बागेश्वर बाबा उर्फ धीरेंद्र शास्त्री कोण आहेत? – Bageshwar Maharaj

बागेश्वर बाबा उर्फ धीरेंद्र शास्त्री कोण आहेत? – Bageshwar Maharaj

बागेश्वर बाबा हे नेहमी आपल्या कोणत्या ना कोणत्या वादग्रस्त वक्तव्यासाठी,विधानासाठी जनसामान्यांच्या सतत चर्चेत राहत असतात.

सतत टीव्ही तसेच न्यूज चॅनलवर त्यांच्या केलेल्या वेगवेगळ्या वादग्रस्त वक्तव्यासाठी नेहमी झळकताना आपणास दिसून येतात.

आजच्या लेखात आपण बागेश्वर बाबा उर्फ धीरेंद्र कृष्ण शास्त्री हे नेमकी कोण आहेत ते आपल्या वादग्रस्त विधानांमुळे वक्तव्यांमुळे एवढे चर्चेत का असतात याच्या विषयी सविस्तरपणे माहिती जाणून घेणार आहोत.

कोण आहेत बागेश्वर बाबा उर्फ धीरेंद्र शास्त्री?का एवढे चर्चेत आहेत?

आपल्या दिव्यदृष्टीने आपणास प्रत्येकाच्या मनातले सर्व काही ओळखता येते असा दावा बागेश्वर बाबा उर्फ धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या कडुन केला जातो.

बागेश्वर बाबा यांना बागेश्वर धाम सरकार या नावाने देखील ओळखले जाते.बागेश्वर बाबा यांचे वय ३०ते ३१ इतके आहे.एखादया हिरो सारखी परसनॅलिटी असलेल्या ह्या तरूणाला सर्व जण बागेश्वर बाबा असे म्हणतात.

बागेश्वर महाराज यांच्याविषयी असे सांगितले जाते की एखादी व्यक्ती जेव्हा आपली समस्या घेऊन यांच्यासमोर येत असते तेव्हा महाराज ती व्यक्ती समोर येताच एका कागदावर लिहायला सुरुवात करतात.

आलेला व्यक्ती येताच महाराजांना त्याचे नाव काय आहे?तो कुठे राहतो? त्याची समस्या काय आहे हे महाराजांना सांगु इच्छितो तितक्याच हे महाराज त्याच्या हातात आपला लिहिलेला एक कागद ठेवतात.

महाराजांनी त्या सर्व गोष्टी कागदामध्ये आधीच लिहिलेल्या असतात ज्या कुठलीही समस्या घेऊन येणारा व्यक्ती त्यांना आल्यावर सांगणार असतो.ज्या त्याने महाराजांना सांगितलेल्या नसतात पण त्या सर्व गोष्टी त्याच्या मनात असतात.

See also  युनिसेफ ची कार्य काय असतात ? UNICEF full form in Marathi

यानंतर मग जय सीताराम अशी घोषणा महाराजांच्या दरबारात होते.अणि मग महाराज त्या व्यक्तीला त्याच्या समस्येवर काय उपाय करता येईल हे सांगत असतात.

अशी ही बागेश्वर बाबा यांची ख्याती आहे असे सांगितले जाते की त्यांच्याकडे कुठलीही समस्या घेऊन येणारा व्यक्ती काहीही बोलण्याआधी हे बाबा त्याच्या मनातले ओळखतात अणि ते सर्व काही कागदावर लिहून त्याच्या समोर ठेवतात.
असे यांच्याविषयी सांगितले जाते.

काही व्यक्ती याला दैव चमत्कार मानतात तर कोणी अंधविश्वास भोंदुगिरी म्हणुन नाकारताना देखील दिसुन आले आहे.

बागेश्वर बाबा कसे अणि कुठुन उदयास आले?

मध्यप्रदेश मधील छतरपुर जिल्ह्यातील गडा ह्या गावात बागेश्वर धाम आहे.असे सांगितले जाते की ह्या गडा हनुमानाचे अणि महादेवाचे जागृत देवस्थान सुद्धा आहे.

असे सांगितले जाते की ह्या हनुमानाच्या मंदिरात तीनशे वर्षे पुर्वी एक महाराज होते ज्यांचे नाव बालाजी महाराज असे होते.

बालाजी महाराज यांना दिव्य शक्ती प्राप्त आहे असे तेथील लोक म्हणायचे.पण आज ह्या महाराजांच्या नंतर ह्या गावात असे विशेष काहीच दिसुन येत नसल्याचे म्हटले जाते.

