राजकीय वर्तुळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या डिग्री वरून वाद का पेटला आहे? – PM Modi Degree Row

राजकीय वर्तुळात नरेंद्र मोदी यांच्या डिग्री वरून वाद का पेटला आहे? – Pm Modi Degree Row

राजकीय वर्तुळात सध्या एकच विषयावर जोरात वाद पेटलेला आपणास दिसून येत आहे तो विषय आहे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची डिग्री.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची डिग्री फेक आहे का असा प्रश्न राजकीय वर्तुळात उपस्थित केला जात आहे.

आजच्या लेखात आपण ह्याच विषयावर सविस्तरपणे माहीती जाणुन घेण्याचा प्रयत्न करणार आहोत नक्की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या डिग्री वरून पेटलेला हा वाद आहे तरी काय?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या डिग्री वरून पेटलेला वाद सर्वप्रथम कुठुन सुरू झाला?

दिल्ली येथील मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी देशाला अडाणी अणि अशिक्षित पंतप्रधान मिळणे ही देशासाठी एक धोक्याची बाब आहे असे नरेंद्र मोदी यांच्यावर टविटर वरून टविट करत मोदीं विषयी टिका करताना म्हटले आहे.

तसेच देशाचे पंतप्रधान एकुण किती शिकलेले आहेत हे जाणुन घेण्याचा अधिकार आम्हाला नाही का त्यांची डिग्री बघण्यासाठी मागितली तर आमच्यावर दंड आकारला जाणार का?असा सवाल देखील अरविंद केजरीवाल यांनी ट्विटर द्वारे केला आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे आहे की अरविंद केजरीवाल यांनी नरेंद्र मोदी किती शिकलेले आहेत त्यांच्या डिग्री विषयी सविस्तरपणे माहिती प्राप्त करण्यासाठी

दिल्ली अणि गुजरात विद्यापीठाकडे माहीतीच्या अधिकारांतर्गत माहीती मागितली होती.पण विद्यापीठाच्या वतीने नरेंद्र मोदी यांच्या शिक्षणाविषयी कुठलीही माहिती देण्यास स्पष्टपणे नकार देण्यात आला होता.

मग अरविंद केजरीवाल यांनी माहितीच्या अधिकारा अंतर्गत हायकोर्टात नरेंद्र मोदी यांच्या डिग्री विषयी माहिती प्राप्त करण्यासाठी एक याचिका दाखल केली होती.

ज्यावर गुजरात हायकोर्टाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या डिग्री विषयीच्या मुदया संदर्भात एक निकाल दिला आहे.

See also  Mission Majnu review in Marathi

ज्यात हाय कोर्टाने नरेंद्र मोदी यांच्या डिग्री विषयी माहिती प्राप्त करण्यासाठी अरविंद केजरीवाल यांनी जी याचिका केली होती ते फेटाळून लावली आहे.अणि केजरीवाल यांना नरेंद्र मोदी यांच्या डिग्री विषयी कुठलीही माहिती देण्यास स्पष्टपणे नकार दिला आहे.

सोबतच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या डिग्री विषयी माहिती जाणून घेण्यासाठी माहीतीच्या अधिकाराखाली याचिका दाखल केल्याबद्दल अरविंद केजरीवाल यांना २५ हजार रुपये इतका दंड देखील हाय कोर्टात ठोठावला गेला आहे.

अणि पंतप्रधान यांच्या डिग्री विषयी माहिती जाणून घेण्याची कुठलीही आवश्यकता नाही असे देखील अरविंद केजरीवाल यांना बजावले आहे.

यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या डिग्रीचा वाद जोरात चर्चेत आला आहे.

नरेंद्र मोदी आपली डिग्री दाखवायला एवढी टाळाटाळ का करता आहे?नरेंद्र मोदी यांची डिग्री फेक आहे का?पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या डिग्री विषयी माहिती जाणुन बुजुन लपविण्याचा गुप्त ठेवण्याचा प्रयत्न केला जातो आहे का?देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी नेमकी किती शिकले आहेत?असे अनेक प्रश्न मोदींच्या शिक्षणा विषयी राजकीय वर्तुळात उठविले जात आहे.

