ओव्हर ड्राफ्ट म्हणजे काय? – Overdraft meaning in Marathi

ओव्हर ड्राफ्ट म्हणजे काय?Overdraft meaning in Marathi

प्रत्येक बँक आपल्या खातेधारकांना वेगवेगळया विशिष्ट सेवा सुविधा पुरवित असते.ओव्हर ड्राफ्ट सुदधा बँकेकडुन खातेधारकाला दिल्या जाणारया अनेक सेवा सुविधांपैकीच एक आहे.

पण आपल्यातील खुप जणांना ह्या सुविधेची माहीती नसल्या कारणाने आपण ह्या सुविधेचा अडीअडचणीत लाभ घेत नसतो.कारण ह्या सुविधेविषयी आपणास कुठलीही माहीती नसते.

म्हणुन आजच्या लेखात आपण ओव्हर ड्राफ्ट ह्या बँकेकडुन दिल्या जाणारया सेवा सुविधा विषयी जाणुन घेणार आहोत.

ओव्हर ड्राफ्ट म्हणजे म्हणजे काय असते ?overdraft meaning in Marathi

ओव्हर ड्राफ्ट म्हणजे आपल्या बँक खात्यात जितकीही रक्कम शिल्लक आहे त्यापेक्षा अधिक रक्कम काढता येण्याची सुविधा.

ओव्हर ड्राफ्ट सुविधा ही आपल्याला विविध सरकारी तसेच खाजगी बँकेकडुन बँकेकडुन दिली जात असते.

ओव्हर ड्राफ्ट ही सुविधा आपणास मुख्यत्वे करंट अकाउंट,सँलरी अकाऊंट,एफ डी इत्यादींवर उपलब्ध करून दिली जाते.पण काही बँकेत हीच सुविधा शेअर्स तसेच ब्रँण्डमध्ये सुदधा दिली जात आहे.

एवढेच नव्हे तर ज्यांचे सेव्हिंग अकाउंट आहे.अशा खातेधारकांना सुदधा ही सुविधा प्रदान केली जात आहे.

म्हणजेच थोडक्यात सांगायचे म्हटले तर ओव्हर ड्राफ्ट ही एक सुविधा तसेच कर्ज आहे जे बँक आपणास देत असते जिचा वापर करून आपण काही कालावधीसाठी बँकेकडुन पैसे उधार घेऊ शकतो.

बँक ओव्हर ड्राफ्ट म्हणजे काय?Bank overdraft meaning in Marathi

बँक खातेधारकाला बँकेकडुन दिली जाणारी ही एक महत्वपूर्ण सुविधा असते ज्यात आपल्या बँक खात्यात जेवढी रक्कम बाकी आहे ती आपणास अपुरी पडत असेल तर आपण ओव्हर ड्राफ्ट सुविधेचा वापर करून अतिरीक्त रक्कम देखील काढु शकतो.

See also  ग्राफिक डिझायनिंग म्हणजे काय? - Graphics designing career opportunities

ओव्हर ड्राफ्ट लिमिट म्हणजे काय?Overdraft limit meaning in Marathi

ओव्हर ड्राफ्ट लिमिट म्हणजे बँकेने दिलेल्या ओव्हर ड्राफ्ट सुविधेची एक मर्यादा असते जिचा आपण बँकेने ठरवलेल्या ठाराविक रक्कमेच्या मर्यादेपर्यतच वापर करू शकतो.

ओव्हर ड्राफ्ट सुविधेचे फायदे –

● जेव्हा आपण एखाद्या आर्थिक अडीअडचणीत असतो आपणास तात्काळ एमरजन्सीमध्ये काही कारणास्तव पैशांची आवश्यकता असते पण आपल्या खात्यात तेव्हा पाहिजे तेवढी रक्कम शिल्लक नसते.तेव्हा अशा वेळी आपण इतरांकडुन कर्ज घेण्यापेक्षा उधार पैसे घेण्यापेक्षा बँकेकडुन आपणास दिल्या जात असलेल्या ओव्हर ड्राफ्ट सुविधेचा लाभ घेऊ शकतो.