जशी गावातले एखादे छोटे मोठे मंदिर असते जिथे गावातील सर्वसामान्य चार पाच मंडळी येते बसते अणि निघुन जाते तसे हे गावातील मंदिर होते.

पण पुढे जाऊन पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या आगमनामुळे ह्या मंदिराला बागेश्वर महाराज धाम म्हणुन प्रसिद्धी ख्याती प्राप्त झाली.

धीरेंद्र कृष्ण शास्त्री म्हणजेच बागेश्वर बाबा हे एक सर्वसामान्य गरीब घरातील व्यक्ती होते.धीरेंद् कृष्ण शास्त्री हे जातीने ब्राह्मण असल्याने गावातील सर्व पूजा अर्चा धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांचे वडील करायचे.

पण अशी मान्यता होते की धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या आजोबा यांना दिव्यदृष्टी प्राप्त होती.याच मंदिरात त्यांचा दरबार भरत असे पण ते फार प्रसिद्ध नव्हते.

पुढे जाऊन धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी खुप अल्प वयामध्ये आपल्या वडिलांच्या संपर्कात येऊन दरबार भरवायला आरंभ केला.आठवडयातुन दोनदा म्हणजे मंगळवार अणि शनिवारी हा दरबार भरवला जात असे.

See also  What is a Philanthropist? - परोपकारी म्हणजे काय - दानशूरता

धीरेंद्र शास्त्री आपल्या दरबारात समस्या घेऊन येणारया याचकाने त्याची समस्या सांगण्याअगोदर त्याच्या मनात कोणत्या समस्येबाबत विचार सुरू आहे हे त्याला सांगु लागले.यामुळे जनसामान्यांमध्ये मनातील ओळखणारा महाराज म्हणुन त्यांची चर्चा होऊ लागली.

असे सांगितले जाते की धीरेंद्र कृष्ण शास्त्री उर्फ बागेश्वर बाबा यांनी फक्त पाच ते सहा वर्षांच्या कालावधीत ही सर्व किर्ती प्राप्त केली आहे.

अणि बागेश्वर बाबा खुप कमी कालावधीत लाखो करोडो लोकांच्या चर्चेत येण्यासाठी सोशल मिडिया कारणीभूत आहे त्यांचे हेच चमत्कारांचे व्हिडिओ वेगवेगळ्या सोशल मिडिया वर हळूहळू व्हायरल होऊ लागले अणि संपूर्ण भारतात त्यांची किर्ती वारयासारखी पसरली.

बागेश्वर बाबा यांच्या दरबारात प्रवेश करण्याच्या अटी नियम –

बागेश्वर बाबा यांच्या बागेश्वर सरकार धाम मध्ये प्रवेशाकरीता काही अटी लागु करण्यात आल्या आहेत.महाराजांच्या दिव्य दरबारात सहभागी होण्यासाठी भाविकांना येथे आधी टोकन घ्यावे लागते मगच कुठल्याही भाविकांना दिव्य दरबारात प्रवेश दिला जात असतो.

इथे महाराजांच्या दरबारात समस्या घेऊन गेलेल्या भाविकाला टोकन मिळवण्यासाठी आधी नारळ बांधण्याची देखील प्रथा आहे.

यात एखादयाला लग्नाविषयी समस्या असल्यास त्याला पिवळया रंगाच्या कापडात नारळ बांधावे लागते.एखादा सवसामान्य प्रश्न असेल तर लाल रंगाच्या कापडात नारळ बांधावा लागतो.

अणि ज्यांना भुतबाधेसंबंधी काही समस्या असेल त्यांना काळया कापडात हा नारळ बांधावा लागतो.

नारळ बांधल्यानंतर भाविकांना टोकन दिले जाते टोकन प्राप्त करताना भाविकाला त्याचा नाव गाव अणि पत्ता देखील देणे आवश्यक असते.यानंतर ज्याचा नंबर लागतो त्याला दरबारात बागेश्वर बाबा यांच्या पुढे जाण्याची संधी प्राप्त होत असते.यासाठी बागेश्वर धामकडुन आपणास संपर्क केला जातो असे सांगितले जाते.

बागेश्वर बाबा कशामुळे नेहमी चर्चेत असतात-

बागेश्वर बाबा उर्फ धीरेंद्र शास्त्री हे त्यांच्या कडुन केल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या वादग्रस्त वक्तव्य विधानांमुळे अधिक प्रसिद्ध अणि प्रचलित झाले आहेत.यामुळेच ते नेहमी चर्चेचा विषय ठरतात.

See also  राजकीय वर्तुळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या डिग्री वरून वाद का पेटला आहे? - PM Modi Degree Row