संविधान म्हणजे काय – भारतीय संविधानाविषयी म्हत्वाचे मुद्दे – What Is a Constitution
देशाच्या कारभारासंबंधीच्या तरतुदी एकत्रितपणे व सुसूत्रपणे ज्या ग्रंथात नमूद केलेल्या असतात त्याला संविधान असे म्हणतात. याचाच अर्थ संविधान म्हणजे देशाच्या राज्यकारभारासंबंधीच्या तस्तुदींचा लिखित दस्तऐवज होय.
- जनतेकडून निवडून आलेल्या प्रतिनिधींमधून शासन किंवा सरकार स्थापन केले जाते. संबिधानातील तरतुदींनुसारच राज्यकारभार करण्याचे शासनावर बंधन असते.
संविधानातील तरतुदी किंवा त्यात नमूद केलेला कायदा मूलभूत असतो. - संविधानास विसंगत ठरतील असे कायदे शासनाला करता येत नाहीत. असे केल्यास ते कायदे न्यायमंडळ रद्द ठरवू शकते.
- संविधानातील तरतुदी अनेकविध बाबींविषयी असतात. उदा., नागरिकत्व, नागरिकांचे हक्क, नागरिक आणि शासनसंस्था यांच्यातील संबंध, शासनाने करायच्या कायदयांचे बिषय, निवडणुका, शासनावरील मर्यादा व राज्याचे अधिकारक्षेत्र इत्यादी.
- संविधानानुसार राज्यकारभार करण्याचे तत्त्व बहुतेक सर्वच देशांनी स्वीकारले आहे. असे असले तरी प्रत्येक देशाच्या संविधानाचे स्वरूप वेगवेगळे असते.
- इतिहास, समाजरचना, संस्कृती, परंपरा इत्यादी बाबतींत देशादेशांमध्ये भिन्नता असते किंबा वेगळेपण असते. त्याचप्रमाणे राष्ट्रांच्या गरजा व उदिष्टेही भिन्न असू शकतात. त्यास अनुरूप असे संविधान निर्माण करण्याचा प्रयत्न ते ते राष्ट्र करते.
- आपला देश 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वतंत्र झाला. तत्पूर्वी भारताबर इंग्रजांचे राज्य होते.
इंग्रज सरकारने राज्यकारभाराच्या सोईसाठी मुंबई प्रांत, बंगाल प्रांत ब मद्रास प्रांत यांसारखे बिभाग पाडले होते.
या डॉ.राजेंद्रप्रसाद प्रांतांपधील कारभार तेथील लोकप्रतिनिधींमार्फत चालवला जात होता. त्याचबरोबर देशातील काही भागांचा कारभार तेथील स्थानिक राजे पाहत होते.अशा भागांना संस्थाने म्हणत व त्यांचे प्रमुख संस्थानिक म्हणून ओळखले जात. संविधान सभेत प्रात आणि संस्थानांचे प्रतिनिधी यांचा समाबेश होता.
संविधान सभेत एकूण 299 सदस्य होते. डॉ.राजेंद्रप्रसाद हे संविधान सभेचे अध्यक्ष होते. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे
योगदान डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे मसुदा समितीचे अध्यक्ष होते. त्यांचा बिबिध देशांच्या संबिधानाचा गाढा अभ्यास होता.
त्यांनी अहोरात्र अभ्यास ब चिंतन करून संविधानाचा मसुदा तयार केला. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी तयार केलेला संविधानाचा मसुदा संबिधान सभेपुढे मांडण्यात आला. त्यावर कलमवार चर्चा झाली. अनेक दुरुस्त्या सुचवण्यात आल्या.
संविधानाचा मसुदा संविधान सभेपुढे मांडण्याचे, त्याविषयी बिचारलेल्या प्रश्नांना उत्तरे देण्याचे, तसेच संबिधान सभेच्या सूचनांनुसार मूळ मसुद्यात फेरबदल करण्याचे, प्रत्येक तरतूद निर्दोष करण्याचे काम डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी केले.
भारताच्या संविधान निर्मितीतील या योगदानामुळे त्यांना भारतीय संविधानाचे शिल्पकार म्हणतात.
भारताचा संविधान दिन – 26 नोव्हेंबर
26 नोव्हेंबर या दिवशी संविधान दिन (राष्ट्रीय विधी दिन किंवा राज्यघटना दिन) संपूर्ण भारतभर साजरा केला जातो.
भारताचा संविधान दिन इतिहास.
1) दि. 29 ऑगस्ट 1947 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संविधानाच्या निर्मितीसाठी मसूदा समितीची स्थापना झाली
2) आणि अंतिम मसुदा दि. 26 नोव्हेंबर 1949 रोजी संविधान समितीने स्वीकारला.
3) त्या संविधानाचे राष्ट्रार्पण दि. 26 जानेवारी 1950 रोजी करण्यात आले.
4) दि. 19 नोव्हेंबर 2015 रोजी भारत सरकारने एका अधिसूचनेद्वारे 26 नोव्हेंबरला ‘संविधान दिन’ म्हणून घोषित केले.
5) त्याआधी, 1979 सालापर्यंत हा दिन ‘राष्ट्रीय विधी दिन’ म्हणून पाळला जात होता.
भारताचा संविधान विषयी..
6) भारत हा सरकारच्या एक संसदीय प्रणालीसह एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही प्रजासत्ताक आहे.
7) संविधानानुसार भारत कायद्यात निर्दिष्ट नियमांच्या हद्दीत कामकाज करणारा शासित देश ठरलेला आहे.
8) ससदीय लोकशाही, संघराज्यीय पद्धत, मुलभूत हक्क व त्यासाठी (न्यायालयीन यंत्रणा), मार्गदर्शक तत्त्वे, केंद्र राज्य संबंध, संविधानात दुरुस्ती ही संविधानातली प्रमुख अंगे आहेत.
9) भारतीय संविधान धर्मनिरपेक्ष लोकशाही प्रजासत्ताक घडविण्याचा व सर्व नागरिकांना समता, स्वातंत्र्य आणि बंधुतेची शिकवण देते.
10) भारताचे राष्ट्रपती हे भारताच्या केंद्रीय कार्यकारी मंडळांचे संविधानात्मक प्रमुख आहेत.
11) भारतात संविधानाची अंमलबजावणी दोन घटकांमधून केली जाते: पहिले राजकारणीद्वारे चालवली जाणारी सभागृहे आणि दुसरे म्हणजे कायदा न्यायप्रणाली (भारतीय न्यायालये).
12) भारतीय संविधान सार्वभौम राष्ट्रासाठीचे जगातले सर्वात मोठे संविधान आहे.
अलबामा या देशाच्या संविधानानंतर, भारतीय संविधान 1,45,000 शब्दांसह जगातले दुसरे सर्वात मोठे व सक्रिय संविधान आहे.
संविधानच्या अंमलबजावणी करताना या , संविधानात
• 22 भागात 395 कलम आणि 8 अनुसूची होते.
• आज संविधानात प्रस्तावना आणि 25 भागात 448 कलम
• आणि 12 अनुसूची व 5 परिच्छेद आहेत.
• संविधानात आतापर्यंत 103 वेळा दुरूस्ती झाली.
13) 1950 साली अमलात आलेले भारतीय संविधान मुख्यत्वे 1935 च्या भारत सरकार कायद्यावर (Government of India Act of 1935) वर आधारित आहे.
14) नागरिकत्व, निवडणूका व अंतरिम संसदेविषयीचे आणि इतर काही तात्पुरत्या बाबी तत्काळ लागू झाल्या.
15) संविधान संपूर्ण रूपानेजानेवारी 26, 1950 रोजी लागू झाले.त्यामुळे 26 जानेवारी हा दिवस ‘भारतीय प्रजासत्ताक दिन’ म्हणून साजरा केला जातो.

16) भारताची राज्यघटना उद्देशिका (Preamble), मुख्य भाग व 12 पुरवण्या (परिशिष्टे) अशा स्वरूपात विभागली आहे.
17) मुख्य संविधानाचे 22 विभाग असून त्यांची अनेक प्रकरणांमध्ये विभागणी केलेली आहे.
18) सुरूवातीच्या 395 कलमांपैकीची काही कलमे आता कालबाह्य झाली आहेत.
19) सध्या राज्यघटनेत 447 कलमे असून भारतीय संविधान जगातल्या सर्वांत मोठ्या संविधानांमध्ये मोडते.
20) भारतीय संविधानाच्या उद्देशिकेप्रमाणे भारत हे सार्वभौम (Sovereign) , समाजवादी (Socialist), धर्मनिरपेक्ष (Secular), लोकशाही (Democratic) प्रजासत्ताक(Republic) आहे.
21) मूळ उद्देशिकेत समाजवादी (Socialist) व धर्मनिरपेक्ष (Secular) हे शब्द नव्हते.
22) राज्यघटनेच्या 42 व्या दुरूस्तीद्वारे ते उद्देशिकेत घालण्यात आले.
संविधान प्रत -सर्व भाषेतील प्रती करता इथे क्लिक करा
संविधानचे इंग्रजी आणि हिंदी या दोन्ही भाषेत हस्तलिखीत सुदधा आहेत . प्रेम बिहारी नाराइन राईजदा यांच्या सुंदर हस्ताक्षराने संविधान लिहिले गेले आणि त्यामधली कलाकृती या नंदलाल बोस आणि इतर कलाकार यांच्याकडून केली.
भारतीय घटनेत घेतलेल्या गोष्टी
1) संसदीय शासन पद्धती : इंग्लंड
2) मार्गदर्शक तत्वे : आयर्लंड
3) मूलभूत हक्क : अमेरिका
4) न्यायमंडळाचे स्वातंत्र्य : अमेरिका
5) न्यायालय पुनर्विलोकन : अमेरिका
6) कायद्याचे अधिराज्य : इंग्लंड
7) सामूहिक जबाबदारीची तत्वे : इग्लंड
8) कायदा निर्मिती : इंग्लंड
9) लोकसभेचे सभापती पद : इंग्लंड
10) संसदेच्या दोन्ही सभागृहांचे संयुक्त अधिवेशन : ऑस्ट्रेलिया
11) संघराज्य पद्धत : कॅनडा
12) शेष अधिकार : कॅनडा
भारतीय राज्यघटना – जाणून घ्या आपले मूलभूत हक्क आणि कर्तव्य
संविधान दिन इतिहास अणि महत्व – Constitution day history and importance in Marathi
भारतीय राज्यघटना (Indian Constitution In Marathi) – जाणून घ्या आपले मूलभूत हक्क आणि कर्तव्य
I like your information thank you so much
Thankyou