धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज यांच्याविषयी संपुर्ण माहीती– Chhatrapati Sambhaji Maharaj Information In Marathi

Table of Contents

धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज साहस कथा –Chhatrapati Sambhaji Maharaj Information In Marathi

सर्वप्रथम स्वराज्याचे दुसरे छत्रपती धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज यांना मानाचा मुजरा.
छत्रपती शंभूराजांनी आपले 33 वर्षाचे जीवन आपल्या वडिलांनी स्थापन केलेल्या स्वराज्याच्या रक्षणासाठी खर्च केले.शंभू राजांना कमी वयापासूनच राजकीय आणि कौटुंबिक अडीअडचणी तसेच समस्यांचा सामना करावा लागला होता.
आपण या लेखामध्ये अशा ह्या थोर व्यक्तिमत्वाबद्दल म्हणजे धर्मवीर छत्रपती श्री संभाजी राजांबद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत

  • छत्रपती संभाजी महाराज यांचा जन्म कधी आणि कुठे झाला ?

छत्रपती संभाजी महाराज यांचा जन्म 14 मे 1657 साली पुरंदर ह्या किल्ल्यावर झाला.

  • छत्रपती संभाजी महाराज यांची कोणकोणत्या भाषेवर चांगली पकड होती?

छत्रपती शंभू राजांना संस्कृत आणि अन्य 8 (मराठी,फारसी,उर्दु,अरबी,इंग्रजी अशा एकुण ९ भाषा माहीत होत्या.

  • धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या आईचे नाव काय होते?

छत्रपती संभाजी महाराज यांच्या आईंचे नाव सईबाई असे होते.सईबाई ह्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पहिल्या पत्नी होत्या.
धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या वडिलांचे नाव काय होते?

  • धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज हे स्वराज्याचे संस्थापक छत्रपती श्री शिवाजी महाराज यांचे पुत्र होते.

छत्रपती संभाजी महाराज यांच्या भावाचे नाव काय होते?
धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांना एक भाऊ देखील होते त्यांचे नाव राजाराम महाराज असे होते.
राजाराम हे महाराज छत्रपती शिवाजी महाराज यांच्या दुसऱ्या पत्नीचे म्हणजे सोयराबाईंचे पुत्र होते.

  • छत्रपती संभाजी महाराज यांना एकुण किती बहिणी होत्या?

शंभू राजे यांना एकुण 6 बहिणी होत्या.
छत्रपती संभाजी महाराज यांचा विवाह कधी आणि कोणाशी झाला होता?
छत्रपती शिवाजी महाराज यांना मराठा साम्राज्यामध्ये वाढ करण्यासाठी अधिकाधिक गड आणि किल्ले हवे होते.
आणि यातील गड प्रचितगड जिंकायला महाराजांना पिलाजीराव शिर्के यांनी मदत केली होती.ज्यामुळे एक तह केला गेला की शिवाजी महाराज यांनी त्यांच्या मुलाचा विवाह पिलाजीराव यांच्या मुलीशी करावा.
त्याच तहानुसार शिवाजी महाराज यांनी संभाजी राजे यांचा विवाह पिलाजीराव शिर्के यांची कन्या जीवाबाईशी लावून दिला.

  • आणि मग लग्नानंतर मराठी रीती परंपरेनुसार जीवाबाई हिचे नाव बदलून येसुबाई असे ठेवण्यात आले होते.

छत्रपती संभाजी महाराज यांच्या मुलाचे नाव काय होते?
धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा विवाह महाराणी येसूबाई यांच्याशी शिवाजी महाराज आणि पिलाजीराव शिर्के यांच्यातील एका तहानुसार झाला होता आणि त्यांना अपत्य देखील होते.ज्याचे नाव शाहू असे होते.

