आरबीआयने लाॅच केला अंतर्दृष्टी डॅशबोर्ड – RBI launches Antardrishti Dashboard in Marathi

आरबीआयने लाॅच केला अंतर्दृष्टी डॅशबोर्ड RBI launches antardrishti dashboard in Marathi

नुकतेच भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शशीकांत दास यांनी एक आर्थिक समावेशन financial inclusion डॅशबोर्ड लाॅच केला आहे.ज्याचे नाव अंतर्दृष्टी डॅशबोर्ड असे ठेवण्यात आले आहे.

आरबीआयच्या अनेक धोरणात्मक उपक्रमांची अंमलबजावणी करून आर्थिक समावेशनाला पाठिंबा देण्याच्या दिशेने हे आणखी एक नवे पाऊल आहे.

ह्याचा मुख्य हेतु आर्थिक समावेशनात वाढ घडवून आणने हा आहे.

सध्या वर्तमान काळात ह्या डॅशबोर्डचा उपयोग आरबीआयच्या अंतर्गत केला जाणार आहे.पण भविष्यात यात मल्टी स्टेक होल्डर दृष्टीकोन अवलंबला जाणार आहे.

देशातील प्रत्येक व्यक्तीला आर्थिक सेवा पुरविण्यावर भारतीय रिझर्व्ह बँक कडून भर दिला जात आहे.

RBI launches Antardrishti dashboard in Marathi

अंतर्दृष्टी डॅशबोर्डची वैशिष्ट्य कोणकोणते आहे?

  1. अंतर्दृष्टी डॅशबोर्ड हे देशात मोठ्या प्रमाणावर वित्तीय सेवांच्या कमतरतेचे क्षेत्र शोधुन काढेल अणि त्यावर काम करेल.
  2. अंतर्दृष्टी प्रासंगिक डेटाला रेकाॅर्ड करेल अणि आर्थिक समावेशनाच्या प्रगतीचे मोजमाप करेल अणि त्याचा मागोवा घेण्यासाठी आवश्यक ते ज्ञान देखील प्रदान करणार आहे.
  3. हे निर्धारित मानकांनुसार आर्थिक समावेशनाच्या प्रगतीचे मूल्यांकन करेल आणि हे आर्थिक समावेशनाच्या प्रगतीच्या देखरेखीसाठी देखील उपयुक्त ठरणार आहे.
  4. आर्थिक समावेशनाची व्याप्ती मोजण्यासाठी आरबीआयने २०२१ मध्ये आर्थिक समावेशन एफ आय इंडेक्स लाॅच केले होते.यामध्ये,प्रवेश,गुणवत्ता आणि उपयुक्तता या आधारावर आर्थिक समावेशकता मोजली जाते.
See also  युपीआय पेमेंटच्या मर्यादेत आरबीआयने वाढवली मर्यादा - UPI Lite Transaction Limits increased