20 थोर भारतीय स्वतंत्रता सेनानीं – भारताचे महान स्वातंत्र्यसैनिक  – Greatest Freedom Fighters Of India Marathi information

महान भारतीय स्वतंत्रता योद्धे –  Greatest Freedom Fighters Of India Marathi information

आपण इंग्रजांच्या गुलामीतुन आझाद झालो आहोत,स्वतंत्र झालो आहोत याला कारण आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी आपल्या प्राणांची आहुती देणारे,आपल्या देशाला स्वातंत्र्य प्राप्त होण्यासाठी आपापल्या वतीने योगदान देणारे आपल्या देशाचे अनेक थोर स्वातंत्र्यसेनानी आहेत.

 • ह्या महान आत्म्यांचे जेवढ स्मरण कराव तेवढे कमी आहे.आपण त्यांनी आपल्या देशासाठी दिलेल्या बलिदानाचे कुठलेही मुल्य लावू शकत नाही.कारण त्यांनी दिलेले योगदान खुप अमुल्य आहे ज्याची आपण कोणती किंमत देखील ठरवू शकत नाही.
 • पण त्यांनी आपल्या देशासाठी दिलेल्या बलिदानाचे,त्यागाचे आपण स्मरण तर नक्कीच करू शकतो.
 • भारताला स्वतंत्रता प्राप्त करून देण्यासाठी अनेक वीर पुरूषांनी तसेच स्त्रियांनी आपल्या प्राणाची आहुती दिली आहे.एवढेच नाही तर अनेक तरूणांनी आपले संपुर्ण तारूण्य देशाच्या सेवेसाठी अपर्ण केले होते.
 • आजच्या आपल्या युवापिढीने यांच्याकडुन प्रेरणा घेत आपल्या देशात जी बेरोजगारी,भ्रष्टाचारासारखे गुन्हे जागोजागी घडत आहे याला कायमचा आळा बसवण्यासाठी याविरूदध आवाज उठविणे गरजेचे आहे.
 • आजच्या लेखात आपण भारतातील 20 अशा स्वातंत्र्य सेनानींविषयी जाणुन घेणार आहोत ज्यांनी आपले पुर्ण आयुष्य देशाच्या सेवेत,देशाच्या हितासाठी अपर्ण केले होते.
 • आणि ज्यांच्यापासुन आपल्या देशाच्या नवीन पिढीला खुप काही शिकायला मिळु शकते.

स्वातंत्र्य सेनानी म्हणजे काय? – भारताचे स्वातंत्र्य सैनिक – भारताचे महान स्वातंत्र्यसैनिक

 आपल्या भारत देशात आत्तापर्यत अनेक थोर स्वतंत्रता सेनानी होऊन गेले आहेत.ज्यांनी आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी आपले संपुर्ण आयुष्य वेचले प्रसंगी कारावासाची शिक्षा भोगली,एवढेच नव्हे तर देशासाठी हसत हसत ते फासावर देखील चढले.अशाच थोर हुतात्म्यांना आपण स्वातंत्र्य सेनानी असे संबोधित असतो.

आज आपण अशाच काही थोर क्रांतीवीरांचा,वीरांगणांचा ( Freedom fighters of India in Marathi ) सविस्तर परिचय करून घेणार आहोत.

ज्यांनी आपल्या देशाच्या विकासात,स्वातंत्र्याच्या युदधात मोलाचे योगदान देऊन देश स्वातंत्र होण्यात आपला एक खारीचा वाटा उचलला आहे.

भारतात कोणकोणते थोर स्वतंत्रता सेनानी होऊन गेले आहेत? – Freedom fighters of India in Marathi

 

 महान भारतीय स्वतंत्रता सेनानींचे  नावे –  Name Freedom Fighters Of India

1)भगतसिंग :

2) मंगल पांडे :

3) सुखदेव :

4) राजगुरू :

5) उधम सिंग :

6) खुदीराम बोस :

7) लाल बहादुर शास्त्री :

8) राणी लक्ष्मीबाई :

9) पंडित जवाहरलाल नेहरू :

10)  टिळक,आगरकर :

11) लाला लजपतराय :

12) चंद्रशेखर आझाद :

13) सुभाषचंद्र बोस :

14) महात्मा गांधी :

15) सरदार वल्लभाई पटेल

16) बाबासाहेब आंबेडकर :

17) सरोजिनी नायडु :

18) डाँ राजेंद्रप्रसाद :

19) गोपाळ कृष्ण गोखले :

20) स्वातंत्र्यवीर सावरकर

1)भगतसिंग :

आज भगतसिंगला कोण नाही ओळखत आपल्या देशातील लहान लहान मुलांना देखील भगत सिंग विषयी आज माहीती आहे.

भगतसिंगचा जन्म 27 सप्टेंबर रोजी 1907 रोजी पंजाब ह्या राज्यात बंगा ह्या गावी झाला होता.लहानपणापासुनच भगत सिंग याच्या मनामध्ये आपल्या देशाविषयी अपार प्रेम निर्माण झाले होते.