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचे बालपण-

  • छत्रपती संभाजी महाराज दोन वर्षाचे असताना त्यांच्या आईंचा सईबाईंचा मृत्यू झाला.त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांनी शंभू बाळाला आईची कमतरता भासु नये यासाठी त्यांच्यासाठी धाराऊ नावाच्या दुधाऊ ठेवल्या.
  • शंभू राज्यांचे बालपण खूप अडचणीत गेले.वयाच्या दुसऱ्या वर्षी स्वतःची आई त्यांना सोडून देवा घरी गेली.
  • लहानपणी बाळ शंभू राज्यांना आऊसाहेब राजमाता जिजाबाई महाभारत आणि रामायणाच्या कथा सांगायच्या.
  • छत्रपती शिवाजी महाराज यांच्या दुसरया पत्नी सोयराबाईंना राजाराम महाराज झाल्यानंतर त्यांना धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा राग येऊ लागला.
  • त्यांना असे वाटायचे की,जोपर्यंत शंभु महाराज आहेत तोपर्यंत आपल्या मुलाला म्हणजे राजाराम महाराजांना योग्य ते स्थान मिळणार नाही.कारण सोयराबाईंना आपल्या मुलाला राजाराम ह्याला छत्रपती शिवाजी महाराजांनंतर गादीवर बसवण्याची इच्छा होती.

छत्रपती संभाजी महाराज कोणकोणत्या विद्येत पारंगत होते?

  • धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज हे शस्त्रात आणि शास्त्रात दोन्ही विद्येत पारंगत होते.
  • धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज आणि कवी कलश यांची मैत्री कशी आणि कुठे झाली?
  • मित्र जोडावे तर छञपती शिवाजी महाराजां सारखे आणि मैत्री निभवावी ती छत्रपती संभाजी महाराज आणि कवी कलशांसारखी.
  • लहानपणी जेव्हा शंभू राजे छत्रपती शिवाजी महाराजांसोबत आग्रा येथे औरंगजेबाच्या वाढदिवसाला गेले होते आणि तेव्हा त्यांना औरंगजेबाकडून अटक करण्यात आली होती.
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या गनिमी कावामुळे शिवाजी महाराज आणि शंभू राजे आग्रा येथील कैदेतुन सुटका होऊन सुखरूप बाहेर पडले. आग्रा येथुन सुटका होऊन बाहेर पडल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी काही दिवस शम्भू राजांना मथुरेतील ब्राम्हणाच्या घरी ठेवले होते आणि स्वराज्यात शंभु राज्यांचा अंतिम संस्कार देखील करण्यात आला होता.
  • शंभू राजे यांनी मथुरेतच शास्त्र शिकले आणि बुधभूषण हा ग्रंथ संस्कृत भाषेत लिहिला.छत्रपती शंभू राजे जवळजळ एक ते दीड वर्ष मथुरेत होते आणि त्यांची कवी कलशांबरोबर भेट देखील तिथेच झाली.
  • छत्रपती संभाजी महाराज आणि कवी कलशांनी आपली मैत्री शेवटच्या श्वासापर्यंत निभावली.
See also  विवाह नोंदणी प्रमाणपत्र का आवश्यक आहे ? Marriage Certificate online Procedure

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या द्वारे लिहिलेले ग्रंथ कोणकोणते आहेत?(Books Written By Chhatrapati Sambhaji Maharaj)

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या द्वारे लिहिलेले ग्रंथ पुढीलप्रमाणे आहेत-
● कवी कलशांच्या मैत्रीनंतर छत्रपती शंभु राजांचे साहित्यावरचे प्रेम वाढू लागले.याचदरम्यान छत्रपती शंभू राज्यांनी काही संस्कृत ग्रंथ देखील लिहिले.ज्यात अवघ्या वयाच्या चौदाव्या वर्षी संभाजी महाराज यांनी बुदध भुषण हा ग्रंथ देखील लिहिला होता.
म्हणजेच संभाजी महाराज यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर संस्कृत भाषेमध्ये बुदध चरित्र देखील लिहिले होते.यावरून आपणास दिसुन येते की संभाजी महाराज संस्कृत भाषेत किती विदवान आणि पारंगत होते.

Books Written By Chhatrapati Sambhaji Maharaj ● याचसोबत छत्रपती संभाजी महाराज यांनी मध्ययुगीन संस्कृतचा वापर करून शृंगारिका लिहिल्या.तसेच संभाजी महाराज यांनी नखशिख,नायिकाभेद,सातसतक इत्यादी ग्रंथांचे देखील लेखन केले.
नखशिखा हा ग्रंथ संभाजी महाराज यांनी त्यांच्या पत्नी यांच्या प्रेरणेतुन लिहिला होता.

छत्रपती संभाजी महाराज यांना लोकांनी कोणती पदवी दिली होती?

