डेबिट कार्ड अणि क्रेडिट कार्ड या दोघांमधील फरक – Difference between credit card and debit card in Marathi

डेबिट कार्ड अणि क्रेडिट कार्ड या दोघांमधील फरक – Difference between credit card and debit card in Marathi

मित्रांनो आज आपल्या प्रत्येकाचेच कुठल्या ना कुठल्या बँकेत अकाऊंट आहे.त्यामुळ डेबिट कार्ड अणि क्रेडिट कार्ड हे दोघेही शब्द आपल्यासाठी अपरिचित नाहीये.

कारण आँनलाईन ट्रान्झँक्शन करण्यासाठी आँनलाईन पेमेंट करण्यासाठी प्रत्येक बँक आपल्या बँक खातेधारकास ह्या दोन सुविधा देत असते.

पण आपल्यातील खुप जणांना या दोघांमधील साम्य माहीत असते पण या दोघांत कोणता फरक असतो हे सविस्तरपणे माहीत नसते.

म्हणुन आज आपण डेबिट कार्ड अणि क्रेडिट कार्ड या दोघांमधील साम्य आणि फरक जाणून घेणार आहोत.जेणेकरून आपल्या मनात कुठलीही शंका राहणार नाही.

डेबिट कार्ड –

● डेबिट कार्ड कार्ड हे दिसायला एटीएम कार्ड प्रमाणे असते पण याच्या समोरील बाजुस मास्टर कार्ड,रूपे कार्ड किंवा विझा कार्ड असे लिहिलेले आपणास दिसुन येते.

● डेबिट कार्ड ही एक सुविधा आहे जी बँकेकडुन आपणास दिली जात असते.डेबिट कार्ड हे आपल्या बँक खात्याशी कनेक्टेड असते.

● डेबिट कार्ड दवारे आपणास आपल्या खात्यातुन आँनलाईन पेमेंट करण्यासोबत एटीएममधुन पैसे देखील काढता येत असतात.

● डेबिट कार्ड दवारे स्वाईप मशिनवर स्वाईप करून देखील आपणास पेमेंट करता येत असते.

● डेबिट कार्ड दवारे आपण तेवढेच पैसे काढु शकतो जेवढे आपल्या खात्यावर शिल्लक आहेत.जर आपण जेवढी रक्कम आपल्या खात्यातुन काढु पाहत आहे तेवढी रक्कम आपल्या खात्यात शिल्लकच नसेल तर आपण ती रक्कम आपल्या खात्यातुन काढु शकत नसतो.

● डेबिट कार्ड दवारे आपण जे पैसे आपल्या बँक खात्यातुन काढत असतो त्यावर आपणास कुठलेही व्याज देण्याची गरज नसते कारण आपण आपलेच स्वताच्या मालकीचे बचत केलेले पैसे डेबिट कार्ड दवारे बँकेतून काढत असतो.म्हणुन यावर आपणास कुठलेही व्याज द्यावा लागत नाही.

See also  बिग बॉस मराठी सिजन ४ चा विजेता कोण आहे?Big boss marathi season 4 winner in Marathi

● डेबिट कार्ड हे आपण फक्त भारतातच आपल्या खात्यामधुन पैसे काढण्यासाठी आँनलाईन पैसे ट्रान्सफर करण्यासाठी,एटीएममधुन पैसे काढण्यासाठी वापरू शकतो परदेशात आपण याचा अजिबात वापर करु शकत नसतो.

● डेबिट कार्डवर आकारला जाणारा सर्विस चार्ज क्रेडिट कार्ड वर आकारल्या जाणारया सर्विस चार्ज पेक्षा कमी असतो.

क्रेडिट कार्ड –

● क्रेडिट कार्ड हे प्रत्येक बँक खातेधारकाकडे नसते कारण क्रेडिट कार्डची सुविधा काही मोजकेच व्यक्ती बँकेकडुन तात्पुरता एमरजन्सीमध्ये लोन घेण्यासाठी वापरत असतात.

● यात आपण जेवढे पैसे बँकेकडुन उधार घेत असतो तेवढे पैसे आपल्या खात्यावर पैसे आल्यावर बँक कट करून घेत असते.अणि हे उधार घेतलेले पैसे आपण ठरलेल्या कालावधीत बँकेला ठरलेल्या व्याजासकट जर परत नही केले तर बँक आपल्याकडुन दंड देखील वसुल करू शकते.

● क्रेडिट कार्डचा वापर आँनलाईन ट्रान्झँक्शन तसेच आँनलाईन पेमेंट करण्यासाठी केला जात असतो.पण क्रेडिट कार्ड दवारे आपण आपल्या एटीएममधुन पैसे काढु शकत नसतो.

● क्रेडिट कार्ड दवारे आपण आपल्या खात्यात पुरेशी रक्कम शिल्लक नसताना देखील तात्पुरता खरेदी शाँपिंग वगैरे करण्यासाठी बँकेकडुन काही पैसे उसने म्हणजेच लोन घेऊ शकतो.

● क्रेडिट कार्ड वर जेवढे लोन आपणास दिले जाते त्याचे महिन्याचे एक फिक्स लिमिट ठरलेले असते.त्यापेक्षा अधिक रक्कम आपणास लोन म्हणुन काढता येत नसते.

● क्रेडिट कार्डचा वापर आपण भारतात तसेच भारताच्या बाहेर असताना देखील आँनलाईन ट्रान्झँक्शन तसेच आँनलाईन पेमेंट करण्यासाठी करू शकतो.

● क्रेडिट कार्डवर आकारला जाणारा सर्विस चार्ज डेबिट कार्ड पेक्षा अधिक असतो.

Debit आणि credit म्हणजे काय? – Debit and credit meaning in Marathi