भारतातील सर्वात प्रभावी प्रेरणादायी वक्ते कोण आहेत ?-  Top 10 motivational speakers in India

भारतातील प्रभावी प्रेरणादायी वक्ते –  Top 10 motivational speakers in India

आज आपणास प्रत्येकाला प्रेरणेची तसेच स्फुर्तीची गरज असते.कारण जेव्हा आपण आपल्या आयुष्यातील

अडीअडचणी तसेच संकटांपुढे खचुन जात असतो.आणि कुठलाही मार्ग दिसत नसल्यामुळे निराश आणि हतबल होऊन जात असतो.

तेव्हा ह्या नैराश्यातुन बाहेर निघण्यासाठी आपण एक आधार मिळण्यासाठी तसेच आपल्या आयुष्यातील अडीअडचणींवर काहीतरी मार्ग प्राप्त व्हावा यासाठी युटयुब सारख्या माध्यमांवर मोटेव्हेशनल व्हिडिओ बघत असतो.

ज्यात विविध प्रेरणादायी क्क्ते असतात जे आपल्याला जीवणातील सर्व संकटांचा,अडीअडचणींचा खंबीरपणे सामना करण्यासाठी मोटिव्हेट करण्याचे काम करत असतात.

आणि त्यासाठी ते आपल्याला आपल्या जीवणातील प्रत्येक अडी अडचणींमध्ये देखीलही ठामपणे उभे राहता यावे यासाठी आपल्याच सारख्या सर्वसामान्य अशा गरीब परिस्थितीतुन कठिण परिस्थितीतुनही मार्ग काढत उच्च शिखर गाठलेल्या यश संपादन केलेल्या व्यक्तीमत्वांचा दाखला देखील यासाठी आपल्यापुढे ठेवत असतात.

आज असे अनेक मोटिव्हेशनल स्पीकर युटयुबवर आपणास पाहायला मिळतात जे तरूणांना रोज आपल्या व्हिडिओद्वारे मोटिव्हेट करण्याचे त्यांना प्रेरणा देण्याचे काम करत आहेत.

आजच्या लेखात आपण अशाच काही भारतातील टाँप 10 मोटिव्हेशनल स्पीकरविषयी सविस्तरपणे जाणुन घेणार आहोत.जे आजच्या तरूण पिढीला मोटिव्हेट करण्यात आपले खुप मोठे योगदान देताना आपणास दिसुन येत आहेत.

भारतातील 2021 मधील Top 10 motivational speakers कोणकोणते आहेत?

 भारतातील 2021 मधील टाँप 10 मोटीव्हेशनल स्पीकरची नावे पुढीलप्रमाणे आहेत :

 1) संदीप माहेश्वरी :

2) डाँ विवेक बिंद्रा :

3) डाँ उज्वल पाटणी :

4) शिव खैरा :

5) चेतन भगत :

6) जग्गी वासुदेव (सदगुरू) :

7) दिपक चोप्रा :

8) राँबिन शर्मा :

9) टी एस मदान :

10) स्वामी ज्ञान वत्सल :

1)संदीप माहेश्वरी :

 संदीप माहेश्वरी हे भारतातील एक अग्रगण्य मोटीव्हेशनल स्पीकर आहेत.जे आज लाखो तरूण तरूणींना मोटिव्हेट करण्याचे काम करत आहे.

संदीप माहेश्वरी यांनी स्वता अनेकदा अपयशाला सामोरे गेले भरपुर संघर्ष केला ज्यामुळे आज त्यांना यश आनंद आणि समाधानाचे जीवण प्राप्त झाले आहे.

See also  Hanuman Chalisa- हनुमान चालीसा वाचण्याचे फायदे कोणकोणते आहेत?

याच कारणासाठी संदीप माहेश्वरी यांनी आपले युटयुबवरील व्हिडिओ बघत असताना आँडियन्सला कुठलाही त्रास तसेच अडथळा निर्माण होऊ नये म्हणुन अँड देखील लावल्या नाहीयेत.

लोकांना निस्वार्थपणे मदत करण्याच्या आणि समाजासाठी काहीतरी चांगले योगदान देता यावे यासाठी त्यांनी हे सर्व केलेले आपणास दिसुन येते.

याचसोबत आजच्या तरूण तरूणींना मोफत मार्गदर्शन करण्यासाठी फ्री सेमिनार वेबिनार देखील आयोजित करत असतात.

आँथरप्रिनर इंडिया समिट कडुन त्यांना 2013 मध्ये क्रिएटिव्ह आँथरप्रिनर आँफ इयरचा अवाँर्ड देखील त्यांना देण्यात आला होता.

संदीप माहेश्वरी यांचे युटयुबवर 21.6 मिलियन फाँलोवर्स आहेत.