Greatest Freedom Fighters Of India
Greatest Freedom Fighters Of India – भगतसिंग

कारण त्यांचे वडील आणि काका हे देखील स्वतंत्रता सेनानी होते त्यामुळे त्यांच्यापासुन प्रेरित होऊन भगत सिंग यांच्या मनात देशासाठी प्राण देण्याची भावना निर्माण झाली.

आणि लहान वयातच इंग्रजांविरूदध त्यांनी लढा पुकारला इंग्रज भारतावर कशा पदधतीने कब्जा करीत आहे भगतसिंग यांनी युवा तरूणांना समजावुन सांगुन एक चळवळ उभारली,यात त्यांनी संसद भवनात बाँम्ब फेकले.याचमुळे त्यांना 23 मार्च 1931 इंग्रजांनी फासावर चढवले आणि भगतसिंग हे हसत हसत देशासाठी फासावर गेले देखील.

 

 

2) मंगल पांडे :

 मंगल पांडे यांचा जन्म 19 जुलै 1857 रोजी उत्तर प्रदेशातील नगवा ह्या गावी झाला होता.

मंगल पांडे यांची ईस्ट इंडिया कंपनीत सैनिक म्हणुन भरती झाले होते.1847 च्या दरम्यान अशी अफवा पसरली की ईस्ट इंडिया कंपनीकडुन जी काडतुसे तयार केली जातात त्यात गाई आणि डुकराची चरबी वापरले जाते.आणि ते काडतुस चालविण्यासाठी प्रत्येक हिंदु आणि मुस्लिम धर्मीय सैनिकाला ते दातांने ओढावे लागायचे.

Freedom fighters of India in Marathi - मंगल पांडे
Freedom fighters of India in Marathi – मंगल पांडे

आणि हिंदु धर्मात गाईला खूप पुजनीय स्थान आहे.गायीच्या पोटात आपण तेहतीस कोटी देव असतात असे मानतो.आणि मुस्लिम धर्मात डुक्कर निषेध असल्याने दोन्ही धर्मातील सैनिकांनी काडतुस वापरण्यास तयार नव्हते.कारण हे त्यांच्या धर्माविरूदध होते

आणि मग 9 फेब्रुवारी 1857 रोजी मंगल पांडेने हे काडतुस वापरण्यास स्पष्ट नकार दिला.मग मंगल पांडेच्या हातातील बंदुक इंग्रजांनी हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा मंगल पांडेने गोळया घालून इंग्रज अधिकारीला ठार केले आणि इंग्रजांविरूदध बंड पुकारले.

चकमकीत आपण इंग्रजांच्या हाती आपण लागु नये म्हणुन मंगल पांडेने स्वताला गोळी देखील मारुन घेतली पण शेवटी मंगल पांडे इंग्रजांच्या तावडीत सापडतात आणि मग त्यांना 6 एप्रिल 1857 रोजी कोर्टात शिक्षा सुनावली जाते.ज्यात मंगल पांडे यांना 18 एप्रिल 1857 रोजी फाशी देण्याची घोषणा केली गेली.

पण मंगल पांडेला फाशीची शिक्षा सुनावल्यामुळे त्यांचे समर्थक इंग्रजांवर मंगल पांडेची सुटका करण्यासाठी आंदोलन करून दबाव आणु लागले म्हणुन घाबरून मंगला पांडेला निर्धारीत वेळेच्या पहिलेच 8 एप्रिल 1857 रोजी फासावर चढवण्यात आले.

See also  FMCG म्हणजे काय? FMCG Full Form in Marathi

3: सुखदेव 

 सूखदेव यांचा जन्म 15 मे 1907 रोजी पंजाब येथील नौधरा येथील लुथियाना या गावी झाला होता.सुकदेव यांचे प्राथमिक शिक्षण लायलापुर इथेच झाले.

मग त्यानंतर त्यांनी लाहोर येथील पंजाब नँशनल काँलेजमध्ये पुढील शिक्षणासाठी अँडमिशन घेतले.

सुखदेव

तिथेच सुकदेवला भगतसिंग,शिववर्मा,भगवतीचरण,विजयसिंह हे चारही भेटतात.या काँलेजातील प्रा,विद्यालंकार हे ह्या चौघांनी क्रांतीकारकांच्या मार्गाकडे वळविले.

मग या सगळयांनी मिळुन तरूण भारत या संघटनेची स्थापणा केली.तरूणांना स्वातंत्र्य चळवळीत समाविष्ट होण्यासाठी प्रेरित करणे हे ह्या संघटनेचे प्रमुख उददिष्ट होते.

याचसोबत सुकदेव यांनी क्रांतीकारक चळवळीत देखील भाग घेत एका ब्रिटीश पोलिस कर्मचारीला फाशी देत लाला लजपतराव यांच्या खुनाचा बदला देखील घेतला.

असेच विविध आक्रमक हल्ले करून ब्रिटीश कर्मचारींना आपल्या आक्रमक कारवाईंनी सुकदेव यांनी एकदम हादरून टाकले होते.म्हणुन भगतसिंग,राजगुरू यांच्यासोबत सुकदेव यांना लाहोर येथील कारावासात 23 मार्च 1931 रोजी फासावर लटकवण्यात आले होते.

