FD आणि RD मध्ये काय फरक आहे? – Difference in recurring deposit and fixed deposit

FD आणि RD म्हणजे काय ? Difference in recurring deposit and fixed deposit

जेव्हा गुंतवणुकीचा तसेच पैशांची बचत करण्याचा विषय आपल्या मनात येत असतो तेव्हा आपल्यासमोर सगळयात पहिले हे दोन पर्याय येत असतात.

पहिला पर्याय म्हणजे Fd आणि दुसरा पर्याय म्हणजे Rd.पण गुंतवणुकीसाठी या दोघांपैकी आपण कशाची निवड करावी?आपल्यासाठी कोणता पर्याय सर्वात उत्तम राहील?हा देखील एक महत्वाचा प्रश्न आपल्यासमोर असतो.

कारण Fd म्हणजे काय?आणि Rd म्हणजे काय हे आपल्यातील बहुतेक जणांना व्यवस्थित माहीत नसते.

आणि जो पर्यत आपल्याला या दोघांमधील मुख्य अंतर कळत नसते.तोपर्यत आपण आपल्या पैशांची गुंतवणुक कुठे करावी?हा एक मोठा संभ्रम आपल्या सर्वाच्यांच मनामध्ये असतो.

म्हणुन आजच्या लेखात आपण Fd म्हणजे काय?Rd म्हणजे काय? या दोघांमध्ये काय फरक आहे? हे सविस्तरपणे जाणुन घेणार आहोत.

Fd चा Full Form काय होतो?(Full Form Of Fd In Marathi)

एफडीचा फुलफाँर्म Fix Deposit (निश्चित जमा ठेव)
असा होत असतो.

Fd म्हणजे काय?

Fd म्हणजे Fix Deposit.फिक्स म्हणजे निश्चित आणि डिपाँझिट म्हणजे जमा म्हणजेच एक अशी रक्कम जी एका निश्चित कालावधीसाठी ठाराविक आणि निश्चित व्याजदरावर आपण बँकेत जमा करत असतो.त्याला Fd(Fix Deposit) असे म्हणतात.

एफ डी मध्ये आपण एका निश्चित कालावधीसाठी बँकेत पैसे जमा करत असतो.ज्यावर आपल्याला एक फिक्स व्याज दर देखील प्राप्त होत असते.

यात आपण अशी रक्कम गुंतवणुकीच्या स्वरूपात एका निश्चित कालावधीसाठी १,२ किंवा ३ वर्षासाठी(आपल्या आवश्यकतेनुसार)बँकेत जमा करत असतो ज्यांची सध्या आपल्याला कुठलीही गरज नाहीये.

यात जर आपण दोन वर्षाची एफ डी केली आहे तर आपण दोन वर्ष ती एफडी काढु शकत नसतो.आणि मग दोन वर्षानंतर ती रक्कम त्यावर ५ ६ किंवा ८ टक्के इतके प्रत्येक बँकेत आपापल्या प्रमाणे एक फिक्स व्याजदर लावून ती रक्कम आपल्याला दिली जात असते.

म्हणजे समजा एखाद्या व्यक्तीने ८ टक्के व्याजाप्रमाणे ५० हजार एफडीमध्ये जमा केले असतील तर त्याला एक वर्षाने एक लाख किंवा दोन वर्षानंतर दोन लाख इतकी रक्कम हातात पडत असते.

Fd Account कसे Open केले जाते?

Fd Account Open करण्यासाठी आपल्याला पुढील Process Follow करावी लागेल –

● सर्व प्रथम आपल्याला आपले सर्व Important Documents सोबत घेऊन बँकेत जावे लागेल आणि बँकेकडुन फिक्स डिपाँझिटविषयी सर्व माहीती प्राप्त करून घ्यावी लागेल.Fd Account कसे Open केले जाते

See also  ज्वारीच्या आहाराचे 15 फायदे -Health Benefits of Jowar in marathi

● मग बँकेकडून आपणास फाँर्म दिला जो आपण एकदा नीट वाचुन व्यवस्थित कुठलीही खाडाखोड न करता भरायचा असतो.

● मग त्या फाँर्मला आवश्यक ते महत्वाचे Documents जोडुन तो फाँर्म आणि त्यासोबत आपले Deposit Amount बँकेत जमा करायचे असते.

