कालीचरण महाराज कोण आहेत?
मागील एक दोन महिन्यांपासून आपणास पुणे मुंबई सारख्या शहरापासून गावाखेडयात देखील कालीचरण महाराज यांच्या नावाचे पोस्टर पाहावयास मिळत आहे.
रोज आपणास महाराष्ट्र राज्यातील कुठल्या ना कुठल्या ठिकाणी कालीचरण महाराज यांचा कार्यक्रम आहे अशी अधिसूचना प्राप्त होत असते.
अशावेळी आपल्यातील खुप जणांच्या मनात हा प्रश्न निर्माण होत असेल की हे कालीचरण महाराज नेमकी आहे तरी कोण?अणि महाराष्ट्रात लोकांमध्ये त्यांची एवढी प्रसिद्धी का आहे
आजच्या लेखात आपण आपल्या मनात निर्माण होत असलेल्या ह्याच सर्व प्रश्नांची उत्तरे जाणुन घेणार आहोत.
कालीचरण महाराज कोण आहेत?
कालीचरण महाराज यांचे खरे नाव अभिजित सारंग असे आहे.कालीचरण महाराज हे त्यांच्या वादग्रस्त वक्तव्य विधान करण्यासाठी प्रचलित आहे.
बागेश्वर बाबा उर्फ धीरेंद्र शास्त्री कोण आहेत?
अभिजित सारंग यांचे नाव कालीचरण कसे पडले?
अभिजित सारंग ज्यांना आज सर्वलोक कालीचरण महाराज ह्या नावाने ओळखतात.यांचे नाव कालीचरण कसे पडले हे त्यांनी एका स्वता आपल्या तोंडुन एका मुलाखतीत सांगितले होते ते म्हणाले होते की
लहानपणी माझा एक अपघात झाला होता ज्यामुळे माझ्या पायाला गंभीर इजा देखील झाली होती.माता कालीची पुजा अर्चना केल्यामुळे महाकालीने मला ह्या संकटातुन बाहेर काढले आलेल्या संकटातुन तारले.
तसेच कालीचरण महाराज हे देखील म्हणाले की त्यांची आजी त्यांना सांगायची की ते रात्री झोपेत असताना देखील काली मातेचा मंत्रजाप करायचे.
अशा पद्धतीने कालीमातेची विशेष कृपादृष्टी माझ्यावर आहे म्हणून मी काली मातेची पूजा अर्चा करू लागलो.अणि तेव्हापासून माझ्या मनात धार्मिक गोडी निर्माण झाली.
जेव्हापासुन मी कालीमातेची पुजा अर्चा करायला सुरुवात केली तेव्हापासून मी तिचाच पुत्र झालो आहे मी माझे सर्व जीवन महाकालीच्या चरणात व्यतीत करावयाचा निर्णय केला आहे.
मी आता माझे संपूर्ण जीवन महाकालीच्या सेवेकरीता अपर्ण करणार आहे.यामुळेच माझे नाव कालीचरण पडले असे कालीचरण महाराज यांनी दिलेल्या एका मुलाखतीत सांगितले आहे.
कालीचरण महाराज मुळचे कुठले आहेत?
अभिजित सारंग उर्फ कालीचरण महाराज हे मुळचे महाराष्ट्र राज्यातील अकोला जिल्ह्यातील शिवाजी नगर येथील राहणारे आहेत.
असे सांगितले जाते की कालीचरण महाराज यांच्या पित्याचे एक मेडिकल स्टोअर्र आहे.
कालीचरण महाराज एवढे प्रसिद्ध कसे झाले?
कालीचरण महाराज यांचा अकोला येथील एका मंदिरात शिवतांडव गातानाचा एक व्हिडिओ सोशल मिडिया वर खुप व्हायरल झाला होता त्यामुळे ते एवढे प्रसिद्ध झाले असे सांगितले जाते.
कालीचरण महाराज यांनी मराठी भजनाचे गायन केलेला व्हिडिओ महाराष्ट्र राज्यातील जनतेत खुप व्हायरल झाला अणि तेव्हा लोकांच्या मनात कालीचरण महाराज यांचे आकर्षण अधिक वाढले.