 

4)राजगुरू :

राजगुरू यांचा जन्म 24 आँगस्ट 1908 रोजी पुणे शहरातील खेड ह्या गावी झाला होता.काशी येथे संस्कृत आणि धर्मशास्त्राचा अभ्यास करत असताना क्रांतीकारकांच्या संघटनेत (हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन पार्टी) मध्ये राजगुरू सहभागी झाले.

चंद्रशेखर आझाद,भगतसिंग इत्यादींसोबत मिळुन राजगुरू यांनी पंजाब,कानपुर,लाहोर आग्रा इत्यादी ठिकाणी असंतोष पेटवत जहाल विचारसरणीचा प्रसार केला.राजगुरू :

लाला लजपतराय यांच्या हत्येचा वचपा काढण्यासाठी राजगुरू यांनी भगतसिंग,सुकदेव यांच्यासमवेत एक मोहीम तयार केली.जिची जबाबदारी भगतसिंग सुकदेव सोबत राजगुरू यांच्या खांद्यावर देखील होती.

लाला लजपतराय यांना लाठीमार करून त्यांची हत्या केलेल्या ब्रिटीश अधिकारीला 17 डिसेंबर 1928 रोजी राजगुरूनेच गोळी घालुन ठार केले होते.

यानंतर भगतसिंग,सुकदेव,राजगुरू या तिघांनी तिथुन पलायन केले पण पण 30 डिसेंबर 1929 रोजी पुणे येथे राजगुरू हे ब्रिटीश अधिकारींच्या ताब्यात सापडले.

मग लाहोर येथील कटात सहभागी सर्व क्रांतीकारींवर खटले लागु करण्यात आले.त्यांना तुरूंगात टाकण्यात आले.ज्यात भगतसिंग,सुकदेव या दोघांसोबत राजगुरूला देखील 23 मार्च 1931 रोजी फाशी देण्यात आली होती.

 

 

5) उधम सिंग :

 सरदार उधमसिंग यांचा जन्म 26 डिसेंबर 1899 रोजी पंजाब येथील सुनम गाव येथे झाला होता.

1919 मधील जालियानवाला हत्याकांडाचे चित्र लहान असताना सरदार उधमसिंग यांनी आपल्या डोळयांनी बघितले होते.ज्यात कित्येक लोक मृत्युमुखी पडले होते.

उधम सिंग

ब्रिटीश गर्वनर जनरल डायरने ज्या क्रुर पदधतीने लोकांना गोळया घालून ठार मारले जी निरपराधांची निघृतपणे हत्या केली होती.त्याचा बदला घेण्याचा निश्चय सरदार उधमसिंग यांनी केला.

यानंतर सरदार उधमसिंग देखील क्रांतीकारी संघटनेत सहभागी झाले.आणि देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी लढल्या जाणार्या ह्या लढाईत लढता लढता खूपच कमी वयात ते देशासाठी 31 जुलै 1940 रोजी शहीद तसेच गतप्राण झाले.

 

 

 

6) खुदीराम बोस :

खुदीराम बोस यांचा जन्म 3 डिसेंबर 1889 रोजी बंगाल येथील हबिबपुर ह्या गावी झाला होता.

विसाव्या शतकामध्ये स्वतंत्रता चळवळीचा वेग बघुन इंग्रजांनी बंगालचे विभाजन करायला सुरूवात केली.

बंगालचे होणारी फाळणी बघून खुदीराम यांनी नववीनंतर शिक्षण सोडुन देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी सत्येन बोस यांच्या क्रांतीकारी संघटनेत प्रवेश केला.

खुदीराम बोस :

पोलिस स्टेशनमध्ये बाँम्ब टाकणे,वंदे मातरतचा नारा देत क्रांतीकारी संघटनेत सहभागी होणे आणि संघटनेत सहभागी होण्यासाठी इतरांना प्रोत्साहित करणे अशी अनेक कार्ये खुदीराम बोस यांनी खुप लहान वयातच केली पण दिसायला खुप लहान असल्याने पोलिस त्यांना कधी कधी ताकीद देऊन सोडुन द्यायचे.

बंगालच्या गर्वनरवर हल्ला,इंग्रज अधिकारींवर बाँम्ब हल्ले करणे,अशी अनेक क्रांतीकारी पाऊले त्यांनी उचलली.

पण इंग्रज अधिकारी किंग्फोर्डची हत्या करण्याचा प्रयत्न करत असताना त्यांच्या हालचालीवरून त्यांच्यावर ब्रिटीश पोलिसांना संशय आला आणि बाँम्ब हल्ला करण्याच्या आरोपात त्यांना अटक केली गेली.किंग्फोर्ड ह्या हल्ल्यातुन वाचला पण त्यात त्याची पत्नी आणि मुलीची ह्या खुदीराम यांच्याकडुन किंग्फोर्डला मारण्याच्या नादात होऊन जात असते.

11 आँगस्ट 1908 रोजी फक्त 18 वर्षाचे असताना खूदीराम बोस यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली.आणि ती देखील त्यांनी हसत हसत देशासाठी मान्य केली.

