुन घेणार आहोत.

SMALL CASE म्हणजे काय?

SMALL CASE  म्हणजे एक वेगळ्या प्रकारे शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक करण्याचा मार्ग..

या स्मॉल केस मध्ये एका कल्पने, युक्ती नुसार व रणनीती नुसार सखोल अभ्यास करून 2 ते 50 समभाग(शेअर) किंवा इटीएफ निवडून त्यात गुंतवणूक केली जाते . म्हणजे एखादा जेव्हा म्हणतो की SMALL CASE  मध्ये  गुंतवणूक कर तेव्हा त्याला  या 2ते 50 शेअर च्या समूह किंवा संचं मध्ये गुंतवणूक करा असे म्हणायचे असते.

 

उदाहरण म्हणजे

  1. डिव्हिडंड देणारा स्मॉल केस- मग यात अश्या 2 ते 50 कंपनी असतात ज्यासर्वात जास्त डिव्हिडंड देतात
  2. आयटी स्मॉल केस- दुसर उदाहरण ,मग यात अश्या 2 ते 50 कंपनी चे शेअर असतील ज्या IT क्षेत्रातल्या सर्वोच्च, सर्वोत्तम व नामांकित असतील.

स्माँल केस ही एक गुंतवणुक करण्याची पदधत आहे.ज्यात आपल्याला शेअर बाजारच्या ठरवलेल्या प्लँननूसार आपल्या पैशांची गुंतवणुक करता येत असते.

आणि सगळयात महत्वाची गोष्ट म्हणजे येथे आपल्याला 2 ते 50 वेगवेगळ्या कंपन्यांचे शेअर आणि इटीएफ फंड असलेले देखील आढळुन येते.

SMALL CASE कशा पदधतीने काम करते?

  • स्माँल केसमध्ये जर आपल्याला गुंतवणुक करायची असेल तर येथे सर्वप्रथम आपल्याला एका थिमची निवड करावी लागत असते.मग कोणतीही एक थीम निवडुन झाल्यावर आपल्याला त्या थीमवर आधारीत शेअर्सची रिसर्च करून माहीती मिळवावी लागते.
  • मग चांगल्या पदधतीने शेअर्सविषयी रिसर्च करून झाल्यावर आपण आपल्याला योग्य वाटेल अशा वेगवेगळया कंपन्यांचे शेअर्स येथे निवडु शकतो.
  • मग आपण निवडलेल्या विविध कंपन्यांच्या शेअर्सचे एक बास्केट तयार केले जाते.हे बास्केट तयार करण्याचे काम विविध ब्रोकर्स किंवा अँडवायझर करत असतात.समजा आपल्याला इन्व्हेस्टमेंटचे चांगले ज्ञान अवगत असेल तर आपण स्वता देखील हे स्माँलकेस बास्केट तयार करून त्यानूसार आपल्याला हवी तिथे गुंतवणुक करू शकतो.
  • आपल्या ट्रेडिंग खात्याचा वापर करून आपल्या स्माँल केस शेअर्सचे व्यवस्थापण आपण करू शकतो एवढेच नव्हे तर हे शेअर्स आपण विकु देखील शकतो.
See also  द्रौपदी मुर्मू जीवन परिचय - बायोग्राफी Draupadi Murmu Information In Marathi

स्माँल केसमध्ये गुंतवणुक करण्याचे फायदे कोणकोणते असतात? -Small case investment mhanje kay

स्माँल केसमध्ये गुंतवणुक करण्याचे फायदे पुढीलप्रमाणे आहेत :

  • स्माँल केसमध्ये गुंतवणुक करण्याचा सगळयात पहिला फायदा आपल्याला हा होत असतो की इथे आपले शेअर्स आपल्या अधिन असतात म्हणुन आपण त्यात कधीही बदल करू शकतो किंवा त्याची विक्री करू शकतो.
  • स्माँल केसमध्ये गुंतवणुक करण्याचा फायदा हा देखील आहे की इथे जे शेअर्स गुंतवणुकीसाठी निवडले जातात ते शेअर्स स्वता फायनान्शिअल एक्सपर्टने रिसर्च करून निवडलेले असतात.
  • स्माँल केसमध्ये आपल्याला शेअर्समध्ये गुंतवणुक करण्याबरोबर इटीएफ फंड मध्ये,गोल्ड मध्ये देखील गुंतवणुक करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.याने आपल्याला कमी रिस्कमध्ये गुंतवणुक करण्याचा फायदा होत असतो.
  • याचसोबत स्माँलकेसमध्ये गुंतवणुक केल्याने आपल्याला भविष्यात दीर्घकाळासाठी चांगले रिटर्नस देखील प्राप्त होत असतात.
  • येथे आपल्याला म्युच्अल फंडमध्ये जसे फंड मँनेजरच्या निर्णयावर चालावे लागते तसा प्रकार दिसुन येत नाही.इथे आपण पुर्णपणे निर्णय घेऊ शकतो की आपल्याला आपले शेअर्स चेंज करायचे आहे किंवा नाही.आपल्या परवानगीशिवाय आपल्या पोर्टफोलिओ मध्ये कुठलेही बदल येथे केले जात नसतात.
  • इथे आपल्याला आपल्या आवडीनुसार कोणतीही थीम निवडता येते आणि त्या थीमनुसार आपल्याला पाहिजे तसा पोर्टफोलिओ निवडण्याचे स्वातंत्र देखील येथे असते.
  • कोणत्याही प्रकारची गुंतवणुक करण्याअगोदर आपण आपला पोर्टफोलिओ पुन्हा चेक करून बघु शकतो की त्यात कोणकोणते शेअर्स आहे त्यांचा रेशो काय आहे याचसोबत आपला पोर्टफोलिओ कोणत्या आधारावर तयार करण्यात आलेला आहे हे देखील बघण्याची सुविधा आपल्याला इथे दिली जात असते.