कालीचरण महाराज हे मुळचे महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असल्याने अणि त्यांचे बालपण शिक्षण सर्व इथेच झाल्याने त्यांचे मराठी उत्तम असल्याचे सांगितले जाते.
कालीचरण महाराज यांचे शिक्षण किती झाले आहे?
कालीचरण महाराज यांचे शिक्षण फक्त आठवीपर्यंत झाले आहे.
कालीचरण महाराज उर्फ अभिजित सारंग यांनी स्वता सांगितले होते की त्यांना शिक्षणात फारशी रूची नसल्याने ते शाळेत जायच्या नावाने इतर लहान मुलांप्रमाणे आजारी पडल्याचे नाटक करायचे.कालीचरण महाराज लहानपणी खुप खोडकर असल्यामुळे शाळेतुन नेहमी त्यांच्या बद्दल तक्रारी यायच्या असे महाराजांनी सांगितले आहे.
यामुळे पालकांनी मावशीकडे शिक्षणासाठी पाठवले पण तिथे देखील त्यांचे मन लागले नाही.हयाच दरम्यान कालीचरण उर्फ अभिजित सारंग हे एका महाराजांच्या संपर्कात आले अणि त्या महाराजांच्या संपर्कामुळे त्यांचा अध्यात्माकडे कल वाढु लागला.अभिजित सारंग यांना महाराजांनी आपल्या खामगाव येथील आश्रमाची जबाबदारी सोपवली होती.
कालीचरण महाराज नेहमी लाल वस्त्रे का परिधान करतात?
कालीचरण महाराज नेहमी लाल वस्त्र परिधान करतात यामागचे कारण सांगताना ते म्हणाले होते की ते पंधरा सोळा वर्षांचे होते त्यांच्या गुरूने त्यांना लाल वस्त्रे परिधान करण्यास सांगितले होते तेव्हापासून ते नेहमी लाल वस्त्रे परिधान करतात.
याचसोबत कालीचरण महाराज असे देखील म्हणतात की त्रषी मुनी कोणताही मेक अप करत नसतात वसतारा देखील मारत नसतात.अणि आपल्या जटा वाढवत असतात.
पण कालीचरण महाराज यांना छान आकर्षक डिझाईन केलेले वस्त्र परिधान करायला आवडते.याचसोबत महाराज दाढी देखील करतात कारण त्यांना नेहमी नीटनेटके राहणे अधिक पसंत आहे.
कालीचरण महाराज आपल्या ह्या नीटनेटके राहणे दाढी वगैरे करणे आकर्षक डिझाईन असलेले वस्त्र परिधान करणे यामुळे ते स्वताला कुठलाही त्रषी मुनी म्हणवून घेत नाही.
कालीचरण महाराज यांना राजकारणात देखील रूची होती त्यांनी अकोल्यातील महानगरपालिकेच्या एका निवडणुकीत ते उभे देखील राहीले होते पण यात त्यांना फक्त २५० मत मिळाली होती
कालीचरण महाराज यांचा पेहराव कसा आहे?
कालीचरण महाराज हे लाल वस्त्रे परिधान करतात अणि कपाळावर एक मोठा कुंकू देखील लावतात.
कालीचरण महाराज लोकांच्या चर्चेत येण्याचे मुख्य कारण काय आहे?
कालीचरण महाराज यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या विषयी एक वादग्रस्त विधान वक्तव्य केले होते त्यामुळे ते वादाचा मुद्दा देखील बनले होते.
छतीसगढ येथील एका धर्मसंसदे मध्ये ते गांधींच्या आक्षेपार्ह बोलले होते त्यांच्या ह्या एका विधानामुळे कालीचरण महाराज वादात सापडले होते.ज्यामुळे त्यांना छतीसगढ पोलिसांनी मध्य प्रदेश मधून त्यांना अटक देखील केली होती.
आता पुन्हा एकदा त्यांनी गांधीविषयी वादग्रस्त वक्तव्य केल्याने ते पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत.