ASEAN गट म्हणजे काय? – ASEAN

ASEAN गट म्हणजे काय?

नुकतीच एशियन अणि भारताच्या आर्थिक मंत्र्यांची बैठक इंडोनेशिया ह्या देशात आयोजित करण्यात आली आहे.

आजच्या लेखात आपण एशियन गट म्हणजे काय हे थोडक्यात जाणुन घेणार आहोत.

ASEAN चा फुलफाॅम काय होतो?

आसियनचा फुलफाॅम association of southeast Asian nations असा होतो.

ASEAN म्हणजे काय?

ASEAN गट म्हणजे काय? - ASEAN
ASEAN गट म्हणजे काय? – ASEAN
  • आसियन ही दक्षिणपूर्व आशियाई देशांची एक संघटना आहे.दक्षिण पुर्व एशिया हा एकुण दहा देशांचा समुह आहे.
  • आर्थिक वाढ आणि समृद्धीला चालना देण्यासाठी आणि प्रदेशात शांतता आणि स्थिरता राखण्यासाठी हे सर्व देश एकत्र काम करतात.
  • आसियनची स्थापणा ८ आॅगस्ट १९६७ रोजी थायलंड ह्या देशाची राजधानी बॅकाक मध्ये करण्यात आली होती.
  • आसियनचे संस्थापक एकुण पाच देश आहेत.ज्यात इंडोनेशिया,मलेशिया,फिलीपिन्स,सिंगापुर,थायलंड ह्या पाच देशांचा समावेश होतो.
  • आसियनचे सध्याचे अध्यक्षपद इंडोनेशिया ह्या देशाकडे सोपविण्यात आले आहे.
  • आसियनचे मुख्यालय इंडोनेशियाची राजधानी असलेल्या जकार्ता येथे आहे.आसीयनचे महासचिव काओ किम हाॅन हे आहेत.
  • आसियन ह्या संघटनेचे सभासदत्व एकुण १० देशांकडे आहेत.१९७६ मध्ये झालेल्या आसियनच्या पहिल्या बैठकीमध्ये मैत्री आणि सहकार्य करारावर स्वाक्षरी करण्यात आली होती.
  • आसियनचे ब्रीद वाक्य एक दृष्टी एक ओळख अणि एक समाज हे आहे.

आसियनचे प्रमुख उद्दिष्ट काय आहे?

प्रादेशिक स्तरावर आर्थिक,सामाजिक,सांस्कृतिक विकास आणि प्रादेशिक शांतता आणि स्थैर्याला प्रोत्साहन देणे हे आसियनचे प्रमुख उद्दिष्ट आहे.

आसियनचे सभासद राष्ट्र कोणकोणते आहेत?

आसियनचे सभासद राष्ट्र थायलंड,मलेशिया,सिंगापुर, इंडोनेशिया, फिलिपाईन्स,इंडोनेशिया,ब्रुनेई, व्हिएतनाम,लाओस, कंबोडिया,म्यामनार हे आसियनचे सभासद राष्ट्र आहेत.

See also  31 मार्च 2023 पुर्वी तुमचे आधार कार्ड पॅन कार्ड सोबत लिंक करा नाहीतर होईल खुप मोठे नुकसान - Pan card aadhar card link alert in Marathi