चालु घडामोडी मराठी – 19 मे 2022 Current affairs in Marathi

19 मे 2022 चालु आणि ताज्या घडामोडी  Current affair in Marathi

1)रामगड विषधारी अभयारण्य व्याघ्र प्रकल्प म्हणुन अधिसुचित-

भारतातील रामगड विषधारी या अभयारण्यास नुकतेच व्याघ्र प्रकल्प म्हणुन अधिसुचित करण्यात आले आहे.

● रामगड विषधारी अभयारण्य व्याघ्र प्रकल्प हा 52 व्या क्रमांकाचा व्याघ्र टाईगर रिझर्व प्रकल्प म्हणुन घोषित केला गेला आहे.

● रामगड विषधारी हे अभयारण्य राजस्थानातील बुंदी,भिलवाडा,कोटा ह्या जिल्हयामध्ये पसरलेले आहे.

● हा व्याघ्र प्रकल्प रणथंबोर आणि मुकुंद अभयारण्यातील वाघांना जोडणारा मेन काँरिडोअर असणार आहे.

● आणि हे अधिसुचित करण्याची घोषणा केंद्रिय पर्यावरणमंत्री भुपेंद्र यादव यांच्याकडुन करण्यात आली आहे.

● जागतिक व्याघ्र दिन हा 29 जुलै रोजी साजरा केला जातो.भारतातील व्याघ्र प्रकल्पाचे जनक कैलास साकला हे आहेत.

● भारतात एकूण 2022 मधील व्याघ्र प्रकल्पांची संख्या 53 आहे.आणि महाराष्टातील व्याघ्र प्रकल्पांची संख्या एकुण सहा आहे.(नवेगाव-नागझिरा ,बोर,मेळघाट,ताडोबा,पेंच,सहयाद्री इत्यादी ही त्यांची नावे आहेत.)

2) इजिप्त करणार भारतातुन 5 लाख टन गहु आयात-

नुकतेच इजिप्त ह्या देशाने भारतातुन 5 लाख टन इतका गहु आयात करण्याचे ठरवले आहे.

● याआधी देखील इजिप्त ह्या देशाने जवळपास 50 हजार टन इतका गहु आयात केला होता.

3) नरेंद्र मोदींनी केले नेपाळसोबत एकुण सहा करार-

अलिकडेच भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताचे शेजारील राष्ट नेपाळसोबत एकुण सहा करार केले आहेत.

● नेपाळ ह्या देशाचे अध्यक्ष विद्यादेवी भंडारी हे आहेत.येथील पंतप्रधान शेर बसादुर देऊबा हे आहेत.नेपाळ ह्या देशाची राजधानी काठमांडु ही आहे.

4) हरियाणातील सिंधु खोरयातील राखी गडी नामक गावी 5 हजार वर्षे जुना सापडला दागिन्यांचा कारखाना-

नुकताच हरियाणातील सिंधु खोरयातील राखी गडी नावाच्या एका गावामध्ये 5 हजार वर्षे इतका जुना दागिन्यांचा कारखाना आढळुन आला आहे.

● वरील वक्तव्य हे भारतीय पुरातत्व सर्वेक्षण यांनी मांडले आहे

● राखी गडी हे गाव हरियाणामधील हिसार जिल्हयातील सिंधु संस्कृतीशी निगडीत असणारे हे एक सगळयात जुने पुरातत्व स्थळ मानले जाते.

5) महाराष्ट आणि उत्तर प्रदेश दोन्ही राज्ये जीएसटी नोंदणीत अव्वल-

अलीकडेच महाराष्ट आणि उत्तर प्रदेश ही दोन्ही राज्ये जीएसटी नोंदणीत अव्वल क्रमांकावर आलेली आहेत.

6) भारताकडुन आयोजित केली जाणार दहशतवाद विरोधी बैठक-

नुकतेच भारताकडुन दहशतवाद विरोधी बैठक आयोजित केली जाणार असल्याचे घोषित करण्यात आले आहे.