  • छत्रपती संभाजी महाराज यांना लोकांनी छत्रपती आणि छावा ह्या दोन पदव्या दिल्या होत्या.
  • छत्रपती शिवाजी महाराज यांच्या निधनानंतर स्वराज्यावर कोणकोणते संकट आले?
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर मुघलांना वाटले की आता आपण सहज सह्याद्री जिंकू परंतु छत्रपती संभाजी महाराजांनी असे होऊ नाही दिले आणि मुघलांना स्वराज्यात जास्त काळ टिकू नाही दिले.
  • 1680 मध्ये औरंगजेब 4 लाख जनावर आणि 50 लाख सेना घेऊन दक्षिणेत आला.
  • औरंगजेबाने कुतुबशाही आणि आदिलशाही जिंकली.नंतर औरंगजेबाने स्वराज्य जिंकण्याचा प्रयत्न केला परंतु त्याला स्वराज्य जिंकण्यामध्ये यश आले नाही.

शंभू राजे स्वराज्याचे दुसरे छत्रपती झाल्यानंतर काय घडले?

  • छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मृत्यूनंतर राजाराम महाराज यांचे मंचकारोहण झाले.
  • छत्रपती शिवाजी महाराज यांच्या निधनाची बातमी मुद्दाम छत्रपती संभाजी राजेंना कळवण्यात आली नव्हती.
  • तेव्हा छत्रपती संभाजी राजे पन्हाळा किल्ल्यावर होते.रायगडावर अण्णाजी दत्तो यांच्या कारस्थानामुळे सोयराबाई यांनी शंभु राजे यांना कैद करण्याचे आदेश दिले,याच आदेशानुसार अण्णाजी दत्तो आणि त्यांचे साथी हे मिळून शंभु राजांना पकडण्यासाठी गेले.
  • सर्वपथम अण्णाजी दत्तो यांनी त्यावेळच्या सरनोबत हंबीरराव मोहिते यांची मदत घ्यायची ठरवली,अण्णाजी दत्तो यांनी हंबीरराव मोहिते यांना आपला भाचा म्हणजे राजाराम महाराज गादीवर बसणार याचे अमिश दाखवले पंरतु हंबीरराव मोहिते यांनी ह्या आमिषाला बळी न पडता अण्णाजी दत्तो यांना पकडून त्यांना छत्रपती संभाजी राजांपुढे उभे केले.
  • हंबीरराव मोहिते याना माहीत होते की,छञपती शिवाजी महाराजांनंतर स्वराज्याचा कारभार चालवण्यास पात्र असे एकच आहेत,ते म्हणजे शंभु राजे.

छत्रपती संभाजी महाराज यांचा राज्यभिषेक कधी आणि कसा झाला?

