मास्टर शेफ कसे बनावे -How to become master chef in Marathi

मास्टर शेफ कसे बनावे how to become master chef in Marathi

रोज नवनवीन चवदार पदार्थ खायला तर आज आपल्या सर्वांनाच आवडते.पण आताच्या नवीन पिढीला नवनवीन खमंग पदार्थ खाण्यासोबत ते बनविण्याची देखील क्रेझ लागली आहे.

महिलांसोबत आताच्या तरुण मुलांना देखील कुकिंगची आवड असल्याने अनेक तरूण कुकिंगला आपले करीअर करण्यासाठी प्रोफेशन म्हणून देखील निवडत असतात.

ज्यामुळे आता इंजिनिअरींग डाॅक्टरेट सोबत एक नवीन करीअरचे क्षेत्र उदयास आले आहे ज्याला आपण शेफ कुकिंग असे म्हणतो.

स्वयंपाकाची नवनवीन खमंग पदार्थ बनवण्याची आवड असलेल्या आज प्रत्येक व्यक्तीला शेफ बनुन आपले करीअर करता येऊ शकते.फक्त यासाठी आपणास स्वयंपाक करण्याची,नवनवीन रेसिपी वापरण्याची आवड असायला हवी.

असे असल्यास आपण कुकिंगला करिअर म्हणून निवडु शकतो अणि यात करिअर करून चांगली कमाई देखील करू शकतो.

एखाद्या हाॅटेल मध्ये शेफ म्हणून नोकरी केल्यास आज आपण चांगले वेतन कमवु शकतो.यात आपणास नवनवीन खमंग पदार्थ बनवण्याचा आनंद देखील लुटता येतो आणि याबदल्यात आपणास भरघोस वेतन देखील प्राप्त होत असते.

शेफ बनुन आपण मोठमोठया हाॅटेल मध्ये स्वयंपाक बनविण्याचे काम करू शकतो याचसोबत आपण टीव्ही वरील दाखवल्या जात असलेल्या कुकिंग प्रोग्राम मध्ये होस्ट पाहुणा बनून जाऊ शकतो.तिथे आपल्या कलेचे सर्वांसमोर प्रदर्शन करू शकतो.

एवढेच नाही तर आपण इतरांना स्वयंपाक करण्यासाठी मार्गदर्शन करायला कुकिंग वर स्वताचे पुस्तक लिहु शकतो.याने आपणास नेम फेम अणि पैसा तिघे प्राप्त होते.

शेफ बनण्यासाठी कोणकोणत्या पात्रतेच्या अटी आपणास पुर्ण करणे आवश्यक आहे?आपल्यात कोणकोणते गुण असणे आवश्यक आहे?

See also  न्युट्रीशिअन अणि डायटेशिअन मधील फरक -Difference between nutrition and dietitian in Marathi

शेफ बनण्यासाठी आपणास सगळ्यात पहिले स्वयंपाक बनविण्याची आवड असणे आवश्यक आहे.

याचसोबत नवनवीन स्वादिष्ट रूचकर खमंग पदार्थ कसे बनवतात कुठल्या पदार्थात कोणता अणि किती मसाला वापरतात याचे नाॅलेज असणे आवश्यक आहे.

नवनवीन रेसिपी वापरण्याची बनवण्याची आपणास आवड असायला हवी.

याचसोबत आपणास शेफचा कुकिंगचा एखादा चांगला सर्टिफिकेट कोर्स किंवा डिप्लोमा देखील करावा लागतो.हा कोर्स करण्यासाठी देखील आपण किमान दहावी ते बारावी पास असणे आवश्यक आहे.

आपल्या कस्टमरच्या आवड पसंतीनुसार पदार्थ बनविण्याचे कौशल्य आपल्यात म्हणजे एका शेफमध्ये असायला हवे खाण्याच्या डिशेसमध्ये रोज वेगवेगळे प्रकारचे बदल देखील त्याला करता यायला हवे.

आपण बनवत असलेला खाद्य पदार्थ कसा आहे त्या पदार्थाचे सेवन करणायारया इतर व्यक्तींसाठी तो किती गुणकारी तसेच आरोग्यदायी आहे त्या खाद्य पदार्थाचा दर्जा कसा आहे त्यात पौष्टिकता आहे किंवा नाही हे देखील एका शेफला माहीती असायला हवे.

How-to-become-master-chef-in-Marathi-.jpg
मास्टर शेफ कसे बनावे -How to become master chef in Marathi

प्रोफेशनल शेफ बनण्यासाठी काय करायला हवे?

१) सर्वप्रथम शेफचा कोर्स करावा लागेल –

जर आपणास प्रोफेशनल शेफ बनायचे आहे तर आपणास सर्वप्रथम हाॅटेल मॅनेजमेंटचा एखादा चांगला कोर्स करावा लागेल.