● ओव्हर ड्राफ्ट सुविधेमुळे आपणास लगेच गरजेपुरता काही कालावधीपुरता का होईना पैसे उपलब्ध होऊन जातात.

● यात पेपरवर्कची देखील जास्त आवश्यकता नसते.

● जेवढी रक्कम आपण ओव्हर ड्राफ्ट सुविधेचा वापर करून वापरली आहे त्याच रकमेवर आपणास व्याज द्यावे लागत असते.

ओव्हर ड्राफ्टचे तोटे –

● यात आपण जी रक्कम उचलत असतो त्यावर व्याजदर हे थोडे जास्त आकारले जात असते.

● ओव्हर ड्राफ्टची रक्कम मर्यादा किती असेल व्याजदर किती आकारले जाईल हे आपल्या आर्थिक स्थितीवरून म्हणजेच जुन्या अकाऊंट हिस्ट्रीवर म्हणजेच याआधी घेतलेल्या कर्जाची परतफेडीवर तसेच आपल्या क्रेडिट स्कोर वर सुदधा अवलंबुन असते त्यावरून हे ठरविले जात असते.जर आपण आधी घेतलेले कर्ज वेळेवर फेडले नसेल आपला क्रेडिट स्कोर खराब असेल तर आपण ह्या सुविधेचा लाभ घेऊ शकत नसतो.

● व्याज दरात जर बदल झाला तर व्याजाचे शुल्क देखील बदलत असते.

● घेतलेले कर्ज आपणास बँकेने निर्धारीत केलेल्या वेळेच्या आत फेडावे देखील लागते नहीतर आपल्याला कर्ज फेडीस उशिर केल्याने बँकेला पँनल्टी चार्जेस भरावे लागु शकतात.

● ओव्हर ड्राफ्ट सुविधेसाठी बँकेकडुन काही वार्षिक चार्जेस देखील घेतले जात असतात.

ओव्हर ड्राफ्ट खात्याची सुविधा बँकेकडुन कोणाला अणि कशी दिली जात असते?

● सँलरी अकाऊंट असलेल्या अशा व्यक्तींनाच ओव्हर ड्राफ्ट सुविधा प्राप्त होत असते ज्यांच्या खात्यावर दर महिन्याला वेतन जमा होत असते.

See also  सुप्रसिद्ध मराठी कादंबरी आणि त्यांच्या लेखकांची नावे - List of Famous Marathi kadambari names

● ओव्हर ड्राफ्टसुविधेचा वापर करण्यासाठी सँलरी अकाऊंट असलेल्या वेतन धारकांचे वेतन किमान १५ ते २५ हजार असणे गरजेचे असते.

● सँलरी अकाउंटवर काही बँका किमान चार ते पाच लाख इतके ओव्हर ड्राफ्टची सुविधा देत असतात.

● जर आपले बचत खाते असेल तर ओव्हर ड्राफ्ट सुविधा प्राप्त करण्यासाठी आपले बँक खाते सहा महिन्यापेक्षा अधिक कालावधीसाठी सक्रिय असावे लागते.जो व्यक्ति जाँब करतो आहे किंवा व्यवसाय करतो आहे म्हणजेच कमाई करतो आहे त्यालाच ही सुविधा बँकेकडुन दिली जात असते.फक्त ही सुविधा सेव्हिंग अकाउंट वर प्राप्त करण्यासाठी आपणास काही वार्षिक चार्जेस भरावे लागु शकतात.जो व्यक्ती कमवता नाही आहे तसेच केसीसी किसान क्रेडिट कार्ड आहे असे व्यक्ती ह्या सुविधेचा वापर करू शकत नाही.यात बँक आपल्याकडुन कुठलेही प्रोसेसिंग चार्ज घेत नसते.

● फिक्स डिपाँझिटवर देखील आपणास ओव्हर ड्राफ्टची सुविधा प्राप्त होत असते.पण ही सुविधा काही ठाराविक बँका आपल्या बँक खातेधारकांना देत असतात.