  • 16 जानेवारी 1681 ला रायगड ह्या किल्ल्यावर शंभु राजांचा राज्याभिषेक सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला आणि ते स्वराज्याचे दुसरे छत्रपती झाले.
    त्यांनी अण्णाजी दत्तो आणि त्यांच्या सहकार्यांना माफ केले आणि परत आपल्या अष्ट प्रधान मंत्री मंडळामध्ये स्थान दिले.
  • छत्रपती संभाजी राजांनी आपल्या मित्राला म्हणजे कवी कलशांना स्वराज्यात दिलेले स्थान काही अष्टप्रधानातील मंडळींना पटले नाही,त्यामुळे ते छञपती संभाजी महाराजांचा राग करू लागले.
    छत्रपती संभाजी महाराज यांनी स्वराज्याचे छत्रपती असताना 8 वर्षामध्ये कोणकोणत्या गोष्टी मिळवल्या?
  • आपल्या छोट्याश्या जीवनामध्ये छत्रपती संभाजी महाराज यांनी खूप युद्धे जिंकली.त्यांनी युद्धात औरंगजेबाला कधीही जिंकू दिले नाही.
    छत्रपती संभाजी महाराजांना बाहेरील शत्रूंचा फक्त सामना करायचा नव्हता ,तर त्याना स्वराज्यातील काही आपल्या शत्रूंचा देखील सामना करायचा होता.
    छत्रपती शिवाजी महाराज असताना त्यांनी कधी कोणाला जहागीर दिली नाही,परंतु त्यांच्या मृत्यूनंतर खूप मराठा सरदारांनी छञपती संभाजी महाराजांकडे जहागीर मिळण्यासाठी विनंती केली.
    परंतु छत्रपती संभाजी राज्यांनी कोणालाही जहागीरी देण्यास स्पष्ठ नकार दिला,त्यामुळे त्यांचे खूप दुश्मन वाढले.
  • छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या कारकिर्दीत फक्त सुरत लुटली,पंरतु छत्रपती संभाजी महाराजांनी औरंगजेबाचे घर समजले जाणारे बुऱ्हाणपूर लुटले.
    बुऱ्हाणपूर लुटल्याचा तोटा औरंगजेबाला खूप झाला.
    छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात औरंगजेबाच्या अत्याचाराला घाबरून खूप हिंदू लोकांनी धर्म परिवर्तन केले होते.
  • त्यातील काहींना छत्रपती शिवाजी महाराजांनी परत हिंदू धर्मात घेतले.असेच छत्रपती संभाजी राजांचे गुरू असणारे नेताजी पालकर यांचे औरंगजेबाने धर्म परिवर्तन केले होते.
    नेताजी पालकर खूप वर्षातून स्वराज्यात आल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांचे धर्म परिवर्तन केले.
    स्वराज्याचे दुसरे छत्रपती छत्रपती संभाजी महाराज यांना झालेली अटक आणि त्यांचे झालेले अतोनात हाल –
  • काही कामानिमित्त छत्रपती संभाजी महाराज संगमेश्वर येथे गेले होते,स्वराज्यातील काही फितुरांच्या मदतीने मुकर्रबखान याने आपल्या ३००० लोकांचे विशाल आणि बलाढय सैन्य घेऊन छञपती संभाजी राजे आणि त्यांचे मित्र कवी कलश यांना नावडी येथे अटक केली.त्यावेळी मराठयांची संख्या फक्त ३०० ते ४०० इतकीच होती.
  • स्वराज्याचा छावा अटक झाला.छत्रपती संभाजी महाराजाना जेव्हा औरंगजेबसमोर आणण्यात आले तेव्हा औरंजेबाने आपले सिंहासन सोडून छत्रपती संभाजी महाराजांपुढे नमाज अदा केली आणि छत्रपती संभाजी महाराज आणि कवी कलशांचे अतोनात हाल करण्यात आले.
    संभाजी महाराज यांची विदुषकाच्या पोशाखात धिंड काढण्यात आली.संभाजी महाराजांनी मराठा साम्राज्यासोबत आपले सर्व किल्ले खजिना बहाल करावा अशी मागणी औरंगजेबाने त्यांच्याकडून केली.
  • पण संभाजी महाराज यांनी तब्बल ४० दिवस सर्व पिडा सहन केली पण औरंजेबापुढे झुकले नाही दयेची भीक मागितली नाही.त्यांची स्वराज्याप्तीची निष्ठा आणि प्रेमाचा त्याग केला नाही.
    तुळापुर येथे त्यांच्या डोळयांमध्ये अक्षरश लोखंडी सळया टाकण्यात आल्या.जीभ कापण्यात आली पण संभाजी राजे यांनी दयेची भीक औरंजेबापुढे मागितली नाही.शेवटी संभाजी हार मानत नाही ह्या रागात त्यांचे मित्र कलश याचे देखील डोळे काढण्यात आले.
    शेवटी एवढे हाल करून एवढी पीडा देऊन देखील संभाजी आपल्यापुढे झुकला नही ही खंत औरंगजेबाच्या मनात कायमची राहुन गेली.
See also  मदर्स डे शुभेच्छा - मातृदिन शुभेच्छा 2023-मदर्स डे कोट्स -Mother Day quotes and wishes in Marathi

छत्रपती संभाजी महाराज यांचे निधन कधी आणि कुठे झाले?