याचसोबत आपण आँनलाईन एटीएम तसेच मोबाईल बँकिंगचा वापर करून देखील एफडी अकाऊंट ओपन करू शकतो.आणि डिपाँझिटची रक्कम देखील इंटरनेट बँकिंगचा वापर करून जमा करू शकतो.

आपण Fd का करायला हवी?Fd करण्याचे फायदे कोणकोणते असतात?

Fd करण्याचे पुढीलप्रमाणे काही महत्वपुर्ण फायदे आपणास होत असतात –

● ठरलेल्या एका निश्चित कालावधीनंतर आपण जमा केलेल्या पुर्ण रक्कमेवर एक निश्चित व्याज लावून बँक आपल्याला एक फिक्स रक्कम यात आपल्या हातात देत असते.

● तसे पाहायला गेले तर एफडी मधील गुंतवलेले पैसे आपल्याला एका ठाराविक निश्चित कालावधीपर्यत बँकेतुन काढता येत नसतात.

पण समजा आपल्याला जर भविष्यात अचानक पैशांची गरज पडली किंवा अचानक काही आर्थिक अडचण आली तर अशा वेळेला आपण आपात्कालीन परिस्थितीत आपली एफडी मोडुन तेच पैसे अडीअडचणीसाठी वापरू शकतो.याचसाठी आपण एफडी काढायलाच हवी.

● आणि सगळयात महत्वाची बाब म्हणजे बचत खात्यात आपण जे पैसे जमा करतो त्यावर आपल्याला खुप कमी व्याजदर मिळत असते.पण एफ डी मध्ये पैसे जमा केल्यावर आपल्याला एक चांगले व्याजदर देखील मिळत असते.

● यात आपले पैसे एका फिक्स टाईम पिरीअडसाठी लाँक होऊन जात असतात.जे आपण भविष्यात अडीअडचणीत वापरू शकतो.

● Fd मध्ये जमा केलेली आपली रक्कम एकदम Safe आणि Secure राहत असतात.

● Fd चा Time Period संपल्यानंतर आपण आपली Fdअजुन जास्त कालावधीसाठी Renew करून अधिक व्याज प्राप्त करू शकतो.

Fd काढण्यासाठी कोणकोणते Important Documents आपणास लागत असतात?

Fd Account Open करण्यासाठी आपल्याला खालील दिलेले काही Important Documents ची आवश्यकता असते-

● Address Proof

● Aadhar Card

● Pan Card

● Pass Port Size Photo

● बँकेकडून दिला जाणारा एफडी फाँर्म

● एफडीसाठी कँश अमाऊंट

Fd कशी मोडली जात असते?

आपात्कालीन परिस्थितीत आपण आपली एफडी
दोन प्रकारे मोडु शकतो-

1) Offline :

2)Online :

1)Offline –

आपल्याला जर आपले एफडी अकाऊंट बंद करायचे असेल तर आपण बँकेत जाऊन बँक मँनेजरशी बोलून आपले अकाऊंट बंद करू शकतो.

यासाठी आपल्याला बँक मँनेजरला आपले एफडी अकाऊंट बंद करण्यासाठी एक अँप्लीकेशन द्यावा लागत असते.

आणि आपण आपले एफडी अकाऊंट का बंद करतो आहे? त्याचे एक कारण देखील द्यावे लागत असते.

मग बँकेकडुन सर्व प्रोसेस पार पडत असते.आणि सर्व प्रोसेस पुर्ण झाल्यावर आपल्या बँक अकाऊंटमध्ये एफडीची सर्व रक्कम 24 तासाच्या आत जमा केली जात असते.

2)Online :

इंटरनेट बँकिंगचा वापर करून देखील आपण आँनलाईन पदधतीने आपले एफडी अकाऊंट क्लोज करू शकतो.

See also  इकोसिस्टम म्हणजे काय? What is an Ecosystem Marathi

यासाठी आपल्याला पुढील Process Follow करावी लागत असते-

● सर्वप्रथम बँकेच्या आँनलाईन पोर्टलवर जाऊन आपल्याला लाँग इन करावे लागेल.

● बँकेच्या पोर्टलवर लाँग इन करून झाल्यावर आपल्याला एक Home Page दिसुन येईल.होम पेज वर जाऊन आपण Fix Deposit ह्या Option वर क्लिक करायचे असते.