7) गुजरात राज्यातील तीन गावांत अवकाशातुन स्पेस डिब्रेज पडले-

नुकतेच गुजरात ह्या राज्यातील भालेज,रामपुरा,खांबोळज ह्या तीन गावांमध्ये अवकाशातुन स्पेस डिब्रेज पडताना आढळुन आले आहे.

8) आर ए ओ नाँरडिकने फिनलँडच्या वीज पुरवठयावर घातली बंदी-

रशियाची सर्वात मोठी वीज पुरवठा कंपनी म्हणुन ओळखल्या जाणारया आर ए ओ नारडिकने नुकतेच फिनलँड ह्या देशाच्या वीज पुरवठयावर बंदी घातली आहे.

9) जमैकामधील ररत्याला देण्यात आले बाबासाहेब आंबेडकरांचे नाव-

जमैका ह्या देशामधील किंग्जटन ह्या ररत्याला नुकतेच डाँ बाबासाहेब आंबेडकरांचे नाव देण्यात आले आहे.आणि याचे उदघाटन भारताचे सध्याचे राष्टपती रामनाथ कोविंद यांच्या हातुन करण्यात आले आहे.

● किंग्जटन ही जमैकाची राजधानी आहे.

10) नुकतीच 75 व्या कान्स चित्रपट महोत्सवाला झाली सुरूवात-

नुकतीच 75 व्या कान्स चित्रपट महोत्सवाला सुरूवात झालेली आहे.

● यावर्षीची कान्स चित्रपट महोत्सवाची 75 वी आवृत्ती असणार आहे.टाँम क्रुझ यांच्या टाँप गन ह्या चित्रपटाचे यात प्रिमियम केले जाणार आहे.

● कान्स चित्रपट महोत्सवाची स्थापणा फ्रान्स कान्स येथे 1946 मध्ये करण्यात आली होती.

● कान्स चित्रपट महोत्सवात मराठीतील गोदावरी हा चित्रपट मुख्य विभागात दाखविला जाणार आहे.

● कान्स चित्रपट महोत्सवात पहिल्या सन्मानाचा देश होण्याचा बहुमान हा भारत देशानेच मिळविलेला आहे.भारताची बाँलीवुड अभिनेत्री दिपिका पदुकोण ही ह्या चित्रपटाची ज्युरी मेंबर आहे.

● महाराष्ट राज्याकडुन कान्स चित्रपट महोत्सवात पाठविण्यात आलेले इतर चित्रपट पोटरा,कारखाणीसांची वारी,तिचे शहर होणे हे आहेत.

● कांस चित्रपटात जाणारा पहिले भारतीय लोककलाकार मामे खान हे आहेत.मामे खान हे एक राजस्थानी गायक आहेत.मामे खान हे मंगनियार ह्या समाजातील आहेत.मंगनियार समाज हा त्यांच्या लोकसंगीतामुळे ओळखला जातो.आणि हा समाज राजस्थानमधील वाळवंटी विभागात विशेषकरून आढळुन येतो.मामे खान यांनी आत्तापर्यत लक बाय चान्स,आय अँम,नो वन किल जेसिका,सोनचीरीया,मान्सुन मँगोज अशा अनेक चित्रपटांत पार्श्वगायन केले आहे.

11)सेसल एनजमेंट यांना 2022 चा वांगाई माथाई फाँरेस्ट चँम्पियन पुरस्कार प्राप्त-

नुकताच सेसल एनजमेंट यांना 2022 चा वांगाई माथाई फाँरेस्ट चँम्पियन पुरस्कार दिला गेला आहे.

● कँमरून ह्या देशातील सेसल एनजमेंट यांना हा पुरस्कार जंगलाचे संरक्षण करण्याकरीता आणि त्यावर अवलंबुन जगत असलेल्या लोकांच्या जीवणात सुधारणा घडविण्याकरीता जे त्यांनी आपले योगदान दिले आहे त्याबददल हा पुरस्कार देण्यात आला आहे.