  • 11 मार्च 1669 मध्ये स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराज यांचे भीमा इंद्रायणी नदीचा संगम होत असलेल्या आळंदी जवळच्या तुळापुर येथे हत्या केली गेली तिथेच त्यांचे निधन झाले.
    संताजी आणि धनाजी यांच्याविषयी मोगलांच्या मनात असलेली दहशत –
  • छत्रपती संभाजी महाराजांच्या निधनानंतर औरंगजेबाला वाटले की आता आपण स्वराज्य जिंकले परंतु धनाजी जाधव आणि संताजी घोरपडे यांनी त्याचे हे स्वप्न पूर्ण होऊ दिले नाही.
    त्याकाळी जेव्हा मुघलांचे घोडे पाणी पीत नसत,तेव्हा मुघलांची सेना म्हणत “घोड्याना पाण्यात
  • संताजी आणि धनाजी यांची प्रतिमा तरी दिसली नाही ना!”, .
    शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज (Shivaji Maharaj And Sambhaji Maharaj)
    छत्रपती शिवाजी महाराज लढाई करताना शक्ती पेक्षा बुद्धीचा,युक्तीचा वापर जास्त करायचे.
    परंतु धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज हे लढाई करताना बुद्धी बरोबर आपल्या शक्तीचा वापर देखील करायचे.
  • छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या कारकिर्दीत फक्त सुरत लुटली,पंरतु छत्रपती संभाजी महाराजांनी औरंगजेबाचे घर समजले जाणारे बुऱ्हाणपूर लुटले.
    प्रसिद्ध व्याख्याते नितीन बानूगडे पाटील यांच्या भाषणातील छत्रपती संभाजी महाराजांवरील काही हिंदीतील ओळी –
  • सचमुच छावा है छावा शेर का ,
    हमने आंखे निकाल दी उसकी पर उसकी आँखें झुकी नही हमारे सामने ।
    हमने जबान काट दी उसकी पर उसने मांगे नही रहम के दो लब्ज।
    हमने हात तोड़ दे उसके,पर उसके हात झुके नही हमारे सामने।

संभाजी महाराज यांच्याविषयी वारंवार विचारले जाणारे महत्वाचे प्रश्न –

1) छत्रपती संभाजी महाराज यांची समाधी कुठे आहे?
वढु बुद्रूक जि.पुणे येथे संभाजी महाराज यांची समाधी आहे.
2) छत्रपती संभाजी महाराज यांनी त्यांच्या कारकिर्दीत कोणकोणते महान पराक्रम केले?
संभाजी महाराज यांनी पंधरापटीने दुप्पट असलेल्या मोगल सेनेशी एकटयाने लढा दिला होता.
त्यांनी आपल्या कार्यकाळात १२० युदधे जिंकली होती.आणि महत्वाची गोष्ट म्हणजे एकातही पराभव त्यांना आला नव्हता.
संभाजी महाराज यांनी गोव्याचे पोर्तुगीज,जंजिरा येथील सिददी आणि म्हैसुर येथील चिकदेवराय ह्या त्यांच्या शत्रुंना अशी अददल घडवली की त्यांनी पुन्हा औरोगजेबास मदत करायचा विचार देखील केला नाही.
3) संभाजी महाराज यांच्या निधनानंतर गादीवर कोणाला बसवण्यात आले?
संभाजी महाराज यांच्या निधनानंतर मराठा साम्राज्याच्या गादीवर त्यांचे बंधु राजाराम यांना बसवण्यात आले.

संभाजी महाराज यांचा संपुर्ण इतिहास आणी जीवण कथा -Sambhaji Maharaj Total History And Life Story In Marathi)-Sambhaji Maharaj complete History And Life Story In Marathi)

छत्रपती शंभूराजांनी आपले 33 वर्षाचे संपुर्ण जीवन आपल्या वडिलांनी स्थापन केलेल्या स्वराज्याच्या रक्षणासाठी खर्च केले.
शंभू राज्यांना कमी वयापासूनच राजकीय आणि कौटुंबिक समस्यांचा सामना करावा लागला होता.
छत्रपती संभाजी महाराज अवघ्या दोन वर्षाचे असताना त्यांच्या आईंचा सईबाईंचा मृत्यू झाला.
त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांनी शंभू बाळाला आईची कमी भासु नये यासाठी धाराऊ नावाच्या दुधाऊ ठेवल्या.
लहानपणी बाळ शंभू राज्यांना आऊसाहेब राजमाता जिजाबाई महाभारत आणि रामायणाच्या कथा सांगायच्या.छत्रपती शंभू राज्यांना संस्कृत आणि अन्य 8 भाषा माहीत होत्या.

  • धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज हे स्वराज्याचे संस्थापक छत्रपती श्री शिवाजी महाराज यांचे पुत्र होते.
  • त्यांच्या आईंचे नाव सईबाई.सईबाई ह्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पहिल्या पत्नी होत्या.
  • धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांना एक भाऊ देखील होते त्यांचे नाव राजाराम महाराज असे होते.
  • राजाराम महाराज हे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या दुसऱ्या पत्नीचे म्हणजे सोयरबाईंचे पुत्र होते.
  • शंभू राज्यांना 6 बहिणी देखील होत्या.धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा विवाह महाराणी येसूबाई यांच्याशी झाला आणि त्यांना शाहू नावाचा एक पुत्र होता.
  • सोयराबाईंना राजाराम महाराज झाल्यानंतर त्यांना धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा राग येऊ लागला.कारण त्यांना असे वाटत होते की जोपर्यंत संभाजी महाराज आहेत,तोपर्यंत आपल्या मुलाला म्हणजे राजाराम महाराजांना योग्य ते स्थान मिळणार नाही.म्हणुन सोयराबाईंना आपल्या मुलाला छत्रपती शिवाजी महाराजांनंतर गादीवर बसवण्याची मनापासुन तीव्र इच्छा होती.
  • लहानपणी जेव्हा शंभू राजे छत्रपती शिवाजी महाराजांसोबत आग्रा येथे औरंगजेबाच्या वाढदिवसाला गेले होते आणि तेव्हा त्यांना औरंगजेबाकडून अटक करण्यात आली होती.
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या गनिमी काव्यामुळे ते आणि शंभू राजे आग्रा येथून सुखरूप बाहेर पडले.
  • आग्र्याच्या येथून बाहेर पडल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी काही दिवस शंभु राजांना मथुरेतील एका ब्राम्हणाच्या घरी ठेवले होते आणि स्वराज्यात शंभु राज्यांचा अंतिम संस्कार देखील करण्यात आला होता.
  • शंभू राजे यांनी मथुरेतच शास्त्र शिकले आणि बुधभूषण हा ग्रंथ देखील संस्कृत भाषेत लिहिला.छत्रपती शंभू राजे जवळजळ एक ते दीड वर्ष मथुरेत होते आणि त्यांची कवी कलशांबरोबर भेटही तिथेच झाली.छत्रपती संभाजी महाराज आणि कवी कलशांनी आपली मैत्री शेवटच्या श्वासापर्यंत निभावली.
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर मुघलांना वाटले की आता आपण सहज सह्याद्री जिंकू पण छत्रपती संभाजी महाराज यांनी असे होऊ नाही दिले.आणि मुघलांना स्वराज्यात जास्त काळ टिकू नाही दिले.1680 मध्ये औरंगजेब 4 लाख जनावर आणि 50 लाख सेना घेऊन दक्षिणेत आला.
  • औरंगजेबाने कुतुबशाही आणि आदिलशाही जिंकली.नंतर औरंगजेबाने स्वराज्य जिंकण्याचा प्रयत्न केला परंतु त्याला स्वराज्य जिंकण्यामध्ये यश आले नाही.
  • छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मृत्यूनंतर राजाराम महाराज यांचे मंचकारोहण झाले.छत्रपती शिवाजी महाराज यांच्या निधनाची बातमी मुद्दाम छत्रपती संभाजी राजेंना कळवण्यात आली नव्हती.
  • तेव्हा छत्रपती संभाजी राजे पन्हाळा किल्ल्यावर होते.रायगडावर अण्णाजी दत्तो यांच्या कारस्थानामुळे सोयराबाई यांनी शम्भू राजे यांना कैद करण्याचे आदेश दिले,याच आदेशानुसार अण्णाजी दत्तो आणि त्यांचे साथी मिळून शम्भू राजांना पकडण्यासाठी गेले.
  • सर्वपथम अण्णाजी दत्तो यांनी त्यावेळच्या सरनोबत हंबीरराव मोहिते यांची मदत घ्यायची ठरवली अण्णाजी दत्तो यांनी हंबीरराव मोहिते यांना आपला भाचा म्हणजे राजाराम महाराज गादीवर बसणार याचे अमिश दाखवले पंरतु हंबीरराव मोहिते यांनी ह्या आमिषाला बळी न पडता अण्णाजी दत्तो यांना पकडून त्यांना छत्रपती संभाजी राज्यांपुढे उभे केले.
  • हंबीरराव मोहिते याना माहीत होते की छञपती शिवाजी महाराजांनंतर स्वराज्याचा कारभार चालवण्यास पात्र असे एकच आहेत,ते म्हणजे शम्भू राजे.
  • 16 जानेवारी 1681 ला शम्भू राजांचा राज्याभिषेक सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला आणि ते स्वराज्याचे दुसरे छत्रपती झाले.
  • त्यांनी अण्णाजी दत्तो आणि त्यांच्या सहकार्यांना माफ केले आणि परत आपल्या अष्ट प्रधान मंत्री मंडळामध्ये स्थान दिले.छत्रपती संभाजी राज्यांनी आपल्या मित्राला म्हणजे कवी कलशांना स्वराज्यात दिलेले स्थान काही अष्टप्रधानातील मंडळींना पटले नाही,त्यामुळे ते छञपती संभाजी महाराजांचा राग करू लागले.
  • आपल्या छोट्याश्या जीवनामध्ये छत्रपती संभाजी महाराज यांनी खूप युद्धे जिंकली.त्यांनी युद्धात औरंगजेबाला कधीही जिंकू दिले नाही.
  • आपल्या ह्या लढयात छत्रपती संभाजी महाराजांना फक्त बाहेरील शत्रूंचा फक्त सामना करायचा नव्हता ,तर त्याना स्वराज्यातील काही आपल्या शत्रूंचा देखील सामना करायचा होता.
  • जसे छत्रपती शिवाजी महाराज गादीवर असताना त्यांनी कधी कोणाला जहागीर दिली नाही तसेच त्यांच्या मृत्यूनंतर खूप मराठा सरदारांनी छञपती संभाजी महाराजांकडे जहागीर मिळण्या साठी विन्नंती करून देखील छत्रपती संभाजी राजे यांनी कोणालाही जहागीर दिली नाही.त्यामुळे त्यांच्या दुष्मनांमध्ये खुप वाढ देखील झाली.
  • छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या कारकिर्दीत फक्त सुरत लुटली,पंरतु छत्रपती संभाजी महाराजांनी औरंगजेबाचे घर समजले जाणारे बुऱ्हाणपूर लुटले.
  • काही कामानिमित्त छत्रपती संभाजी महाराज संगमेश्वर येथे गेले होते,स्वराज्यातील काही फितुरांच्या मदतीने मुकर्रबखान याने आपल्या ३००० लोकांचे विशाल आणि बलाढय सैन्य घेऊन छञपती संभाजी राजे आणि त्यांचे मित्र कवी कलश यांना नावडी येथे अटक केली.त्यावेळी मराठयांची संख्या फक्त ३०० ते ४०० इतकीच होती.
  • स्वराज्याचा छावा अटक झाला.छत्रपती संभाजी महाराजांना जेव्हा औरंगजेबसमोर आणण्यात आले तेव्हा औरंजेबाने आपले सिंहासन सोडून छत्रपती संभाजी महाराजांपुढे नमाज अदा केली आणि छत्रपती संभाजी महाराज आणि कवी कलशांचे अतोनात हाल करण्यात आले.
See also  Sarcastic म्हणजे काय? - sarcastic meaning in Marathi

