भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांना देण्यात आला सुरीनाम देशातील हा सर्वोच्च नागरी पुरस्कार
सध्या भारत देशाच्या राष्ट्रपती सुरीनाम दौरयावर आहेत.
भारत देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांना सुरीनाम ह्या देशातील राष्ट्रपती चंद्रिका प्रसाद संतोखिया ह्यांच्या हस्ते सुरीनाम ह्या देशातील सर्वोच्च नागरी पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे.
सुरीनाम प्रजासत्ताकच्या अध्यक्ष चंद्रिका प्रसाद संतोखी यांनी सोमवारी भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांना सुरीनाम देशातील सर्वोच्च नागरी पुरस्कार the grand order of the chain of yellow star देऊन सन्मानित केले आहे.
सुरीनाम देशातील सर्वोच्च नागरी पुरस्कार प्राप्त करणारया द्रौपदी मुर्मु ह्या प्रथम भारतीय महिला राष्ट्रपती आहेत.
याबाबत प्रतिक्रिया व्यक्त करताना द्रौपदी मुर्मु म्हणाल्या आहेत की हे फक्त माझ्यासाठी नाही तर सर्व भारतीयांसाठी सन्मानाची महत्वाची गोष्ट आहे.
ही ओळख फक्त माझ्यासाठी नव्हे तर भारत देशातील १.४ अब्ज लोकांची आहे ज्यांचे मी प्रतिनिधित्व करत आहे असे देखील द्रौपदी मुर्मु आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना म्हणाल्या.
हा सुरीनाम देशातील सर्वोच्च नागरी पुरस्कार प्राप्त केल्या बद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांनी आनंद व्यक्त केला आहे.
भारत आणि सुरीनाम ह्या दोन्ही देशांमध्ये चार सामंजस्य करार करण्यात आले आहे.आरोग्य,कृषी क्षमता निर्माण क्षेत्रात करण्यात आले आहेत.
जसे आपल्या भारत देशात विविध जाती धर्मातील लोक वास्तव्यास आहेत एकदम त्याचप्रमाणे सुरीनाम मध्ये देखील विविध जाती धर्मातील लोक वास्तव्यास आहेत.
द्रौपदी मुर्मु यांना देण्यात आलेला सुरीनाम देशातील सर्वोच्च नागरी पुरस्कार द्रौपदी मुर्मु यांनी इंडो सुरीनामी समुहास समर्पित केला आहे.
असे करताना द्रौपदी मुर्मु म्हणाल्या की त्या त्यांना देण्यात आलेला हा पुरस्कार भारत अणि सुरीनामी या दोन्ही देशातील संबंध करण्यात आपली महत्वाची भुमिका बजावणारया भारतीय सुरीनामी समुहातील येणारया भावी पिढीला समर्पित करत आहे.
याचसोबत द्रौपदी मुर्मु यांनी भारतीय नागरिकांच्या वतीने सुरीनाम देशातील नागरिकांना शुभेच्छा देखील प्रदान केल्या.
हा पुरस्कार भारत अणि सुरीनाम या दोन्ही देशातील महिला सशक्तीकरणासाठी विशेष ठरणार आहे.असे देखील द्रौपदी मुर्मु म्हणाल्या.
भारत आणि सुरीनाम ह्या दोन्ही देशातील मैत्री ही ऐतिहासिक अणि सांस्कृतिक संबंधांवर आधारलेली आहे.भारत अणि सुरीनाम मधील व्यापार उद्योगाचे प्रमाण खुप कमी आहे.
सुरीनाम देशाचा भारत देशाशी काय संबंध आहे? सुरीनाम देशाला भारत देशाच्या बाहेरील छोटा भारत असे का म्हटले जाते?
सुरीनाम हा दक्षिण अमेरिका मधील एक छोटासा देश आहे.आकाराच्या बाबतीत सुरीनाम हा देश महाराष्ट्र राज्यापेक्षा मोठा आहे.
पण येथील लोकसंख्या ही फक्त आठ लाख इतकीच आहे.अणि ह्या देशातील एकुण लोकसंख्येतील २८ टक्के लोकसंख्या ही भारतीय वंशीय लोकांची आहे.अणि येथील २१.४ टक्के लोक आफ्रिकन वंशाचे आहेत.
