आपल्या नावात बदल कसा करता येतो ? How to change your name legally Marathi information

 नावात बदल कसं करता येतो ? How to change your name legally Marathi information

 आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात कधीतरी ही वेळ नक्कीच येते जेव्हा आपल्याला आपले स्वताचे नाव बदलावे लागत असते.यामागे एकच कारण राहत नसुन अनेक कारणे यासाठी कारणीभुत ठरत असतात.

ज्यात आपल्याला आपल्या नावाविषयी असंतोष असणे,नावात शासनाकडुन टाईप करताना स्पेलिंग मिस्टेक होऊन जाणे.इत्यादी अशी अनेक विविध कारणे असतात.ज्यामुळे आपल्याला आपले नाव कायद्याने चेंज करावे लागत असतात.

अशा वेळी आपल्याला एका योग्य मार्गदर्शनाची आवश्यकता असते.जेणेकरून आपल्याला ही सर्व फोसेस कशी असते? यात आपल्याला काय काय करावे लागत असते?नेम चेंजसाठी कोणते डाँक्युमेंटस लागत असतात याविषयी सविस्तरपणे जाणुन घेता येईल.

म्हणुन आजच्या लेखात आपण आपले नाव कायदेशीर पदधतीने कसे चेंज करायचे त्यासाठी आपल्याला कोणती प्रोसेस फाँलो करायची असते आणि त्यात काय काय करायचे असते इत्यादी हे सर्व काही सविस्तरपणे जाणुन घेणार आहोत.जेणेकरून आपल्याला आपले नाव बदल करत असताना कोणतीही अडचण येणार नाही.

आपण आपले नाव चेंज करण्याची कोणकोणती कारणे असतात?

 आपण आपले नाव चेंज करण्यामागे कोणतेही एक कारण नसुन त्यामागे परिस्थितीनुसार अनेक कारणे असु शकतात.जी पुढीलप्रमाणे असतात :

1)लग्नानंतर जेव्हा एखाद्या स्त्रीला आपल्या पतीचे आडनाव आपल्या नावापुढे लावायचे असेल तेव्हा ती आपले माहेरचे आडनाव काढुन सासरचे आडनाव लावत असते.

2) जेव्हा एखादी स्त्री पुनर्विवाह करत असते तेव्हा आपल्या आधीच्या पतीचे नाव काढुन नवीन पतीचे आडनाव आपल्या नावापुढे लावण्यासाठी ती आपले नाव चेंज करत असते.

See also  आईला घरातील कामात मदत कशी करणार ? - Ways To Help Busy Mother At House

3) आपण आपले नाव चेंज करण्यामागे काही ज्योतिषीय कारणे देखील असतात.ज्यात आपण ज्योतिषांच्या सांगण्यावरून आपण आपले नाव राशी तसेच ग्रहानुसार चेंज करत असतो.

4) जेव्हाही एखादी स्त्री किंवा पुरुष प्रेमविवाह तसेच इतर कोणत्याही कारणाने आपला धर्म बदलत असतो तेव्हा त्या स्त्री तसेच पुरुषाला आपले नाव कायदेशीर पदधतीने चेंज करावे लागत असते.

5) किंवा पालकांच्या चुकीमुळे शासकीय,सरकारी रेकाँर्डमध्ये आपले चूकीचे नाव दाखल केले गेले असेल तेव्हा देखील आपण नाव दुरूस्तीसाठी आपले नाव चेंज करत असतो.

6) शासनाकडुन आपले नाव टाईप करताना जर काही स्पेलिंग तसेच टाईपिंग मिस्टेक झाली असेल तर ती करेक्ट करण्यासाठी देखील आपण आपले नाव चेंज करत असतो.

7) आपल्याला जर आपल्या नावाविषयी कुठल्याही प्रकारचा असंतोष किंवा असमाधान असेल तर आपण तेव्हा देखील आपले नाव चेंज करू शकतो.