स्माँल केसमध्ये गुंतवणुक करण्यासाठी आपल्याला काय इन्व्हेस्टमेंट चार्ज लागत असतात?

  • स्माँल केसमध्ये गुंतवणुक करण्यासाठी आपल्याला आपले डिमँट तसेच ट्रेडिंग अकाऊंट ओपन करावे लागते.
  • येथे आपल्याला दोन वेळा वन टाईप खर्च करावा लागत असतो.पहिला खर्च आहे स्माँल केसमध्ये जर आपल्याला रजिस्ट्रेशन करायचे असेल तर आपल्याला 118 रूपये रजिस्ट्रेशन चार्ज भरावा लागत असतो.याचसोबत शंभर रूपये आपल्याला ब्रोकरेज फी तसेच चार्जेस देखील भरावे लागतात.
  • यानंतर आपल्यापुढे दोन पर्याय असतात फ्री तसेच पेड स्माँल केस जर आपण पेड स्माँल केसची निवड केली तर त्यासाठी आपल्याला स्माँलकेस मँनेजरला मँनेजिंग फी द्यावी लागते जी वर्षाची पाच ते दहा हजार इतकी असते.
See also  KFC म्हणजे काय ? KFC Information In Marathi

स्माँल केसमध्ये गुंतवणुक कशी करावी?

 

स्माँल केसमध्ये गुंतवणुक करण्याची प्रक्रिया पुढीलप्रमाणे आहे :

  • सगळयात आधी आपल्याला आपले एक ट्रेडिंग अकाऊंट आणि डिमँट अकाऊंट ओपन करावे लागते.
  • यानंतर आपण ट्रेडिंग ब्रोकरच्या वेबसाईटवर जाऊन किंवा अँपवर जाऊन देखील स्माँल केसमध्ये गुंतवणुक करू शकतो.
  • जर आपल्याला अँपचा वापर करून गुंतवणुक करायची असेल तर आपण गुगल प्ले स्टोअरमध्ये जाऊन आधी स्माँल केसची अँप डाऊनलोड तसेच इंस्टाँल करावी.
  • यानंतर आपल्यासमोर लाँग इन विद ब्रोकरचे आँप्शन येते तिथे विविध ब्रोकर्सची यादी दाखवली जाते.
  • मग आपल्यापुढे आलेल्या यादीमधील ज्या ब्रोकरकडे आपण डिमँट अकाऊंट ओपन केले आहे.त्यावर क्लीक करून आपण लाँग इन करायचे असते.
  • मग आपण आपला डिमँट अकाऊंटचा आयडी पासवर्ड तेथे इंटर करायचा असतो.
  • मग यानंतर आपल्यासमोर वेगवेगळे स्माँल केसचे आँप्शन दिसुन येतात.यापैकी आपल्याला जो योग्य वाटेल त्यात आपण गुंतवणुक करू शकतो.
  • याचसोबत आपल्याला एक डिस्कव्हर नावाचे आँप्शन दिसुन येत असते त्यात देखील आपल्याला विविध स्माँल केस दिसुन येत असतात.याचसोबत सी आँल स्माँल ह्या आँप्शनवर आपण ओके केले तर उर्वरीत स्माँल केस देखील आपल्याला दिसून येत असतात.
  • तसेच जर आपण स्क्रोल करून खाली आल्यावर आपल्याला टाँप गेनर्स इन लास्ट ईअर हे एक आँप्शन दिसुन येते.
  • ज्यात आपल्याला फार्मा ट्रँकर,व्हँल्युह मोमेनटम,आयटी ट्रँकर असे विविध स्माँल केस दिसुन येत असतात.
  • याचसोबत आपण इथे आपला स्वताचा स्माँल केस देखील बनवू शकतो.यासाठी आपल्याला क्रिएट आँप्शनवर जावे लागते.मग अँड स्टाँक नावाचे बटण आपल्यासमोर येते तेथे ओके केल्यावर आपण तिथे आपल्याला हवे ते स्टाँक अँड करू शकतो.
  • यानंतर आपल्याला निवडलेल्या स्टाँकला एक नाव द्यावे लागते तसेच आँब्जेक्टिव्ह देखील द्यावे लागते.
  • यानंतर आपल्यासमोर खाली सेव्ह स्माँकेस बटण दिलेले असते त्यावर ओके करावे.
  • सेव्ह स्माँलकेसवर ओके केल्यानंतर आपल्यासमोर दोन आँप्शन येत असतात.

