सर्वात कठीण 10 परीक्षा भारत – Top 10 Toughest Exams in India Marathi information
परीक्षा हा प्रत्येक विदयार्थ्याच्या शिक्षणातील एक अत्यंत महत्वाचा घटक आहे.ज्यात परीक्षक आपल्या क्षमतेची चाचणी करतात.
याचसोबत वेळेचे व्यवस्थापन करणे,कठोर परिश्रम करणे,संयम राखणे ही आपल्या व्यक्तीमत्वातील मुख्य वैशिष्टये परिक्षेमुळेच विकसित होत असतात.
परदेशात शिक्षण घेण्यासाठी चांगल्या काँलेजात प्रवेश प्राप्त करायला,एखाद्या कंपनीत,संस्थेत नोकरी मिळविण्यासाठी अँप्लाय केल्यावर देखील योग्य उमेदवाराची निवड करण्यासाठी मुलाखतीच्या स्वरूपात आपली परिक्षा घेतली जात असते.
म्हणजेच आज जीवणाच्या प्रत्येक पातळीवर आपणास परिक्षेला सामोरे जावे लागते.भारतात आज अशा अनेक अवघड परीक्षा आहेत.
ज्या त्यांच्या अवघड पँटर्नसाठी मुख्यकरून ओळखल्या जातात.आज आपण Top 10 Toughest Exams in India विषयी जाणुन घेणार आहोत.
ज्या उत्तीर्ण होण्यासाठी उमेदवारांना दिवसरात्र अभ्यास करून परिश्रम घ्यावे लागतात.आणि ज्यात उत्तीर्ण होणे सोपी गोष्ट नसते.म्हणुन या परीक्षांत उत्तीर्ण होत असलेल्या उमेदवाराचे देशभर कौतुक आणि अभिनंदन देखील केले जाते.
कोणकोणत्या आहेत?
भारतातील top 10 toughest exams ची नावे पुढीलप्रमाणे आहेत :
1)युपीएससी सिव्हील सर्विस परीक्षा :
2) आय आयटी-जेईई :
3) चार्टड अकाऊंटंट :
4) नीट यु.जी :
5) ए.आय-आय.एम.एस युजी :
6) गँट परिक्षा :
7) एन-डी-ए परीक्षा :
8) सी.एल.एटी :
9) यु.जी.सी नेट :
10) एन-आय-डी-ई ई :
1)युपीएससी सिव्हील सर्विस परीक्षा :
युपीएससीचा फुल फाँर्म (union public service commission) असा आहे.
युपीएससी नागरी सेवा परिक्षा ह्या केंद्र सरकारमधील सर्वोच्च प्रशासकीय पदांवर योग्य आणि पात्र उमेदवारांची भरती करण्यासाठी आयोजित केल्या जात असतात.
ही परिक्षा आय ए एस,आयपीएस,आय एफ एस इत्यादी सारख्या सर्वोच्च पदांसाठी आयोजित केली जात असते.
यात परिक्षेचे स्वरूप हे पुर्व परिक्षा,मुख्य परिक्षा,मुलाखत असे असते.ज्यात उत्तीर्ण होण्यासाठी प्रत्येक उमेदवाराला गांभीर्य,पुर्ण समर्पण आणि कठोर परिश्रमाची गरज असते.
युपीएससीचा अभ्यासक्रम हा विस्तृत असतो.म्हणजेच यात कुठल्याही एकाच विषयाचा अभ्यास आपल्याला करावा लागत नसतो.
तर यात आपणास विविध विषयांचा सखोल अभ्यास करावा लागत असतो,त्यासाठी विविध संदर्भ ग्रंथांचा एनसीआरटीचा अभ्यास करावा लागतो,करंट अफेअर्स विषयी जाणुन घेण्यासाठी रोज न्युज बघाव्या लागतात,नियमित वर्तमानपत्र वाचावे लागते.
आणि एवढया गांभीर्याने,पुर्ण समर्पण करून,कठोर मेहनत घेऊन अभ्यास करून देखील कधीकधी काही उमेदवारांना युपीएससी परीक्षा उत्तीर्ण व्हायला दोन तीन वर्षे लागुन जात असतात.यावरून आपणास ह्या परिक्षेचे काठिण्य लक्षात येते.