 

7) लाल बहादुर शास्त्री :

लाल बहादुर शास्त्री यांचा जन्म 2 आँक्टोंबर 1904 रोजी उत्तर प्रदेशातील मुगलसराय नावाच्या गावी झाला.

महात्मा गांधींनी जे असहकार आंदोलन,भारत छोडो,सत्याग्रह केले होते त्यात लाल बहादुर शास्त्री यांचा देखील समावेश होता.

लाल बहादुर शास्त्री :

भारताला स्वातंत्र्य प्राप्त करून देण्याच्या लढयात तब्बल 9 वर्षे लाल बहादुर शास्त्री यांनी तुरूंगातच काढली.

आणि मग जेव्हा भारत इंग्रजांच्या गुलामीतुन मुक्त झाला तेव्हा लाल बहादुर शास्त्री हे देशाचे गृहमंत्री बनले.याचसोबत ते भारताचे दुसरे पंतप्रधान देखील होते.

1966 विदेश यात्रेत असताना हदय विकाराचा झटका येऊन त्यांचा मृत्यु झाला.

 

 

8) राणी लक्ष्मीबाई :

 राणी लक्ष्माबाई यांचा जन्म 1828 रोजी काशी(वाराणसी) येथे झाला होता.

इंग्रज राजवटीत जेव्हा भारताचा गर्वनर लाँर्ड डलहौसी हा होता.तेव्हा त्याने एक नियम लागु केला ज्यात असे लिहिलेले होते ज्या राज्याचा कुठलाही राजा नहीये त्यावर इंग्रजांचा अधिकार असेल.राणी लक्ष्मीबाई :

तेव्हा राणी लक्ष्मीबाई यांचे पती निधन पावले होते.पण एकटया असताना देखील राणी लक्ष्माबाई यांनी इंग्रजांपुढे हार मानली नाही.

आणि मै मेरी झाशी नही दुंँगी असे म्हणत तब्बल दोन आठवडाभर इंग्रजांसोबत जिद्दीने युदध केले.1857 च्या उठावात यांचे फार मोलाचे योगदान होते.

 

 

9) पंडित जवाहरलाल नेहरू :

 पंडित जवाहरलाल यांचा जन्म 14 नोव्हेंबर 1889 रोजी अलाहाबाद येथे झाला होता.

पंधरा वर्षाचे असताना पंडित नेहरू हे परदेशात शिक्षणासाठी गेले होते.यानंतर भारतात परत आल्यानंतर महात्मा गांधी यांच्या संपर्कात आल्यानंतर त्यांनी विदेशी वस्तुंचा त्याग स्वदेशीचा पुरस्कार केला आणि देशाच्या स्वातंत्र्य लढयात आपले अमुल्य योगदान दिले.

पंडित जवाहरलाल नेहरू :

याचसोबत त्यांनी 1928 मध्ये स्वतंत्र भारत चळवळ उभारली तसेच 7 आँगस्ट 1947 आखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या मुंबई येथे भरवलेल्या अधिवेशनात त्यांनी इंग्रजांना भारतातुन पळवून लावण्यासाठी भारत छोडो आंदोलनाची घोषणा केली.त्यानंतर त्यांना इंग्रजांनी अटक करून कारावसात देखील टाकले होते.

27 मे 1964 मध्ये पंडित जवाहरलाल नेहरू यांचा दिल्ली येथे मृत्यु झाला होता.

See also  FDI म्हणजे काय? Foreign Direct Investment Marathi information

 

 

10) लोकमान्य टिळक :Freedom fighters of Maharashtra in Marathi

 लोकमान्य टिळकांचा जन्म महाराष्टातील रत्नागिरी जिल्हयात 23 जुलै 1856 रोजी झाला होता.आणि 1 आँगस्ट 1920 रोजी त्यांचा मृत्यु झाला.

आगरकरांचा जन्म 14 जुलै 1856 रोजी सातारा जिल्हयात असलेल्या टेंभे ह्या गावी झाला.आणि 1895 मध्ये आगरकरांचा मृत्यु झाला होता.

 स्वराज्य हा माझा जन्मसिदध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच अशा कठोर शब्दांत इंग्रजांना सुनावले, आणि आपल्या जहालवादी लेखन शैलीतुन लोकमान्य टिळक यांनी ब्रिटीशांचा चांगला समाचार घेतला.लोकमान्य टिळक :

डेक्कन काँलेजमध्ये आगरकर आणि टिळक या दोघांची भेट झाल्यानंतर दोघांनी मिळुन आपले देशकार्यासाठी वाहुन नेण्याचा निर्णय घेतला.ज्यात त्यांनी केसरी आणि मराठा ही दोन वृतपत्रे देखील सुरू केली होती

टिळक आगरकर या दोघांनी इंग्रजांविरूदध आपल्या वर्तमानपत्रातुन जनजागृती केली इंग्रज आपल्यावर कसे अन्याय करत आहेत कसे गुलामीत ठेवत आहेत हे जनतेच्या निदर्शनास आणुन दिले.

