श्रावण महिन्याच महात्म्य -Shravan month importance

श्रावण महिन्या विषयी माहीती

मित्रांनो जेव्हा पावसाळा ह्या त्रतुचा आरंभ होतो तेव्हा सर्व स्त्रिया श्रावन महिन्याची मोठया आतुरतेने वाट पाहत असतात.

श्रावण महिन्यास सर्व सण तसेच उत्सवांचा राजा म्हणुन ओळखले जाते.श्रावन महिन्याला आपण खुप अधिक महत्व देत असतो.कारण शिवशंकरा देखील श्रावण अधिक प्रिय आहे.

श्रावण महिन्याचा आरंभ दरवर्षी पावसाळा ह्या त्रतुमध्ये होत असतो.श्रावन महिन्यात कधी पाऊस पडतो तर कधी अचानक उन देखील पडत असते.

श्रावण महिन्यात अनेक महत्वाचे सण उत्सव असतात.लोक ह्या पावन महिन्यात दानधर्म तसेच पुण्य देखील करतात.आपल्या मराठी दिर्ग्दर्शिकेनुसार 29 जुलैला श्रावण महिन्याचा आरंभ सुरू होत आहे.

अणि आँगस्ट महिन्यातील 26 तारखेला हा श्रावण समाप्त होणार आहे.

श्रावण महिन्याला सर्व सणांचा-उत्सवांचा राजा असे का म्हणतात?

मित्रांनो श्रावण हा चातुर्मासातील सगळयात श्रेष्ठ महिना म्हणून ओळखला जातो.

आषाढी अमावस्येच्या दिवशी दिव्यांची आवास करून झाल्यावर बाकीच्या व्रत वैकल्यांचा आरंभ होत असतो.निसर्गाच्या वातावरणामध्ये बदल होताना दिसुन येतो.पावसाळयास आरंभ होतो.हरित भाज्यांचा हंगाम सुरू होतो.श्रावण महिन्यातच अनेक महत्वाचे मराठी सण उत्सव येत असतात.

ह्याच श्रावण महिन्यात नवीन विवाह झालेल्या स्त्रिया आपल्या माहेरी जात असतात.श्रावण हा निर्मळतेचा पावनतेचा महिना आहे.हा शिवप्रेमी भक्तासाठी खुपच महत्वाचा महिना आहे.कारण श्रावण महिना हा शिव शंकराला अधिक प्रिय आहे.

श्रावणी सोमवार ते श्रावणी अमावस्या या कालावधीत अनेक महत्वाचे सण जसे की रक्षाबंधन,गोपाळकाला,नागपंचमी इत्यादी उत्सव व्रत उपवास ह्या महिन्यात येतात.

हेच कारण आहे की श्रावण महिन्यास सर्व सण उत्सवांचा राजा मानले जाते.

श्रावण महिन्याला एवढे महत्व का दिले जाते?

● श्रावण महिना हा शिवशंकराला अधिक प्रिय असणारा महिना आहे.जर आपण ह्या महिन्यात व्रत उपवास केले शंकराची आराधना केली आपल्या आजुबाजुचे सर्व वातावरण हे भक्तीमय मंगलमय होऊन जाते.आपल्याला आपल्या जुन्या कुकर्म पाप इत्यादी पासुन मुक्ती प्राप्त होत असते.

See also  रक्षाबंधनच्या दिवशी बहिणीला गिफ्ट देण्यासाठी 20 गिफ्ट आयडीया - Raksha Bandhan 20 Gift Ideas 2022 In Marathi

● ह्या महिन्यात जर आपण महादेवाची भक्तिभावाने पुजा अर्चा केली व्रत उपवास केले तर आपल्या सर्व ईच्छा पुर्ण होत असतात.

● श्रावण महिन्यात जे सण उत्सव आपण एकत्रितपणे साजरे करतो त्याने आपल्या आजुबाजुचे वातावरण उत्साह अणि आनंदाचे बनते.आपली आपापसामधील बांधिलकी वाढते आपले संबंध अधिक दृढ होऊ लागतात.

● श्रावण महिन्यातच देवी पार्वतीने शंकराची उपासना करून व्रत उपवास करून त्यांना आपल्या भक्तीने श्रदधेने प्रसन्न केले.अणि शिवशंकराने प्रसन्न होऊन तिच्याशी विवाह देखील केला होता.

श्रावण महीना साजरा करण्याचे प्रमुख कारण काय आहे?

असे म्हटले जाते की श्रावण महिना आला का महादेव त्यांच्या सासरी भेट देतात.आपल्या भक्तांकरीता पुथ्वीवर येत असतात.अणि हाच तो क्षण आहे जेव्हा त्यांच्या भक्तांना त्यांची आराधना भक्ती करून कृपादृष्टी प्राप्त करता येत असते.

