भारतातील पहिल्या वाॅटर मेट्रो प्रकल्पा विषयी माहिती – India first water metro project information in Marathi
नुकतेच आपल्या भारत देशाने चीनला लोकसंख्येच्या बाबतीत मागे टाकत जागतिक पातळीवर विश्वविक्रम नोंदविला होता आता पुन्हा एक नविन विश्वविक्रम नोंदविण्याच्या तयारीत भारत देश दिसत आहे.
25 एप्रिल रोजी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आशियातील सर्वात मोठ्या अणि पहिल्या वाॅटर मेट्रो ट्रेनचे उद्घाटन केले जाणार आहे.
आजच्या लेखात आपण ह्याच वाॅटर मेट्रो ट्रेन विषयी थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत.
आतापर्यंत आपणास आपल्या भारत देशात जागोजागी रेल्वेच्या रूळावर मेट्रो ट्रेन धावताना दिसुन आल्या आहेत.हया मेट्रो रेल्वे दवारे आपल्यातील कित्येक जणांनी प्रवास देखील केला आहे.
पण आता आपणास एक नवीन प्रकारच्या मेट्रो ट्रेन दवारे प्रवास करण्याची संधी प्राप्त होत आहे.जिचे नाव वाॅटर मेट्रो असे आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते केरळ राज्यातील कोचीन शहरात ह्या वाॅटर मेट्रोचे उद्घाटन करण्यात येणार आहे तसेच ह्या नवीन प्रकल्पाला हिरवा कंदील देखील दाखविला जात आहे.
इलाॅन मस्कने सर्व व्हेरीफाईड टविटर अकाऊंट वरून ब्लु टिक का काढले ? कारण काय ?
वाॅटर मेट्रो ट्रेनचे फायदे कोणकोणते आहेत?
ह्या नवीन मेट्रो ट्रेनचा प्रारंभ झाल्याने एका जागेवरून दुसरया जागेवर जाणे सोपे अणि सोयीस्कर पडणार आहे.
ह्या नवीन वाॅटर मेट्रो ट्रेनमुळे केरळा राज्यातील कोची शहरातील विविध भाग एकमेकांना जोडले जाणार आहे ज्यामुळे प्रवाशींना एका जागेवरून दुसरया जागेवर जाणे प्रवास करण्यासाठी हे अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.
दुसरा फायदा ह्या वाॅटर मेट्रो ट्रेनचा हा होईल की ह्या ट्रेनमुळे प्रवाशांना कमी वेळात प्रवास करता येणार आहे अणि हा प्रवास करण्यासाठी सर्व वाॅटर मेट्रो प्रवाशींना वाजवी दर मोजावे लागणार आहे म्हणजेच कमी पैसे खर्च करावे लागणार आहे.
वाॅटर मेट्रो ट्रेनचे वैशिष्ट्य काय आहे?
वाॅटर मेट्रो ही इतर सर्वसामान्य मेट्रो ट्रेन प्रमाणे रेल्वेच्या रूळावर नव्हे तर पाण्यावर धावणार आहे
२५ एप्रिल २०२३ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात येत असलेल्या वाॅटर मेट्रो ट्रेनचे प्रमुख वैशिष्ट्य हे आहे की ही मेट्रो ट्रेन भारतातील नव्हे तर संपूर्ण आशियातील पाण्यावर धावणारी पहिली मेट्रो ट्रेन असणार आहे.
ह्या वाॅटर मेट्रो प्रकल्पाअंतर्गत पाण्याच्या रस्त्याने शहरांची जोडणी केली जाणार आहे.
ह्या प्रकल्पात अनेक बोटसला जोडून त्यांना मेट्रोचा आकार दिला जाणार आहे.
नदीच्या काठावर वसलेल्या मोठ्मोठया शहरांसाठी ही वॉटर मेट्रो मोठी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था ठरू शकते असा अंदाज वर्तवला जात आहे.
असे सांगितले जात आहे की ह्या वाॅटर मेट्रो प्रोजेक्ट करीता १४ टर्मिनल अणि २३ वाॅटर मेट्रो बोटींची व्यवस्था देखील करण्यात आली आहे.
अणि हयातील चार ते पाच मेट्रो टर्मिनल सेवेसाठी पुर्णपणे सज्ज असल्याचे देखील सांगितले जात आहे.यावर जवळजवळ ७४६ करोड इतका खर्च देखील करण्यात आला आहे.
.२०२३ च्या अखेरपर्यंत ही वाॅटर मेट्रो ट्रेन प्रवाशांसाठी वापरासाठी खुली केली जाईल असे म्हटले जाते आहे.
पुढील पाच सहा महिन्यांत ट्रायल रन पुर्ण करून झाल्यावर या विभागावर नियमित सेवा सुरू केल्या जाणार आहेत.
हा प्रोजेक्ट पुर्णपणे कार्यान्वित केला गेल्यावर ३८ टर्मिनल अणि वाॅटर मेट्रो सेवेत ७८ बोटी आपणास दिसून येतील.