इंग्रजांविरूदध लढयात आपल्या केसरी आणि मराठा या वृतपत्रातुन त्यांनी इंग्रजांचे डोके ठिकाणावर आहे का अशा जहालवादी भाषेत अनेक वेळा टिळकांनी परखडपणे वक्तव्य देखील मांडले.ज्यामुळे टिळकांना आणि आगरकरांना अनेकदा तुरूंगवासाची शिक्षा देखील देण्यात आली.

 

11) लाला लजपतराय :

 लाला लजपतराय यांचा जन्म पंजाबच्या फिरोजपुर जिल्हयातील धुंडिके गावी 28 जानेवारी 1836 मध्ये झाला होता.लाला लजपतराय यांना आपण पंजाब केसरी म्हणून देखील ओळखतो.

लाला लजपतराय यांचे भारतीय स्वातंत्र्य लढयात फार मोलाचे योगदान आहे.ब्रिटीशांना हकलुन लावण्यासाठी संपुर्ण भारतात स्वदेशी वस्तुंचाच वापर केला जावा यासाठी लालाजींनी देखील स्वदेशी अभियान राबवले.लाला लजपतराय :

बंगालच्या विभाजनास देखील त्यानी ब्रिटीशांविरूदध आपला विरोध दर्शवला.सायमन कमिशनचा विरूदध शांततेत आंदोलन केले.ज्यात त्यांनी असा प्रस्ताव मांडला जर ह्या कमिशनमध्ये भारतीयांना जागा दिली जात नसेल तर या कमिशनने भारतातुन चालते व्हावे.

पण ब्रिटीशांनी त्यांची ही शांतताप्रिय मागणी मान्य न करता उलट त्यांना लाठीमार केला ज्यात लाला लजपतराय गंभीर जखमी झाले त्यातच त्यांचा 17 नोव्हेंबर 1928 रोजी मृत्यु देखील झाला.

 

12) चंद्रशेखर आझाद :

 चंद्रशेखर आझाद यांचा जन्म 23 जुलै 1906 रोजी मध्य प्रदेशातील भवरा नावाच्या गावात झाला होता.

लहानपणापासुनच चंद्रशेखर आझाद यांच्या मनात आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्याची देशप्रेमाची,देशभक्तीची ईच्छा उत्पन्न झाली होती.

म्हणुन 1921 मध्ये महात्मा गांधींनीने इंग्रजांविरूदध जी असहकार चळवळ सुरू केली होती त्या चळवळीत देशाला इंग्रजांपासुन स्वातंत्र्य मिळवुन द्यायचे यासाठी ते देखील समाविष्ट झाले होते.याचसाठी त्यांनी इतर तरूणांमध्ये देखील इंग्रजांविरूदध लढा देण्यासाठी देशभक्ती जागृत केली.

असहकार आंदोलनात त्यांना कारावासात देखील टाकण्यात आले होते.याचसोबत कारावासात चंद्रशेखर आझाद यांना अमानुषपणे मारहाण देखील करण्यात केली होती.तरी देखील मार खाता खाता भारत माता की जय असा जयघोष ते करीत होते.

असहकार आंदोलनातुन गांधीजींनी त्यांचा आक्रमक पवित्रा बघत असहकार आंदोलनात सहभागी होण्यास नकार दिला कारण याने आंदोलनास हिंसकता प्राप्त झाली असती आणि गांधीजींना शांततेच्या मार्गाने स्वातंत्र्याचा लढा लढायचा होता.

पुढे जाऊन चंद्रशेखर आझाद यांची ओळख रामप्रसाद बिस्मिल्ला यांच्याशी झाली.मग रामप्रसाद बिस्मिल्ला हे अध्यक्ष असलेल्या हिंदुस्थान रिपब्लिकन असोसिएशन या क्रांतीकारक संघटनेचे चंद्रशेखर आझाद हे सभासद झाले.

मग आपल्या संघटनेतील सहकारींच्या मदतीने आझाद यांनी काकोरी ट्रेन लुटली.ज्या प्रककरणात रामप्रसाद बिस्मिल्ला आणि त्यांच्या इतर सहयोगींना फासावर लटकवण्यात आले.

मग तिथून पोबारा करत चंद्रशेखर आझाद यांनी दिल्लीत क्रांतीकारक बैठक आयोजित केली.ज्यात हिंदुस्थान सोशँलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन नावाची एक नवीन संघटना उभारणात आली.

लाला लजपतराय यांच्या खुनाचा बदला घेण्यासाठी चंद्रशेखर आझाद यांनी 1928 मध्ये सँडर्स नावाच्या इंग्रज अधिकारीची हत्या देखील केली.ज्यानंतर त्यांचे अनेक साथी पकडले गेले.आपल्या सहकारींना सोडवण्याचा खुप अथक प्रयत्न केले पण त्यात त्यांना अपयश हाती आले.