● मग यांतर आपल्याला Service Request Section मध्ये जाऊन Premature Option वर क्लिक करायचे असते.

● यानंतर Next Option वर ओके करायचे असते.

● यानंतर आपले Fd Account Select करून Next Option वर ओके करायचे असते.

यानंतर आपली एफडी अकाऊंट क्लोज करण्याची Request बँकेकडे Send होऊन जात असते.

आपणास Fix Deposit वर काही Monthly Interest प्राप्त होत असतो का?

जर आपण प्रत्येक वेळेला वेळोवेळी पैसे भरणे,मासिक वारंवारीतेची निवड केल्यास आपण Monthly Interest प्राप्त करू शकतो.

एफ डी मध्ये एक रक्कमी पैशांची बचत केली जात असते.यात आपण दर महिन्याला/तीन महिन्यांनी/सहा महिन्यांनी/वर्षभरानंतर एफडीची मुदत संपल्यावर व्याज प्राप्त करता येत असते.

यात आपल्याला आपल्या गरजेप्रमाणे Interest प्राप्त करण्याचे Option निवडता येत असते.

यात असे व्यक्ती जे वयस्कर आहे आणि त्यांना दर महिन्याला पैशांची आवश्यकता असते.ते Monthly Interest चे Option Select करू शकतात.

आणि जे व्यक्ती तरूण आहेत ते मुदत संपल्यानंतर मुददल आणि व्याज प्राप्त करण्याचे Option Select करू शकतात.

Rd चा Full Form काय होतो?(Full Form Of Rd In Marathi)

आरडीचा फुलफाँर्म Recurring Deposit (आवर्ती ठेव)
असा होत असतो.

Rd म्हणजे काय?

जर आपल्याला प्रत्येक महिन्यामध्ये एक निश्चित रक्कम जमा करायची असेल तर त्यासाठी आरडी ही एक Mature Scheme आहे.

जेव्हा आरडीचा कालावधी संपत असतो तेव्हा आपल्याला आपली जमा केलेली सर्व रक्कम Interest सोबत दिली जात असते.

समजा आपण पाच वर्षाषाठी एफडीचे खाते ओपन केले असेल आणि दर महिन्याला हजार रूपये जमा करतो आहे.

आणि ह्या सर्व बचतीवर आपणास 5 टक्के व्याज लावण्यात येते आहे.तर मुदत संपुष्टात आल्यानंतर आपणास 68,006 रूपये प्राप्त होत असतात.

आरडीचा Interest Rate Saving Account च्या Interest Rates पेक्षा अधिक असतो.आरडीचा Interest Rates 6 ते 9 टक्के इतका असतो.

आरडीच्या Interest Rates मध्ये कालावधीनुसार बदल घडुन येत असतो.म्हणुन आपण आरडी प्राप्त झाल्यानंतर आरडीमध्ये आपल्याला किती Interest Rate दिला जातो आहे.याची एकदा तपासणी करून घ्यायला हवी.

आरडी अकाऊंटचा Minimum Time Period 6 Month असतो तर Maximum Time Period 10 Year इतका असतो.आणि प्रत्येक बँकेत आरडी अकाऊंट ओपन करण्याची रक्कम अलग अलग असते(एका बँकेत 500,दुसरया बँकेत 100,आणि तिसरया बँकेत 10 असा फरक प्रत्येक बँकेत असतो)

Fd आणि Rd मध्ये काय फरक आहे?

● आरडीमध्ये आपण एका निश्चित Time Period नंतर गुंतवणुक करत असतो तर एफडीमध्ये आपण एकाच वेळी गुंतवणुक करू शकतो.(एफडी मध्ये आपणास फक्त एकाच वेळेस पैसे द्यावे लागतात पण आरडी मध्ये ठाराविक कालावधीनंतर आपणास पैसे द्यावे लागत असतात आणि आपण जर ते वेळेवर नही दिले तर आपले आरडीचे खाते बंद देखील केले जाऊ शकते)

See also  स्वप्रे आणि त्यामागचे अर्थ अणि संकेत - Dreams and their meanings in Marathi

● आरडी अशा लोकांसाठी अधिक चांगली असते जे मासिक किंवा कोणत्याही निश्चित कालावधीत एक किमान रक्कम गुंतवू इच्छित असतात.

