31 मार्च 2023 पुर्वी तुमचे आधार कार्ड पॅन कार्ड सोबत लिंक करा नाहीतर होईल खुप मोठे नुकसान – Pan card aadhar card link alert in Marathi

31 मार्च 2023 पुर्वी तुमचे आधार कार्ड पॅन कार्ड सोबत लिंक करा नाहीतर होईल खुप मोठे नुकसान pan card aadhar card link alert in Marathi

भारत सरकारच्या वतीने तसेच केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाकडुन आर्थिक व्यवहार सुरळीत व्हावा कर चुकवेगिरीला आळा बसवता यावा यासाठी नेहमी नागरीकांना आपले पॅन कार्ड आधार कार्ड सोबत लिंक करण्यासाठी आवाहन केले जात असते.पण नागरीकांकडून‌ याकडे नेहमी दुर्लक्ष केले जाते.

म्हणुन आता शासनाने एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे.आता ज्या व्यक्तींचे पॅन कार्ड हे आपल्या आधार कार्ड सोबत 31 मार्च 2023 पुर्वी लिंक केलेले नसेल अशा व्यक्तींना खुप मोठे नुकसान सहन करावे लागणार आहे.

आधार कार्ड पॅन कार्ड सोबत लिंक नाही केले तर काय होईल?

Pan card aadhar card link alert in Marathi

आता जे व्यक्ती 31 मार्च 2023 पुर्वी आपले आधार कार्ड पॅन कार्ड सोबत लिंक करणार नाही त्यांचे पॅन कार्ड हे निष्क्रिय केले जाणार आहे म्हणजे आपण आपल्या पॅन कार्डचा वापर कुठल्याही आर्थिक व्यवहारामध्ये करू शकणार नाही.

म्हणजेच आपणास आयकर परतावा करता येणार नाही तसेच आपण रिफंड जारी करण्यास देखील असक्षम असणार आहे.

सेबीकडुन देखील गुंतवणूकदारांना सुचित करण्यात आले आहे की जर गुंतवणूक दाराने आपले पॅन कार्ड हे आधार कार्ड सोबत लवकरात लवकर ३१ मार्च २०२३ अगोदर लिंक नाही केले तर गुंतवणूक दारांना नॅशनल स्टॉक एक्सचेंज बाॅम्बे स्टाॅक एक्सचेंज अशा बाजारपेठेत कोणतीही गुंतवणूक गुंतवणूकीचे व्यवहार करता येणार नाही.

महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनात तीन लाख रुपयांची वाढ

आपण आपले आधार कार्ड पॅन कार्ड सोबत लिंक करणे अनिवार्य का करण्यात आले आहे?

प्राप्तीकर विभागाकडून असे सांगितले गेले आहे की आपणास जर आपल्या पॅन कार्डच्या डुप्लीकेशनला आळा बसवायचा असेल तर आपणास कुठल्याही परिस्थितीत पॅन कार्ड हे आधार कार्ड सोबत लिंक करणे अनिवार्य आहे.

कारण पॅन कार्ड आधार कार्ड सोबत लिंक केल्यावर शासनास टॅक्स भरणारया व्यक्तींची ओळख पटते अणि कर चुकवण्यासारखे चुकीचे प्रकार अजिबात घडुन येत नाही.

आपणा सर्वांनाच पॅन कार्ड आधार कार्ड सोबत लिंक करणे अनिवार्य आहे का?

नाही कारण जरी पॅन कार्ड आधार कार्ड सोबत लिंक करणे जरी संपूर्ण नागरीकांना बंधनकारक केले गेले असले तरी काही ठाराविक वयाच्या ज्येष्ठ नागरिक वर्गाला यात सुट देण्यात आली आहे.

ज्यांचे वय ८० पेक्षा जास्त आहे अशा ज्येष्ठ नागरीकांना आपले पॅन कार्ड आधार कार्ड सोबत लिंक करणे अनिवार्य नसणार आहे.तसेच जे परदेशातील नागरीक भारत देशात वास्तव्य करीत आहे त्यांना देखील पॅन कार्ड आधार कार्ड सोबत लिंक करणे अनिवार्य नसणार आहे.

३१ मार्च २०२३ पुर्वी पॅन कार्ड आधार कार्ड सोबत लिंक करायला काही दंड भरावा लागेल का?

होय जे नागरीक ३१ मार्च २०२३ पुर्वी आपले आधार कार्ड पॅन कार्ड सोबत लिंक करतील त्यांना हजार रुपये दंड भरावा लागणार आहे.

कारण याआधी पॅन कार्ड आधार कार्ड सोबत लिंक करायची शेवटची तारीख ३१ मार्च २०२२ होती यानंतर हजार रुपये दंड आकारला जाणार होता.म्हणून दंड म्हणून आपणास आता हजार रुपये भरावे लागणार आहे.

आपले आधार कार्ड पॅन कार्ड सोबत लिंक आहे का नाही हे कसे चेक करायचे?

  • सर्वप्रथम आपणास incometax.gov.in ह्या वेबसाईटवर जायचे आहे.
  • incometax.gov.in ह्या वेबसाईटवर  गेल्यावर आपणास स्क्रोल करून खाली यायचे आहे खाली आपणास quick link मध्ये link aadhar status वर क्लिक करायचे आहे.
  • यानंतर आपल्या समोर एक पेज ओपन होईल जिथे आपणास आपला पॅन कार्ड नंबर अणि आधार कार्ड नंबर टाकायचा आहे.अणि खाली दिलेल्या view link aadhar status वर ओके करायचे आहे.
  • यानंतर आपणास सांगितले जाईल की आपले पॅन कार्ड आपल्या आधार कार्ड सोबत लिंक आहे किंवा नाही.