नाम म्हणजे काय आणि नामाचे प्रकार किती? Definition And Types Of Nouns In Marathi

नाम म्हणजे काय आणि नामाचे प्रकार किती? Definition And Types Of Nouns In Marathi

आजच्या लेखात आपण नाम म्हणजे काय?नामाचे प्रकार किती आहेत?आणि ते कोणकोणते आहेत हे सविस्तरपणे जाणुन घेणार आहोत.

नाम म्हणजे काय? Definition Of Noun In Marathi

आपण एखाद्या व्यक्तीला सजीव तसेच निर्जीव वस्तुला,पक्षीला,प्राण्याला,भावनेला,स्थळाला गावाला,शहराला जे नाव देत असतो,ज्या नावाने संबोधित असतो त्यालाच नाम असे म्हणतात.

उदा,

● राहुल -हे एका मुलाचे नाव आहे
(हे एक सजीव व्यक्तीचे नाम आहे)

● श्वेता -हे एका मुलीचे नाव आहे
(हे सुदधा एक सजीव व्यक्तीचे नाम आहे)

● आंबा (हे एक फळाचे नाव आहे.
(हे देखील एक नाम आहे)

● पुणे -हे एका स्थळाचे,ठिकाणाचे शहराचे नाव आहे.
(हे देखील नाम आहे)

● कबुतर-हे एका पक्षीचे नाव आहे.
(हे एक नामच आहे)

● टेबल -हे एका निर्जीव वस्तुचे नाव आहे.

(हे एक नाम आहे).

● प्रेम-ही एक भावना आहे.हे एक भावनेचे नाव आहे.
(हे सुदधा एक नाम आहे)

● बिबटया-हे एक जंगली प्राण्याचे नाव आहे.

(हे सुदधा एक नाम आहे)

वरील उदाहरणांवरून एक गोष्ट थोडक्यात आपणास लक्षात येते की कुठल्याही मानवाला,वस्तुला,प्राण्याला,पक्षीला,जागेला तसेच जगातील इतर कुठल्याही बाबीला आपण ज्या नावाने संबोधित असतो त्यालाच नाम असे म्हटले जाते.

नामाचे प्रकार एकुण किती आहेत आणि कोणकोणते आहेत? – Types Of Nouns In Marathi

नामाचे एकुण तीन मुख्य प्रकार आहेत जे पुढीलप्रमाणे आहेत-

See also  ऑनलाईन मोफत मराठी पुस्तके - List of 5 free websites

1) सामान्य नाम (Common Noun) –
2) भाववाचक नाम (Abstract Noun) –
3) विशेष नाम (Proper Noun) –

 

सामान्य नाम(Common Noun) –

हा एक नामाचा असा प्रकार आहे ज्यात आपण कुठल्याही एका विशिष्ट जातीला,वर्गाला एकदम सारखेच संबोधित असतो.

थोडक्यात एखाद्या जाती तसेच वर्गाला दिल्या गेलेल्या एका समान म्हणजेच काँमन नावाला सामान्य नाम(Common Noun) असे म्हटले जाते.

सामान्य नामाची वैशिष्टये-

● हे जातीवाचक नाम असते.

आपण एखाद्या वस्तुला ज्या नावाने ओळखत असतो तेच त्या वस्तुचे सामान्य नाम असते.

उदा, प्राणी,वनस्पती,फळे,भाज्या,पक्षी इत्यादी

सामान्य नामाची वाक्ये-

● वाघ हा एक हिंस्स प्राणी आहे.
● कोरपड ही एक औषधी वनस्पती आहे.
● राहुल एक प्रामाणिक मुलगा आहे.

सामान्य नामाचे पुढील दोन प्रमुख प्रकार आहेत-

1)समुहवाचक नामे(Collective Noun) –

2) पदार्थवाचक नामे(Material Noun) –

1)समुहवाचक नामे(Collective Noun) –

ज्या नामामधून एखाद्या विशिष्ट समुहाचा वर्गाचा,गटाचा उल्लेख केला जात असतो त्यालाच समुहवाचक नाम असे म्हटले जात असते.

समुह वाचक नामाने कुठल्याही एकाच जातीतील प्राणी,पक्षी,वस्तु,व्यक्तींच्या समुहाचा आपणास बोध होत असतो.