2)  डाँ विवेक बिंद्रा :

डाँ विवेक बिंद्रा हे भारतातील दुसरे टाँप मोटिव्हेशनल स्पीकर आहेत.विवेक बिंद्रा हे एक मोटिव्हेशनल स्पीकर,बिझनेस कोच आणि एक बिझनेसमँन देखील आहेत.

डाँ विवेक बिंद्रा बडा बिझनेस डाँट काँमचे सीईओ तसेच फाऊंडर आहेत.विवेक बिंद्रा यांच्या युटयुब चँनलवर आत्तापर्यत 18 मिलियन सबस्क्राईबर झाले आहेत आणि 12 दशलक्ष पेक्षा अधिक मेंबर्स झालेले आहेत.

विवेक बिंद्रा यांनी आत्तापर्यत दहा पुस्तकांचे लेखन केले आहे.ते त्यांच्या लीडरशिप डेव्हलमेंट प्रोग्राम द्वारे युवा पिढीला लीडरशिप कशी करावी लीडर कसे बनावे याचे मार्गदर्शन करीत आहे.

याचसोबत ते आपल्या यूटयुब चँनल वरून वेगवेगळया केस स्टडीजवर देखील व्हिडिओ अपलोड करीत असतात.ज्यांचा लाभ आपण युटयुबवरून फ्री मध्ये घेऊ शकतो.

3) डाँ उज्वल पाटणी :

 डाँ उज्वल पाटणी हे भारतातील फेमस मोटिव्हेशनल स्पीकर आहेत.डाँ उज्वल पाटणी आपल्या सेमिनार कार्यशाळेतुन रोज लाखो लोकांना प्रेरणा देण्याचे काम करीत आहे.

डाँ उज्वल पाटणी यांना भारतातीलच नव्हे तर भारताबाहेरील लोक देखील मोटिव्हेशनल स्पीकर म्हणुन ओळखतात.

डाँ उज्वल पाटणी हे इंटरनँशनल कोच,मोटिव्हेशनल स्पीकर आणि एक प्रसिदध लेखक म्हणुन देखील प्रसिदध आहेत.

डाँ उज्वल पाटणी यांच्या युटयूब चँनलवर आत्तापर्यत एकुण 5.75 मिलियन इतके सबस्क्राईबर झालेले आपणास दिसुन येतात.

See also  श्रावण महिन्याच महात्म्य -Shravan month importance

4) शिव खैरा :

 डाँ शिव खेरा हे भारतातील फेमस मोटिव्हेशनल स्पीकर,रायटर तसेच पाँलिटिशन म्हणुन देखील प्रसिदध आहेत.

मोटिव्हेशनल स्पीकर बनण्याच्या अगोदर शिव खैरा यांनी कार वाँशर तसेच विमा एजंट म्हणुन देखील काम केले होते.

डाँ शिव खैरा यांनी आत्तापर्यत अनेक लोकप्रिय पुस्तकांचे लेखन केले आहे.त्यांच्या यु कँन विन ह्या पुस्तकाला बेस्ट सेलरचा अवाँर्ड देखील प्राप्त झाला आहे.

शिव खेरा हे भारतातच नाही तर परदेशातील विविध आयोजित चर्चासत्रात अधिवेशनांमध्ये बोलताना आपणास दिसुन येतात.

5) चेतन भगत :

 चेतन भगत यांना आज कोण नाही ओळखत भारतातील एक फेमस रायटर मोटिव्हेशनल स्पीकर म्हणून चेतन भगत आज ओळखले जातात.

चेतन भगत यांनी टाईम्स आँफ इंडिया आणि दैनिक भास्कर सारख्या वर्तमानपत्रात काँलम रायटिंगचे देखील काम केले आहे.

चेतन भगत यांच्या लिहिलेल्या पुस्तकांवर अनेक चित्रपट देखील निघाले आहेत.

चेतन भगत हे विविध कार्यक्रमात समारंभात मोटिव्हेशनल स्पीच देऊन युटयुबवर मोटिव्हेशनल व्हिडिओ अपलोड करून तरुण पिढीला प्रेरित करण्याचे काम आज करीत आहे.

चेतन भगत यांच्या युटयुब चँनलवर आत्तापर्यत 446K सबस्क्राईबर झालेले आहेत.

6) जग्गी वासुदेव (सदगुरू) :

 जग्गी वासुदेव यांना आपण सर्वजण सदगुरू म्हणुन ओळखतो.सदगुरू हे एक योगी आहेत.याचसोबत ते ईशा फाऊंडेशन नावाच्या एका एनजीओचे संस्थापक देखील आहेत.

सदगुरू हे आपल्या युटयुब व्हिडिओमधुन योग,शिक्षा पर्यावरणावर लक्ष केंद्रित करत असतात.