म्हणुनच युपीएससी ही जगातील सर्व अवघड परिक्षांपैकी पहिल्या क्रमांकाची अवघड परिक्षा म्हणुन ओळखली जाते.
2) आय आयटी-जेईई :
आय आयटी चा फुल फाँर्म (Indian institute of technology) असा होतो.
इंडियन इंस्टीटयुट आँफ टेक्नाँलाँजी मधील विविध इंजिनिअरींगच्या अभ्यासक्रमात प्रवेश घेत असलेल्या विदयार्थ्यांची गुणवत्ता टेस्ट घेण्यासाठी घेतली जाणारी काँमन इंनट्रान्स एक्झाम म्हणजेच आय आयटी जेईई.
ही परीक्षा आय आयटी जेईई मेन्स आणि आय आयटी जेईई अँडव्हान्स अशा दोन टप्प्यात घेतली जात असते.
मोठया प्रतिष्ठीत आय आयटी काँलेजमध्ये,संस्थेत प्रवेश घेण्यासाठी दिवस रात्र अभ्यास करून विदयार्थी मोठया संख्येत ही प्रवेश परिक्षा देत असतात.
ज्यापैकी मोजक्याच योग्य आणि पात्र उमेदवारांची निवड त्या महाविद्यालयात तसेच संस्थेत शिक्षण घेण्यासाठी केली जात असते.यावरून ही परिक्षा किती अवघड पातळीची असेल याचा आपणास अंदाज येऊन जातो.
ह्या परिक्षेचे अवघड पँटर्न आणि परिक्षा पास होण्यासाठी विदयार्थ्यांची होणारी दगदग धडपड आणि परिक्षेचे काठिण्य ह्या स्पर्धेला भारतातील सगळयात कठिन परिक्षांपैकी एक बनवते.
3) चार्टड अकाऊंटंट :
चार्टड अकाऊंट ही (institute of chartered account of india) द्ववारे आयोजित केली जाणारी परीक्षा आहे.
सी ए ची परीक्षा पास होण्यासाठी अभ्यास करावयाच्या अभ्यासक्रमाचा एक कठोर आणि अवघड नमुना उमेदवारांसमोर असतो.
पण ही परिक्षा पास झाल्यावर आपणास एका चांगल्या वेतनासोबत यशस्वी करिअरची हमी प्राप्त होत असते.पण ही परीक्षा पास करण्यासाठी आपल्याला तेवढी मेहनत देखील घ्यावी लागत असते.
ही परीक्षा तीन टप्पयात घेतली जाते.ज्यात पहिले सी-पी-टी टेस्ट(common proficiency test),आय-पी-सीसी टेस्ट(integrated professional compitance course),आणि मग सीए च्या पदासाठी उमेदवारांची फायनल एक्झाम घेतली जात असते.
आणि सगळयात महत्वाची गोष्ट म्हणजे सी-पी-टी टेस्ट,आय-पी-सीसी टेस्ट,इंटिग्रेटेड प्रोफोशनल काँम्पिटन्स कोर्स तसेच सीए ची फायनल एक्झाम क्रँक करणे करणे खुप अवघड मानले जाते.आणि यासाठी व्यापक नियोजन आणि कठोर परिश्रमाची आवश्यकता असते.
म्हणुन सीए ची परीक्षा ही एक अवघड परिक्षा म्हणुन ओळखली जाते.
4) नीट यु.जी :
भारतात वैदयकीय अभ्यासक्रमासाठी एखाद्या मोठया वैदयकीय संस्था महाविद्यालयात प्रवेश प्राप्त करण्यासाठी NEET परिक्षा देणे आणि त्यात उत्तीर्ण होणे प्रत्येक वैदयकीय अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेऊ इच्छित उमेदवारासाठी हे अनिवार्य असते.
एनटीए (national testing agency) द्वारे प्रिमेडिकल टेस्ट दरवर्षी एमबीबीएस,बीडीएस,ए आय एम एस इत्यादी अभ्यासक्रम वगळता उच्च वैदयकीय महाविद्यालयातील इतर अभ्यासक्रमांसाठी योग्य आणि पात्र उमेदवारांची निवड करायला घेतली जात असते.
