Debit आणि credit चे अर्थ काय ? – Debit and credit meaning in Marathi
डेबिट आणि क्रेडिट हे दोघेही फायनान्स आणि बँकिंगशी संबंधित अत्यंत महत्वाचे शब्द आहेत.
हे दोघे शब्द आपण आपल्या दैनंदिन जीवणात आर्थिक देवाणघेवाणीचे व्यवहार करत असताना नेहमी बँकिंग तसेच फायनान्स क्षेत्रात लिहत,वाचत तसेच ऐकत देखील असतो.
तसेच आपल्या बँक खात्यातुन आपण दुसरयाच्या अकाऊंटवर पैसे ट्रान्सफर करत असतो किंवा कोणी दुसरी व्यक्ती आपल्या खात्यावर पैसे ट्रान्सफर करत असते.
तेव्हा बँकेकडून आपल्याला आपल्या बँक खात्यातुन किती रक्कम क्रेडिट झाली आहे आणि किती रक्कम डेबिट झाली आहे याचा मँसेज येत असतो.
पण यांचा अर्थ नेमकी काय होतो हे आपल्यातील बहुतेक जणांना माहीत देखील नसते.त्यामुळे आपला खुप गोंधळ देखील होत असतो.
काळजी करू नका मित्रांनो कारण आज आपण ह्याच दोन शब्दांचा अर्थ जाणुन घेणार आहोत.
Debit आणि credit म्हणजे काय?
जेव्हा आपण दुसरयाच्या खात्यावर आपल्या खात्यातुन पैसे ट्रान्सफर करत असतो तेव्हा आपल्या खात्यातुन पैसे डेबिट होतात म्हणजेच वजा होतात त्यालाच debit असे म्हणतात.
आणि ती वजा रक्कम दुसरयाच्या खात्यावर जमा होत असते म्हणजेच क्रेडिट होत असते.त्यालाच credit असे म्हणतात.
Debit चा मराठीत काय अर्थ होतो? (debit meaning in Marathi)
Debit शब्दाचे मराठीत पुढील अर्थ होतात-
● जमा खर्चातील खर्चाची बाजु
● खर्चाच्या बाजुवर नोंद ठेवणे
● देणे म्हणुन नोंद करणे
● नाव लिहिणे
● खात्यातुन वजा करणे
● असा रेकाँर्ड जो थकित रक्कम दर्शवत असतो.
● गुंतवणुकीतुन रक्कम काढणे
● उत्तरदायित्व
● देय रक्कमेची नोंद
● खात्यावरून पैसे काढणे
क्रेडिट कार्ड व डेबिट कार्ड टोकनाईझेशन म्हणजे काय?
Debit चा हिंदीत काय अर्थ होतो? Debit meaning in hindi
Debit शब्दाचे हिंदीत पुढील अर्थ होतात-
● त्रणांकन
● किसी के नाम लिखना
● जमा
● विकलन
● नामखाता
● खर्चे मे लिखना
● त्रण हिसाब मे लिखना
● उधार खाता
● त्रण के खाते मे डालना
● खाते से पैसे निकालना
Credit चा मराठीत काय अर्थ होतो? credit meaning in Marathi
Credit चे मराठीत पुढील अर्थ होतात-
● बँकेच्या खात्यातील जमा रक्कम
● उधार
● बँकेकडुन खातेधारकाला विश्वासाने उधार म्हणुन देण्यात येणारी रक्कम
● विश्ववास,खात्री
● एखाद्या गोष्टीचे श्रेय घेणे
● एखाद्या खात्यात पैसे जमा करणे
● गुणामुळे प्राप्त होत असलेला सम्मान
● सदाचरणामुळे प्राप्त होणारी मानमान्यता
● प्रतिष्ठा
Credit चा हिंदीत काय अर्थ होतो?(credit meaning in Hindi)
Credit चे हिंदीत पुढील अर्थ होतात-
● बँक खाते मे जमा की गई राशी या रक्कम
● बँक खाते मे पैसे जमा होना
● लोन,कर्ज
● किसी बातका श्रेय लेना
● भरोसा या विश्वास
● बँक से उधार दी गई रक्कम या राशी
SBI Global International Debit Card माहीती, अर्ज,फायदे लिमिट व फी
Debtor कोणाला म्हणतात?
ज्यांच्याकडुन पैसे घ्यायचे आहेत त्यांना debtor म्हणतात.पैसे देणारा हा डेबिटर असतो.
Creditor कोणाला म्हणतात?
ज्याला पैसे द्यायचे आहे तो creditor असतो.म्हणजेच पैसे घेणारा हा क्रेडिटर असतो.
1 thought on “Debit आणि credit म्हणजे काय? – Debit and credit meaning in Marathi”
Comments are closed.