सुरीनाम देशात ५२.३ टक्के लोक ख्रिश्चन धर्मातील आहेत.अणि १९ टक्के लोक हिंदु धर्मातील आहेत.हया १९ टक्के हिंदु धर्मातील लोकांमध्ये सर्वाधिक लोकसंख्या भोजपुरी लोकांची असल्याने सुरीनाम देशात डच भाषेनंतर भोजपुरी भाषा अधिक प्रमाणात बोलली जाते.
म्हणून सुरीनाम ह्या देशाला भारताच्या बाहेरील छोटा भारत असे संबोधिले जाते.हया दक्षिण अमेरिका मधील छोट्याशा देशात भारतीय लोकांची जाण्याची गोष्ट देखील खुप रंजक आहे.
स्वातंत्र्य पुर्व काळात युरोपियन देशाच्या अनेक देशात वसाहती होत्या.हया वेगवेगळ्या वसाहती मधून साखर, कापुस तंबाखू अशी नगदी पिकांचे उत्पन्न घेतले जात होते.
अशातच नेदरलँड् मधील वेस्ट इंडिया कंपनीने दक्षिण अमेरिका खंडातील उत्तरेचा बराचसा भाग जिंकून घेतला होता.यातच एक वसाहत सुरीनामची देखील होती.
वसाहती स्थापन केल्यानंतर डचांनी इटली अॅमेझाॅनची जंगले साफ केली अणि तिथे उसाची शेती करायला सुरुवात केली.
डचांनी उसाची शेती सुरू केली पण तिथे शेतीमध्ये अणि साखरेच्या कारखान्यात काम करण्यासाठी त्यांच्याकडे पुरेसे मजदुर उपलब्ध नव्हते.मग मजुर मिळवण्यासाठी नेदरलँड् मधील वेस्ट इंडिया कंपनीने आफ्रिका देशातील लोकांना गुलाम बनवुन दक्षिण अमेरिका मधील सुरीनाम येथे आणण्यास सुरुवात केली.
आफ्रिकन गुलामांना आणल्यानंतरही डचांना आणखी मजुरांची आवश्यकता भासु लागली ज्यामुळे त्यांनी भारतावर राज्य करत असलेल्या ब्रिटीशांसोबत मजुरांकरीता व्यवहार करणे सुरू केले.
१८७३ मध्ये ब्रिटीश सरकार अणि सुरीनाम देशात मजुरांना सुरीनाम मध्ये पाठविले जाईल असा एक करार झाला.यात बिहार अणि उत्तर प्रदेशच्या सीमेवरील असलेल्या भोजपुरी मजुरांची निवड करण्यात आली होती.
भोजपुरच्या पट्ट्यातील सर्व गरीब मजदुरांना सुरीनाम देशात मजुरीसाठी पाठविण्यात आले.भारतातुन निघत असताना मजदुरांना सुरीनाम येथे नेले जात आहे अशी माहिती देखील देण्यात आली होती.
पण मजदुरांना ते निराक्षर असल्यामुळे सुरीनाम हे भारतातील श्रीराम नावाचे एक गाव किंवा तीर्थस्थळ आहे हा एक दुसरा देश आहे हे भारतीय मजदुरांच्या लक्षात आलेच नाही.
सर्व मजदुर आपण राम मंदिरात जातो आहे ह्या उत्सुकता मध्ये कोलकता मधील बंदरातुन जहाजात बसले मजल दर मजल करत हे जहाज भारत अणि आफ्रिका खंडाला वळसा घालत दक्षिण अमेरिका येथील उत्तर भागात जाऊन पोहोचले.
जहाज उतरल्यावर मजुरांना लक्षात आले की ते श्रीराम तीर्थस्थळी आले नसुन दक्षिण अमेरिका देशातील सुरीनाम ह्या देशात आले आहेत.
मग ह्या सर्व मजदुरांना सुरीनाम येथे उसाच्या शेतात एखाद्या गुलामाप्रमाणे बळजबरीने राबवुन घेण्यात आले.हयाच भारतीय मजुरांच्या अपार मेहनत कष्टाच्या जोरावर पुढे सुरीनाम हा देश अस्तित्वात आला.
१६ जुले २०२० रोजी भारतीय हिंदु चाल्स संतोखी हे सुरीनाम ह्या देशातील राष्ट्रपती बनले होते.चालस संतोखी ह्यांच्याच हस्ते द्रौपदी मुर्मु यांना the grand order of the chain of yellow star हा पुरस्कार देऊन सन्मानित केले गेले आहे.