एनजीटी काय आहे, कार्य काय असतात?NGT meaning in Marathi

एनजीटी काय आहे?NGT meaning in Marathi

नुकतेच माजी न्यायमूर्ती प्रकाश श्रीवास्तव यांना एनजीटीचे नवे अध्यक्ष पदी नियुक्त करण्यात आले आहे.

आपल्यातील खुप जणांनी हा शब्द प्रथमतः ऐकला असल्याने आपल्याला याविषयी अधिक माहिती नाही.

म्हणून आजच्या लेखात आपण एनजीटी म्हणजे नेमके काय असते हे थोडक्यात जाणुन घेणार आहोत.

एनजीटीचा फुलफाॅम National Green tribunal असा होतो.यालाच मराठी मध्ये राष्ट्रीय हरित न्यायाधिकरण असे म्हटले जाते.

एनजीटी ही केंद्र सरकारच्या वतीने स्थापित करण्यात आलेली एक विशेष न्याययंत्रणा आहे जी पर्यावरणाशी संबंधित कुठल्याही तक्रारींचा समस्यांचा लवकरात लवकर न्यायनिवाडा करून निपटारा करण्याचे काम करते.पर्यावरणाचे संरक्षण करण्याचे काम करते.

एनजीटी मध्ये कुठल्याही मुद्द्याचा निपटारा करण्यासाठी किमान सहा महिने इतका कालावधी लागु शकतो.

ही एक अशी पर्यावरण विषयक न्याय यंत्रणा आहे जिथे पर्यावरणाशी संबंधित तक्रारींवर सुनावणी होते मग शेवटी त्यावर निर्णय दिला जात असतो.

थोडक्यात सांगायचे म्हटले तर एनजीटी ही उच्च न्यायालयासारखेच अधिकार प्राप्त असलेले एक पर्यावरण न्यायालय आहे.

पण हाय कोर्ट अणि एनजीटीची तुलना आपण करू शकत नाही कारण हायकोर्टाला जो न्यायाधिकार देण्यात आला आहे तो संविधानानुसार देण्यात आला आहे.अणि एनजीटीला देण्यात आलेले अधिकार एनजीटी अधिनियम २०१० नुसार आहेत.

जी व्यक्ती एनजीटीच्या नियमांचे आदेशाचे पालन करत नाही त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाते.

  1. एनजीटीची स्थापणा १८ आॅक्टोंबर २०१० रोजी करण्यात आली होती.१८ आॅक्टोंबर २०१० मध्ये एनजीटीचे अध्यक्ष म्हणून जस्टिस लोकेश्वर सिंह पंटा यांची नियुक्ती करण्यात आली होती.
  2. यानंतर जस्टिस स्वतंत्र कुमार यांना एनजीटीच्या अध्यक्षपदी नियुक्त करण्यात आले होते.यांचा कार्यकाळ डिसेंबर २०१७ मध्ये संपुष्टात आला होता.
  3. यानंतर कार्यवाहक अध्यक्ष जस्टिस युडी साळवी यांची नियुक्ती करण्यात आली होती.यांचा कार्यकाळ २०१८ मध्ये संपुष्टात आला होता.
  4. यानंतर एनजीटीचे अध्यक्ष म्हणून न्यायमूर्ती आदर्शकुमार गोयल होते.यानंतर न्यायमूर्ती शिवकुमार सिंह यांना कार्यकारी अध्यक्ष नियुक्त करण्यात आले होते.
  5. आता न्यायमूर्ती प्रकाश श्रीवास्तव हे एनजीटीचे आॅगस्ट २०२३ मधील नवीन अध्यक्ष बनले आहेत.
  6. एनजीटीची स्थापणा एका अधिनियमांतर्गत करण्यात आली होती.हा अधिनियम एनजीटी अधिनियम २०१० असा होता.
See also  (GI)  भौगोलिक मानांकनाचे शेती विकासातील महत्व - Geographical Indication (GI) Tag In Agriculture Crops Mahiti

पर्यावरण संरक्षण,वन संरक्षण,नैसर्गिक संसाधनांसह पर्यावरणाशी संबंधित कोणत्याही कायदेशीर अधिकाराची अंमलबजावणी करणे,प्रभावित व्यक्ती किंवा मालमत्तेला दिलासा देणे,बाधित व्यक्ती किंवा मालमत्तेला मदत,नुकसान भरपाई आणि त्याच्याशी संबंधित नवीन प्रकरणांचा प्रभावी आणि जलद निपटारा करण्यासाठी एनजीटीची स्थापणा करण्यात आली होती.

न्युझीलंड अणि आॅस्ट्रेलिया व्यतिरिक्त भारत असा देश आहे जिथे पर्यावरणाशी संबंधित विशेष प्राधिकरणाची स्थापना करण्यात आली आहे. अणि पर्यावरणाशी संबंधित कुठल्याही तक्रारींचा इथे त्वरित निपटारा केला जातो.

एनजीटीच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती केली जाते?

एनजीटीच्या अध्यक्षपदी सुप्रीम कोर्टाच्या सेवानिवृत्त न्यायाधीशाची तसेच हाय कोर्टच्या सेवानिवृत्त चिफ जस्टीसची नियुक्ती केली जाते.

एनजीटी मधील तज्ञ सभासदांची संख्या १० किंवा २० असु शकते.यात नियुक्त केलेल्या तज्ञ सभासदांना केंद्र सरकारच्या वतीने नियुक्त केले जाते.

एनजीटीचे मुख्य काम काय असते?

पर्यावरणाचे रक्षण करणे हे एनजीटीचे मुख्य काम आहे.जंगलांचे वनांचे संरक्षण करणे, पर्यावरणीय प्राकृतिक स्रोतांचे रक्षण करणे, पर्यावरणाशी संबंधित कायद्याचे रक्षण करणे

भारतातील नागरीक असलेल्या व्यक्तींच्या पर्यावरणीय अधिकाराचे हनन झाल्यास त्याला आर्थिक साहाय्य प्रदान करणे हे एनजीटीचे काम आहे.