ही परीक्षा वैदयकीय अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेऊ इच्छित असलेले बारावी पास उमेदवार देऊ शकत असतात.
नीट परिक्षा ही सर्वात स्पर्धात्मक परिक्षा असते. वैदयकीय अभ्यासक्रमास प्रवेश प्राप्त करण्यासाठी ही परिक्षा सुमारे पंधरा ते वीस लाख इतके विदयार्थी देत असतात.
ह्या परिक्षेचा अभ्यासक्रम मोठा आणि विस्तृत असतो त्यामुळे बहुतेक विदयार्थी ह्या परिक्षेची तयारी करणे बारावीत प्रवेश घेतल्यावरच सुरू करून देत असतात.
5) ए.आय-आय.एम.एस युजी (AIIMS UG):
आय-आय.एम.एस युजी ही परीक्षा (all india institute of medical science) द्वारे आयोजित केली जात असते.
आय-आय.एम.एस युजी चे आयोजन हे AIIMS च्या सात कँम्पसमध्ये आँफर केल्या गेलेल्या एम बी बीएस पदवीसाठी उमेदवार निवडायला केले जाते.
ए-आय-आय एम एस हे प्रत्येक वैदयकीय इच्छुक उमेदवाराचे स्वप्न मानले जाते.त्यामुळे मोठया संख्येने या अभ्यासक्रमात प्रवेश मिळवण्यासाठी दरवर्षी उमेदवारांचे अर्ज येत असतात.
ही परीक्षा अवघड मानली जाण्याचे अनेक कारण आहेत ही परिक्षा फक्त काही मर्यादीत जागांसाठीच घेतली जात असते.आणि ही परिक्षा उच्च कठिण स्तरावर आयोजित केली जाते.
प्रत्येक वर्षी मोठया संख्येने या अभ्यासक्रमात प्रवेश मिळवण्यासाठी दरवर्षी लाखो उमेदवारांचे अर्ज येत असतात.
पण आयोजक मंडळाने मर्यादित जागांचीच भरती करण्यासाठी ही परीक्षा आयोजित केली जात असल्याने म्हणुन योग्य आणि पात्र उमेदवारांनाच येथे कट आँफ केले जाते.आणि उमेदवार किती पात्र आणि योग्य आहे याची निश्चित खात्री करून घेण्यासाठी प्रश्नांच्या अडचणपातळीत वाढ देखील केली जात असते.
म्हणुनच ही परिक्षा एक अवघड परिक्षा मानली जाते.
आणि एक महत्वाची गोष्ट म्हणजे 2020 मध्ये ए आय एम एस (AIIMS) ने AIIMS UG परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. आणि त्याठिकाणी NEET ही परिक्षा AIIMS मधील एमबी-बीएस (MBBS) पदवी शिक्षणाच्या प्रवेशासाठी सामान्य परीक्षा म्हणून घेतली जाणार आहे.
6) गँट परिक्षा (Gate exam):
गँट परिक्षा ही इंजिनिअरींग क्षेत्रातील पदव्युतर अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेण्यासाठी घेतली जात असते.ही परिक्षा भारतीय विज्ञान संस्थेकडून घेतली जात असते.
गँट परिक्षेत आपल्याला पदवीच्या चार वर्षात जो अभ्यासक्रम शिकवला गेला आहे तो सर्व अभ्यासक्रम यात समाविष्ट केला जातो.
ही परिक्षा आँनलाईन पदधतीने आयोजित केली जात असते.यात परीक्षा देत असलेल्या उमेदवारांचे पुढील दोन पँरामीटरच्या आधारे मुल्यमापन केले जाते.
1)एक काँमन अँबीलिटी टेस्ट
2) टेक्नीकल आणि इंजिनिअरींग मँथेमँटिकल नाँलेज.
ही परिक्षा अवघड मानले जाण्याचे कारण हे आहे की ही परीक्षा मोजक्याच जागांसाठी घेतली जाते तसेच मोठया संख्येत प्रत्येक वर्षी उमेदवार ही परिक्षा देत असतात.