अशा प्रकारे आपल्या आक्रमक पवित्रेने चंद्रशेखर आझाद यांनी पुर्ण हादरून टाकले होते.आणि मग इंग्रजांशी लढता लढता 27 फेब्रूवारी 1931 रोजी आपल्या एका साथीदाराला भेटण्यासाठी अलफ्रेड पार्क येथे गेले असताना ब्रिटीशांना याची वार्ता पोहचली व त्यांनी चंद्रशेखर आझाद यांना चहुबाजुने घेरून घेतले.

ज्यात ते एकटे पडले होते.मग शेवटी ब्रिटीशांच्या हातुन आपला मृत्यु होऊ नये म्हणुन त्यांनी आपल्या रिव्हाँलव्हरमधील उरलेली एक गोळी स्वताला मारून घेतली ज्यात त्यांचा मृत्यु झाला.

 

13) सुभाषचंद्र बोस :

 सुभाषचंद्र बोस यांचा जन्म 23,जानेवारी 1897 रोजी उडिसा राज्यातील कटक ह्या गावी झाला होता.

सुभाषचंद्र बोस स्वातंत्र्य लढयातील एक अग्रगण्य नेता होते म्हणुन त्यांना नेताजी अशी उपाधी देखील बहाल करण्यात आली होती.

गांधीजींचे अहिंसावादी धोरण पटत नसल्याने इंग्रजांशी लढा देण्यासाठी सुभाषचंद्र बोस यांनी जर्मनी,जपान,इटलीची मदत देखील घेतली.

 

दुसरया महायुदधाच्या काळात इंग्रजांशी लढण्याकरीता त्यांनी आझाद हिंद सेनेची स्थापणा देखील केली.

आणि भारतीय तरूणांना आव्हान केले की तुम्ही मला तुमचे रक्त द्या मी तुम्हाला तुमचे स्वातंत्र्य मिळवून देतो असे आवाहक तरूणांना इंग्रजाविरूदध लढा देण्यासाठी केले होते.

भारतीय स्वातंत्र्याच्या लढयात त्यांना तब्बल अकरा वेळा कारावसात जावे लागले होते.पुर्व सीमेवरून प्रवेश करत भारताला इंग्रजांच्या ताब्यातुन मुक्त करण्यासाठी चलो दिल्ली असे नारा देत आपली सर्व फौज ते दिल्लीकडे घेऊन वळले.

पण सिंगापुरहुन जपानी विमानाने सिंगापुर कडे जात असताना 28 आँगस्ट 1945 रोजी विमानाला अपघात झाला आणि त्यातच त्यांचा मृत्यु देखील झाला.

 

14) महात्मा गांधी :

 महात्मा गांधी यांचा जन्म 2 आँक्टोंबर 1869 रोजी गुजरात राज्यात झाला होता.

महात्मा गांधी हे अहिसेंचे पुजक होते कुठलेही कार्य मोहीम ते अहिंसावादी पदधतीने पार पाडायचे.

इंग्रजांनी भारत सोडुन कायमचे निघुन जावे यासाठी महात्मा गांधी असहकार आंदोलन ज्यात भारतीयांनी इंग्रज अधिकारींना कुठलेही सहकार्य करायचे असे त्यांनी घोषित केले होते.

याचसोबत सायमन कमिशनमध्ये भारतीयांना स्थान दिले जावे नहीतर सायमन कमिशनने भारतातुन चालते व्हावे असे त्यांनी सायमन परत जा असे म्हणत इंग्रजांविरूदध भारत छोडो आंदोलन केले,सत्याग्रह अशा अनेक चळवळी उभारल्या.

See also  दुधाचे पासून बनवले जाणारे पदार्थ - Milk products information in Marathi

परदेशी वस्तुंचा त्याग करून स्वदेशीचा पुरस्कार महात्मा गांधीनी केला.ज्यात फक्त आपल्या भारतातील सर्व नागरीकांनी भारतातील वस्तुंचाच वापर करावा विदेशी वस्तुंवर बहिष्कार टाकावे असा संदेश त्यांनी दिला.

आणि शेवटी महात्मा गांधीच्या अहिंसावादी लढयाच्या प्रयत्नांना अखेर यश प्राप्त झाले आणि शेवटी 15 आँगस्ट 1947 रोजी इंग्रजांनी भारत सोडुन पलायन केले.

पण 30 जानेवारी 1948 रोजी नथुराम गोडसेने गांधीजींवर गोळया झाडल्या ज्यात गांधीजींचा मृत्यु झाला.

 

15) सरदार वल्लभाई पटेल :

 सरदार वल्लभभाई पटेल यांचा जन्म 31 आँक्टोंबर 1875 रोजी गुजरात राज्यातील नाडीयाड या गावी झाला होता.

महात्मा गांधी यांच्यापासुन प्रेरित होऊन गांधीं यांनी सुरू केलेल्या असहकार चळवळीत सरदार वल्लभभाई पटेल हे देखील सहभागी झाले होते.