अनेक नेते यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी अडाणी आहेत,त्यांची डिग्री बोगस आहे,असे आपले टीकात्मक भाष्य न्युज चॅनलवर करताना आपणास दिसून येत आहेत.

याचसोबत संजय राऊत यांनी मोदींची राज्यशास्त्र ह्या विषयातील डिग्री क्रांतीकारक असल्याचा दावा केला आहे अणि ती संसदेच्या गेटवर टांगायला हवी जेणेकरून सर्वाच्या मनातील शंका दुर होतील असा टोला लगावला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे शिक्षण एकुण किती झाले आहे?

इलेक्शन कमिशन कडे म्हणजेच निवडणूक आयोगाकडे नरेंद्र मोदी यांनी सादर केलेल्या एका अॅफेडेव्हीट मध्ये असे दिले आहे की नरेंद्र मोदी यांच्याकडे पदवी अणि पदव्युत्तर अशा दोन पदव्या आहेत.

नरेंद्र मोदी यांनी बीए अणि एम ए अशा दोन डिग्री प्राप्त केल्याचे त्यांनी इलेक्शन कमिशन कडे सादर केलेल्या एका अॅफेडेव्हीट नुसार सांगितले जात आहे.

See also  सीता नवमीचे महत्व काय आहे? ह्या दिवशी सीतेचे पुजन केल्याने कोणते लाभ प्राप्त होतात?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपले हे बीएचे शिक्षण १९७८ मध्ये दिल्ली विद्यापीठातून घेतले आहे अणि एम ए चे शिक्षण त्यांनी गुजरात विद्यापीठातुन घेतले आहे असे यात सांगितले आहे.

२००४,२००९ तसेच २०१४ मधील निवडणुकीत अॅफेडेव्हीट मध्ये नरेंद्र मोदी यांनी हीच माहीती दिली होती.पण २०१४ मधील लोकसभा निवडणुका जाहीर झाल्या अणि नरेंद्र मोदी यांच्या डिग्री विषयी आक्षेप घेण्यास सुरुवात झाली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे शिक्षण नेमके किती झाले आहे यावर चौकशी करण्यासाठी माहीतीच्या अधिकाराखाली अर्ज करावयास अनेक राजकीय नेत्यांनी सुरूवात केली होती.यावर हायकोर्टात याचिका देखील दाखल केल्या गेल्या.

यामध्ये आता दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा देखील समावेश झाला आहे.

असे सांगितले जाते आहे की २०१६ मध्ये केंद्रीय माहिती अधिकार आयोगासमोर अरविंद केजरीवाल यांच्या निवडणूक ओळखपत्रावरील पत्यावरुन एक सुनावली चाललेली होती.

या सुनावणीत केजरीवाल असे म्हटले होते की माझयाविषयी आवश्यक सर्व माहीती मी देतो पण आधी आयोगाने मला नरेंद्र मोदी यांच्या डिग्री विषयी माहिती द्यायला हवी.

केंद्रीय माहिती आयोगाकडुन आपणास नरेंद्र मोदी यांच्या डिग्री विषयी माहिती दिली जात नाहीते तसेच ही माहिती लपविली जात आहे असा आरोप देखील तेव्हा केजरीवाल यांनी केला होता.

मग केंद्रीय माहिती आयोगाकडुन केजरीवाल यांची मोदींच्या डिग्री विषयी माहिती जाणून घेण्याची मागणी आरटीआय चौकशी म्हणून स्वीकारण्यात आली.

मग यानुसार केंद्रीय माहिती आयोगाकडुन दिल्ली आणि गुजरात विद्यापीठ यांना नरेंद्र मोदी यांच्या नावावर असलेल्या सर्व डिग्री विषयी माहिती देण्याचा आदेश दिला गेला.

केंद्रीय माहिती आयोगाचे हा निर्णय घेण्यामागे असे मत होते की निवडणूक लढविण्यासाठी शिक्षण हा महत्वाचा निकष नसला तरी देखील एखादा मुख्यमंत्री पदावरील व्यक्ती पंतप्रधान यांच्या शिक्षणाविषयी माहीती मागत असेल तर ते उचित ठरू शकते.