पण ज्यांचा बीई/बी-टेक ह्या अभ्यासक्रमाचा अभ्यास उत्तम सखोल झालेला असतो असेच मोजकेच उमेदवार ह्या परिक्षेत उत्तीर्ण होत असतात.कारण यात त्याच अभ्यासक्रमाची पडताळणी घेतली जात असते.
7) एन-डी-ए परीक्षा :
एनडी ए चा फुल फाँर्म (national defence academy असा आहे.
सेना,नौदल आणि हवाई दलातील उमेदवारांची भरती करण्यासाठी सेवा निवड मंडळ(SSB-service selection board) कडुन एनडीएची परिक्षा घेतली जात असते.
देशातील सर्वात प्रतिष्ठित डिफेन्स अकँडमीसाठी सर्वोतम उमेदवारांची तपासणी करायला ही परिक्षा वर्षातुन दोन वेळेस घेतली जाते.
एनडी ए परिक्षेच्या पँटर्नमध्ये SSB interview सोबत उमेदवारांची written test आणि physical fitness test देखील घेतली जात असते.
यात उमेदवाराच्या मैदानी कामगिरीचे मुल्यांकन करायला त्याच्याकडुन विविध अँक्टीव्हीटी करून घेतल्या जात असतात.
एनडीए परिक्षेत पास होण्यासाठी उमेदवाराला हे सर्व टप्पे पार पाडावे लागतात.
एनडीए परिक्षा ही देखील एक खूप अवघड परिक्षा मानली जाते कारण यात प्रत्येक उमेदवारास अभ्यासक्रमाचा सखोल अभ्यास करावा लागतो,तसेच लेखी परिक्षेत आणि शारीरीक पात्रता चाचणीत देखील पास व्हावे लागते.
8) सी.एल.एटी(CLAT) :
CLAT चा फुल फाँर्म (common law admission test) असा होतो.
सी-एल-एटी ही एक entrance exam आहे.जी एल- एलबी(LLB) आणि एल एल एम(LLM) अभ्यासक्रमाला प्रवेश देण्यासाठी घेतली जात असते.
जरी काही लाँ काँलेज LSAT चा स्वीकार करत असतात पण इतर काही प्रवेशांसाठी CLAT स्कोअर महत्वाचा असतो.
ही परीक्षा वर्षातुन एकदा घेतली जात असते.आणि ही परीक्षा आँफलाईन मोडमध्ये घेतली जात असते.
यात पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी उमेदवाराने बारावी पास असणे आवश्यक आहे.तर पदव्युत्तर अभ्यासक्रमाला प्रवेश मिळविण्यासाठी बँचलर डिग्री असणे आवश्यक आहे.
ह्या परीक्षेत पास होण्यासाठी उमेदवाराला कायद्याचे उत्तम सखोल ज्ञान असणे आवश्यक असते.म्हणुन ही परीक्षा एक अवघड परीक्षा मानली जाते.
9) यु.जी.सी नेट :
युजीसी नेट ही राष्टीय पातळीवरील परीक्षा आहे.ही परिक्षा भारतीय विद्यापीठ आणि महाविद्यालयांत सहाय्यक प्राध्यापक आणि जेआर एफ पदाच्या भरतीसाठी घेतली जात असते.
जगभरातील सगळयात कठिन परिक्षांमधील एक परिक्षा ही असते.एकुण 83 विषयांवर आणि जगातील 81 सेंटरवर ही परीक्षा आयोजित केली जात असते.
2018 पासुन (national testing agency)अधिपत्याखाली ही परीक्षा आयोजित केली जाते.
ज्या उमेदवारांचे पदव्युत्तर शिक्षण पुर्ण झाले आहे ते नेट परिक्षेसाठी अँप्लाय करण्यास पात्र ठरत असतात.
साधारणत युजीसी नेट परिक्षेसाठी एक ते दोन लाख इतक्या संख्येने उमेदवार बसत असतात.आणि त्यात केवळ तीस ते चाळीस हजार उमेदवार परीक्षेत उत्तीर्ण होत असतात.