शेअर स्माँलकेस आणि इन्व्हेस्ट नाऊ असे दोन पर्याय यातुन जर आपल्याला इन्व्हेस्ट करायचे असेल तर आपण इन्व्हेस्ट ह्या आँप्शनवर ओके करू शकतो.शेअर करायचे असेल तर शेअर स्माँलकेसवर ओके करून शेअर देखील करू शकतो.

See also  भारतातील पहिल्या वाॅटर मेट्रो प्रकल्पा विषयी माहिती -India first water Metro project information in Marathi

स्माँल केसमध्ये कोणी गुंतवणुक करायला हवी?

ज्यांना शेअर बाजारचे चांगले ज्ञान आहे ज्यांना शेअर मार्केटचा चांगला अनुभव आहे असे व्यक्ती येथे दिर्घकाळासाठी गुंतवणुक करू शकतात.

तसेच ज्या गुंतवणुकदारांना आपल्या पोर्टफोलिओवर कंट्रोल हवा असेल ते देखील स्माँल केसमध्ये गुंतवणुक करू शकतो.फक्त गूंतवणुकदाराला आपण किती जोखिम घेऊ शकतो ही पातळी माहीत असायला हवी.आणि मार्केट टाईमिंगचे देखील ज्ञान असणे गरजेचे आहे.

पण जे व्यक्ती ह्यात नवीन आहेत आणि त्यांना शेअर मार्केटचे कोणतेही ज्ञान नही त्यांनी इथे गुंतवणूक करणे शक्यतो टाळायला हवे.

स्माँल केस आणि म्युच्अल फंड या दोघांमध्ये काय फरक आहे?

1)PORTFOLIOW CONTROL-

म्युच्अल फंडमध्ये आपले पैसे कुठे गुंतवायचे हे गुंतवणुकदाराला ठरवता येत नसते.तसेच आपले पैसे कुठे गूंतवले जात आहे हे देखील त्याला जाणुन जाणुन घेता येत नसते.

पण स्माँल केसमध्ये असे नसते गुंतवणुकदाराचे आपल्या पोर्टफोलिओवर पुर्ण कंट्रोल असतो.तसेच आपले शेअर्स कुठे गुंतवायचे तसेच गुंतवले जात आहेत हे देखील त्याच्या पुर्ण नियंत्रणात असते.

2) CAPITAL REQUIREMENT –

स्माँल केस मध्ये म्युच्अल फंडच्या तुलनेत गुंतवणुकीसाठी अधिक भांडवलाची गरज पडत असते.

म्हणजेच येथे छोटे गुंतवणुकदार गुंतवणुक करू शकत नसतात.

आणि म्युच्अल फंडमध्ये गुंतवणुकीसाठी कमी भांडवल लागत असते.इथे छोटे गुंतवणुकदार देखील गूंतवणुक करू शकतात.

3) EXPENCE RATIO :

स्माँल केसचे खर्चाचे प्रमाण अलग पदधतीचे आहे आणि म्युच्अल फंडचे देखील.काही स्माँल केस हे फ्री आहेत पण काही पेड देखील आहेत.स्माँल केसमध्ये रेजिस्ट्रेशन फी तसेच ब्रोकरेज चार्जेस देखील लागत असतात.तसेच पेड स्माँल केसमध्ये मँनेजिंग फी देखील भरावी लागते.

म्युच्अल फंडमध्ये कमी खर्च करावा लागतो पण हा खर्च विविध पदधतीने आपल्याला करावा लागत असतो.

4)EXIT LOAD –

स्माँल केसमध्ये आपल्याला कोणताही इक्झिट लोड लाँक इन पिरियड दिला जात नाही.

पण म्युच्अल फंडमध्ये एक्झिट लोड चार्जेस घेतले जातात म्हणजे समजा आपण लाँक इन पपिरीयडच्या आधी गुंतवणुक केलेली रक्कम काढली तर आपल्याकडुन एक्झिट लोड चार्जेस घेतले जातात.

5) RISK :

म्युच्अल फंडच्या तुलनेत स्माँल केसमध्ये जास्त रिस्क असलेली आपणास दिसुन येते.

म्युच्अल फंडमध्ये तज्ञ व्यक्ती मार्केट रिसर्च करून आपला फंड मँनेज करत असतात.पण म्युच्अल फंडमध्ये सुदधा रिटर्नसची हमी दिली जात नसते.

म्हणुन रिस्क ही एकीकडे नसुन दोघीकडे आहे हे आपल्यावर सर्वस्वी अवलंबुन आहे आपण कोणती रिस्क घेऊ शकतो.