8) तसेच आपण आपल्या काही इतर वैयक्तिक कारणांसाठी देखील आपले नाव चेंज करू शकतो.

आपल्याला आपल्या नावात बदल करण्यासाठी कोणकोणती कागदपत्रे लागत असतात?

 आपल्याला जर आपल्या नावात कायदेशीर पदधतीने बदल करायचा असेल तर त्यासाठी आपल्याला काही महत्वाचे डाँक्युमेंटस तयार करावे लागत असतात.

जे पुढील दिलेल्या प्रमाणे असतात :

1) आपल्याला कायदेशीर पदधतीने आपले नाव चेंज करायचे असेल तर त्यासाठी आपल्याला आपण आपले नाव बदलत असल्याचे एक प्रतिज्ञापत्र तयार करावे लागत असते.आणि त्यात एक योग्य कारण द्यावे लागत असते.ज्याला इंग्रजीत name change affidavit असे देखील म्हटले जात असते.

2) आपण आपले नाव चेंज केले आहे अशी जाहीरात आपल्याला सर्व महत्वाच्या न्युज पेपरमध्ये किंवा टीव्ही अँड अशा जाहीरात माध्यमांद्वारे करावी लागत असते.

3) आपण आपले नाव बदलत असल्याची अधिसुचना आपल्याला भारत सरकारच्या राजपत्रात म्हणजेच government gazette मध्ये द्यावी लागत असते.

4) आपल्याला आपल्या जुन्या नावाचा आयडी देखील लागत असतो.ज्यात पँनकार्ड,आधार कार्ड मतदान कार्ड इत्यादींचा समावेश होत असतो.

See also  NGO म्हणजे काय ? NGO information in Marathi

5) आणि एक डिजीटल सिग्नेचर सीडी देखील तयार करावी लागत असते.

कायद्याने आपण आपले नाव कसे चेंज करावे?

 आपल्याला जर कायद्याने आपल्या नावात बदल करायचा असेल तर आपल्याला पुढील प्रोसेस फाँलो करावी लागेल :

 • आपल्याला जर आपले नाव चेंज करायचे असेल तर आपण सर्वप्रथम नेम चेंजसाठी अँफिडेव्हिट करायला हवे.ज्यासाठी स्थानिक नोटरी मध्ये जाऊन नाव बदल करत असल्याचे प्रतिज्ञापत्र करावे लागते.
 • त्या प्रतिज्ञापत्रात आपण आपले आधीचे नाव आणि नवीन हवे असलेले नाव यांचा समावेश करायला हवा.आणि आपण आपले नाव कोणत्या कारणासाठी चेंज करत आहे ते कारण देखील द्यावे लागत असते.
 • आणि मग आपले नाव चेंज करण्यासाठी वर्तमानपत्रात नाव बदलाची एक जाहीरात द्यावी लागते ज्यात आपल्याला अर्जदाराचे संपुर्ण नवीन तसेच जुने नाव नाव,अर्जदाराचा संपुर्ण पत्ता,नेम चेंज अँफिडेव्हीट केल्याची डेट,अर्जदाराचे वय,ज्या नोटरीतुन प्रतिज्ञापत्र तयार केले गेले आहे तिचे नाव,अर्जदाराच्या वडिलांचे/पतीचे नाव देखील यात द्यावे लागत असते.आणि वर्तमानपत्रात नाव बदलत असल्याची जाहीरात देण्यापुर्वी शेवटी एकदा पुन्हा एकदा सर्व तपशीलाचा क्राँस चेक करून घ्यावा.जेणेकरून नंतर कुठलीही समस्या उत्पन्न होणार नाही.
 • आणि मग शेवटी भारताच्या अधिकृत राजपत्रात म्हणजेच गर्वमेंट गँझेटमध्ये देखील याची एकदा नोंद करावी लागते.यात आपल्याला शुल्काचा डीडी आणि आवश्यक डाँक्युमेंटसोबत एक अर्ज लिहावा लागतो.आणि मग भारताच्या राजपत्रात आपले नाव बदलत असल्याची अधिसुचना द्यावी लागत असते.