पण ह्या माहीती आयोगाच्या निर्णया विरोधात गुजरात विद्यापीठाने हाय कोर्टात धाव घेतली अणि मोदींच्या डिग्री विषयी माहिती प्राप्त करण्याचा जो आदेश माहीती आयोगाने दिला आहे तो त्यांच्या अधिकार क्षेत्राच्या बाहेर आहे असे मत गुजरात विद्यापीठाने मांडले होते.

See also  नवीन शैक्षणिक धोरणाचे स्वरूप कसे असणार आहे? New Education policy in Marathi

ह्यावर ३१ मार्च रोजी एक सुनावणी करण्यात आली केंद्रीय माहिती आयोगाने घेतलेला निर्णय गुजरात हायकोर्टाने रद्द बाहय ठरवला.

अणि सांगितले आहे की पंतप्रधान यांच्या शैक्षणिक डिग्री ची माहिती देणे हे माहीतीचा अधिकार अंतर्गत येत नाही ही एक वैयक्तिक माहिती आहे ही देण्याची कुठलीही आवश्यकता नाही असे म्हणत केंद्रीय उच्च न्यायालयाने गुजरात विद्यापीठाला मोदींच्या डिग्री विषयी कुठलीही वैयक्तिक माहिती देण्यास स्पष्टपणे मज्जाव केला.

२०१४ मध्ये देखील हंसराज जैन नावाच्या एका व्यक्तीने दिल्ली विद्यापीठातून पास झालेल्या एन ह्या स्पेलिंगपासुन सर्व उत्तीर्ण उमेदवारांची डिग्री माहीतीच्या अधिकारांतर्गत दाखवावी अशी मागणी केली होती.

पण तुम्हाला रोल नंबर माहीत असेल तर सांगा कारण असे स्पेलिंगनुसार कोणाचीही डिग्री दाखवता येत नाही असे दिल्ली विद्यापीठाने हंसराज जैन यांना सांगितले होते.

अशा विविध कारणांमुळे आतापर्यंत नरेंद्र मोदी यांच्या डिग्री विषयी जाहीर केली गेली नाही म्हणून राजकीय वर्तुळात नरेंद्र मोदी यांच्या डिग्री विषयी संशयाचे वातावरण निर्माण होऊन वाद पेटलेला दिसुन येत आहे.

पण हा राजकीय पक्षांच्या मनात असलेला संशय दुर करण्यासाठी भाजपने अनेकदा प्रयत्न केले असल्याचे सांगितले जाते.

२०१६ मध्ये अरविंद केजरीवाल यांच्या अर्जानुसार केंद्रीय माहिती आयोगाने दिल्ली आणि गुजरात विद्यापीठाला मोदींच्या डिग्री विषयी माहिती देण्याचे आदेश दिले

तेव्हा भाजप नेते अमित शहा अरूण जेटली यांनी ९ मे २०१६ रोजी एक पत्रकार परिषद घेऊन मोदींची बीए एम ए ची डिग्री दाखवली होती.पण ह्या डिग्री सत्य नाही खोटया आहे असे प्रश्न आम आदमी पक्षाने उपस्थित केले असल्याचे सांगितले जाते.

भाजप पक्षाने दाखवलेल्या नरेंद्र मोदी यांच्या दिल्ली विद्यापीठातील बीए ची डिग्री मध्ये मोदींच्या नावाची स्पेलिंग वेगवेगळ्या आहेत.तसेच एम मधील डीग्री यात तारीख देखील चुकीची दिली असल्याचे आरोप करण्यात आले होते.

गुजरात विद्यापीठाने केलेल्या एका ट्विटमध्ये असे सांगितले आहे की मोदी यांनी राज्यशास्त्र विषयात एम केले आहे तसेच गुजरात विद्यापीठाच्या व्हाॅईस चांसेलर यांनी देखील याचे स्पष्टीकरण टविट करून दिले होते.

तरी देखील आजही पंतप्रधान मोदींच्या डिग्री विषयीचा हा वाद काही संपलेला नाही.