श्रावण महिन्यातच देवी पार्वतीने शंकराची उपासना करून व्रत उपवास करून त्यांना आपल्या भक्तीने श्रदधेने प्रसन्न केले.अणि शिवशंकराने प्रसन्न होऊन तिच्याशी विवाह देखील केला होता.

म्हणजेच ह्या महिन्यात जर आपण भक्तीभावाने शंकराची आराधना केली तर आपल्या तपस्चर्येचे चांगले फळ आपणास प्राप्त होत असते.म्हणुनच शिवशंकराला प्रसन्न करण्यासाठी हा श्रावण महिना साजरा केला जात असतो.

श्रावण महिन्यात कोणकोणते महत्वाचे सण उत्सव व्रत उपवास येत असतात?

1)श्रावणी सोमवार/ शिवामुठ –

श्रावण महिन्याचा आरंभ होतो तो श्रावणी सोमवारने.श्रावणी सोमवारला शिवामुठ असे देखील म्हटले जाते.

श्रावणी सोमवारला शंकराच्या,महादेवाच्या पिंडावर शिवलिंगाच्या जागी तांदुळ,मुग,जव,इत्यादी वाहिले जाते.

हे व्रत काही महिला आयुष्यभर करतात तर काही नवीनच विवाह झालेल्या महिला हे व्रत फक्त पाच सहा वर्ष करीत असतात.

2) मंगळागौर –

मंगळागौरला श्रावणी मंगळवार असे देखील म्हटले जाते.

हा नवविवाहित महिलांसाठीचा विशेष सण उत्सव मानला जातो.यादिवशी नवविवाहित स्त्रिया आपला संसार नेहमी सुखाचा,आनंदाचा राहो याकरीता मंगळागौरचे व्रत करत असतात

See also  दुसर्यां चे व्हाट्सएप स्टेटस कसे डाऊनलोड करावे ? how to download whatsapp status of others marathi

यात पहिल्या मंगळागौरीला इतर सवाशिनींना ह्या व्रताची पुजा करण्यासाठी बोलावण्यात येते.पाच वर्ष हे व्रत करावे लागत असते.

ह्या व्रताचे कालावधीत मंगळागौरी पुजन,एकमेकांची तांदळाने नारळाने ओटी भरणे,रात्रभर जागरण करणे यात झिम्मा फुगडी,उखाणे म्हणने हे सर्व काही चालत असते.याने स्त्रीला सासर अणि माहेर दोघा ठिकाणचे प्रेम प्राप्त होत असते.

3) नागपंचमी :

नागपंचमीच्या दिवशी जिथेही वारूळ असेल तिथे जाऊन महिलांकडून नागाची पुजा केली जाते.त्याला वाटीत दुध पाजले जाते.

नागपंचमीच्या दिवशी शेतकरी सुदधा नागाची पुजा करत असतात.कारण नागच हा शेतात बिळात लपलेल्या उंदरांना खातो अणि शेतकरीचे नुकसान होण्यापासुन वाचवतो.या दिवशी सापाला मारले जात नाही.

4) रक्षाबंधन –

रक्षाबंधन हा बहिण अणि भावाच्या पवित्र नात्याचा दिवस आहे.ज्याला नारळी पौर्णिमा असे देखील म्हटले जाते.

कारण रक्षाबंधन अणि नारळी पौर्णिमा हे दोघे सण एकाच दिवशी येतात.

रक्षाबंधनाच्या दिवशी बहिण भावाला ओवाळते त्याच्या हातात राखी बांधते अणि त्याबदले भाऊ बहिणीला तिचे सदैव रक्षण करण्याचे मनात वचन देतो.ओवाळणे झाले की बहिणीला एखादी भेटवस्तु देखील देतो.

नारळी पौर्णिमेच्या दिवशी कोळी लोक समुद्रास नारळ अपर्ण करतात अणि नवीन हंगामा करीता नाव पुन्हा समुद्रात सोडतात.अणि आपला व्यवसाय म्हणजेच मासेमारीस आरंभ करतात.

5) कृष्ण जन्माष्टमी/गोपाळकाला –

हा कृष्ण जन्माचा दिवस आहे.ज्याला श्रीकृष्ण जयंती असे म्हटले जाते.अणि याच्याच दुसरया दिवशी गोपाळकाला देखील असतो.या दिवशी दहीहंडी फोडली जाते.

6) पोळा/पिठोरी अमावस्या –

पिठोरी अमावस्या म्हणजेच पोळयाच्या दिवशी श्रावण महिना संपतो.

या दिवशी शेतकरींचा मित्र बैलाची पुजा केली जाते.त्याला पुरण पोळीचा नैवेद्य खाऊ घालण्यात येतो.

श्रावण महिन्यात कशाचे सेवण करू नये?

श्रावण महिना हा व्रत उपवासाचा पवित्र काळ असल्याने श्रावण महिन्यात आपण मांस मच्छी खाऊ नये.शाकाहारी आहाराचे म्हणजे हिरव्या भाजीपालाचे अधिक सेवण करावे.

Leave a Comment