अशा पदधतीने वरील सर्व प्रोसेसला फाँलो करून आपण आपले नाव कायदेशीर पदधतीने चेंज करु शकतो

नाव बदलण्यासाठी लागणारे महत्वाचे डाँक्युमेंटस :

 • नाव बदल करण्यासाठी केलेला अर्ज
 • नेम चेंज अँफिडेव्हीट
 • आधार कार्ड
 • आई किंवा वडिलांचे आधार कार्ड

नाव बदलण्याच्या प्रक्रियेस किती कालावधी लागतो?

नाव बदल करण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला वर्तमानपत्रात एक जाहीरात द्यावी लागते.यात कमीत कमी तीन ते चार दिवस लागत असतात.आणि मग सरकारी राजपत्रात नाव येण्यासाठी दोन ते तीन आठवडे लागत असतात.

See also  आरोग्य विमा म्हणजे काय ? आणि का घ्यावा ? - Health Insurance Policy In Marathi

 आपल्याला आपले नाव बदलत असल्याची जाहीरात वर्तमानपत्रात देणे बंधनकारक असते का?

 होय आपण आपले नेम चेंज अँफिडेव्हीट केल्यानंतर आपण राहत असलेल्या शहरातील प्रमुख एक ते दोन वर्तमानपत्रांत आपल्या नाव बदलाची जाहीरात देणे अनिर्वाय आहे.

  आपल्याला आपले नाव बदलण्यासाठी नेम चेंज अँफिडेव्हीट करणे गरजेचे असते का?

 होय आपल्याला जर आपल्या नावात बदल करायचा असेल तर आधी आपल्याला नोटरीमध्ये जाऊन नेम चेंज अँफिडेव्हीट करून एक प्रतिज्ञापत्र तयार करावे लागत असते.आणि त्यात आपण आपले नाव कोणत्या कारणासाठी चेंज करतो आहे.ते कारण देखील नमुद करावे लागत असते.

आणि याचीच नोंद भारतीय राजपत्रात आणि वर्तमान पत्रात देखील केली जात असते.

अशा पदधतीने आज आपण आपले नाव कायदेशीर पदधतीने कसे चेंज करू शकतो हे सविसतरपणे आज जाणुन घेतले आहे.

 गँझेट हे काय असते?

 गँझेट म्हणजेच एक प्रकारचे वर्तमानपत्रच तसेच बातमीपत्र असते ज्यात समाजात घडत असलेल्या सर्व घटना प्रसंगांची घडामोडींची सारांश मध्ये नोंद केली जात असते.

 गर्वमेंट गँझेटचे काम काय असते?

 जेव्हाही शासनाकडुन कोणताही नवीन कायदा लागु केला जात असतो.तो गर्वमेंट गँझेटद्वारेच लागु केला जात असतो.याव्यतीरीक्त लिंग,धर्म,नाव बदल करण्यासाठी देखील गर्वमेंट गँझेटचा वापर केला जात असतो.

2 thoughts on “आपल्या नावात बदल कसा करता येतो ? How to change your name legally Marathi information”

 1. माहिती छान दिली आहे पण अन अपूर्ण आहे . राजपत्र प्रकाशित करण्यासाठी कुठे संपर्क करावा , कार्यालय website चे नाव सामील करा

  Reply
 2. माझी आई ९५वर्षाची आहे.तिच्या आताच्या म्हणजेच सासरच्या नावाचे आधारकार्ड व मतदार कार्ड तसेच रेशनकार्डही आहे.पण पूर्वी बँकेत ठेवलेल्या ठेवींचे व्यवहार करण्यासाठी पॅन कार्ड आवश्यक आहे असे सांगितले आहे.पण पॅन कार्ड साठी जन्मतारखेचा दाखला गरजेचा आहे.तो दाखला माहेरच्या नावाने निघणार, अशावेळी नेमके काय करावे? श्रीधर जोशी.

  Reply

Leave a Comment