संभाजी महाराजांनी मराठा साम्राज्यासोबत आपले सर्व किल्ले खजिना बहाल करावा अशी मागणी औरंगजेबाने त्यांच्याकडून केली.
पण संभाजी महाराज यांनी तब्बल ४० दिवस सर्व पिडा सहन केली पण औरंजेबापुढे झुकले नाही दयेची भीक मागितली नाही.त्यांची स्वराज्याप्तीची निष्ठा आणि प्रेमाचा त्याग केला नाही.
तुळापुर येथे त्यांच्या डोळयांमध्ये अक्षरश लोखंडी सळया टाकण्यात आली’, संभाजी राजे यांनी दयेची भीक औरंजेबापुढे मागितली नाही.शेवटी संभाजी हार मानत नाही ह्या रागात त्यांचे मित्र कलश याचे देखील डोळे काढण्यात आले.
शेवटी एवढे हाल करून एवढी पीडा देऊन देखील संभाजी आपल्यापुढे झुकला नही ही खंत औरंगजेबाच्या मनात कायमची राहुन गेली.
अशा ह्या हा शुर संभाजीची 11 मार्च 1669 मध्ये भीमा इंद्रायणी नदीचा संगम होत असलेल्या आळंदी जवळच्या तुळापुर येथे  निधन झाले.