कारण यातील पेपर दोन हा आपल्या speacialise विषयावर आधारीत असला तरी पेपर एक यात विविध विषयांवर आधारीत घेतला जात असतो.आणि तो अत्यंत कठिन पातळीवर तयार केला जात असतो.
म्हणून नेट परिक्षा ही अत्यंत अवघड परीक्षांमधील एक मानली जाते.
10) एन-आय-डी-ई ई :
एन-आय-डी-ई ई चा फुल फाँर्म नँशनल इंस्टीटयुट आँफ डिझाईन इंन्ट्रांस एक्झाम असा होत असतो.
एन आय डी ई ही परिक्षा(bachelor of desigh),(master of desigh) ह्या अभ्यासक्रमासाठी उमेदवारांची निवड करण्यासाठी एन आय डी च्या समितीकडुन घेतली जाणारी aptitude test असते.
ही परीक्षा प्रिलिम्स आणि मेन्स अशा दोन टप्प्यात घेतली जात असते.आणि यात पात्र ठरलेल्या उमेदवारांना नँशनल इंस्टिटयुट आँफ डिझाईन या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी निवडले जात असते.
ही परीक्षा देखील एक अवघड आणि स्पर्धात्मक परीक्षा आहे.यात सामान्य पेपरमध्ये विचारले जाणारे प्रश्नांची पातळी अवघड असते.आणि सर्जनशील विभागातील प्रश्न देखील आव्हानात्मक आणि वेळखाऊ प्रकारचे असतात.
भारतातील इतर काही अवघड पातळीवरील परिक्षां: List of other 10 Toughest Exams in India –
1) आय ई एस (IES exam) :
आय ई एस(Indian engineering service) ही देखील भारतातील सर्वात कठिन
परीक्षांपैकी एक परिक्षा आहे.
भारत सरकारच्या विविध विभागांमार्फत विविध रिक्त अभियांत्रिकी पदांकरीता उमेदवारांची निवड करण्याच्या हेतुने युपीएससी द्वारे ही परिक्षा आयोजित केली जाते.
यात इलेक्ट्रिकल इंजिनिअरींग,मँकेनिकल इंजिनिअरींग,इलेक्ट्राँनिक्स इंजिनिअरींग इत्यादी शाखांसाठी भरती केली जात असते.
ही परीक्षा प्रिलिमनरी एक्झाम ,मेन्स एक्झाम आणि पर्सनँलिटी टेस्ट अशा तीन टप्प्यात घेतली जात असते.
2) कँट (CAT Exam) :
कँट परिक्षा ही भारतातील टाँप बिझनेस काँलेज मध्ये विविध अभ्यासक्रमासाठी प्रवेश प्राप्त करण्यासाठी घेतली जाते.
या परीक्षेत उमेदवाराची विविध पँरामीटरवर आधारीत चाचणी घेतली जात असते.ज्यात data intrepretation,logical reasoning,oral test इत्यादींचा समावेश असतो.
ही परीक्षा आँनलाईन पदधतीने प्रत्येक वर्षी एक वेळेस घेतली जाते.
दरवर्षी दोन लाख उमेदवार ह्या परीक्षेला बसत असतात ज्यात फक्त 1500 उमेदवार निवडले जात असतात.
भारतातील Top 10 toughest exams विषयी वारंवार विचारले जाणारे काही महत्वाचे प्रश्न – FAQ
1)भारतातील सर्वात toughest exams कोणकोणत्या आहेत?
भारतातील सर्वात toughest exams ची नावे पुढीलप्रमाणे आहेत :
● CFA
● CA
● IES
● LNAT
● CCIE
● GATE
● UMSLE
इत्यादी.
2) भारतातील सर्वात easy exams कोणकोणत्या आहेत?
भारतातील सर्वात easy exams म्हणुन ओळखल्या जात असलेल्या काही परिक्षांची नावे पुढीलप्रमाणे आहेत :
● RRB
● SSC (group D आणि group C)
● Steno
● IBPS
● CTET
2 thoughts on “Top 10 Toughest Exams in India – सर्वात कठीण 10 परीक्षा भारतात कोणत्या आहेत ?”
Comments are closed.