12) जर्मनीला मागे टाकुन भारत बनला जगातील सर्वात मोठी चौथी वाहन बाजारपेठ-

नुकतेच ओ आय सी ए(organization internationale des construction of automobile)ने दिलेल्या एका अहवालानुसार भारत देशाने जर्मनीला मागे टाकुन जगातील सर्वात मोठी चौथी वाहन बाजारपेठ बनण्याचा मान प्राप्त केला आहे.

● ह्या यादीत सध्या प्रथम क्रमांकावर चीन हा देश आहे आणि दितीय आणि त्रितीय क्रमांकावर अमेरिका आणि जपान आहेत.

14) कर्नाटक मध्ये काढण्यात आला धर्मातरण विरोधी कायदा-

नुकताच कर्नाटक राज्यामध्ये धर्मातरण विरोधी अध्यादेशाला मंजुरी प्राप्त झाली आहे.

● कर्नाटकचे राज्यपाल धावरचंद गेहलोत यांनी धर्मातर विरोधी विधेयकावर काढण्यात आलेला अध्यादेशास नुकतीच मंजुरी दिली आहे.

● या विधेयकानुसार सक्तीने धर्मातरण केले गेल्यास तीन ते पाच वर्षाचा कारावास आणि पंचवीस हजार रूपये इतका दंड ठोठावण्यात येणार आहे.यातच अल्पवयीन महिलांचे एससी एसटी प्रवर्गातील व्यक्तीचे धर्मातरण केल्यास किमान तीन ते दहा वर्षाचा तुरूंगवास भोगावा लागणार आहे.शिवाय पन्नास हजारापर्यत दंड देखील वसुल केला जाणार आहे.

● सामुहिक धर्मातर केल्यास तीन ते दहा वर्ष जेल एक लाख रूपये इतका दंड ठेवण्यात आला आहे.तसेच ज्यांचे सक्तीने धर्मातर घडवून आणले आहे अशा व्यक्तींना आरोपीकडुन पाच लाखापर्यत नुकसान भरपाई देखील दिली जाणार आहे.

15) नवीन श्रीवास्तव बनणार नेपाळमधील भारताचे नवे राजदुत-

आता विनय मोहन क्वात्रा यांच्यानंतर नेपाळमधील भारताचे नवे राजदुत म्हणुन नवीन श्रीवास्तव यांची नियुक्ती केली जाणार आहे.

● नवीन श्रीवास्तव हे सध्या परराष्ट मंत्रालयामध्ये सचिव ह्या पदावर कार्यरत आहेत.

● याआधी नवीन श्रीवास्तव परराष्ट मंत्रालयाच्या पुर्व आशियाई विभागाचे प्रमुख देखील राहिले आहेत.

16) चांदिपुर येथे करण्यात आली डिआर डीओच्या विकसित केलेल्या क्षेपणास्त्राची चाचणी-

नुकतेच चांदिपुर येथे डिआर डीओने आपल्या नौदल जहाजविरूदध विकसित केलेल्या क्षेपणास्त्राची चाचणी केली आहे.

● नुकतीच भारतीय नौदलाकडुन सिकिंग हेलिकाँप्टरमध्ये प्रथम स्वदेशी नौसेनिक अँटीशीप मिसाईलची यशस्वीपणे चाचणी करण्यात आली आहे.

● ही चाचणी ओडिसा येथील बालासोर एकीकृत परीक्षण रेंज करण्यात आली आहे.

17) इंद्रजित सिंग यांना 2022 चा हंबोल्ट रिसर्च अवाँर्डने करण्यात आले सन्मानित-

नुकतेच इंद्रजित सिंग यांना 2022 चा हंबोल्ट रिसर्च अवाँर्डने सन्मानित करण्यात आले आहे.

● इंद्रजित सिंग दिल्ली विद्यापीठातील वैज्ञानिक आहेत.

● हंबोल्ट रिसर्च अँवाँर्ड हा अलेक्झांडर वाँन हंबोल्ट ह्या फाऊंडेशनकडुन दिला जात असतो.

