Sachin Tendulkar appointed as the National Icon of Election Commission of India.
भारतीय निवडणूक आयोगाने मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला बनवले नॅशनल आयकाॅन
भारतीय निवडणूक आयोगाने निवडणुकीच्या प्रक्रियेत जास्तीत जास्त मतदारांनी समाविष्ट व्हावे यासाठी
अणि निवडणुकीत जास्तीत जास्त लोकांनी मतदान करावे तसेच निवडणुक प्रक्रियेत मतदारांच्या सहभागात अधिक वाढ करण्यासाठी एक अत्यंत महत्त्वाचे पाऊल उचलले आहे.
भारतीय निवडणूक आयोगाने मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याला निवडणूक प्रक्रिया मध्ये जास्तीत जास्त मतदारांचा समावेश व्हावा म्हणून नॅशनल आयकाॅन म्हणून निवड केली आहे.
मंगळवारी २२ आॅगस्ट २०२३ रोजी निवडणूक आयोगाने ही महत्वाची घोषणा केली आहे.
याकरीता मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि निवडणूक आयोग यांच्यात एक सामंजस्य करार केला गेला आहे ज्यावर निवडणूक आयोगाने अणि मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याने आपली स्वाक्षरी देखील केली आहे.
ह्या कराराचा एकुण कालावधी तीन वर्षे इतका असणार आहे.
ह्या करारानुसार आता भारताचा धडाकेबाज फलंदाज म्हणून ओळखले जाणारा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर हा सर्व मतदारांना तीन वर्षे मतदान करण्यासाठी प्रोत्साहित करण्याचे काम करणार आहे.
सचिन तेंडुलकर यांचा तरूण पिढीवर असलेला प्रचंड प्रभाव बघुन निवडणूक आयोगाने हा निर्णय घेतला आहे.
सचिन तेंडुलकर देशातील निवडणूक आयोगाचा नॅशनल आयकाॅन बनल्याने जुन्या मतदारांसोबत नवे मतदार देखील स्वता मतदान करण्यासाठी पुढे येतील असे मत निवडणूक आयोगाने व्यक्त केले आहे.
सचिन तेंडुलकर आणि निवडणूक आयोग यांच्यात झालेल्या सामंजस्य कराराचे उद्दिष्ट –
सचिन तेंडुलकर आणि निवडणूक आयोग यांच्यात झालेल्या सामंजस्य कराराचे मुख्य उद्दिष्ट हे मतदारांच्या संख्येत वाढ करणे मतदारांना मतदान करण्यासाठी जागृत,प्रेरीत करणे त्यांना मतदानाचे महत्त्व पटवून देणे हे आहे.
याचसोबत मतदान करण्यासाठी तरुणांमध्ये नवीन उत्साह निर्माण करणे हा आहे.
निवडणुक प्रक्रियेत जास्तीत जास्त मतदारांचा समावेश करणे हा आहे.
याच कारणांसाठी निवडणूक आयोगाने क्रिकेट क्षेत्रातील भारतरत्न पुरस्कार प्राप्त दिग्दज फलंदाज मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याची नॅशनल आयकाॅन म्हणून निवड केली आहे.
मागील वर्षी देखील निवडणूक आयोगाने मतदारांच्या संख्येत वाढ घडवून आणण्यासाठी तसेच जास्तीत जास्त युवा तरूणांना मतदान करण्यासाठी प्रोत्साहित करण्यासाठी पंकज त्रिपाठी यांना नॅशनल आयकाॅन म्हणून निवडले होते.
ह्या वर्षी निवडणूक आयोगाने क्रिकेटचा भगवान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची ह्या कार्यासाठी नियुक्ती करण्याचे ठरवले आहे.