उदा,वर्ग,गट,संघटना,समिती,समुदाय इत्यादी.

समुहवाचक नामाची वाक्ये-

● आमच्या महाविद्यालयात विदयार्थींच्या अनेक संघटना आहेत.
● माझा वर्ग भिंतीपासुन तीन नंबरला आहे.
● समोरच्या भिंतीवर पक्ष्यांचा समुदाय बसलेला आहे.

2) पदार्थवाचक नामे(Material Noun) –

पदार्थवाचक नामांचे देखील दोन प्रकार आहेत-

1)अमोजणीय पदार्थवाचक नामे –
2)मोजणीय पदार्थवाचक नामे –

1)अमोजणीय पदार्थवाचक नामे -(Uncountable Material Noun)

असे पदार्थ किंवा वस्तु ज्यांची संख्येशिवाय इतर मापकांच्या आधारे मोजणी केली जात असते अशा पदार्थ तसेच वस्तुंना दिलेल्या नामास मोजणीय पदार्थवाचक नाम असे म्हटले जाते.

उदा,दुध,साखर,तांदुळ,सोने इत्यादी.

2) मोजणीय पदार्थवाचक नामे -(Countable Material Noun)

असे पदार्थ किंवा वस्तु ज्यांची संख्येदवारे मोजणी केली जात असते अशा पदार्थ तसेच वस्तुंना दिलेल्या नामास मोजणीय पदार्थवाचक नाम असे म्हटले जाते.

See also  HSN कोड म्हणजे काय ? HSN code information Marathi - 6 अंकीकोड - 5 कोटीपेक्षा जास्त व्यावसायिक उलढाल

उदा,पुस्तके,पेन,वहया इत्यादी.

पदार्थवाचक नामाची काही वाक्ये-

● मी रोज सकाळी डेअरीमधुन एक लीटर दुध विकत आणत असतो.
● साखरेचे भाव आता खुप वाढले आहेत.
● मी काल दुकानातुन दोन पुस्तके आणि वहया विकत आणल्या.

भाववाचक नाम (Abstract Noun) –

भाववाचक नाम हा नामाचा असा प्रकार आहे ज्यात एखादा प्राणी,पक्षी,व्यक्ती वस्तु यांच्यामध्ये असणारया गुण वैशिष्टयांचा,भावनांचा तसेच त्यांच्या दर्जा आणि स्थितीचा आपणास बोध होत असतो.

एक असा शब्द ज्याच्यामुळे कुठल्याही वस्तुची भावना गुण आणि स्थिती आपणास कळत असते,माहीत होत असते त्या शब्दाला भाववाचक नाम असे संबोधतात.

भाववाचक नामे ही काल्पनिक नामे असतात त्यामुळे यांचे वास्तवात कुठलेही अस्तित्व असलेले आपणास दिसुन येत नसते.म्हणजेच यात अशा भावना कल्पणांचा समावेश होतो ज्या आपण अनुभवू शकतो पण बघु शकत नाही.

उदा,उददिष्ट,जीवन मरण इत्यादी.

भाववाचक नामाची काही वाक्ये –

● भ्रष्टाचार हा आपल्या देशाला लागलेला सगळयात मोठा काळीमा आहे.
● ऐक्य ही माणसाची खरी ताकद असते.
● कुठलाही खेळ खेळत असताना चपळाईची आवश्यकता ही असतेच.

विशेष नाम (Proper Noun) –

हा नामाचा एक असा प्रकार आहे ज्यात कुठल्याही एका संपुर्ण जाती तसेच वर्ग समुहाचा बोध होत नसतो यात कोणत्याही एका विशिष्ट वस्तु,व्यक्ती,प्राणी,पक्षी,गाव,शहर यांचा बोध होत असतो.

म्हणुनच विशेषनामाला व्यक्तीवाचक नाम असे म्हटले जाते.

उदा,

● योगेश
● संजय
● मालेगाव
● पुणे

विशेषनामाची काही वाक्ये-

● नाशिक हे शहर द्राक्षांसाठी खुप प्रसिदध आहे.
● पुणे हे विदयेचे माहेरघर आहे.
● गोदावरी नदीला महाराष्टाची गंगा असे संबोधिले जाते.
● भारत देश हा एक विविधतेत एकता असलेला देश आहे.