चालु घडामोडी मराठीत – 1 मे 2023 Important current affairs in Marathi

1 मे 2023 रोजीच्या महत्वाच्या चालु घडामोडी 1 may important current affairs in Marathi

बेल्जियम देशाच्या व्हिटो ह्या कंपनीने कचरयापासुन बायोडिझेल बनविण्याच्या पथदर्शी प्रकल्पासाठी अयोध्या सिटीची निवड केली आहे.

भारतीय नौदलाने आॅपरेशन कावेरी अंतर्गत सुदान मध्ये अडकलेल्या भारतीयांना बाहेर काढण्यासाठी आय एन एस तेग अणि आय एन एस सुमेधा ह्या युदध नौकेचा वापर केला आहे.

भारतीय गिर्यारोहक अर्जुन वाजपेयी हे नेपाळमधील जगातील दहाव्या क्रमांकाच्या अन्नपूर्णा पर्वतावर चढणारे पहिले भारतीय व्यक्ती ठरले आहेत.

एल आयसीचे व्यवस्थापकीय संचालक तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून सिद्धार्थ मोहंती यांची निवड करण्यात आली आहे.

अलेसेंड्रा कोरप यांना 2023 मधील गोल्ड मॅन पर्यावरण ह्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

नुकतेच रशकी ह्या कंपनीने केळीच्या चामडयापासुन बनवलेल्या हॅडबॅगची देशातील पहिली श्रेणी लाॅच केली आहे.

अरूण कशयप यांची स्पाइस जेटचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

अमेरिकेतील पेनसेलव्हिया राज्याने दिवाळी ह्या सणाला अधिकृत सुटटी म्हणून घोषित केले आहे.

वन अर्थ वन हेल्थ म्हणजेच एक पृथ्वी एक आरोग्य हा उपक्रम भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केला आहे.

जगातील प्रथम रोबोटिक चेक इन असिस्टंटचे अनावरण ईमीरेट ह्या दुबईच्या एअरलाईनसने केले आहे.

दरवर्षी 1 मे रोजी महाराष्ट्र राज्य दिवस आंतरराष्ट्रीय कामगार दिन अणि गुजरात राज्य स्थापणा दिवस साजरा केला जातो.

2023 मधील 68 वा फिल्म फेअर अवाॅर्ड सोहळा मुंबई येथील जिओ कनवेक्शन सेंटर बीकेसी येथे पार पडला आहे.

नुकताच 30 एप्रिल रोजी आयुष्यमान भारत दिवस साजरा करण्यात आला होता.

नुकताच आय आयटी कानपुर ह्या सायबर सुरक्षा कौशल्य कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला होता.

नुकतेच भारत देशाने काॅलिटी इनफ्रास्ट्रकचर वर जर्मनी सोबत नवीन वर्क प्लॅन तयार करण्यासाठी हस्ताक्षर केले होते.

अभिलाष टॉमी हे प्रतिष्ठित गोल्डन ग्लोब शर्यत पूर्ण करणारे पहिले भारतीय आहेत.

See also  राहुल गांधी यांची खासदारकी रद्द होण्याचे नेमके कारण काय आहे? - Why Rahul Gandhi disqualified

नवाब मोहम्मद अब्दुल अली यांना नुकताच आय एए मेधावी सेवा पुरस्कार 2023 देण्यात आला आहे.

नुकतेच नॅशनल मेडिकल डिव्हाईस पाॅलिसी अंतर्गत हिमाचल प्रदेश,मध्य प्रदेश,तामिळनाडू, उत्तर प्रदेश ह्या चार मेडिकल डिव्हाईस पार्कची स्थापणा केली जाणार आहे.

उत्तर प्रदेश ह्या राज्याला नुकताच स्वच्छतेसाठी हुडको हा पुरस्कार देण्यात आला आहे.

एफ एम कनेक्टिव्हिटीला प्रोत्साहन देण्यासाठी नरेंद्र मोदी यांनी नुकतेच 91 नवीन ट्रांसमीटरचे उद्घाटन केले आहे.

नुकतेच नरेंद्र मोदी यांनी नमो मेडिकल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूटचे सिलवासा येथे उद्घाटन केले आहे.

नुकतेच आरबीआयने सिटी युनियन बँकेच्या एमडी तसेच सीईओ म्हणून एन कामाकोडी यांची नियुक्ती केली आहे.