● दरवर्षी 100 व्यक्तींना ह्या पुरस्काराने सन्मानित केले जात असते.यात पुररस्कार विजेत्यास साठ हजार युरो इतकी रोख रक्कम दिली जाते.सोबतच हा पुररस्कार प्राप्त व्यक्तीस जर्मनीमधल्या वैज्ञानिक संस्थेमध्ये तब्बल एक वर्ष रिसर्च करण्याची संधी देखील प्रदान केली जात असते.

18) नेपाळमध्ये केली जाणार इंटरनँशनल सेंटर फाँर बौदध कल्चर अँण्ड हेरिटेजची निर्मिती-

नेपाळ ह्या भारताच्या शेजारील देशामध्ये इंटरनँशनल सेंटर फाँर बौदध कल्चर अँण्ड हेरिटेजची निर्मिती करण्यात येत आहे.

● याविषयी नुकत्याच आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात भारताचे आणि नेपाळच्या पंतप्रधानांनी आपला सहभाग नोंदवला आहे.

19) हरियाणाने सुरू केली ई अधिगम योजना-

नुकतीच हरियाणा या राज्याकडुन ई अधिगम ही योजना सुरू करण्यात येत आहे.

● या ई अधिगम योजनेअंतर्गत किमान तीन लाख विदयार्थींना आपले आँनलाईन शिक्षण पुर्ण करता यावे यासाठी त्यांना मदत म्हणुन टँबलेट तसेच कंप्युटरचे वितरण केले जाणार आहे.

20) मांगर गाव बनले महाराष्टातील पहिले मधाचे गाव-

नुकतेच मांगर हे गाव महाराष्टातील पहिले मधाचे गाव बनलेले आहे.

● हे गाव महाबळेश्वर तालुक्यात आहे.

21) नीती आयोगाकडुन लाँच करण्यात आला नँशनल डाटा अँनेलिटिक्स प्लँटफाँर्म-

नुकताच नीती आयोगाकडुन नँशनल डाटा अँनेलिटिक्स प्लँटफाँर्म लाँच करण्यात आला आहे.

● नीती आयोगाची स्थापणा ही 2015 साली केली गेली होती.याचे मुख्य कार्यालय नवी दिल्ली येथे आहे.नीती आयोगाचे पदसिदध अध्यक्ष पंतप्रधान असतात म्हणुन सध्याचे नीती आयोगाचे अध्यक्ष नरेंद्र मोदी हे आहेत.नीती आयोगाच्या नवीन उपाध्यक्षपदी राजीव कुमार यांच्या जागी सुमन बेरी हे आता आले आहेत.

22) सिक्कीमकडुन 16 मे रोजी स्थापणा दिवस साजरा –

सिक्कीमकडुन नुकताच 16 मे रोजी स्थापणा दिवस साजरा केला गेला आहे.

● सिक्कीमची राजधानी गंगटोक ही आहे.आणि हे राज्य 1975 मध्ये भारताचे बाविसावे राज्य म्हणुन अस्तित्वात आले तेव्हापासुन 16 मे रोजी सिक्कीमचा स्थापणा दिवस म्हणुन साजरा केला जात असतो.

23) भोपाळ मध्ये करण्यात आले ग्रामीण जमाती तंत्रज्ञान प्रकल्पाचे उदघाटन-

नुकतेच भोपाळ मध्ये करण्यात ग्रामीण जमाती तंत्रज्ञान प्रकल्पाचे उदघाटन करण्यात आले आहे.

24) वैज्ञानिकांनी लावला लडाख येथे मँडसोईडे सापाच्या जीवाश्माचा शोध-

नुकताच काही वैज्ञानिकांनी लडाख येथे मँडसोईडे नामक सापाच्या जीवाश्माचा शोध लावण्यात यश प्राप्त केले आहे.

● मँडसोईडे ही एक सापाची जात आहे जी लवकरच लुप्त होणार आहे आणि त्यावरच संशोधकांनी जीवाश्माचा शोध लावला आहे.

Leave a Comment