सदगुरू यांची लिहिलेली सर्व पुस्तके ही श्रदधा,धर्म,आरोग्य आणि अध्यात्मावर आधारीत असलेले आपणास दिसुन येतात.

द न्यू याँर्क टाईम बेस्ट सेलरच्या लिस्टचमध्ये त्यांचे नाव देखील आलेले आहे.

सदगुरूंच्या युटयुब चँनलवर आत्तापर्यत 8.68 मिलियन इतके सबसक्राईबर झालेले आहेत.

7) दिपक चोप्रा :

 दिपक चोप्रा हे सुदधा एक उत्तम मोटिव्हेशनल स्पीकर म्हणून ओळखले जातात.दिपक चोप्रा यांना युएसमध्ये डाँक्टर म्हणुन यश मिळाल्यानंतर लवकरच त्यांच्यात अध्यातमाविषयी रूची निर्माण झाली.

See also  टोलुना इंफ्लुएन्सर म्हणजे काय - Toluna influencers meaning in Marathi

आणि मग त्यांनी महर्षी महेश योगी यांच्याबरोबर ट्रान्सडेंशल मेडिटेशनचा सराव केला.

त्यांनी लिहिलेले अनेक पुस्तके ही आरोग्य आणि मेडिटेशनवर आधारीत आहे.

8) राँबिन शर्मा :

 राँबिन शर्मा देखील एक प्रसिदध मोटिव्हेशनल स्पीकर आहे.एक मोटिव्हेशनल स्पीकर तसेच कोच बनण्यासाठी राँबिनने सर्वप्रथम त्याची नोकरी सोडली.

जीवणात अध्यातमाकडे वळुन अध्यात्मिक प्रवासाला सुरूवात केल्यानंतर जीवणात अर्थ शोधत असलेल्या वकिलाविषयीचे पुस्तक लिहिल्याने राँबिन शर्मा हे अधिक प्रसिदध होत गेले.

त्यांनी लिहिलेल्या ह्या पुस्तकाचे द मंक हु सोल्ड असे होते.सध्या राँबिन शर्मा मोठ मोठया कंपनींसोबत मिळुन लीडरशिप आणि सेलिंग कोचचे काम करत आहे.

राँबिन शर्मा याच्या युटयुब चँनलवर आत्तापर्यत 850K एवढे सबस्क्राईबर झालेले आपणास दिसुन येतात.

9) टी एस मदान :

 टी एस मदान हे देखील एक प्रसिदध मोटिव्हेशनल स्पीकर आहेत.

टी एस मदान यांच्या युटयुब चँनलवर आत्तापर्यत 10.9 मिलियन एवढे सबस्क्राईबर झालेले आपणास दिसुन येतात.

टी एस मदान यांचा मोटिव्हेशनल स्पीकिंगमध्ये 40 पेक्षा अधिक वर्षाचा अनुभव आहे.आपल्या मोटिव्हेशनल व्हिडिओत ते नेहमी लाईफ स्टाईल,कम्युनिकेशन स्कील,काँन्फिडन्स,पाँझिटिव्ह थिंकिंग,टाईम मँनेजमेंट,लीडरशीप स्कील तसेच सेलिंग स्कील इत्यादी विषयांवर व्हिडिओ बनवून ते आज करोडो लोकांना मोटिव्हेट करण्याचे कार्य करीत आहे.

10) स्वामी ज्ञान वत्सल :

 स्वामी ज्ञान वत्सल हे सुदधा भारतातील प्रसिदध मोटिव्हेशनल स्पीकर आहेत.

स्वामी ज्ञान वत्सल एक मँकेनिकल इंजिनिअर हैते जे नंतर अध्यात्माकडे वळले आणि अध्यातमिक गुरू बनले.

आज स्वामी वत्सल हे त्यांच्या सायन्स रिसर्च टेक्नाँलाँजी आणि मोटिव्हीशनल स्पीचमधुन लाखो तसेच करोडो लोकांना प्रेरित करण्याचे काम करता आहे.

अशा पदधतीने आज आपण 2021 मधील भारतातील काही टाँप टेन मोटिव्हेशनल स्पीकरविषयी जाणुन घेतले आहे.जे आज जगभरातील कानाकोपरयातील लाखो तसेच करोडो लोकांना,तरूण तरूणींना आपल्या युटयुब चँनलद्वारे प्रेरित करण्याचे काम करता आहे.

3 thoughts on “भारतातील सर्वात प्रभावी प्रेरणादायी वक्ते कोण आहेत ?-  Top 10 motivational speakers in India”

  1. माहिती छान आहे थोडाच पण नेमक मांडल आहे….

    यांच्य सर्वाविषयी आणखी सखोल माहिती टाकावी. रिसर्च करून….

    धन्यवाद….

Comments are closed.