आज देशात तसेच परदेशात देखील अशा अनेक मोठमोठ्या उत्तम संस्था आहेत जिथे आपणास हाॅटेल मॅनेजमेंटचे तसेच केटरींगचे कोर्स उपलब्ध करून दिले जातात.

याचसोबत आजकाल वेगवेगळ्या हाॅटेल रेस्टॉरंट मध्ये देखील आपणास कुकींगचे हाॅटेल मॅनेजमेंटचे अनेक प्रायव्हेट डिप्लोमा तसेच सर्टिफिकेट कोर्स वगैरे उपलब्ध करून दिले जातात.

२) नेहमी अपडेटेड राहावे लागेल –

एक उत्तम प्रकारचा शेफ बनण्यासाठी आपणास अपडेटेड देखील राहणे आवश्यक आहे.कुकिंग मध्ये सध्या कोणकोणत्या नवनवीन डिशेस ट्राय केल्या जात आहेत.

कोणते नवनवीन प्रयोग स्वयंपाकात केले जात आहेत.

आता लोकांना एकच प्रकारचा जुना पदार्थ नेहमी खायला आवडत नाही म्हणून शेफला त्या पदार्थावर नवनवीन प्रयोग करून आधुनिक काळातील लोकांच्या गरजेनुसार आधुनिक रूप देता यायला हवे.

See also  एनजीटी काय आहे, कार्य काय असतात?NGT meaning in Marathi

आपल्या आधुनिक काळातील नवीन ग्राहकांच्या आवडीनिवडी नुसार त्यांच्या जिभेच्या चवीनुसार नवनवीन प्रयोग आपणास करता यायला हवे.यासाठी आपण सतत अपडेटेड राहणे गरजेचे आहे.

परदेशी खादयात भारतीय तडका लावलेले खाद्य पदार्थ कस्टमरला अधिक आवडत असतात.याचकरीता आपणास देशी खाद्यपदार्थासोबत परदेशी खाद्य पदार्थाचे देखील नाॅलेज असायला हवे.

चायनीज इटालियन फ्रेंच असे इत्यादी प्रकारचे खाद्यपदार्थ बनविण्याचे कौशल्य एका उत्तम शेफमध्ये असायला हवे.

शेफ बनुन किती वेतन मिळते?

शेफ हे एक असे प्रोफेशन आहे ज्यात आपणास नाव पैसा प्रसिद्धी हया तिन्ही गोष्टी प्राप्त होतात.

आपण शेफ बनुन एखाद्या हाॅटेल तसेच रेस्टॉरंट मध्ये नोकरी केली तरी आपणास आपण नोकरी कुठे करतो आहे आपली योग्यता काय आहे यावरून वेतनाचा अंदाज लावता येईल.

भारतात शेफला प्रारंभी २० ते २५ हजार इतके वेतन दिले जाते.सौदी अरब वगैरे इतर परदेशात भारतापेक्षा जास्त अणि भरमसाठ वेतन दिले जाते असे सांगितले जाते.म्हणुन अनेक उमेदवार परदेशात हाॅटेल मॅनेजमेंटचा कोर्स करणे अधिक पसंद करतात.

शेफ अणि कुक या दोघांमध्ये काय फरक असतो?

शेफ अणि कुक या दोघांमध्ये फरक असतो शेफ हा किचनचा प्रमुख असतो.याचसोबत त्याच्याकडे पाककलेची डिग्री असते.अनेक वर्षे सुपरव्हिजन करण्याचा स्वयंपाक बनवण्याचा ह्या क्षेत्रात काम करण्याचा अनेक वर्षांचा अनुभव देखील शेफला असतो.

किचनचे सुपरव्हिजन करणे खाण्यापिण्याच्या मेन्युची लिस्ट तयार करण्यापासून ते स्वयंपाक घराची देखभाल करणे ही जबाबदारी शेफकडे असते.

कुक हा एक आचारी असतो जो स्वयंपाक घरात स्वयंपाक तयार करण्याचे काम करतो.हायस्कुल मधून शिक्षण घेतलेला सर्व साधारण व्यक्ती देखील कुक बनु शकतो.

Chef courses

  1. Bachelor Of Vocational Degree In Hotel Management
  2. Bsc And Msc In Hotel Management
  3. Bsc In Hospitality And Hotel Administration
  4. Certificate Course In Cookery
  5. Certificate Course In Cookery For Home Making
  6. Degree In Food And Beverages Services
  7. Degree In Food Production
  8. Diploma In Bakery And Confectionery
  9. Diploma In Cookery
See also  ऋषि सुनक यांचा जीवन परिचय - Biography of Rishi Sunak in Marathi