आणि एफडी अशा लोकांसाठी चांगली असते जे आपल्या पैशांची एकरकमी बचत करू इच्छित आहेत.जे आपले पैसे एका फिक्स टाईम पिरीअडसाठी लाँक करू इच्छित असतात.

● Fix Deposit चा किमान कालावधी 7 दिवस इतका असतो.आणि Recurring Deposit चा किमान कालावधी हा सहा महिने इतका असतो.

● Fix Deposit चा Maximum Time Period 10 वर्ष इतका असतो.आणि Recurring Deposit चा Maximum Time Period देखील 10 वर्ष इतकाच असतो.

● एफ डी आणि आरडी हे दोघे योजनांमधून मिळणारया व्याजावर कर आकारले जात असते.आरडीच्या बाबतीत टीडीएस भरणे बंधनकारक नसते.पण त्या व्यक्तीने आयटीआर भरत असताना मिळालेल्या व्याजाचा उल्लेख करणे गरजेचे असते.

● फिक्स डिपाँझिटमध्ये मिळत असलेल्या व्याजाची रक्कम जर 10 हजार पेक्षा जास्त असेल तर अकाऊंट होल्डरला टीडीएस भरावा लागत असतो.1 एप्रिल 2019 पासुन ही रक्कम मर्यादा 40 हजार पर्यत सुधारीत केली गेली आहे.पँन सबमिट केल्यास आपणास 10 टक्के टीडीएस लागतो आणि पँन सबमीट न केल्यास आपणास 20 टक्के देणे असतो.

● जेव्हा आपण एफडी आणि आरडी मधील Returns ची तुलना करायला जातो.तेव्हा आपणास असे दिसुन येईल की एफ डी हे आरडी पेक्षा अधिक Returns प्राप्त करून देते.याला देखील एक कारण आहे कारण आरडीमध्ये अकाऊंट होल्डर मासिक रक्कम जमा करत असतो.त्यामुळे त्यानुसारच त्याला व्याज प्राप्त होत असते.

पण एफडीची रक्कम ही एकदाच जमा केली जात असते.आणि ती एकरक्कमी असल्याने त्यावर जास्त व्याजदर प्राप्त होत असते.

● एफ डी मध्ये आपण पैशाची अकस्मातपणे अचानक गरज पडल्यास आपणास आपल्या खात्यातील रक्कमेतुन 90 टक्के रक्कम काढता येत असते.आरडी मध्ये देखील आपणास ही सुविधा उपलब्ध करून दिली आहे.

● कंपाउंडिंग इंटरेस्ट साधारणत प्रत्येक तिमाहीत आरडी योजनेत येत असतो.पण एफडीमध्ये प्रत्येक वर्षी जे व्याज जमा होत असते त्या व्याजावर कंपाऊंडिंग इंटरेस्ट मोजला जात असतो.

● सर्व भारतीय निवासी आरडी खाते आणि एफ डी खाते ओपन करण्यासाठी पात्र ठरत असतात.आणि आरडी मध्ये आपल्या लहान मुलांसाठी देखील हे खाते त्यांचे पालक ओपन करू शकतात.

● आरडीमध्ये आपल्याला Tax Benefit दिला जात नसतो.पण एफडी मध्ये Tax Benefit अँक्ट 800 C अंतर्गत Income Tax Law 1961 लागु करण्यात आलेला आहे.(हा कायदा पाच वर्षापेक्षा अधिक कालावधीसाठी लागु करण्यात आलेला आहे.)

● आरडीच्या काही प्रकरणात मुदत संपण्याच्या आधी पैसे काढल्यास कुठलेही दंड न आकारता पैसे दिले जात असतात पण काही बँक दंड आकारणी देखील करत असतात.

एफडीमध्ये आपणास दंड भरून पैसे काढावे लागत असतात.

Fd अधिक चांगले आहे की Rd?

आपल्याला उत्तम सेवा देणारी योजना कोणती आहे हे पूर्णपणे आपल्या गरजेवर अवलंबुन असते.फिक्स डिपाँझिट मध्ये प्राप्त होत असलेले व्याज जास्त असते.

आणि आरडी हे अधिक लवचिक असते.कारण ते आपणास Small Amount मध्ये टप्याटप्यात Money Deposit करू देत असते.म्हणुन आपण दोघांमधील कुठल्याही एकाची निवड खुप हुशारीने करायला हवी.