त्यांनी गुजरात राज्यातील काँग्रेसचे अध्यक्ष असताना अहमदाबाद शहरातील ब्रिटीश वस्तुंवर बहिष्कार घातला.सरदार वल्लभाई पटेल

गांधीजींच्या स्वदेशी आंदोलनात सहभागी होत त्यांनी आपल्या ब्रिटीश कपडयांचा त्याग केला आणि स्वदेशी खादीपासुन तयार केलेले कपडे परिधान करणे सुरू केले.अशी अनेक देशसेवेची कार्ये त्यांनी केली स्वातंत्र्यासाठी गांधीजींच्या मार्गाने चालत लढा देत राहिले.

अशा ह्या स्वतातंत्र्याच्या लढयात मोलाची काम करणारया भारताच्या पोलादी पुरूषाचा सरदार वलल्ल्भाई पटेल यांचा 15 डिसेंबर 1950 रोजी मृत्यु झाला.

 

16)  बाबासाहेब आंबेडकर : Female freedom fighters of India in Marathi language

 बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्य 14 एप्रिल 1891 रोजी मध्यप्रदेशातील महु ह्या गावी झाला होता.

पहिल्या गोलमेज परिषदेमध्ये भारतातील कोणताही मोठा नेता नसताना बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतंत्र राज्यघटना,मतदानाचा अधिकार या अधिकाराला मान्यता प्राप्त करून दिली. बाबासाहेब आंबेडकर

भारताची स्वताची स्वतंत्र राज्यघटना तयार करणे,देशातील जनतेला समानतेचे महत्व पटवून देणे,अस्पृश्यांना त्यात त्यांचा अधिकार प्राप्त करून देऊन जातीभेद नष्ट करणे अशी अनेक मोलाची कार्ये बाबासाहेब आंबेडकरांनी केली.

अशा ह्या महान नेत्याचा मृत्यु 6 डिसेंबर 1956 रोजी झाला होता.

 

 

 

17) सरोजिनी नायडु :

 सरोजिनी नायडु यांचा जन्म 13 फेब्रुवारी 1879 रोजी हैदराबाद येथे झाला.त्यांचा जन्म हा महिला दिन म्हणुन देखील साजरा केला जातो.

भारताचे संविधान तयार करण्यासाठी जी कमिटी तयार केली गेली होती सरोजिनी नायडु त्या कमिटीच्या सदस्य होत्या. सरोजिनी नायडू

बंगालची फाळणी होत असताना पंडित जवाहरलाल नेहरू आणि महात्मा गांधी यांच्यासोबत स्वातंत्र्याच्या लढयात आपले योगदान देखील सरोजिनी नायडु यांनी दिले.

यासाठी त्यांनी परदेशात जाऊन भाषणे केली काव्यवाचन केले आणि लोकांना त्यातुन स्वातंत्र्याचे महत्व आपल्या भाषणातुन पटवून दिले.

सरोजिनी नायडु यांचा मृत्यु हा 2 मार्च 1949 रोजी झाला.

 

18) डाँ राजेंद्रप्रसाद :

 डाँ राजेंद्र प्रसाद यांचा जन्म 3 डिसेंबर 1884 रोजी जिरादेई येथे झाला होता.

डाँ राजेंद्रप्रसाद यांचा व्यवसाय वकिली असुन देखील त्यांनी वकिली सोडुन देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी देशाच्या स्वातंत्र्य चळवळीत भाग घेतला.

1920 मधील असहकार चळवळीत देखील त्यांनी गांधीजींसोबत भाग घेतला.यासाठी त्यांनी आपल्या मुलाचा दाखला इंग्रजी विदयापिठातुन काढुन बिहार येथील विद्यापीठात त्याला दाखल केले.

एवढेच नव्हे तर गांधीजींच्या अनेक चळवळीत जसे असहकार चळवळ,चले जाओ आंदोलन,मिठाचा सत्याग्रह इत्यादी मध्ये त्यांचा सहभाग होता.ज्यात त्यांना कित्येकदा तुरूंगात देखील टाकण्यात आले होते.

डाँ राजेंद्रप्रसाद यांचा मृत्यु 28 फेब्रुवारी 1963 रोजी झाला.

 

 

 

 

19) गोपाळ कृष्ण गोखले :Female freedom fighters of India in Marathi language

 गोपाळ कृष्ण गोखले यांचा जन्म 9 मे 1866 रोजी रत्नागिरी जिल्हयातील कोतळुक ह्या गावात झाला होता.

भारतात असलेल्या ब्रिटीश सत्तेविरूदध कायदेशीर आणि राजनैतिक पदधतीने गोपाळ कृष्ण गोखले यांनी लढा दिला.गोपाळ कृष्ण गोखले हे मवाळ विचारसरणीचे नेते होते.

ब्रिटीश सत्ता ही आपल्या भारतासाठी एक वरदान आहे असे त्यांचे मत होते.म्हणजेच ब्रिटीश सत्तेला फारसा यांचा विरोध असलेला आपणास दिसुन येत नाही.

गोपाळ कृष्ण गोखले यांचा मृत्यु 19 फेब्रुवारी 1915 रोजी झाला होता.

 

 

 

20) स्वातंत्र्यवीर सावरकर :

 सावरकरांचा जन्म 28 मे 1883 रोजी नाशिक जिल्हयातील भगुर गावी झाला.

 विनायक दामोदर सावरकर हे एक असे थोर स्वातंत्र्यसेनानी होते ज्यांना स्वातंत्र्याच्या लढाईत अनेक वर्षे कारावास भोगावा लागला.

गांधीजींच्या स्वदेशी चळवळीला पाठिंबा देत सावरकरांनी सर्व विदेशी वस्त्रे टाकुन टाकली होती.

आपल्या भारत देशाला ब्रिटीशांच्या तावडीतुन मुक्त करण्यासाठी त्यांनी पुणे येथे ब्रिटीशांविरूदध भडकवून देशभक्त तरूणांची एक मित्रमेळा संघटना स्थापण केली जिचे पुढे अभिनव भारतमध्ये देखील रूपांतर केले गेले.ज्यात त्यांच्यावर राजद्रोहाचा आरोप करून त्यांची बँरिस्टर पदवी देखील हिरावून घेतली गेली.

त्यांना काळापाणीची शिक्षा देखील ठोठावण्यात आली.तरी देखील त्यांनी देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्याचा ध्यास शेवटच्या श्वासापर्यत सोडला नाही.

 

26 फेब्रूवारी 1966 रोजी त्यांचा मृत्यु झाला.

भारतातील इतर स्वातंत्र्य सेनानीची नावे – List of 40 Greatest Freedom Fighters Of India

भारताच्या स्वातंत्र्य चळवळीत आपले अमुल्य योगदान देणारे इतर भारतातील स्वातंत्र्य सेनानीची नावे पुढीलप्रमाणे  :Freedom fighters of India Images with names

 

 1. मदन मोहन मालवीय :
 2. रविंद्रनाथ टागोर :
 3. दादाभाई नौरोजी :
 4. तात्या टोपे :
 5. बिपिनचंद्र पाल :
 6. नानासाहेब पेशवे :
 7. कुवरसिंग :
 8. राजगोपालचारी :
 9. सेनापती बापट :
 10. अब्दुल कलाम :
 11. मदनलाल धिंग्रा :
 12. कस्तुरबा गांधी :
 13. गोविंद वल्लभ पंत :
 14. रासबिहारी बोस :
 15. जयप्रकाश नारायण :
 16. अँनी बेझंट :
 17. सुबोध राँय :
 18. गणेश शंकर विदयार्थी :
 19. सुर्या सेन :
 20. बटुकेश्वर दत्त :
 21. गणेश घोष :
 22. बिरसा मुंडा :
 23. अशफाउल्ला खान :
 24. बहादुर शाह जफर
 25. राम प्रसाद बिस्मिल्ला :
 26. देवी दुर्गावती :
 27. टिळक मंजी :
 28. सुचेता कृपलानी :
 29. तारकनाथ दास :
 30. सुरेंद्रनाथ बँनर्जी :
 31. उल्हासकार दत्ता :
 32. सरत चंद्र बोस :
 33. बेगम हजरत महाल
 34. के एम मुंशी :
 35. चित्तरंजन दास :
 36. अब्दुल हफीज मोहम्मद बराक उल्ला
 37. मातंगिनी हाजरा :
 38. कमलादेवी चटटोपाध्याय
 39. अश्फाक अली :
 40. कल्पणा दत्ता :

Freedom fighters of India Images with names

भारतीय स्वातंत्र्य सेनानींविषयी वारंवार विचारले जाणारे अत्यंत महत्वाचे प्रश्न – FAQ about Greatest Freedom Fighters Of India

 

भारतीय स्वातंत्र्य स्त्रियांची सेनानींची नवे – Who are women freedom fighter in India?

1)भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी लढा दिलेल्या स्त्रियांची नावे काय आहेत? List of women freedom fighter names in India)

 भारताच्या स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी लढा दिलेल्या काही प्रमुख स्त्रियांची नावे पुढीलप्रमाणे आहेत :

 

 1. राणी लक्ष्मीबाई
 2. सरोजिनी नायडु
 3. कल्पणा दत्ता
 4. कमलादेवी चटटोपाध्याय
 5. बेगम हजरत महल
 6. सुचेता कृपलानी
 7. देवी दुर्गावती
 8. अँनी बेझंट
 9. सावित्रीबाई फुलेमहादेवी वर्मा
 10. बसंती देवी
 11. मातंगिनी हाजरा
 12. कनकलता बरूवा
 13. अरूणा असफ अली
 14. भिकाजी कामा
 15. तारा राणी श्रीवास्तव
 16. मुलमाती
 17. लक्ष्मी सेहगल
 18. किटटुर राणी चिन्नमा
 19. कस्तुरबा गांधी
 20. कमला नेहरू
 21. झलकारी बाई
 22. उडा देवी
 23. अम्मु स्वामीनाथन
 24. उमाबाई कांदापुर
 25. विजयालक्ष्मी पंडित
 26. बेगम रोईका
 27. दुर्गा बाई देशमूख
 28. उशा मेहता

भारतरत्न पुरस्काराविषयी माहीती – भारतरत्न पुरस्कारार्थी 1954 ते आजपर्यंत –

 

इमेज सोर्स – विकिपीडिया

भारत सरलर